!.....प्रपोज......! by sanjay kamble *******************प्रपोज..." काळ्या जिभेची कुठली.... तोंड बंद कर नाहीतर बघ......." मध्यम वयाची महीला कर्मचारी एका पेशंटवर ओरडत होती.. अंगान काहीशी जाड. सावळ्या रंगाची... गोल चेहरा आणी किंचित बसक नाक यामुळे तेच्या नेहमीच रागिट दिसायचे...आवाज तसाच करडा.. हॉस्पीटलच्या शांत वातावरणात तीचा आवाज हॉस्पीटलच्या दुस-या मजल्यावरच्या संपुर्ण वार्डमधे घुमला...... दुपारची कडक उन्हाची दाहकता आता काहीशी कमी होत सुर्य क्षितीजाकडे झुकत चाललेला... पाय-या चढुन हॉस्पीटलच्या वॉर्ड मधुन इन्स्पेक्टर झपाझप पावल टाकत चालत येत होते त्यांच्या मागे दोन हवलदार डोक्यावरची टोपी नीट करत चालत होते. पायातल्या बुटांचा खट्ट खट्ट खट्ट आवाज संपूर्ण वार्डमधे

नवीन एपिसोड्स : : Every Thursday

1

प्रपोज - 1

!.....प्रपोज......! by sanjay kamble *******************प्रपोज..." काळ्या जिभेची कुठली.... तोंड बंद कर नाहीतर बघ......." मध्यम वयाची महीला कर्मचारी एका पेशंटवर ओरडत होती.. अंगान काहीशी जाड. सावळ्या रंगाची... गोल चेहरा आणी किंचित बसक नाक यामुळे तेच्या नेहमीच रागिट दिसायचे...आवाज तसाच करडा.. हॉस्पीटलच्या शांत वातावरणात तीचा आवाज हॉस्पीटलच्या दुस-या मजल्यावरच्या संपुर्ण वार्डमधे घुमला...... दुपारची कडक उन्हाची दाहकता आता काहीशी कमी होत सुर्य क्षितीजाकडे झुकत चाललेला... पाय-या चढुन हॉस्पीटलच्या वॉर्ड मधुन इन्स्पेक्टर झपाझप पावल टाकत चालत येत होते त्यांच्या मागे दोन हवलदार डोक्यावरची टोपी नीट करत चालत होते. पायातल्या बुटांचा खट्ट खट्ट खट्ट आवाज संपूर्ण वार्डमधे ...अजून वाचा

2

प्रपोज - 2

तशी सर्वांची कुजबूज थांबली... तो आवाज अगदी शांतपने ऐकु लागले... कदाचीत हा खुन करणा-यानच हा मेसेज ठेवलेला असेल...एका शांततेनंतर त्या मोबाईल मधुन एका युवकाचा आवाज येऊ लागला... 'प्रेम......? हं..... प्रेम.......! अस म्हणतात की प्रेम आंधळ असत..... असतं नव्हे , असतच... मी तर या मताशी अगदी ठाम आहे...... तसा प्रत्येक जण या प्रेमाचा आपापल्या परीने अर्थ लावत असतो... खरंतर प्रेम म्हणजे या जगातली सर्वात सुंदर कल्पना... कधी नुसती कल्पना, तर कधी भयान वास्तव. कधी सुरेख चांदण, तर कधी भयान काळोख.. कधी आयुष्यभराची सोबत , तर कधी अर्ध्यातच शेवट.... शेवट, तो ही भिषण... काळजाचा थरकाप उडवणारा शेवट... तुम्हीही ...अजून वाचा

3

प्रपोज - 3

काय झालं असेल तीला...? हा विचार करतच सर्व तिथून बाहेर पडलो.. **** सकाळी उठायला जरा उशीरच झाला , कदाचीत काल रात्री बराच वेळ त्या मुलीचा, म्हणजे तीच्या अवस्थेचा विचार करत होतो, त्यामुळे लवकर झोप लागली नव्हती.. हातांवर, गालावर ,मानेवर नख्यांनी ओरबडलेल्या जखमा , पिंजलेले केस, आणी अचानक तीच किंचाळण. रात्रभर तेच दृष्य डोळ्यांसमोर येत होत... अंघोळ वगैरे आटोपुन नेहमीप्रमाणे कामावर जायला निघालो... बाईक वरून बाहेर पडलो आणि काही अंतरावर गेलो होतो तस लक्षात आल की मोबाइल घरीच राहीला आहे... बाईक वळवण्यासाठी मी मागे पाहिल तशी 'ती' येताना दिसली.. तीचे ...अजून वाचा

4

प्रपोज - 4

"'प्रिया... काळजी करू नकोस बाळा.."हुंदका आवरत तीची आई जवळ बसुन तीला शुध्दीवर आणायचा प्रयत्न करत होती... ***** काही वेळातच तीला हॉस्पीटलमधे दाखल केल..तीची आई आणी बाबा दोघे हॉस्पीटल मधे होते तर भाऊ बाहेरगावी पाहुण्यांच्या घरी गेलेला... त्यांना गरज लागेल म्हणुन मी तीथच थांबलो.. डॉक्टर तपासून जायचे आणी नाना त-हेचे रिपोर्ट तयार करत होते , मेंदुच काय संपुर्ण शरीर स्कॅन केल, ब्लड रिपोर्ट तपासु लागले... मी मात्र बघ्याच्या भुमिकेत सर्व लांबूनच पहात होतो.. रात्रीचे दोन वाजुन गेले होते.. जांभई देतच मी दोन्ही हात पैंटच्या खिशात हात घालुन चालत येत दरवाजावर लावलेल्या काचेतुन आत ...अजून वाचा

5

प्रपोज - 5

ती आली... क्लासवरून थेट ठरलेल्या ठिकानी... नेहमीसारखीच सुरेख दिसत होती... ब्लॅक जीन्स . पिंक टॉप, चमकदार सोनेरी केस जे नेहमीप्रमाणेच मोकळे सोडलेले. कानात छानशा रिंग तर कपाळावर बारीकशी टीकली.. दुरूनच स्माईल करत पुढ आली..." आज सुट्टी तुला....?" बॅग बाजुला ठेवत बाकड्यावर बसली...." नाही ग.... एक खुपच Importent काम होत म्हणुन सुट्टी घेतली.." थोडा वेळ काय बोलाव सुचेनास झाल .. ती मात्र नेहमीच्या गमती सांगण्यात दंग होती हसता हसता दोन वेळा माझ्या पाठीवर नेहमीसारखीच चपाट मारली, पन माझ लक्ष कशातच नव्हत.. मी तीच गोड हसण ,बोलण मन लाऊन ऐकत होतो.. पन तीला 'प्रपोज' करायच आहे या विचारान काळीज मात्र ...अजून वाचा

6

प्रपोज - 6

कोण असेल ती आकृती...? विचार करून करून डोकं दुखायला लागलं... कोणाला सांगाव का या बद्दल...? पण कोणाला...? आणी हे थांबणार होत की पुढे आणखी काही नशीबान वाढून ठेवलेलं.... *****सकाळी आवरून कामावर गेलो खरा पन लक्ष लागत नव्हत... रात्रीच ते स्वप्न कधीच डोक्यातुन गेलेल.... पन स्वता:च्या मुर्खपनावर राग येत होता.. मी तीच्या निखळ मैत्रीला आता कायमच मुकलो होतो. आजही तीचा एक ही मेसेज नव्हता की मिसकॉलही नव्हता... इतका तिरस्कार करत होती माझा.. इतका राग आलेला तीला माझा...? खरच मी तीच्या मैत्रीला समजुन घेतल नाही, पन मी ही प्रेम केल तीच्यावर , म्हणुन ...अजून वाचा

7

प्रपोज - ७

तीच्या आईची ती तक्रार योग्यच होती, प्रिया आपल्या आईला शांत व्हायला सांगु लागली पन त्याच्या डोळ्यातुन पाणी येतच राहील..********दोन तीला डिस्चार्ज मिळाला पन तीच शरीर कृश होत चाललेल... एखाद्या असाध्या रोगान ग्रासलेल्या माणसा सारख निस्तेज बनत चाललेल तीच शरिर पहावत नव्हत .. ती बरी झालेली पन कायमची नाही... तीला पुन्हा कधी त्रास सुरू होईल कोणीच सांगु शकत नव्हत... आणी आता तीला त्रास सुरू झाला तर तो सहन करण्याची शक्तिही तीच्या शरिरात राहीली नव्हती ... तीचा अंत निश्चीत होता... पन हे का होतय..? याच उत्तर फक्त प्रियाच देऊ शकत होती... हो... याच उत्तर तीच देऊ शकत होती.. तीला मदत हवी होती ...अजून वाचा

8

प्रपोज - ८

हो ती म्हणाली होती घरचे सर्व तीला मेंटल हॉस्पीटल मधे भरती करायला आलेत.. आणी तो डॉक्टरही तेच म्हणाला होता...तो हव......*****"नमस्कार...... आत येऊ का.....?" मी केबिनच दार उघडत विचारल..." हो.... या ना.... बसा..." मला आत बोलवल आणी आपल्या हातातले रिपोर्ट पाहू लागले... अगदीच छान एसी केबीन होती.. समोर टेबलवरच्या जाड आणी रूद काचेवर हाथ ठेवत माझी नजर डॉक्टरांच्या खुर्चीमागच्या शरीररचनेच्या आकृतिवर स्थिरावली... काय काय साहीत्या फिटींग करतो परमेश्वर... " बोल.... काय मदत करू तुझी....? " रिपोर्ट खाली ठेवत म्हणाले"मला ओळखल असेल तुम्ही...?" त्यानी किंचीत भुवया आकसुन पाहल आणी डोळ्यांवरचा चश्मा काढत टेबलवर ठेवला...."हो..... ओळखल.....त्या वेड्या मुलीचा मित्र ना..."" तीला वेडी कशावरून ...अजून वाचा

9

प्रपोज - ९

" काही नाही होणार. उगाच कशाला घाबरतेस..?" मावशीच्या आवाजात थोडा राग होता जशा त्या खेकसत होत्या.. प्रियान खिडकीची कडी कन खाली खेचली आणी कुईईई आवाज करत ती खिडकी उघडली.. आणी मी समजुन गेलो की पलीकडे रूम नाही तर हीच शेवटची रुम होती, दुस-या मजल्यावरची . आणखी एक एक लक्षात आल की आत येतान खिडकीत दिसलेली आकृती याच रुममधे होती.. " प्रिया... जाऊदे ..मला भास झाला असेल..."पन ती खिडकीमधे पाठमोरी उभी शांतपने बाहेर पहात होती... मी पुन्हा हाक दिली पन काहीच प्रतिसाद येईना.. तोच एक थंड हवेचा झोका खिडकीतुन आत शिरला तसा सर्रर्रर्रर कन अंगावर काटा आला... प्रिया म्हणुन मी जोरात ओरडलो ...अजून वाचा

10

प्रपोज - 10

Blue eyes By Sanjay Kamble रात्रीच्या गहिऱ्या काळोखात बुडालेल्या डांबरी रस्त्यावरून ती एकटीच चालत होती... विजेच्या खांबावरील बल्ब गल्लीतील टवाळखोर मुलांनी फोडल्यामुळे 1 , 2 विजेच्या खांबावरील बल्ब तेवढेच सुरू होते... कामावरून सुटून ती आता घरी निघालेली... मोबाईल कानाला लावून ती आपल्या आई सोबत बोलत होती.... " हो ग आई .. बाबांची औषधे घेतली आहेत... मेथीच्या दोन जुड्या आणी पांढरी वांगी.. तुझी आवडती... आता आणखी काही आणायला सांगू नको कारण आता सगळी दुकानं बंद झाली आहे..."तिचं बोलणं ऐकून आई म्हणाली..." इतका उशीर का केलास...? शहरात काय सुरू आहे माहित आहे ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय