Aghatiti - 10 books and stories free download online pdf in Marathi

अघटीत - भाग १०

अघटीत भाग १०

दुसरे दिवशी पासुन नेहेमीचे रुटीन सुरु झाले .
क्षिप्रा कॉलेजला गेली पण गौतम नसल्याने ग्रुपमध्ये जायचे तिचे मन नव्हते .
रात्री काही महत्वाचे फोन आल्याने खुप वेळ पद्मनाभ जागा होता त्यामुळे त्याला उशीरच झाला उठायला .
चहा घ्यायला तो बाहेर आला तेव्हा वरदा स्वयंपाकाच्या तयारीला लागली होती .
कुकला काही सुचना देत होती नंतर तिला बाजार करायसाठी जायचे होते .
चहा पितापिता त्याने क्षिप्राची चौकशी गेली .
तिला डबा दिला का विचारले .
तेव्हा वरदा म्हणाली अरे ती कॉलेज कुमारी आहे आता डबा नाही नेत .
बाहेर हॉटेल मध्ये खाणे असते आजकाल ..
पद्मनाभला आठवले त्याच्या कॉलेजच्या काळात त्याला खुप वाटायचे बाहेर खावे ..मजा करावी .
पण घराची परिस्थिती इतकी कठीण होती की अशी चैन परवडणारी नव्हती .
सुदैवाने मुलीच्या नशिबात आहे तर करू दे मजा ..
“करू दे ग एन्जोय आणि हेच तर दिवस आहेत तिचे मजा करायचे .
आणि तिला काय कमी आहे बाप मोठ्या पोस्टवर आहे तिचा ..
“हे असे बोलून तिला लाडावून ठेवले आहेस तु “
पद्मनाभ फक्त हसला ..
बर मी गाडी घेऊन बाजारात जाऊन येऊ का ..?
तुला काही आज जायची गडबड दिसत नाहीये ..
“नाही ग बाई ..मी निघालो आता लगेच आवरून
खुप महत्वाची मिटिंग आहे आज सध्या रेव्ह पार्टीज आणि त्यांच्या ऱेड हे सत्र चालू आहे न ?
रेव्ह पार्टी हे काय आहे रे ? मधुरा ने विचारले
“अग मलाही जुजबी माहिती आहे त्याविषयी ,हे सगळे आज आम्हाला मिटिंग मध्ये समजणार आहे त्यासाठी आमचे मोठे साहेब येणार आहेत आणखी बरेच अधिकारी पण येतील
मला गाडीने जायला लागेल ...तु रिक्षाने जा .”
मधुराने त्यला होकार दिला आणि ती पुढच्या कामाला लागली .
पद्मनाभ हेड ऑफिसला पोचला तेव्हा तिथे बरीच वर्दळ वाढली होती
बरेच डी एस पी ,पी एस आय हुद्द्यावरचे लोक येऊन पोचले होते .
आय जी साहेब येणार होते त्यांच्या भाषणासाठी सगळी व्यवस्था ऑफिसच्या मोठ्या हॉल मध्ये केली होती .
बाहेर एकमेकात मिटिंग बद्दल चर्चा चालु होती .
सध्या पुण्याबाहेर अनेक फार्म हाउस आणि मोठ्या बंगल्यातून रेव्ह पार्टीजचे प्रस्थ खुपच वाढले होते .
त्यावरचे उपाय आणि बंदोबस्त कसा करता येईल अशासाठी होती आजची मिटिंग .
पद्मनाभ पण आपल्या काही मित्रांसोबत आत जाऊन बसला.
मिटिंग सुरु झाली ..आजचा अजेंडा अतिशय महत्वाचा आणि सेन्सिटीव विषय होता.
“रेव्ह पार्टी “
रेव्ह पार्टीज आणि त्याच्यावर घातल्या जाणाऱ्या धाडी याविषयी जुजबी माहिती त्याला होती .
सातारला असताना पुण्याच्या बातम्या त्याच्या कानावर पडत होत्या .
पण त्या धाडीमध्ये आता एक मोठा अधिकारी म्हणून त्याला स्वतःला भाग घ्यायला लागणार होता .
मोठ्या साहेबांचे भाषण सुरु झाले सोबत स्लाईड शो पण चालू होता .
त्यात त्यांनी अनेक मुद्दे विशद केले .
हाय सोसायटी मध्ये रहाणार्या मुलामुलींच्या मध्ये या पार्ट्या चालतात .
या पार्ट्या छुप्या पद्धतीने आयोजित केल्या जातात
रेव्ह पार्टी म्हणजे दारू , ड्रग्स, म्यूजिक, नाचगाणे आणि अनिर्बंध सेक्‍स चे कॉकटेल असते . महानगरामध्ये युवक युवती यांच्यात रेव्ह विषयी आकर्षण वाढतच चालले आहे .
रेव्ह पार्टी ड्रग पेडलर्ससाठी व्यवसायातील सर्वात अनुकूल ठिकाण बनले आहे कारण या पार्टिज मध्ये बेकायदेशीर ड्रग्‍स घेतले जातात .
यांची नावे आहेत एसिड और इक्सटैसी.
हे ड्रग्स बेकायदेशीर आहेत हे आपण त्यांना विकू शकत नाही आणि वापरु शकत नाही, परंतु ते रेव्ह पार्ट्यांमध्ये सहज उपलब्ध असतात.
हे ड्रग्स घेतल्यावर तरुण तरुणी सलग आठ तासपर्यंत डान्स करू शकतात .हे ड्रग्स घेतल्यामुळे त्यांच्यात उत्साह निर्माण होतो आणि सतत नाचण्याचे वेड निर्माण होते .
ज्यांच्याजवळ पैसे असतात ते एसिड व इक्सटेसी सारखे महागडे ड्रग घेतात .
ज्याच्याकडे इतके पैसे नाहीत ते हशीश श्रूम्स ,किंवा चरस गाँजावरच भागवून घेतात .एसिड, इक्सटैसी पिऊन रात्रभर ट्रांस म्यूजिकवर नाचायचे आणि मग छोट्या झोपड्यातून सेक्स करायचे यातच या मुलांची सगळी इतिकर्तव्यता असते .


क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED