Aghatit - 15 books and stories free download online pdf in Marathi

अघटीत - भाग १५

अघटीत भाग १५

आणि मग जे घडु नये ते घडले ....
तिच्या आयुष्यातला हा पहीलाच अनुभव होता ..
थोड्या वेदना देणारा असला तरी खुपच थरारक होता ..
क्षिप्रा थोडी भानावर आली आणि तिला जाणवले ..
बाप रे हे काय घडले आपल्या हातुन ?
आपण स्वतःला सावरायला हवे होते ..
पण आता वेळ निघून गेली होती ..
त्याच्या बाहुपाशातून स्वतःला सोडवत क्षिप्रा म्हणाली
“ गौतम सावर स्वताला ..आता जायला हवे मला घरी... उशीर होतोय ..
असे बोलून तिने कुडता परत घातला आणि मागे हात करून चेन लाऊ लागली
पण गौतमने तिला परत बेडवर ओढले ..आणि तिचा कुडता परत बाजूला केला
“काय ग असा विरस करतेस अजुन पुरते समाधान पण नाही झालेय माझे ..
आणि मग परत एकदा ..दोनदा ..तीनदा तसेच घडले .
क्षिप्राच्या विरोधाला फारसे जुमानले नाही गौतमने..
इतक्या दूर एकटीच आलेली क्षिप्रा पण आता काहीच करू शकत नव्हती
“खुप मजा आली डीअर ...तु कमालीची चीज आहेस ..
क्षिप्रा हसली आणि फ्रेश व्हायला आत गेली
आता मात्र ती अक्षरशः थकुन गेली होती .
मग गौतमने परत तिच्यासाठी ग्लास भरला आणि म्हणाला
घे थोडेसे बरे वाटेल तुला जरा
क्षिप्राने मोबाईल पाहीला तर नऊ वाजायला आले होते
आता मात्र खुपच उशीर झाला होता.
गौतम मला घरी सोड न आता ..बराच उशीर झालाय रे .
स्वतःचे कपडे घालत गौतम म्हणाला,
” नाही ग जमणार आता तुला सोडायला यायला .
घरचे लोक यायची वेळ झालीय मला घरी थांबायला हवे ..
पण तुला रिक्षा मागवु आपण
मग नोकरा कडून त्याने रिक्षा मागवली आणि क्षिप्राला घरी पाठवले .
मात्र पुन्हा भेटणार अशी कबुली घेऊनच ..
ती गेल्यावर गौतम खुपच खुष झाला ..
खुप “कडक” अनुभव होता आजचा क्षिप्रा सर्वापेक्षा वेगळी होती.
आता हीला परत परत बेडवर घ्यायलाच हवे अशा विचाराने तो स्वतःशीच हसला .
खरे म्हणजे आज ती या गोष्टीला तयार होईल का नाही याची त्याला खात्री नव्हती.
उगाच दंगा आरडा ओरडा केला असता तर नोकरासमोर तमाशा झाला असता .
म्हणुन आधीच त्याने तिच्या दारूच्या ग्लासमध्ये थोडे गुंगीचे औषध टाकले होते .
त्या अमली सिगारेटने आणि दारूने काम एकदम चोख केले होते .
रिक्षात क्षिप्रा आज झालेल्या गोष्टीचा विचार करीत होती
तिला खुपच थ्रिल्लिंग वाटला होता आजचा अनुभव ..
फक्त यातुन काही विचित्र घडायला नको ..
मग तिला आठवले एकदा शिवानीने तिला गर्भनिरोधक गोळ्याविषयी माहिती दिली होती .
ती काळजी आता तिला घ्यायला लागणार होती .
ती घरी पोचली तेव्हा दहा वाजायला आले होते .
घरी कोणीच नसणार होते आई नव्हतीच ,,बाबा नेहेमी उशीराच येतो .
घरात आजीला सोबत म्हणून एक ओळखीच्या वृद्ध मावशी होत्या..
पण त्यांना काहीतरी सांगुन पटवता आले असते ..
तिने घराची बेल वाजवली ..
दरवाजा उघडला तिच्या आत्याने
आत्याला पाहुन ती चकीतच झाली ..
तिचे चुरगळलेले कपडे ,मलूल चेहेरा ,हातावर गालावर लाल लाल डाग हे पाहील्यावर आत्या म्हणाली
”अग कीती उशीर हा ..?
कीती वेळ फोन लावते आहे पण फोन बंद ठेवला आहेस..
तु होतीस कुठे इतका वेळ ..?आणि हा काय अवतार झालाय तुझा ?
आत्याच्या प्रश्नांच्या सरबत्तीने क्षिप्रा गांगरून गेली ..
गौतम सोबत असताना डिस्टर्ब नको म्हणून तिनेच फोन बंद ठेवला होता .
तिच्या हातावर चेहेर्यावर गौतमच्या दातांच्या खुणा होत्या
मग तिने खोटेच सांगितले की मैत्रिणीला बरे नव्हते म्हणुन ती मैत्रिणीकडे थांबली होती
येताना रिक्षाला अपघात झाला आणि तिला थोडे लागले वगैरे ..
तोपर्यंत आजी आतल्या रूम मधून बाहेर आली होती .
क्षिप्राचा अवतार बघुन ती पण चकित झाली शिवाय क्षिप्रा घरी आल्यावर एकदम दारू आणि सिगारेटचा वास आला होता तो आजीने ओळखला होता .
सिगारेटचा वास तर आजकाल क्षिप्राच्या रूममध्ये येतच असे
पण आता ही कार्टी कोणत्या थराला गेलीय कोण जाणे
आजी काही बोलायच्या आत क्षिप्रा आपल्या खोलीत गेली आणि तिने दार लाऊन घेतले .
बाहेर आजी आणि त्यांची लेक दोघी या गोष्टीची चर्चा करीत राहिल्या .
आजीना घरी सोडण्यासाठी त्यांची लेक आली होती
पण घरी कोणीच नसल्याने ती थांबली होती .
आणि तिला हा प्रकार पाहायला मिळाला होता.
मग आत्याने तिच्या घरी फोन करून ती इथेच राहील असा निरोप दिला
क्षिप्राच्या खोलीचे दार वाजवुन आत्याने ती जेवणार आहे का ते विचारले पण तिने दार न उघडताच ती झोपणार आहे असे सांगुन टाकले
मग माय लेकी झोपायला निघाल्या
आजीच्या मनात आता फारच शंका कुशंका येऊ लागल्या .
काय वाटेल ते झाले तरी पद्मनाभला आणि सुनेला हे सांगायलाच हवे होते .
इकडे क्षिप्राला पण अजिबात झोप येईना
आता आजी आणि आत्या हे सगळे बाबाला सांगतील .
आजीला तर पहील्या पासुन संशय होताच
आणि जर हे बाबाला समजले तर मात्र तिचे काहीही खरे नव्हते
कारण बाबा खुप कडक होता .
काय करेल सांगता येत नव्हते
इकडे फोनवर गौतमचे मेसेज सारखे येत होते ..तो आज खुप खुष होता
तिच्या शरीराची ,तिची वर्णने, त्यांच्यामधल्या प्रसंगाची वर्णने ..
इतर काही .वेगवेगळ्या सेक्सच्या क्लिप्स पाठवत होता .
त्याला रिप्लाय तर द्यावा लागतच होता
त्याला नाराज करून तिला आता चालणार नव्हते ..
आता ती मनाने आणि शरीराने त्याच्यात पूर्ण गुंतून गेली होती .
काय होणार आहे उद्या कोण जाणे ...काळजीत होती ती

क्रमशः.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED