Aghatiti - 11 books and stories free download online pdf in Marathi

अघटीत - भाग ११

अघटीत भाग ११


आजकाल महानगरातील विवाहित स्त्रियांना सुद्धा याची भुरळ पडते आहे .

रेव्ह पार्ट्या आणि ठाणे, मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील मादक पदार्थांचे मार्केट यांचे थेट संधान समोर आले आहे. बाजारपेठेत येणारे कोणतेही नवे ड्रग्ज किंवा मादक पदार्थ आधी या रेव्ह पार्ट्यांमध्येच चाखले जातात. या पार्ट्या म्हणजे मादक पदार्थांचे टेस्ट सेंटरच बनल्या आहेत.

रेव्ह पार्टी म्हणजे दारू, नाच-गाणं, ड्रग्ज आणि सेक्स यांचं कॉकटेल असतं. रेव्ह पार्टी अत्यन्त गुप्तपणे एखाद्या निर्जनस्थळी आयोजित करण्यात येते. मुंबई ठाण्यातील सुमारे 150 हुन अधिक बड्या हॉटेल्स आणि क्लब अशा रेव्ह पार्ट्यांचे आयोजन अत्यंत गुप्तपणे करतात. त्यासाठी या आयोजकांनी वेगवेगळे व्हॉट्सअँप ग्रुप बनवले आहेत. या ग्रुपमध्ये फक्त अशाच लोकांना सामील करून घेतलं जातं जो अत्यन्त गुप्तपणे अशा पार्ट्यांना हजेरी लावतो व त्याची बाहेर कुठेही वाच्यता करत नाही.

या ग्रुपच्या माध्यमातून मेसेज टाकून या पार्ट्यांची प्रसिद्धी केली जाते. रेव्ह पार्ट्यात सहभागी होण्यासाठी लागणारी एन्ट्री फी, दारू व ड्रग्जचे प्रकार आणि इतर सुख-सुविधांची यादी या ग्रुपवर वेळीवेळी टाकण्यात येते. साहजिकच या यादीत अश्लीलतेचा प्रकार देखील सामील असतो.
अशा रेव्ह पार्ट्या खासकरून विकेंडला आयोजित करण्यात येतात.

सध्या मुंबई-ठाण्यात अशा पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याने आयोजक अलिबाग, खंडाळा, कर्जत अशा ठिकाणी या पार्ट्या आयोजित करतात. नवनव्या ड्रग्जच्या प्रकारांच्या जाहिरातीसाठी देखील या रेव्ह पार्ट्या कुप्रसिद्ध आहेत.

एखाद्या ड्रग्ज माफियाने नवा ड्रग्जचा प्रकार मार्केटमध्ये आणला की त्याचा नमुना अशा पार्ट्यांमध्ये फुकट वाटला जातो. हे ड्रग्ज अत्यंत घातक व शरीरावर खोलवर परिणाम करणारे असतात. नवा ड्रग्जचा प्रकार नमुना म्हणून तरुणांना दिला की त्याची जाहिरात होते व मागणी वाढू लागते. त्या ड्रग्जला कोड लँग्वेज मध्ये काय म्हणायचं, ते कुठे उपलब्ध होईल व त्याची किंमत काय असणार ह्या सगळ्या बाबी अशा पार्ट्यांमध्ये प्रसिद्ध केल्या जातात.

एकप्रकारे रेव्ह पार्टी म्हणजे ड्रग्ज विक्रीचा सगळ्यात मोठा प्लँटफॉर्मच आहे. पेपरबॉम्ब म्हणजेच एलएसडी पेपर, एमडी, ए़फेड्रीन, बाटला, क्रिस्टल, एमडीएम, अस्प्रिंन, क्रॅक, हॅश, हुक्का पेन, बच्चू टॅबलेट, कोकेन आदी नवनव्या ड्रग्सची येथे सर्रास विक्री केली जातेय.
इतकेच नव्हे तर पोलिसांना गुंगारा देण्यासाठी कफ सिरप, व्हाईटनर, डोकेदुखीत वापरण्यात येणारे बाम, पॉवरफुल पेन किलर आदी औषधींचा देखील नशेसाठी सर्रास वापर करण्यात येतो.
हे सारे ड्रग्ज इतके पावरफुल असतात की ते सेवन केल्यावर आपण सुपरहिरो असल्याचा भास होऊ लागतो म्हणून तरुण मुलं ते सेवन करून सलग आठ-आठ तास डिजेवर नाचतात.
या रेव्ह पार्ट्यांची दुसरी काळी बाजू म्हणजे अश्लीलता व सेक्स रॅकेट होय.
मध्यंतरी पोलिसांनी मारलेल्या छाप्यात देखील एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल सात अभिनेत्री नको त्या अवस्थेत सापडल्या होत्या. या अभिनेत्रींना टीव्ही सिरीयल मध्ये काम मिळणे अवघड झाले की मग त्यांना पैसा मिळेनासा होता. त्यात झगमगत्या दुनियेत सिलिब्रिटी म्हणून लागलेला ब्रँड जपणे गरजेचं होऊन बसतं. गाडी, फ्लॅटचे भाडे, कपडे व इतर खर्च या सार्‍यांवर महिन्याकाठी लाखो रुपये खर्च होतात.
मग हा खर्च करायचा कसा ?असा प्रश्न पडला की या क्षेत्रातील तरुणींना पहिलाच मार्ग असतो तो हाय प्रोफाइल कॉलगर्ल बनण्याचा.
काही सुसंस्कृत घरातल्या तरुणी हा मार्ग कधीच स्वीकारत नाहीत, मात्र ज्यांना झगमगत्या दुनियचं व्यसन जडतं ते या गलिच्छ व्यवसायात पाय ठेवतात. मुंबई, पुणे, नाशिक, अलिबाग अशा कितीतरी ठिकाणी रेव्ह पार्टीवर पडलेल्या पोलिसांच्या छाप्यात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा काळा चेहरा जगासमोर आला आहे.

महाराष्ट्रात वर्षभरात सुमारे तीन हजारांहून अधिक रेव्ह पार्ट्यांचे आयोजन केले जात असल्याचा अंदाज पोलीस वर्तवतात.

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या आकडेवारीनुसार, 2017 या वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्रात 144 ठिकाणी रेव्ह पार्ट्यांवर पोलिसांनी धाडी टाकल्या आहेत. त्यात 3 हजार 234 लोकांना अटक करण्यात आली.

2018 या वर्षभरात 256 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या असून पाच हजारांहून अधिक जणांना अटक करण्यात आली.
या पार्ट्यांमध्ये अनेक बेरोजगार अभिनेत्री हाय प्रोफाइल कॉलगर्ल म्हणून सहभागी होतात. आतापर्यंत अटक केलेल्यांमध्ये 35 ते 40 सेलिब्रिटींची नावे या प्रकारच्या केसेसमध्ये अडकली आहेत.पार्टीबद्दल माहिती देण्यात आली होती.

कधी कधी रेव्ह पार्टी आयोजन करणाऱ्यानं दारूचा परवाना घेतलेला असतो पण परवान्यापेक्षा देखील जास्त प्रमाणावर दारू सदर ठिकाणी आढळून आलेली दिसते .

इतकी दारू की जणु काही दारूच्या नद्यांच वाहात आहेत


क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED