प्रतिबिंब भाग १ शेवटी कशीतरी आठवड्याभराची सुट्टी काढून यश आणि जाई शिवपुरीस आपल्या जुन्या संस्थानी जायला निघाले. रावसाहेब जाऊनही चार महिने होऊन गेलेले. वकिलाचे दहादा फोन येऊन गेले. पण यशच्या कामाच्या व्यस्ततेने फुरसत मिळत नव्हती. शेवटी वकिलाने आता आला नाहीत तर सर्व सरकारजमा होईल आणि नंतर काहीच हाती लागणार नाही असे निकराचे सांगताच जाण्याशिवाय पर्यायच उरला नाही. यशच्या मते तसेही तिथे जुन्या पुराण्या वास्तुशिवाय काही नव्हतेच. वकिलास सांगून विकून टाकावे असे त्याने बोलूनही दाखवले, पण जाताना सासऱ्यांनी दहा वेळा जाईस एकदा तरी शिवपुरी जाऊन यावे मग जो वाटेल तो निर्णय घ्यावा असे परोपरीने कळवळून सांगितलेले तिच्या मनातून जाईना. शेवटी तिने

Full Novel

1

प्रतिबिंब - 1

प्रतिबिंब भाग १ शेवटी कशीतरी आठवड्याभराची सुट्टी काढून यश आणि जाई शिवपुरीस आपल्या जुन्या संस्थानी जायला निघाले. रावसाहेब जाऊनही महिने होऊन गेलेले. वकिलाचे दहादा फोन येऊन गेले. पण यशच्या कामाच्या व्यस्ततेने फुरसत मिळत नव्हती. शेवटी वकिलाने आता आला नाहीत तर सर्व सरकारजमा होईल आणि नंतर काहीच हाती लागणार नाही असे निकराचे सांगताच जाण्याशिवाय पर्यायच उरला नाही. यशच्या मते तसेही तिथे जुन्या पुराण्या वास्तुशिवाय काही नव्हतेच. वकिलास सांगून विकून टाकावे असे त्याने बोलूनही दाखवले, पण जाताना सासऱ्यांनी दहा वेळा जाईस एकदा तरी शिवपुरी जाऊन यावे मग जो वाटेल तो निर्णय घ्यावा असे परोपरीने कळवळून सांगितलेले तिच्या मनातून जाईना. शेवटी तिने ...अजून वाचा

2

प्रतिबिंब - 2

प्रतिबिंब भाग २ परत येऊन दोघे जेवले पण जाईचे मुळीच जेवणात लक्ष नव्हते. तिला राहूनराहून ती बाई गेली कुठे विचार त्रास देत होता. दुपारी पलंगावर पडली, तरी तिची ती एकटक नजर जाईच्या डोळ्यांसमोरून जाईना. शेवटी जाई उठली आणि परत त्याच खुर्चीत येऊन बसली. तिला आता त्या माडीवरच्या दालनांना पाहण्याची आस लागली. किल्ल्या यशकडे होत्या. शिवा आणि रखमा जिना, दरवाजा साफ करून घेत होते. साफसफाई झाली. रखमाने चहा केला. मग सगळेच वर आले. यशने चाव्या काढून शिवाच्या हातात दिल्या. प्रथम एक चावी शिवाने पूर्ण फिरवून बाहेर काढली. मग दुसरी, नंतर तिसरी. चौथी चावी पूर्ण फिरवल्यानंतर खट्कन कुलूप उघडले. शिवाने कडी ...अजून वाचा

3

प्रतिबिंब - 3

प्रतिबिंब भाग ३ सकाळी यशला जाग आली तेव्हा जाई शेजारी नव्हती. बाथरूममधे असेल असा विचार करून तो कूस बदलून पण मग त्याला परत जाग आली. बाथरूमचं दार उघडंच होतं. त्याने दिवाणखान्यात येऊन पाहिलं, स्वैपाकघरात पाहिलं. जाई कुठेच नव्हती. मग त्याला अचानक वरचा आरसा आठवला. तो धावत वर आला. पाहतो तर, जाई आरशावर मान टेकून, जमिनीवर बसल्याजागी झोपली होती. त्याने घाबरून, तिला जागे करण्यासाठी, हलवायला सुरवात केली तशी हळूहळू तिने डोळे उघडले. अनोळखी चेहऱ्याने तिने यशकडे पाहिले आणि ती सावरून उठून बसली. "अगं इथे काय करतेस? किती घाबरलो मी. कधीपासून आहेस इथे? आणि अशी काय अवघडून झोपलीस? " जाई काहीच ...अजून वाचा

4

प्रतिबिंब - 4

प्रतिबिंब भाग ४ त्या दिवशी वाडा संपूर्ण सजवला होता. नव्यानेच रंगरंगोटी करण्यात आली होती. भाऊसाहेब होते. बऱ्याच वर्षांनी वाड्याला नवी मालकीण मिळणार होती. त्यांच्या मुलाची, अप्पासाहेबाची बायको, म्हणजेच, भाऊसाहेबांची सून वयात आली होती. व्याह्यांचा तसा निरोप आला होता. आज सूनबाई कायमच्या वाड्यावर राहायला येणार होत्या. एका मोठ्या जबाबदारीतून मोकळं झाल्याची भावना त्यांच्या मनात होती. मंडळी पोचली. रितीरिवाज, परिवारातील इतर स्त्रियांनी पूर्ण केले. भाऊसाहेबांच्या पत्नीचे अकाली निधन त्यांना फार एकटे करून गेले होते. पण मुलाला सावत्रपणा नको म्हणून त्यांनी दुसऱ्या लग्नाचा विचारही मनात आणला नव्हता. रितीप्रमाणे गावातील कलावंतीण, सूनेची दृष्ट काढायला आली होती. तिच्याबरोबर तिची उफाड्याची मुलगी शेवंताही ...अजून वाचा

5

प्रतिबिंब - 5

प्रतिबिंब भाग ५ दुसऱ्या दिवशी यशच्या महत्वाच्या मिटींग्ज होत्या. जाईने त्याला आग्रहाने जायला लावले. मी बेडवरून उठणारच असा निर्वाळाही दिला. दुसऱ्या दिवशी सकाळीच नवरानवरीस देवदर्शनास नेले. साताठ तासांचा प्रवास होता. मंडळी मुक्काम करून तिसऱ्या दिवशी परतणार होती. भाऊसाहेबांनी प्रकृती अस्वास्थ्याचे निमित्त पुढे केले. सगळ्यांना धाडले. त्यात घरात राबणारे, नुकतेच लग्न झालेले, शिवाचे आजा-आजीही होते. तुम्हाला तरी देवदर्शन कधी होणार, असे म्हणत आग्रहाने धाडले. मालकाच्या दानतेने ती दोघे सुखावली. सगळे गेल्यावर भाऊसाहेबांनी शेवंताचे शव ओढत नेत वाड्याच्या छतावरून मागच्या दरीत फेकून दिले. आरशाच्या कपाटाच्या बिजागऱ्या तोडल्या, मग भिवास बोलावून नवे कपाट बनवून त्यावर या आरशाचे दार लावण्यास सांगितले. जुने ...अजून वाचा

6

प्रतिबिंब - 6

प्रतिबिंब भाग ६ जाई एकदा एखाद्या विषयाच्या अभ्यासाला लागली की, इतकी एकाग्र होत असे की मग बाकी कोणतीच गोष्ट चित्त विचलित करू शकत नसे. तिने याच गोष्टीचा, शेवंताला आपल्या मनापासून दूर ठेवण्यासाठी वापर करण्याचे ठरवले. थोड्या वेळाने तिने मन एकाग्र करण्याच्या अनेक पद्धतींपैकी एकीचा वापर करत, डोळे मिटून स्वस्थ पडून मन एकाग्रतेच्या सरावास सुरवात केली. काही वेळाने तिचा मनातल्या मनात प्लॅनही ठरला. या सर्व गोष्टींच्या असं आहारी जाऊन चालणार नव्हतं. आत्ता प्राथमिकता ही होती की लढायचं असेल तर शरीर, मन दोन्ही निरोगी आणि सुदृढ हवं. त्यासाठी व्यवस्थित दिनक्रम आखून घ्यावा लागणार होता. मंडळी देवदर्शनाहून परतली. नवी नवरानवरी आनंदात ...अजून वाचा

7

प्रतिबिंब - 7

प्रतिबिंब भाग ७ एव्हाना शेवंताची दहशत सर्वांनाच बसली होती. कधीकधी कुणाकुणाला ती दिसायची. तिच्यासाठी वाड्यावर आणि गावातही, प्रत्येक शुभकार्यापूर्वी, अमावास्येला, ओटी काढून ठेवण्याची प्रथा पडली होती. आज बेडवर पडल्यापडल्याच चलचित्र सुरू होते. स्टडीमधे जाण्याचीही गरज उरली नाही. जाई विचार करू लागली, शेवंता थोडी शांत झाली असावी. माणसाचा जसा "मी" सुखावतो तसाच तिचाही "मी" सुखावला असेल का, या नव्या मिळणाऱ्या मानामुळे? अचानक तिला तिच्या आजीची आठवण झाली. तिचं बोलणं, जे तेव्हा काही म्हणजे काही कळलं नव्हतं ते आज आठवलंही आणि समजलंही. केव्हातरी, श्राद्धविधी पाहताना जाईने विचारले “आपण हे असे जेवण पणजोबा पणजींसाठी ठेवतो, पण त्यांना हे आवडतं का? दर वर्षी ...अजून वाचा

8

प्रतिबिंब - 8

प्रतिबिंब भाग ८ शेवंता सावकाश स्टडीतून बाहेर आली. ऑफिसच्या दिशेने जाऊ लागली. तिच्या पायातल्या पट्ट्यांचे आवाज छूम छूम छूम..., एकदम सावध झाली. बाहेर आली, तर शेवंता तिला ऑफिसच्या दारातून आत जाताना दिसली. धास्तावलेल्या मनाने जाई ऑफिसच्या दाराशी पोचली. यश आत होता. त्याने अंगातला शर्ट उतरवला होता. दरवाजाकडे त्याची पाठ होती. शेवंता त्याच्या अगदी जवळ उभी होती. नुसती. जराही हलली असती तरी त्याला स्पर्श झाला असता. आसुसलेल्या नजरेने ती त्याला पहात होती. जाई ओरडणारच होती, तेवढ्यात यश मागे वळला, "झालं तुझं मेडिटेशन? छान तंद्री लागली होती तुझी." जाईची क्षणभर नजर यशकडे वळली आणि तेवढ्यात शेवंता दिसेनाशी झाली. पण जाईला मात्र ...अजून वाचा

9

प्रतिबिंब - 9

प्रतिबिंब भाग ९ रोज नव्याने, मृतात्म्यांविषयीचे तिचे ज्ञान वाढतच होते. मृतात्म्यास इतर कोणासमोर यायचे असेल, तर प्रचंड पडतात. त्याच व्यक्तीच्या शरीरद्रव्यांचा वापर करत त्याला आपली छबी निर्माण करावी लागते. मृत्यूसमयीची तीव्र भावना, इच्छा, याच त्यांच्या दीर्घकाल अस्तित्वास कारणीभूत ठरतात. जितकी भावना तीव्र, तितका तो अहम, त्या भावनेस चिकटतो. कालानुसार तो अधिकाधिक चिवट बनत जातो. ते मन, त्या तीव्र भावनेस घट्ट धरून ठेवते. कारण त्याचे संपूर्ण अस्तित्व त्यावरच अवलंबून असते. मग न संपणारे नरकयातनेचे हे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी निकराची धडपड सुरू राहते. जाईला मनुष्यस्वभावात आणि यांच्यात अधिकाधिक साम्य दिसू लागले. अहमच्या अस्तित्वाची धडपडच माणसाचे अख्खे आयुष्य व्यापून उरते. ...अजून वाचा

10

प्रतिबिंब - 10

प्रतिबिंब भाग १० जाईला सर्वच गोष्टींचा प्रथमपासून विचार करून पाहणे गरजेचे वाटू लागले. सर्व घटनांमधले कच्चे दुवे शोधून, त्यातील समजावून घेणे गरजेचे होते. शेवंताचा पुढचा घाव कसा आणि कुठे असेल हे आता ओळखणे गरजेचे होते. हातात वेळ फार उरला नव्हता. कुठल्याही क्षणी काहीही घडण्याची शक्यता होती. तिचा जीव धोक्यात होता, होता का? वाड्याच्या इतर सुनांमधे आणि आपल्यामधे काय फरक आहे? आता सर्व गत इतिहास आपल्याला कळलाय, खरंच कळलाय का? अचानक तिला आपले सासरे आठवले. त्यांनी एवढ्या अजिजीने आपल्याला वाड्यावर जाण्यास का सांगितले? ते ही स्वत:च्याच पत्नीची झालेली भीषण अवस्था स्वत:च्या डोळ्यांनी पाहून? खरंच त्यांना बायकोच्या मृत्यूमधे काहीच अनैसर्गिक वाटले ...अजून वाचा

11

प्रतिबिंब - 11 - अंतिम भाग

प्रतिबिंब भाग ११ अचानक शेवंता अक्राळविक्राळ रुपात आरशात दिसू लागली. तिचा हात बाहेर आला आणि गळ्याला पकडायला पुढे झाला. पण तिला गळा पकडता येईना. "फॅन निर्जीव आहे शेवंता. त्यावर अधिकार गाजवणे सोपे. काही अनीष्ट शक्तीही तुला साहाय्यभूत झाल्या असतील. पण सुजाण मनाला कह्यात घेणे फार सोपे नव्हे. शक्ती वाया घालवू नकोस. ह्या अहंकाराने बराच उत्पात माजवला आहे. आता पुरे.”फट्कन ती दिसायची बंद झाली. “आता, मी तुझ्या मनाला, योग्य मार्गावर घेऊन जाणार आहे. निदान तसा प्रयत्न तरी करणार आहे. जशी तू या सर्व उत्पाताला निमित्तमात्र ठरलीस तसाच माझाही सहभाग निमित्तापुरताच आहे, हे मी जाणून आहे. मी माझ्या जीवाचंच ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय