"Hello….Hello…. राजेश… ", " हा… बोलं गं… ", "अरे… तुझा आवाज clear येत नाही आहे.… Hello…?", "थांब जरा… बाहेर येऊन बोलतो." राजेश ऑफिसच्या बाहेर आला. "हा, येतो आहे का आवाज आता…. बोल मग. ", "हा… आता येतो आहे clear… कसा आहेस तू…", "मी ठीक आहे आणि तू कधी आलीस केरळ ट्रीप वरून…. फोटो बघितले तुझे…. सगळे फोटो छान आहेत हा… ", "हो का…. तूला तर सगळेच फोटो आवडतात माझे. असा एक तरी फोटो आहे का जो तुला आवडला नाही… सांग. ", "ते तर आहेच… कारण तू दिसतेस सुद्धा छान…. मग चांगलेच असणार ना फोटो… " त्यावर निलम हसली. " तू

Full Novel

1

एक होता राजा…. (भाग १)

"Hello….Hello…. राजेश… ", " हा… बोलं गं… ", "अरे… तुझा आवाज clear येत नाही आहे.… Hello…?", "थांब जरा… बाहेर बोलतो." राजेश ऑफिसच्या बाहेर आला. "हा, येतो आहे का आवाज आता…. बोल मग. ", "हा… आता येतो आहे clear… कसा आहेस तू…", "मी ठीक आहे आणि तू कधी आलीस केरळ ट्रीप वरून…. फोटो बघितले तुझे…. सगळे फोटो छान आहेत हा… ", "हो का…. तूला तर सगळेच फोटो आवडतात माझे. असा एक तरी फोटो आहे का जो तुला आवडला नाही… सांग. ", "ते तर आहेच… कारण तू दिसतेस सुद्धा छान…. मग चांगलेच असणार ना फोटो… " त्यावर निलम हसली. " तू ...अजून वाचा

2

एक होता राजा…. (भाग २)

राजेश…. चाळीत राहणार एक सर्वसामान्य मुलगा. ४ वर्षाचा असताना, एक दिवस अचानक… कोणाला न सांगता, त्याचे वडील कूठेतरी निघून का गेले ते फक्त आणि फक्त त्यांनाच ठावूक… ते अजूनही परत आलेले नाहीत. छोट्या राजेशला आईनेच सांभाळलं. वडील अचानक निघून गेल्याने, त्याच्या बाल मनावर परिणाम झालेला. तेव्हापासून राजेश काहीसा अबोल. जास्त कोणाशी मिसळणे नाही… फारच कमी बोलायचा. कधी कधी तर स्वतःमधेच गुरफटलेला. साधा, सरळमार्गी. कोणाचं वाईट करू नये आणि कोणाविषयी वाईट चिंतू नये. अश्या मनाचा. पण खूप हळवा. भावूक मनाचा. रस्त्यावरल्या किती मुलांना तो मदत करायचा. स्वतः गरीब होता तरी ...अजून वाचा

3

एक होता राजा…. (भाग ३)

असेच दिवस जात होते. त्यात पुन्हा खंड पडला तो निलमच्या केरळ ट्रीपमुळे. ऑफिस टूर होती. शिवाय कामही होतंचं. पण मंगेशला एक खबर लागली होती. आणि ती म्हणजे, निलमच्या घरी तिच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे याची. निलम मोठया पोस्टवर होती,हूशार होती, salary चांगली होती. त्यामुळे समोरूनच तिला किती चांगली 'स्थळं' येत होती. राजेशला याची कल्पना होती. त्याच्या मनात धाकधूक होती त्याचीच. त्याने ठरवलं होतं कि आपणच तिला विचारू आधी. त्यात ती केरळला गेल्याने तो विचारू शकला नाही. ४ महिने चालली तिची केरळ ट्रीप… मुंबईला कधी आली ते सांगितलंच नाही…. आणि सांगितलं ते थेट…. ...अजून वाचा

4

एक होता राजा…. (भाग ४)

मंगेश दचकला. " अरे… हे काय… ","माझ्या engagement चे invitation… " मंगेशला धक्का बसला. निलमकडे बघत राहिला."अरे, असा काय काही तुला माहीतच नाही.","मला कसं कळणार ? "," राजा बोलला नाही तुला… " मंगेशने नकारार्थी मान हलवली."त्याला तर पहिलच सांगितलं… आणि त्यालाच पहिलं invitation देयाचे होते म्हणून तर call करत आहे सकाळपासून." मंगेश अजून त्या धक्यातून सावरला नव्हता. "पण तुझं नशीब चांगलं आहे हा… तुला पहिलं invitation… " मंगेश खोटं खोटं हसला. " अभिनंदन… " ," Thanks… नक्की यायचे हा… " ,"हो नक्की… " मंगेश निमंत्रण पत्रिका पाहू लागला. स्वप्नील दामले…. म्हणजे ब्राम्हण… " दामले म्हणजे ब्राम्हण ना… " ...अजून वाचा

5

एक होता राजा…. (भाग ५)

संध्याकाळी मंगेश, राजेशला जबरदस्ती घेऊन गेला. राजेशला लवकर निघायचे नव्हते. ८ वाजता बरोबर पोहोचले दोघे त्या टपरीवर.… तिघे अगदी असल्या पासून या टपरीवर चहा घेण्यासाठी थांबत आणि टाईमपास करत. चाळीपासून जवळच होती टपरी. निलम तर आधीच आलेली. " काय रे राजा… कालपासून call करते आहे तुला, एकदाही उचलला नाहीस…. " राजेश गप्पच. निलम मंगेशकडे पाहू लागली. मंगेशला समजलं ते. त्यानेच विषय सुरु केला. " निलम, मला काहीतरी बोलायचे आहे.","हं… बोलं.","मला माहित नाही, हि योग्य वेळ आहे का नाही बोलायची… ", "हा… काही असेल ते आत्ताचं बोलून घे हा…. कारण लग्न झाल्यावर मी ...अजून वाचा

6

एक होता राजा…. (भाग ६)

खूप वेळाने राजेश बोलला. "निलम सांगत होती, तो दुबईला मोठा engineer आहे, मुंबईत स्वतःचे दोन Flats आहेत. १.५ लाख दुबईत असतो… वरचेवर india मध्ये येतो. खूप छान मुलगा भेटला तिला… शिवाय तिचं एक स्वप्न होतं, निलमला world tour करायची होती… मला ते काही जमलं नसतं कधीच… आता तरी निलम जगभर फिरू शकेल… " राजेश हसत म्हणाला. " पण यार… असं कसं रे …. " मंगेश खूप वेळाने बोलला." किती वर्ष एकत्र आहोत आपण… त्यात तुम्ही दोघे किती जवळ… कधीच वेगळे झाला नाहीत तुम्ही,तुम्हा दोघांना ते जमलंचं नाही… दूर जाणं, रोज एकतरी call असतो ना तुमचा एकमेकांना… नाहीतर मेसेज तरी चालू ...अजून वाचा

7

एक होता राजा…. (भाग ७)

लग्नाचा दिवस, खूप मोठा सोहळा… केवढा मोठ्ठा हॉल… सगळी मोठी माणसं, पुरुष मंडळी सुटा-बुटात तर बायका-मुली… भरजरी साड्या आणि ड्रेसेस मध्ये, श्रीमंती तर डोळे दिपवणारी. निलम त्या लग्नाच्या साडीत, दागिन्यात राणी दिसत होती अगदी. तिचा होणारा नवरा, स्वप्निल… त्याने सुद्धा राजा सारखा पेहराव केला होता. भव्य-दिव्य लग्न अगदी… अर्थात त्या दोघांच्या परिस्तिथीला साजेशा असा. या सर्व लवाजम्यात, मंगेश एका कोपऱ्यात उभा राहून ते सर्व पाहत होता. त्याला माहित होतं, कि हा सोहळा मोठा असणार, मोठी नावाजलेली माणसं येणार म्हणून त्याने एक सूट भाड्याने घेतला होता, एका दिवसासाठी. तरीसुद्धा त्याला अवघडलेलं वाटतं ...अजून वाचा

8

एक होता राजा…. (भाग ८)

निलम मुंबई ब्रांचला जाऊ लागली. त्यासाठीच तर आली होती ना ती. २ दिवस झालेले, पुन्हा कामात गुंतली निलम. उशिराच ती ऑफिसमधून. त्यादिवशी काम लवकर संपलं, खूपच लवकर…. निघाली घरी कारमधून.बाहेर मुख्य रस्त्यावर आली. जरासं ट्राफिक लागलं. गाडीतूनच आजूबाजूला पाहू लागली. अचानक तिला आठवलं, राजेश आणि मंगेशचं ऑफिस जवळच होतं ना. जाऊया का तिथे… कदाचित भेट झाली तर. निलमने गाडी तिकडे वळवली. किती वर्षांनी आली होती तिथे. अनोळखी सगळं. निलम कार मधून उतरली. काहीच ओळखीच नाही. ती पुढे आली. राजेश-मंगेशचं ऑफिस होतं, तिथे आता अर्धवट बांधकाम सुरु होतं. मग तिथे उभ्या असलेल्या watchman ला ...अजून वाचा

9

एक होता राजा…. (भाग ९)

चहाची order दिली मंगेशने. चहा आला." हा… काय झालं नक्की निलम… एकत्र का राहत नाही तुम्ही दोघे.","आमचा divorce झाला मंगेश उडालाच."काय बोलतेस तू… " निलम काही न बोलता चहा पिऊ लागली. मंगेश अजून shock मध्ये, निलम शांतपणे चहा पीत होती. मंगेश थोड्यावेळाने पुन्हा बोलला." मला वाटते मी काहीतरी चुकीचं ऐकल आहे , बरोबर ना निलम… ","नाही, जे ऐकलंसं ते खरं आहे.","कधी झालं हे… " ," लग्नाच्या second anniversary ला… मी त्याला गिफ्ट दिले divorce papers… त्याने सही केली आणि आम्ही वेगळे झालो.","का असं ?"."जमलं नाही मला… ","काय जमलं नाही." ,"त्याच्या सोबत राहणं जमलं नाही मला.","तू काय बोलते ...अजून वाचा

10

एक होता राजा…. (भाग १०)

बोलता बोलता रात्रीचे ९ वाजले. निघायला हवं म्हणून दोघेही बाहेर आले हॉटेलच्या. "चल निलम… छान वाटलं बोलून, इतक्या वर्षांनी… आठवण तरी ठेवलीस आमची… ","हो रे… तुम्हाला कुठे विसणार होती मी…","बरं…. आता किती दिवस आहेस इंडिया मध्ये…","actually…मी आता बदली करून घेणार आहे, प्रोसेस सुरु झाली आहे, दिल्ली ब्रांचला बदली करून घेईन.","आणि इकडे नाही येणार का… "," may be नाही… पप्पा-मम्मीनी ठरवलं आहे, ते सुद्धा दिल्लीला शिफ्ट होतील. पप्पा तर retire झालेत ना…. मग तसं पण काम नाही त्याचं इथे… सगळेच तिथे राहू मग… पण अजून नक्की नाही… ","ठीक आहे… पण जाण्याआधी, एकदातरी…. राजेशला भेटून जा… कारण आता फक्त या ...अजून वाचा

11

एक होता राजा…. (भाग ११)

खोलीच्या बाहेर पाऊल टाकलं आणि जोरात पावसाला सुरुवात झाली." थांब निलम… पाऊस थांबला कि जा… भिजशील उगाच… " निलम आता, दोघे त्या बाल्कनीत उभे राहून पावसाकडे बघत होते. राजेशची आई… दोघांना आतूनच पाहत होती. किती वर्षांनी ते असे उभे होते. निलम बोलली थोड्यावेळाने."भिजतोस का अजून पावसात…. मी तर किती miss केलं पावसाला… "राजेशने smile दिली."तिथे दुबईला नसेल ना पाऊस वगैरे… तुला खरं सांगू… मला पाऊस असा आवडला नाही कधी. शाळेत असताना तर, बाहेरच पडायचो नाही मी, पाऊस सुरु झाला असेल तर…. वाटायचं, आपण विरघळून जाऊ आपण पावसात. तरी लहानपणी ...अजून वाचा

12

एक होता राजा…. (भाग १२) अंतिम भाग

थोडावेळ दोघे तसेच होते. निलमने त्याला मिठी मारली होती,मात्र राजेशने नाही. नंतर राजेशने स्वतःच तिची मिठी सोडवली. "असं बरं गं आता… तुझं लग्न झालंय… मिस्टरांना काय वाटेल तुझ्या… " पाऊस थांबला होता… " पाऊस थांबला आहे तो पर्यंत निघ तू… शिवाय घरी काम सुद्धा आहे ना घरी तुझं… " निलमने डोळे पुसले आणि निघाली. " बघ… जमलं तर…. पुढच्या महिन्यात इथे सार्वजनिक गणपती आहेत… बहुतेक शेवटचा असेल यावर्षी…. माहित नाही… चाळ तोडून इमारत बांधायची आहे… try कर हा… पुढच्या महिन्यात…" निलमने होकारार्थी मान हलवली."चल… कार पर्यंत सोडतो तुला… " निलम आणि राजेश कारजवळ आले, निलम बसली गाडीत. निघायचा विचार ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय