Aghatit - 12 books and stories free download online pdf in Marathi

अघटीत भाग १२

अघटीत भाग १२

रेव्ह पार्टिज मध्ये 20 हजार, 30 हजार या 60 हजार वाट चे म्यूजिक सुद्धा वाजत असते ,एकदम सुपर फास्ट असते .

या सुपर फास्ट संगीताच्या आणि नशेच्या मिश्रणाने सगळी बंधने तुटून जातात आणि मग युवा आपल्या आदिम स्वरूपामध्ये येतो .

नाचता नाचता इष्काची लहर आली कित्येक रेव्ह पार्टिज मध्ये त्याचीही व्यवस्था केलेली असते .

रेव्ह पार्टीच्या जागेवर त्याच्यासाठी झोपड्या तयार केलेल्या असतात.

तिथे अनिर्बंध सेक्सची सोय असते .पार्टनर ची अदलाबदल करणे हे तर यामध्ये एकदम “कुल “ समजले जाते यामध्ये भाग घेणाऱ्या बिंदास युवकांसाठी सेक्स आणि प्रेम यांच्या नैतिकतेला कोणतेच महत्व नसते .
या पार्टीत ही युवा पिढी एसिड, इक्सटैसी पीणार रात्रभर ट्रांस म्यूजिक वर नाचणार 'हट' मध्ये सेक्स करणार आणखीन काय ?
खंडाळा आजकाल रेव्ह पार्ट्यांचा स्वर्ग मानला जातो .
रेव्ह चे निमंत्रण देताना आयोजक खुप काळजी घेतात .चुकून जरी त्यांच्या सर्किट च्या बाहेर ही खबर गेली तर गोंधळ होऊ शकतो .

मुंबई, खंडाळा, पुणे, पुष्कर पासून आता रेव्ह पार्ट्या मनाली पर्यंत पोचल्या आहेत .
या नशेच्या धुंदीमुळे रेव्ह पार्टीचे नियम बदलले आहेत आधी या पार्ट्या मोकळ्या जागी होत आता मात्र लपून छपून केल्या जातात .

मुंबई मध्ये पडलेल्या छाप्या नंतर पूर्ण देशभरातील रेव्ह कम्युनिटी मध्ये जणु काही रेड अलर्ट लागला आहे .
या पार्ट्यामध्ये ट्रांस म्यूजिक वाजवणाऱ्या दिल्लीच्या डीजेनी या संदर्भात मात्र आपली तोंडे बंद ठेवली आहेत .
बरेचसे डीजे असा आव आणतात की जणु काही त्यांना रेव्ह पार्ट्या विषयी काहीच कल्पना नसते .
परंतु खरी गोष्ट ही आहे की ते भोळे नाहीत याउलट त्यांना या पार्ट्यामधील अंतर्गत सर्व बित्तंबातमी असते दिल्लीच्या आस्पासचे जवळ जवळ सर्व डीजे या रेव्ह पार्ट्यामुळेच मालामाल व्हायला लागले आहेत .
महरौली आणि गुड़गाँवच्या एकांतात असलेल्या फार्म हाउसमध्ये हे डीजेच त्यांच्या नाइट लाइफला रंगीत संगीत बनवत आहेत

दिल्लीच्या रेव्ह ग्रुप मधले रेव्ही इसराइल, ईराण आणि फ्रांसच्या फिरंगी सर्किट मध्ये अधिक सामील होतात .
अशा पार्ट्या मध्ये नेहमी जाणार्यांना “मनु” म्हणतात .
रेव्ह आता फक्त धंदा नाही राहिला
हा आता जवळच्या मित्रांसोबत मन रमवायचा छंद झाला आहे .
ते सगळे आपापसात पैसे गोळा करतात आणि मग मौजमस्ती करतात .
मुंबई मध्ये धाडी पडल्यानंतर मात्र रेव्ह पार्ट्यामध्ये नवीन सदस्यांचे येणे एकदम बंद झाले आहे .
कारण हे नवे लोकच गड़बड़ करतात, उगाच शायनिंग मारण्यासाठी कुणालातरी सांगतात आणि मग या पार्ट्या पोलिसांच्या नजरेत येऊ शकतात .
या पार्ट्यात मुलींची संख्या लक्षणीय असते .
इकडे आपण मुलांपेक्षा मुलींची संख्या कमी आहे अशी तक्रार करीत असतो पण या रेव्ह पार्ट्यांच्या संदर्भात मुलीनी मुलांना चक्क खुप मागे टाकले आहे .
शंभर रेव्ह युवामध्ये मुलींची संख्या 60 असते .
यामध्ये एयरहोस्टेस सुद्धा नेहेमीच सामील असतात .

या पार्टी मध्ये जर कोणी तरुण सतत न थांबता डान्स करीत असेल तर नक्कीच तो इक्सटेसी सेवन केलेला असतो .
प्रश्न फक्त ड्रगसेवन हा नसतो .
अशा पार्टीत जायची किंमत सुद्धा डबल द्ययला लागते .
सेक्स संदर्भात सुद्धा काही विदेशी लोक बेशरम पणाची हद्द पार करीत असतात .
मुली या साठी काहीही किंमत द्यायला तयार असतात .
कोणताही रंग, स्वाद व गंध नसलेल्या रेप डेट ड्रग या नावाच्या कुख्यात ड्रगच्या कह्यात येऊन रेव्ह पार्टीत जाणार्या नवशिक्या मुली आपला सत्यनाश करून घेत असतात .

हार्ट केयर फाउंडेशन चे अध्यक्ष आणि नशेची सवय सोडण्यासाठी युवकांना सल्ला देणारे डॉ. म्हणतात की जर कोणी दूध, चहा अथवा पाण्यात मिसळून हे ड्रग दिले तर अजिबात पत्ता लागत नाही .
याचा परिणाम असा होतो की या मुलींच्या बाबतीती काहीही झाले तरी या मुली आनंदाच्या धुंदीत असतात ,त्यांना वाटत असते आपण डेट वर आहोत .
आणि या धुंदीतून शुद्ध आल्यावर त्यांना आपल्या बरोबर काय काय झाले आहे हे आठवत सुद्धा नाही.

क्रमशः


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED