Aghatit - 5 books and stories free download online pdf in Marathi

अघटीत - भाग -५

अघटीत भाग ५

गाडीत बसल्यावर काही इतर बोलणे सुरु असताना गौतम अचानक क्षिप्राला म्हणाला .
मला तु खुप आवडतेस पण आजपर्यंत सांगायची संधीच मिळाली नव्हती हे सांगायला
हे ऐकुन क्षिप्रा मनातून खुप आनंदली कारण तिच्या पण बरेच दिवस हे मनात होते .
ग्रुपमध्ये अनेक जण होते… काहीतर खुप देखणे होते ..
पण गौतमचे स्टायलिश रहाणे तिला मोह घालायचे .
सहा फुट उंच असलेला गौतम रंगाने सावळा होता पण शरीराने भरदार होता .
शिवाय कायम उत्तमोत्तम कपडे अंगात असायचे ..वेगवेगळे शूज , गोगल्स आणि त्याच्याकडे दोन तीन अलग अलग प्रकारच्या गाड्या पण असायच्या ज्या परदेशी बनावटीच्या होत्या .
शिवाय ओठात सतत सिगारेट असलेले त्याचे जाडजूड ओठ आणि त्यावरच्या मिशा तिला फारच सेक्सी वाटत .
गाडी चालवताना एका हाताने गौतमने क्षिप्राचा हात दाबला.
आणि विचारांच्या तंद्रीत असलेली क्षिप्रा भानावर आली.
“बोल ना ग मी काहीतरी सांगतो आहे तुला .
तिच्याकडे पहात गौतम म्हणाला ..
आता क्षिप्राने त्याच्या नजरेला नजर दिली ..
आणि हलकेच संमतीची मान डोलावली ..
तिचा अविर्भाव पहाताच गौतम एकदम खुष झाला .
ग्रुप मधली ही देखणी बांधेसूद पण जरा गावंढळ मुलगी त्याला खुप आवडली होती .
कधीतरी तिला मिठीत ओढावे अशी त्याची इच्छा होती ..
पण इतक्या पटकन ती हो म्हणेल अशी त्याला कल्पना नव्हती .
आणि अचानक गाडी एक वळण घेऊन मागे फिरली ..
क्षिप्राच्या छातीत धडधड होऊ लागली ..पण अनामिक आकर्षण तर होतेच ..
गाडी एका सुनसान जागी थांबली ..
गौतमने क्षिप्राला हलकेच जवळ ओढले आणि घट्ट धरून तिच्या ओठावर ओठ ठेवले .
अचानक असे घडल्याने क्षिप्रा बावरून गेली ..
पण तिच्याही नकळत ती त्याला प्रतिसाद देऊ लागली.
त्याच्या खोलवर चुंबनात ती बुडून गेली
काही क्षणात ती भानावर आली आणि तिने स्वतःला सोडवून घेतले .
“प्लीज चल घरी मला उशीर होतोय .”
“ओके ओके बेबी नको चल सोडतो घरी तुला ..
असे बोलून मनातून थोड्या नाराज झालेल्या गौतमने गाडी परत वळवली
घराच्या जवळ गाडी येताच तिने गौतमला अलीकडे थांबायला सांगितले आणि त्याचा निरोप घेऊन ती खाली उतरली.
गौतमने निरोप घेताना तिचा हात हातात घेऊन कीस केले
“वाट पहातोय आपल्या पुढच्या भेटीची .”.असे तो तिच्याकडे पाहून म्हणाला
क्षिप्राने त्याच्याकडे हसून पाहिले आणि ती घराकडे वळली .
ती घरी पोचली तेव्हा आठ वाजून गेले होते ..
आई अजुन घरात आलेली दिसत नव्हती ..बाहेरच्या खोलीत आजी टीवी पाहत होती .
“अग क्षिप्रा काय हा उशीर सकाळी नऊला गेली आहेस आत्ता येतेस ..काय हे
आजीची सरबत्ती ऐकुन क्षिप्रा एकदम भांबावली .
अग आजी असेच कॉलेज झाल्यावर अभ्यास करीत होते मैत्रिणीकडे म्हणून उशीर झाला ग “
इतका कसला अभ्यास ग ? जेवणा खाण्याची पण शुध्द नाही का ?
“काय हे आजी जेवल्या शिवाय राहीन का मी ?
तुला माहित आहे न मला भुक आवरत नाही ,शिवानीच्या घरी जेवले ग मी
तिच्या आईने खुप आग्रह केला होता .”
“बर चल आता हात पाय धुवून कपडे बदल बरे ..आणि ये खिचडी खायला
आपण दोघी एकत्र जेवूया .”.
क्षिप्रा आत कपडे बदलायला गेली
“बाहेर तो ड्रायव्हर आहे का बघ ग ...सिगारेट चा वास येतोय ..
आजी बाहेरून ओरडून म्ह्णाली ..
“या ड्रायवरला किती वेळा सांगितल इतकी सिगारेट ओढू नको पण ऐकत नाही मेला ..”
आजी करवादली
अग बाहेर कोणीच नाही तुला कसला वास येतोय?..चल आता जेवायला .
शिल्पाने विषय टाळला ..तिच्या लक्षात आले की हा सारा गौतमच्या चुंबनाचा परिणाम होता
त्याच्या तोंडात सारखीच सिगारेट असते ..
आणि तो वास आजीच्या नाकाने बरोबर ओळखला आहे

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED