Aghatit - 7 books and stories free download online pdf in Marathi

अघटीत - भाग ७

अघटीत भाग ७

दुसर्या दिवशी कॉलेजला गेल्यावर क्षिप्राच्या आजीने तिच्या आईला वरदाला बोलावले .
आणि तिला जे जे काही क्षिप्रा बाबत संशयास्पद वाटत होते ते बोलून दाखवले.
वरदा पण थोडी काळजीत पडली ,तिने ठरवले आता थोडे कड्क धोरण घ्यायला हवे .
पद्मनाभच्या कानावर पण घालावे असे तिला वाटले
पण सध्या तो फार गडबडीत होता बरीच टेन्शन होती ..त्यात आणखीन ही भर नको
असा विचार करून ती शांत राहिली .
मात्र क्षिप्राला तिने थोडी समज दिली ,थोडे गोड बोलूनच हे काम करायला हवे होते ना ..
क्षिप्राने पण थोडा कांगावा केला ...
पण आईने सांगितले ते आपल्याला पटले असे दाखवले .
नंतर तीन चार दिवस ती अगदी वेळेत कॉलेजला गेली आणि लवकर परत पण आली .
आल्यानंतर असेच आई आजीशी गप्पा केल्या आणि घरीच राहिली .
थोडा आई आणि आजीचा गेलेला विश्वास परत मिळायला हवा ना ..!!
तीन चार दिवस ती ग्रुप सोबत नव्हतीच ..
मग एक दिवस शिवानीने तिला हटकले ..”का ग येत नाहीस आजकाल ?
सगळी वाट पहात आहेत तुझी ..”
तिच्या बोलण्यातून क्षिप्राला समजले गौतम पण कुठे बाहेरगावी गेला होता
तरीही दोन दिवस पुन्हा घरीच राहून तिसर्या दिवशी ती ग्रुप सोबत गेली .
या काही दिवसात तिला सिगारेटची खुप तल्लफ आली होती हे मात्र तिला जाणवल .
सगळा ग्रुप पुन्हा बाहेर पडून एका हॉटेलमध्ये गेला .
गौतमची नजर तिच्यावर होती ..तीही अधूनमधून सर्वांची नजर चुकवून त्याला प्रतिसाद देत होती .
नेहेमी प्रमाणे सिगारेटी काढल्या गेल्या ..
क्षिप्राने हपापल्या सारख्या दोन सिगारेट पटकन काढुन घेतल्या .
गौतमने लायटर पेटवला आणि क्षिप्रा झुरके घेऊ लागली ..
तहानलेल्या माणसाला पाणी मिळाल्यावर जशी अवस्था होते तसे झाले होते तिचे .
सलग तीन सिगारेट ओढल्यावर तिला बरे वाटले .
तिने ठरवले आता एक पाकीट विकत घेऊन घरी जायचे आणि रात्री टोयलेट मध्ये ओढायची .
आज गौतमने येताना दोन इम्पोर्टेड दारूच्या बाटल्या आणल्या होत्या .
थोड्याच वेळात त्या फोडल्या गेल्या आणि सर्वांनी आपले ग्लास उचलून चिअर्स केले .
एक ग्लास गौतमने क्षिप्राच्या पुढे केला ..क्षिप्राने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले .
“अग घे टेस्ट तरी घेऊन बघ ..नाही आवडली तर नको घेऊ “
क्षिप्राच्या मनाची धाकधूक झाली ..एकदम दारू प्यायची ?तिचे धाडस होईना ..
सगळे मित्र मैत्रिणी हसु लागले ..
“सिगारेट ओढताना असेच करीत होतीस पण नंतर आवडायला लागली न “
सोड आता बावळटपणा ..आमच्या ग्रुपमध्ये तु शोभायला हवीस बर का “
मग मात्र तिचा नाईलाज झाला आणि तिने तो ग्लास तोंडाला लावला
पहिल्यांदा घशात थोडी जळजळ झाली ..प्रथम चव नाही आवडली ..
पहिला ग्लास तिने कसातरी संपवला ..
नंतर मात्र तिला एकदम हलके हलके वाटू लागले ..मन पिसासारखे तरल झाले ,
आता सर्वांचीच विमाने तरंगायला लागली होती ..
दुसरा ग्लास गौतमने तिला जवळ ओढुन तिच्या तोंडाला लावला .
फार वेगळा अनुभव होता तो ...
तिचे हे दारू आवडणे गौतमला सुद्धा खुप आवडले
त्याच्या पुढच्या प्लान साठी हे अगदी उत्तम होते ..
मागच्या आठवड्यात घेतलेल्या पुसटशा चुंबनाने त्याची भूक भडकली होती
कधी एकदा क्षिप्राचा संपूर्ण उपभोग घेतो असे त्याला झाले होते .
क्षिप्रा मात्र या गोष्टीविषयी पूर्णपणे अजाण होती
आज क्षिप्रा जास्त न थांबता शिवानी सोबत घरी गेली.
घरी गेल्यावर फोन वाजला ..गौतमचा फोन होता .
“का लवकर गेलीस ? मला तुझ्याशी बोलायचं होत .”
तिने फोन घेताक्षणी समोरून आई आली ..तिने फोन कट केला
आणि थोड्या वेळाने त्याला मेसेज केला आणि फोन कट केला म्हणून माफी मागितली
त्याने पण समजून घेतले आणि परत परत तिला भेटायची इच्छा दाखवली .
मग सुरु झाला चाट सिलसिला ..
तिच्या रुपाची तारीफ ,तिच्यावरच्या प्रेमाची कबुली ...अशा अनेक गोष्टी
त्या रात्री ती पहाट होईपर्यंत त्याच्याशी चाटवर बोलत राहिली ..
या चाट मध्ये त्याने तिला अनेक रोमांटीक गाणी आणि अनेक प्रेमगीतांच्या क्लिप्स पाठवल्या ..
त्यात काही पोर्न क्लिप्स पण होत्या ...बघताना तिचे मन थरारून उठले .
तिच्या आयुष्यात हे आता आणखीन एक वेगळे वळण आले होते .

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED