अघटीत भाग १ पद्मनाभची गाडी पोर्चमध्ये शिरली तेच ताबडतोब दोन पोलीस समोर आले आणि त्यांनी गाडीचे दार उघडले . पद्मनाभ त्याची आई ,पत्नी वरदा आणि लेक क्षिप्रा गाडीतुन खाली उतरले आणि बंगल्यात शिरले .त्या “टुमदार” बंगल्यात दोन नोकर ,एक माळी आणि एक कुक त्यांच्या स्वागतासाठी हजर होते . सातार्यातील पोस्टिंग नंतर डी एस पी च्या प्रमोशन वर पद्मनाभ ची बदली नुकतीच पुण्यात झाली होती .आपल्या अंगभूत गुण आणि सचोटी याच्यावर त्याला अत्यंत लहान वयात हे प्रमोशन मिळाले होते .अत्यंत अभिमानास्पद अशी कारकीर्द होती पद्मनाभची .तसे त्याचे वडील पोलीस सेवेतच होते पण त्यांना इतके मोठे प्रमोशन त्यांच्या हयातीत मिळाले
Full Novel
अघटीत - भाग-१
अघटीत भाग १ पद्मनाभची गाडी पोर्चमध्ये शिरली तेच ताबडतोब दोन पोलीस समोर आले आणि त्यांनी गाडीचे दार . पद्मनाभ त्याची आई ,पत्नी वरदा आणि लेक क्षिप्रा गाडीतुन खाली उतरले आणि बंगल्यात शिरले .त्या “टुमदार” बंगल्यात दोन नोकर ,एक माळी आणि एक कुक त्यांच्या स्वागतासाठी हजर होते . सातार्यातील पोस्टिंग नंतर डी एस पी च्या प्रमोशन वर पद्मनाभ ची बदली नुकतीच पुण्यात झाली होती .आपल्या अंगभूत गुण आणि सचोटी याच्यावर त्याला अत्यंत लहान वयात हे प्रमोशन मिळाले होते .अत्यंत अभिमानास्पद अशी कारकीर्द होती पद्मनाभची .तसे त्याचे वडील पोलीस सेवेतच होते पण त्यांना इतके मोठे प्रमोशन त्यांच्या हयातीत मिळाले ...अजून वाचा
अघटीत - भाग-२
अघटीत भाग २ वरदाच्या मनात आले खरेच अगदी धकाधकीचे आयुष्य सुरु होणार आता याचे . नवीन शहर ,नवे लोक जबाबदार्या आणि वेगवेगळी कामातली नवनवीन आव्हाने !!! या सर्वाची कल्पना तिला पद्मनाभने आधीच देऊन ठेवली होती . आता तो घरासाठी किंवा कुटुंबां साठी फार वेळ देऊ शकणार नव्हता . सर्व काही आता वरदालाच बघावे लागणार होते . तसेही नवरा पोलीस असल्याने पूर्वी पण ड्युटी चोवीस तास होतीच . तरी पण कौटुंबिक आयुष्य चांगले होते . कोल्हापूर सांगली बदल्या झाल्या तरी त्या तिघी सातार्यातून कुठेच गेल्या नाहीत . पद्मनाभ बदलीच्या गावी जाऊन येऊन रहात होता . आता प्रमोशन नंतर त्या सर्वांचे ...अजून वाचा
अघटीत - भाग-३
अघटीत भाग ३ अशा रीतीने एकदा सगळ्या गोष्टी मार्गी लागू लागल्या . प्रतिमा आणि तिचे कुटुंब पुण्यात आले आणि थोडे दिवस तिच्या नवर्याला ट्रेनिंग असल्याने तिची दोन मुले आणि ती पद्मनाभ कडेच राहिली होती . तिची मुले शाळेत जाणारी होती .त्यांचे पण शाळेतले दाखले व्हायचे होते . मग काय ती दोघे आणि क्षिप्रा नुसता घरभर दंगा चालू होता . पद्मनाभची आई लेकी सोबत अगदी खुष होती . स्वयंपाकपाणी काहीच नसल्याने प्रतिमा पण खुष होती . फक्त आई वहिनी सोबत गप्पा आणि अधून मधून गाडीतुन पुण्यात फिरणे .. मस्त एन्जॉयमेंट चालली होती तिची . नव्या कॉलेज मध्ये प्रवेश झाल्यापासून क्षिप्रा ...अजून वाचा
अघटीत - भाग-४
अघटीत भाग ४ हल्ली त्या तिघी मैत्रिणी शिवानीच्या गाडीतून कॉलेजमध्ये जात व इतर वेळी पण गाडीतुन एकत्र भटकत .पण तिची मैत्रीण गाडी घेऊन घेई न्यायला आली आहे हे क्षिप्राच्या घरी पटले नसते . शिवाय बाबाने जर असे काही पाहीले असते तर नक्कीच अनेक प्रश्न विचारल असते . म्हणून मग ती नेहेमी प्रमाणे घरून रीक्षाने निघत असे व कोपर्या पर्यंत जाऊन रीक्षा सोडुन देत असे . तिथे शिवानी आणि नायरा तिची वाट पाहत असत ..मग तिघी एकत्र निघत . तिच्या उशिरा कॉलेजला जाण्यावरून आईने पण एकदोन वेळेस तिला टोकले होते . पण तिने अशीच उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेली ...अजून वाचा
अघटीत - भाग -५
अघटीत भाग ५ गाडीत बसल्यावर काही इतर बोलणे सुरु असताना गौतम अचानक क्षिप्राला म्हणाला . मला तु खुप आवडतेस आजपर्यंत सांगायची संधीच मिळाली नव्हती हे सांगायला हे ऐकुन क्षिप्रा मनातून खुप आनंदली कारण तिच्या पण बरेच दिवस हे मनात होते . ग्रुपमध्ये अनेक जण होते… काहीतर खुप देखणे होते .. पण गौतमचे स्टायलिश रहाणे तिला मोह घालायचे . सहा फुट उंच असलेला गौतम रंगाने सावळा होता पण शरीराने भरदार होता . शिवाय कायम उत्तमोत्तम कपडे अंगात असायचे ..वेगवेगळे शूज , गोगल्स आणि त्याच्याकडे दोन तीन अलग अलग प्रकारच्या गाड्या पण असायच्या ज्या परदेशी बनावटीच्या होत्या . शिवाय ओठात सतत ...अजून वाचा
अघटीत - भाग ६
अघटीत भाग ६ खरेतर पद्मनाभच्या आईला क्षिप्रा मधला फरक स्पष्ट दिसत होता . पोरगी वेळी अवेळी घरी येत असते, करताना कधीच दिसत नसे आणि सतत मोबाईलवर असे हे जाणवत होते . तिच्या मैत्रिणी पण जरा अति आगावू आहेत . कसले कसले कपडे घालते ही पोरगी आणि विचारले की उत्तर ही नीट देत नाही हे ही त्यांना समजले होते .यापूर्वी त्यांची आणि क्षिप्राची चांगली गट्टी असायची. मनातले सगळे ती आई बाबाच्या आधी आजीला सांगत असे . दोघी एकत्र जेवत एकत्र झोपत .. एकमेकीत छान छान गमती शेअर करीत पण आजकाल ती गंमत ही संपली होती. तिचा वेळेत घरी यायचा पत्ता ...अजून वाचा
अघटीत - भाग ७
अघटीत भाग ७ दुसर्या दिवशी कॉलेजला गेल्यावर क्षिप्राच्या आजीने तिच्या आईला वरदाला बोलावले . आणि तिला जे जे काही बाबत संशयास्पद वाटत होते ते बोलून दाखवले. वरदा पण थोडी काळजीत पडली ,तिने ठरवले आता थोडे कड्क धोरण घ्यायला हवे . पद्मनाभच्या कानावर पण घालावे असे तिला वाटले पण सध्या तो फार गडबडीत होता बरीच टेन्शन होती ..त्यात आणखीन ही भर नको असा विचार करून ती शांत राहिली . मात्र क्षिप्राला तिने थोडी समज दिली ,थोडे गोड बोलूनच हे काम करायला हवे होते ना .. क्षिप्राने पण थोडा कांगावा केला ... पण आईने सांगितले ते आपल्याला पटले असे दाखवले . ...अजून वाचा
अघटीत - भाग ८
अघटीत भाग ८ रात्री दहा वाजता पद्मनाभ घरी आला आल्याबरोबर ताबडतोब हात पाय धुवुन जेवण टेबलावर आला वरदाने त्याला पुसायला टॉवेल दिला आणि वाढायला घेतले . बरेच दिवसांनी असा तो घरी जेवायला आला होता. आजकाल उशीर झाला तर तो बाहेरच खात असे . दोघे जेवायला बसली ..”प्रिन्सेस जेवली का आमची ?त्याने विचारले . “हो रे ती आणि आई दोघीपण जेवल्या आणि झोपल्या सुद्धा .. आता गेले कित्येक दिवस तुझी माझी सुद्धा भेट होत नाहीये . मग जेवताना पद्मनाभने तिला सांगितले त्याला दोन दिवस सुट्टी मिळाली आहे तेव्हा ते सर्व कुठेतरी जाऊ शकतात खुप दिवस झाले ते सर्व असे निवांत ...अजून वाचा
अघटीत - भाग ९
अघटीत भाग ९ नाश्ता टेबलवर नाश्ता करताना क्षिप्राने खुप आनंदी असल्याचा आव आणला होता . कारण बाबा बरेच काही होता ...त्याचे बरेचसे बोलणे तिच्या कानावर फक्त पडत होते . मनात मात्र विचारांची गर्दी होती . आई दोनतीन वेळ म्हणाली सुद्धा ...”अग नीट खा ना लक्ष कुठाय तुझे ?.. खोलीत फोन सायलेंट वर ठेवला होता पण त्यावर गौतमचे कॉल असणार ही तिला खात्री होती . सर्वांचे आवरल्यावर ड्रायव्हरने सर्वांचे सामान गाडीत नेऊन ठेवले . सर्वजण बाहेर पडताना वरदा कुलूप लावायला घेणार इतक्यात क्षिप्रा म्हणाली “आई थांब थांब माझा मोबाईल घरातच राहीला आहे . “ये पटकन .... बाबा गाडीत जाऊन बसलाय ...अजून वाचा
अघटीत - भाग १०
अघटीत भाग १० दुसरे दिवशी पासुन नेहेमीचे रुटीन सुरु झाले . क्षिप्रा कॉलेजला गेली पण गौतम नसल्याने ग्रुपमध्ये जायचे मन नव्हते . रात्री काही महत्वाचे फोन आल्याने खुप वेळ पद्मनाभ जागा होता त्यामुळे त्याला उशीरच झाला उठायला . चहा घ्यायला तो बाहेर आला तेव्हा वरदा स्वयंपाकाच्या तयारीला लागली होती . कुकला काही सुचना देत होती नंतर तिला बाजार करायसाठी जायचे होते . चहा पितापिता त्याने क्षिप्राची चौकशी गेली . तिला डबा दिला का विचारले . तेव्हा वरदा म्हणाली अरे ती कॉलेज कुमारी आहे आता डबा नाही नेत . बाहेर हॉटेल मध्ये खाणे असते आजकाल .. पद्मनाभला आठवले त्याच्या कॉलेजच्या ...अजून वाचा
अघटीत - भाग ११
अघटीत भाग ११ आजकाल महानगरातील विवाहित स्त्रियांना सुद्धा याची भुरळ पडते आहे . रेव्ह पार्ट्या आणि ठाणे, मुंबई महानगर प्रदेशातील मादक पदार्थांचे मार्केट यांचे थेट संधान समोर आले आहे. बाजारपेठेत येणारे कोणतेही नवे ड्रग्ज किंवा मादक पदार्थ आधी या रेव्ह पार्ट्यांमध्येच चाखले जातात. या पार्ट्या म्हणजे मादक पदार्थांचे टेस्ट सेंटरच बनल्या आहेत. रेव्ह पार्टी म्हणजे दारू, नाच-गाणं, ड्रग्ज आणि सेक्स यांचं कॉकटेल असतं. रेव्ह पार्टी अत्यन्त गुप्तपणे एखाद्या निर्जनस्थळी आयोजित करण्यात येते. मुंबई ठाण्यातील सुमारे 150 हुन अधिक बड्या हॉटेल्स आणि क्लब अशा रेव्ह पार्ट्यांचे आयोजन अत्यंत गुप्तपणे करतात. त्यासाठी या आयोजकांनी वेगवेगळे व्हॉट्सअँप ग्रुप बनवले आहेत. या ...अजून वाचा
अघटीत भाग १२
अघटीत भाग १२ रेव्ह पार्टिज मध्ये 20 हजार, 30 हजार या 60 हजार वाट चे म्यूजिक सुद्धा वाजत असते सुपर फास्ट असते . या सुपर फास्ट संगीताच्या आणि नशेच्या मिश्रणाने सगळी बंधने तुटून जातात आणि मग युवा आपल्या आदिम स्वरूपामध्ये येतो . नाचता नाचता इष्काची लहर आली कित्येक रेव्ह पार्टिज मध्ये त्याचीही व्यवस्था केलेली असते . रेव्ह पार्टीच्या जागेवर त्याच्यासाठी झोपड्या तयार केलेल्या असतात. तिथे अनिर्बंध सेक्सची सोय असते .पार्टनर ची अदलाबदल करणे हे तर यामध्ये एकदम “कुल “ समजले जाते यामध्ये भाग घेणाऱ्या बिंदास युवकांसाठी सेक्स आणि प्रेम यांच्या नैतिकतेला कोणतेच महत्व नसते . या पार्टीत ही युवा ...अजून वाचा
अघटीत भाग १३
अघटीत भाग १४ ही सर्व माहिती ऐकताना आणि स्लाईड शो बघताना पद्मनाभ चक्रावून गेला . विशेषतः पार्टीत नाचणाऱ्या मुलांचे निर्लज्ज मुलींचे बीभत्स आणि अर्धनग्न व्हिडीओ पाहून त्याला शिसारी आली . पद्मनाभला नवल वाटत होते ,काय असेल अशा मुलींची अवस्था आणि काय असेल त्यांचे भविष्य ? राहून राहून त्याला वाटत होते या मुलींच्या पालकांचे इतके कसे दुर्लक्ष होत असेल मुलींकडे आणि मुली पण इतक्या कशा बेदरकार ...? जवळ जवळ अशीच भावना इतर अधिकाऱ्यांची पण झाली होती . यानंतर प्रश्नोत्तराचा सेशन होता . बर्याच जणांनी बरेच प्रश्न विचारले . त्यात महत्वाचा प्रश्न हाच होता की या मुलांच्या पालकांना याबद्दल समजत नाही ...अजून वाचा
अघटीत - भाग १४
अघटीत भाग १४ त्या दिवशी गौतमचा मेसेज तिला मिळाला तो नुकताच परदेशातून परतला होता ,त्याने तिला घरी भेटायला बोलावले क्षिप्राचे मन थरारून उठले त्याला भेटायची आस तिला होतीच . घरी बोलावले म्हणजे घरच्या लोकांशी ओळख करून देतोय वाटत ..!! असा विचार मनात येताच ती खुप आनंदली . त्याने संध्याकाळी पाच वाजता भेटायची वेळ दिली होती ,पण आज वेळेचा तिला काही प्रोब्लेम नव्हता कारण काल आई दोन दिवसासाठी सातारला गेली होती,उद्या यायची होती . आजी तर अजुन आत्याकडेच होती . साडेचारला क्षिप्रा तयार झाली . आज तिने स्लीवलेस पंजाबी घातला होता आणि ओढणी पण घेतली होती . गौतमच्या घरच्या लोकांना ...अजून वाचा
अघटीत - भाग १५
अघटीत भाग १५ आणि मग जे घडु नये ते घडले .... तिच्या आयुष्यातला हा पहीलाच अनुभव होता .. थोड्या देणारा असला तरी खुपच थरारक होता .. क्षिप्रा थोडी भानावर आली आणि तिला जाणवले .. बाप रे हे काय घडले आपल्या हातुन ? आपण स्वतःला सावरायला हवे होते .. पण आता वेळ निघून गेली होती .. त्याच्या बाहुपाशातून स्वतःला सोडवत क्षिप्रा म्हणाली “ गौतम सावर स्वताला ..आता जायला हवे मला घरी... उशीर होतोय .. असे बोलून तिने कुडता परत घातला आणि मागे हात करून चेन लाऊ लागली पण गौतमने तिला परत बेडवर ओढले ..आणि तिचा कुडता परत बाजूला केला “काय ...अजून वाचा
अघटीत - भाग १६
अघटीत भाग १६ सकाळ झाली आणि क्षिप्रा रूम मधून बाहेर आली . काल रात्री उशिरा झोप लागल्याने ती उठली नऊ वाजून गेले होते . तिच्या मनात थोडी धाकधूक होतीच ... पण तिच्यासाठी आजचा दिवस वेगळाच होता . कारण घरात एकच गडबड चालली होती .. आजी चहा पीत होती आणि बाबा तिच्या शेजारी बसून बोलत होता . आई कसले तरी डबे ,थर्मास भरत होती . “आई कधी आलीस तु ? कसली ग चाललीय गडबड ..? क्षिप्राने विचारताच आईने सांगितले ती नुकतीच आली होती सातारहुन आत्याच्या नवऱ्याला आज सकाळी अपघात झाला होता . रस्त्यातील लोकांनी त्यांना दवाखान्यात दाखल केले होते आणि ...अजून वाचा
अघटीत - भाग १७
अघटीत भाग १७ क्षिप्राने पाहीले दारात गौतमचा मित्र हसत उभा होता . ती थोडी संकोचली आणि तिने स्वतःला जास्तच लपेटले आणि मान खाली घातली त्यांच्यात काहीच बोलणे होईना तेव्हा संकोचाने तिने मान वर केली तर काय .. त्याने आपले कपडे काढायला सुरवात केली होती आणि तिच्या समोरच तो नग्न झाला .. ‘तिने प्रश्नार्थक गौतमकडे पाहीले गौतमने तिला जवळ ओढले आणि म्हणाला “घाबरू नको ग आपलाच आहे तो .आणि त्या दोघांनी एकमेकांच्या हातावर टाळी दिली . काही समजायच्या आतच गौतमच्या मित्राने तिच्या अंगावरचे पांघरूण ओढले आणि तिला उघडे केले . तिचे नग्न शरीर बघताच तो अक्षरशः पिसाळला .. आणि त्याने ...अजून वाचा
अघटीत - भाग १८
अघटीत भाग १८ दुसऱ्या दिवशी सकाळी क्षिप्राला जाग आली तेव्हा दहा वाजून गेले होते . तिचे डोके चांगलेच जड होते ,बेड वरून उठायला पण कठीण जात होते . अंगदुखी ,मळमळ..काहीतरी विचित्रच वाटत होते . ती तशीच उठली आणि स्वयंपाक घरात गेली . मावशी नाश्ता तयार करून स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या होत्या. बाबा आणि आई पण केव्हाच बाहेर पडले होते . मावशीनी तिला चहा नाश्ता देऊ का विचारले...पण क्षिप्राने इतक्यात नको असे सांगितले आणि ती परत आपल्या खोलीत परतली . तिला काहीच सुचेना मग दरवाजा लावून तिने सिगारेटचे पाकीट काढले आणि सिगारेट ओढू लागली .. काल गौतमने आणलेल्या ब्रांडची सिगारेट खुप ...अजून वाचा
अघटीत - भाग १९
अघटीत भाग १९ दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर ती चहा घेण्यासाठी स्वयंपाक घरात गेली . आजही तिला तसे बरे वाटत ,पुर्ण विश्रांती घ्यायचे तिने ठरवले होते . आजची संध्याकाळची पार्टी तिच्यासाठी खुप खास असणार होती . गौतमने तिच्यासाठी खुप खर्च केला होता आणि तिलाही खुप उत्सुकता होती त्याची . टेबलावर बाबा,आई दोघेही चहा घेत बसले होते .. बाबा तिच्याकडे पाहून हसला ..”हेल्लो प्रिन्सेस कशी आहेस बेटा .. कॉलेजला नाही का जायचे ? आणि असा का दिसतो आहे तुझा चेहेरा ... बरे वाटत नाही का पिल्लूला ?..असे म्हणून बाबाने तिचा हात प्रेमाने हातात घेतला . कधी चिंकी तर कधी प्रिन्सेस तर ...अजून वाचा
अघटीत - भाग २० - अंतिम भाग
अघटीत भाग २० रात्री नऊ वाजता पद्मनाभ घरी आला . आज दिवसभर भरपूर पळापळी झाली होती त्यामुळे खुपच थकला . सकाळपासून जेवायला पण फुरसत नव्हती मिळाली वरदा नुकतीच दवाखान्यातून येत होती . आता परत जेऊन तिला डबा घेऊन जायचे होते . पद्मनाभला बघुन ती म्हणाली” बरे झाले आलास रे.. जेऊया एकत्रच .. सकाळी लवकर गेला आहेस ते आलाच नाहीस ना आज परत .. मावशी सांगत होत्या “ तिच्याशी काही बोलायच्या आधी पद्मनाभ क्षिप्राच्या खोलीकडे निघाला खोलीत डोकावल्यावर त्याला दिसले क्षिप्रा पाठमोरी बेडवर झोपली होती . तो परत येऊन हातपाय धुऊन जेवायला आला तेव्हा वरदा म्हणाली “अरे आज जरा तिला ...अजून वाचा