propose - 8 books and stories free download online pdf in Marathi

प्रपोज - ८

हो ती म्हणाली होती घरचे सर्व तीला मेंटल हॉस्पीटल मधे भरती करायला आलेत.. आणी तो डॉक्टरही तेच म्हणाला होता...

तो डॉक्टर......?

भेटायलाच हव......

*****

"नमस्कार...... आत येऊ का.....?" मी केबिनच दार उघडत विचारल...
" हो.... या ना.... बसा..." मला आत बोलवल आणी आपल्या हातातले रिपोर्ट पाहू लागले... अगदीच छान एसी केबीन होती.. समोर टेबलवरच्या जाड आणी रूद काचेवर हाथ ठेवत माझी नजर डॉक्टरांच्या खुर्चीमागच्या शरीररचनेच्या आकृतिवर स्थिरावली... काय काय साहीत्या फिटींग करतो परमेश्वर...
" बोल.... काय मदत करू तुझी....? " रिपोर्ट खाली ठेवत म्हणाले
"मला ओळखल असेल तुम्ही...?" त्यानी किंचीत भुवया आकसुन पाहल आणी डोळ्यांवरचा चश्मा काढत टेबलवर ठेवला....
"हो..... ओळखल.....त्या वेड्या मुलीचा मित्र ना..."

" तीला वेडी कशावरून ठरवलत....?"

" तीला मरणयातना होतात... अंग जळाल्यासारख्या वेदनेन ती तडफडते... पन तीच्या सर्व चाचण्या केल्या .. सर्व नॉर्मल..."

" म्हणजे तुम्ही एखाद्या आजाराच निदान करू शकला नाहीत तर तो पेशंट वेडा ठरतो.... असच ना..."

"एकदा तीनं एका कर्मचा-यावर हल्ला केला होत... आणी स्वता:च्या भावावरही.. अशा पेशंटची जागा मेंटल हॉस्पीटलच असते..."

" पन हे तीच्याकडून कोणीतरी करवून घेत असेल तर..?"

" तुला काय म्हणायच आहे....?" ते जरा रागातच म्हणाले..

" ती वेडी नाही.... ती जे भोगतेय ते दिसत नाही पन तीला त्या वेदना होतात... आणी ते खर आहे...."

" ओह..... म्हणजे भुत...? लुक मिस्टर ...?"
" संजय...."
" हा संजय.... या फालतु गोष्टीवर मी विश्वास ठेवत नाही..... मेडीकल सायंन्स किती प्रगत झालय आणी तुम्ही आजची पिढी या मुर्ख गोष्टींवर विश्वास ठेवताय..."

" सर.... तुमच्या मागे जे शरीराच्या आतल्या रचनेच मॉडेल लावलय.... कधी त्याला नीट पाहीलय..."

" हो अगदी व्यवस्थीत...... त्यातच टॉप केलाय...."

"मला सांगा... किडनी कुठ असते....? हार्ट.....? लिव्हर.......? नेक बोन....? ब्रेन......?"

डॉक्टर एकाएका प्रश्नाच उत्तर देऊन भयंकर संतापले....
" . नेमक काय म्हणायच आहे तुला....?"

त्यांचा संतापलेला चेहरा पाहून माझ्या चेहऱ्यावर मात्र किंचित हसून उमटलं.. आपले दोन्ही हात समोरच्या टेबलावर ठेवले आणि किंचित पुढे सरकून त्यांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणालो.

" सर तुम्ही संपुर्ण शरिराचा अभ्यास केलाय पन मग याच शरिराला उभ करणारा आत्मा नेमका कुठ असतो हे सांगु शकाल...? खुपसारे कृत्रिम अवयव मेडिकल सायंन्स ने तयार केलेत पन तुम्ही कृत्रीम आत्मा तयार करू शकाल जो माणुस मेल्यानंतर त्याच्या शरिरात घातल्यावर तो पुन्हा जिवंत होईल...?"

डॉक्टर आवक होऊन माझ्याकड पहात होते....
" आणी हो.. सर...! प्रिया वेडी नाही..."
माझ्याकड पहात त्यानी एक कार्ड काचेच्या टेबलवरून पुढ सरकवल.... मी ते कार्ड उचलुन पाहात वरच्या खिशात घातल..
" Im Sorry sir... जर तुम्हाला राग आला असेल तर..."
एवढ बोलुन मी बाहेर पडु लागलो ते मात्र विचार करत त्या शरीररचनेच्या आकृतिकड पहात राहीले....

*****

कार्ड वर एक पत्ता आणी नंबर दिलेला... मी तो नंबर डायल केला तशी समोरून एका महीलेचा आवाज आला... मी विचारलेली माहीत त्यांनी सांगितली . मला रात्र अशीच वाया घालवायची नव्हती. घरी परतलो आणी किरकोळ साहीत्या बैगेत भरल...
"पुजा... बाहेरगावी जातोय.... उद्या येईन..."

ते मिरज च्या हॉस्पिटलमधे नव्हते गेले... कोल्हापुरजवळच एक मोठे मानसोपचार तज्ञ होते... गाडी त्या दिशेने धावत होती तशी रात्रही आणखी गडद्द होत असल्यासारख वाटु लागल... थंडीच्या दिवसात नितळ चांदण ओढुन येणारी रात्र आज कोळोखान माखली होती जणु काळ्याकुट्ट अजगरासारख्या सावल्या त्या आकाशातील चांदण्या गिळंकृत करत पुढ सरकत होत्या... रात्रीचा गार वारा अंगाला झोंबत होता, पन वेग कमी करून चालणार नव्हत.. प्रत्येक क्षणाला मनावर एखाद दडपन होत कदाचीत मी या सर्वातुन दुर रहाव असा अप्रत्यक्ष संकेतच येत होता... रात्र बरीच झालेली साधारण आकरा वाजलेले, ते हॉस्पीटल समोर दिसत होत.. शहरी मणुष्यवस्तीपासुन दुरच, बरच लांब जस हायस्कुल असाव , समोर लोखंडी गेट आणी पाच सहा फुटांची भिंत... आजु बाजूला छोटी मोठी झाड दिसत होती..... गाडी बाजुला घेत चालत गेटजवळ बनवलेल्या छोट्या खोलीशी आलो आणि त्या भव्य अशा हॉस्पिटल वर एक नजर टाकली.. दुस-या मजल्यावरील काही खिडक्या बंद दिसत होत्या तर काही खिडक्यांमधून त्यांची प्रकाश डोकावत होता... तीथच डाव्या बाजुच्या लोखंडी ग्रिल लावलेल्या उघड्या खिडकीतुन किंचीत प्रकाश येताना दिसला, त्या खिडकीमधून बाहेर पडणाऱ्या मंदी प्रकाशातून डोकावणारी एक मानवी आकृति माझ्याकड पहात असल्याच जाणवल... मी क्षणभर तसाच आकृतीकडे पहात त्या बंद गेटमागुनच वॉचमनला हाक दिली... काही सेकंदांच्या अंतराने मी पुन्हा त्याला हाक दिली तसा बाजुच्या कट्ट्याजवळून चालत डोक्याला मफलर गुंडाळलेली एक वयस्कर व्यक्ति समोर आली.. साधारण साठी ओलांडलेली असेल. सावळा रंग , किंचीत बसक नाक, सुरकुतलेल्या चेह-यावर पांढरी खुरटी दाढी दिसत होती.. अंगात फुल बाह्यांचा सफेद शर्ट आणि तशीच पांढरी विजार त्या इसमाने घातलेली... गेटच्या यातूनच आपल्या किलकिल्या डोळ्यांनी त्याने मला पाहिलं आणी मागे लावलेल्या बाईकला पाहून विचारल..
" कोन पायजे....?"

मला बघताच त्यांनी प्रश्न केला..
" डॉक्टरसाहेबांना भेटायच आहे...."


" सकाळी या.... मेन डाक्टर सकाळीच भेटणार...."


" सर.... खरतर मला एका पेशंटला भेटायच आहे... आज सकाळी आणलय..." मी चेहरा केविलवाणा करत म्हणालो..

" आता भेटायला परवानगी न्हाय र बाळ. उद्या ये..." शेवटी त्याच्या हातापाया पडून आत जायची परवानगी घेतली तीथ काम करणा-या एका मावशीसमोर हात जोडले
"फकस्त पाच मींट..."
त्यांनी मला एका रूमकडे नेल... स्त्री विभाग होता. बराच गोंगाट माजलेला... कोण जोरजोरात रडत होत तर कोणी किंचाळत होत... कोण गाढ झोपलेल तर कोणी नुसतच किलकील्या डोळ्यांनी आजुबाजूला पहात होत... अशीच एक रुम दिसली....दरवाजावर लावलेल्या काचेतुन आत पाहील आणी खळ्ळकन डोळ्यात पाणी आल... पांढरट रंगाचा गाऊन अंगात घातलेला, सार शरीर गोळा करून तीच मुसमूसन सुरू होत..

"प्रिया......." माझा आवाज ऐकताच तीनं झटकन वर पाहील... रुक्ष मोकळ्या केसांना चेह-यावरुन बाजुला करत त्या छोट्याशा बेडवरून ती उठुन बसली... मला समोर पाहुन तीला अश्रु आवरेनासे झाले, बेडवरून खाली उतरुन चालत पुढ आली... रडून डोळे लाल झालेले, माझ्यासमोर हात जोडून ती फक्त रडत होती पन निराशेन भरलेल्या तीच्या चेह-यावर एक समाधान दिसत होत...
" चल रे....... खुप झाला इमोशनल ड्रामा.... सकाळी ये....."
" मावशी सकाळपर्यंन्त मी जीवंत राहीन की नाही माहीत नाही हो... थोडा वेळ बोलतो आम्ही..."
प्रियान विनवणी केली तशा त्या मावशींनी हातातला टॉर्चचा प्रकाश तीच्या चेह-यावर पाडत म्हणाल्या...
" तुला आम्ही मरू देत नाही..."
मावशीचे शब्द कानावर पडले तस मी प्रियाकड पाहील... हातानेच खुण केली... ' काळजी नको करूस... मी आहे तुझ्यासोबत.'
तीलाही खुप बर वाटल... आणी माझी नजर तीच्या मागील खिडकीवर गेली... त्या खिडकीच्या पलिकडे कोणीतरी ऊभ होत..
कदाचित पलिकड दुसरी रुम असावी...
" हा महिलांचा वार्ड आहे ना....?" शंका वाटली म्हणुन मी त्या मावशीला विचारल
" हो .... फक्त स्त्रीया मुली आहेत इथ...."
"मग पलिकडच्या रूम मधे तो मुलगा काय करतोय..."
तस प्रिया माग पाहु लागली... पन तोवर तो मुलगा तीथुन गेला होता...
" तीथ मुलगाच काय पण कोणाची सावली पन पडु शकत नाही..." ती मावशी जरा अतीआत्मविश्वासुच वाटली....
" हो का..... ते कस....?"
" सांगते.... प्रिया..... ती खिडकी उघाड...." मावशीचा आदेश येताच प्रिया माझ्याकड थोड भयभीत नजरेन पहात खिडकीच्या दिशेन चालु लागली.. मावशी मात्र भलत्याच आत्मविश्वासात होती.. खिडकीपाशी पोहोचल्यावर तीन फिरून आमच्याकड पाहील
" काही नाही होणार. उगाच कशाला घाबरतेस..?"

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED