Aghatit - 18 books and stories free download online pdf in Marathi

अघटीत - भाग १८

अघटीत भाग १८

दुसऱ्या दिवशी सकाळी क्षिप्राला जाग आली तेव्हा दहा वाजून गेले होते .
तिचे डोके चांगलेच जड झाले होते ,बेड वरून उठायला पण कठीण जात होते .
अंगदुखी ,मळमळ..काहीतरी विचित्रच वाटत होते .
ती तशीच उठली आणि स्वयंपाक घरात गेली .
मावशी नाश्ता तयार करून स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या होत्या.
बाबा आणि आई पण केव्हाच बाहेर पडले होते .
मावशीनी तिला चहा नाश्ता देऊ का विचारले...पण क्षिप्राने इतक्यात नको असे सांगितले
आणि ती परत आपल्या खोलीत परतली .
तिला काहीच सुचेना मग दरवाजा लावून तिने सिगारेटचे पाकीट काढले आणि सिगारेट ओढू लागली ..
काल गौतमने आणलेल्या ब्रांडची सिगारेट खुप भारी होती ....ती हवी होती आत्ता
आणि मग तिला दारूची पण प्रकर्षाने आठवण झाली ..
एखादा ग्लास मिळायला हवी होती बरे वाटले असते असे तिला वाटले .
आता ती दारू आणि सिगारेट दोन्हीच्या आहारी गेली होती ..
सिगारेट आणि दारू तिला घरी मिळणार नव्हती .
त्यासाठी तिला गौतमकडे जावेच लागणार होते .
तिने गौतमला फोन केला ..बराच वेळ फोन वाजत होता ...
दारू मिळण्यासाठी ती अगदी अधीर झाली होती
तिची खुप चिडचिड झाली ...कुठे गेलाय कोण जाणे
मग नाईलाजाने तिने कशीतरी आंघोळ करून कपडे वगैरे आवरले ..
तोवर गौतमचा फोन आला ..
तिने अगदी गडबडीने त्याला भेटायची इच्छा दाखवली .
पण तो कुठेतरी कामासाठी बाहेर जाणार होता .
तरीही त्याने तिला सांगितले की तिने कालच्या हॉटेलमध्ये जाऊन वाट पाहावी .
तो तिथे येईल तिला भेटायला काही वेळात ...
आणि तिथे बाकी सर्व व्यवस्था असल्याने ती तिथे थांबू शकते .
खरेतर परस्पर वाट पाहायची ही आयडिया क्षिप्राला नाही आवडली ..
पण तिला दारूची प्रचंड तलफ आली होती .
.असे वाटत होते आता दारू नाही मिळाली तर आपले काही खरे नाही ..
ती पर्स घेऊन बाहेर आली आणि ..कॉलेजला जाते असे मावशीना सांगुन ती बाहेर पडली .
ती हॉटेलमध्ये पोचल्यावर कौंटरवरच तिला गौतमचा तो मित्र भेटला ..
सोबत आणखी एकजण होता .
तिला रूम उघडुन देऊन त्याने बार मधून बाटली आणि ग्लास काढला आणि टेबलवर ठेवला .
काहीतरी खायला आणतो असे म्हणून तो दार लोटून बाहेर गेला .
समोरच कालचे गौतमचे सिगारेटचे पाकीट पडले होते .
ते बघितल्या बरोबर क्षिप्रा अक्षरशः त्याच्यावर तुटून पडली ,दोन सिगारेट तिने लगबगीने ओढल्या .
ग्लासात दारू ओतून घेऊन दोन ग्लास दारू ती घटघट प्यायली ..
तिसऱ्या ग्लासाला तिचे भान हरपले आणि पेला तिच्या अंगावर सांडला..
ती तशीच सोफ्यात पडून राहिली .
अर्धवट जागृत अवस्थेत तिला जाणवले ..गौतमच्या मित्राने तिला उचलुन बेडवर ठेवली होती .
खोलीत आणखी पण एका तरुण होता ..दोघांनी मिळुन तिचे कपडे दूर करायला सुरवात केली ..
क्षिप्राला विरोध करायचा होता ..पण ती काहीच करू शकत नव्हती .
आजूबाजूचे सगळे अंधुक अंधुक दिसत होते ..ओरडावे वाटत होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हता .
बराच वेळ दोघे तिच्या शरीराशी चाळे करीत होते ,...तिचा उपभोग घेत होते ..
तिचा विरोध तोकडा पडत होता किंबहुना तिला काय चाललेय याचे भानच नव्हते .
ते दोघे कधी निघुन गेले तिला समजले नाही .
..खुप वेळाने ती कशीबशी उठली आणि तिने आपले कपडे गोळा केले .
.तोपर्यंत दरवाजा उघडला आणि गौतम आत आला ..ती त्याला घट्ट बिलगली आणि रडू लागली .
गौतमने तिला सोफ्यावर बसवून आपल्या जवळ घेतले आणि तिला कुरवाळू लागला
“डीअर रडतेस कशाला ...काय झालेय तुला
काय सांगावे हेच तिला समजेना ...
ती फक्त मुसमुसून रडत होती
त्याने तिला जवळ घेऊन परत दारूचा भरलेला ग्लास तिच्या तोंडाला लावला ..
आणि तिच्या सोबत बेडवर आला ..परत दार उघडुन ती दोघे आत आली
आता तिघे मिळुन तिचा मनसोक्त उपभोग घेऊ लागले ..
सर्वांची भुक मिटल्यावर परत दारूचे ग्लास भरले गेले
क्षिप्रा तशीच पडून राहिली होती ,नंतर ते दोघे खोलीतुन गेल्यावर गौतम तिला म्हणाल
“चल तुला घरी सोडतो ...क्षिप्राने कपडे गोळा केले .आणि आवरून बाहेर आली .
तिच्या डोळ्यात परत अश्रू पाहून गौतम म्हणाला
“हे बघ असे बारीकसारीक गोष्टीत तुला आता रडून चालणार नाही ..
तुला हे आयुष्य हवे असेल तर एन्जोय करायला शिक
मी तुला आयुष्यातले उतमोत्तम ऐशोआराम दाखवले आहेत .
आता उद्या संध्याकाळी मी तुला एका पार्टीत नेणार आहे .
ती एक हाय प्रोफाईल पार्टी असणार आहे ..
या पार्टीसाठी तिकीट घ्यावे लागते ,खुप खर्चिक असे ते तिकीट मी फक्त तुझ्यासाठी काढणार आहे .
कारण तु मला आवडतेस ..
तिथे तुला एक वेगळी दुनिया पाहायला मिळेल ...जी फक्त अतिश्रीमंत माणसेच पाहु शकतात .
पण रात्री परतायला उशीर होईल .. तुला जमणार आहे का हे ?
तु येणार असशील तर मी सांगेन तसेच तुला तिथे वागायला लागेल.
आणि जर हे काही जमत नसेल तर तसे सांग मी दुसऱ्या मैत्रिणीला घेऊन जाईन..”
हे ऐकुन क्षिप्रा गडबडीने म्हणाली ..”मी ऐकेन सगळे तु सांगितलेले
मी येईन नक्की त्या पार्टीत..
माझ्या घरची रात्रीची परवानगी कशी काढायची ते मी बघेन”
गौतम खुष झाला त्याने ओळखले की ती त्याला नाही म्हणूच शकत नाही
ती आता व्यसनाच्या पूर्ण आहारी गेली आहे .
आणि त्याच्या पुरेपूर कह्यात आली आहे..
त्या दारू आणि सिगारेटची तिला आता सवय होऊ लागली आहे
ती याशिवाय जगूच शकणार नाही आणि कशाला नाही पण म्हणू शकणार नाही .
तिला आता कशीही वापरता येणार होती .
क्षिप्राला मात्र मनात कुठतरी काहीतरी विचित्र वाटत होते ..
पण काय वाटत होते तेच तिला समजत नव्हते
आता नाईलाज होता तिचा ती पूर्ण हतबल झाली होती ..
गौतममध्ये शरीराने आणि मनाने यापूर्वीच गुंतली होती
आणि आता रोज सिगारेट आणि दारू शिवाय तिला जगणे केवळ अशक्य होते .
उद्याच्या रात्रीच्या पार्टीचे ती सहज जमवू शकत होती कारण सध्या घरी कोणी नव्हतेच
आणि तिच्या खोलीचा एक दरवाजा मागच्या रस्त्यावर उघडत होता.
तो वापरता आला असता बाहेर पडायला .
त्यामुळे तसाही काही प्रोब्लेम नव्हता
आणि कोणत्याही परिस्थितीत तिला ही पार्टी चुकवायची नव्हती .
दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळच्या प्लाननंतर गौतमने तिला घरी सोडले .

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED