propose - 7 books and stories free download online pdf in Marathi

प्रपोज - ७

तीच्या आईची ती तक्रार योग्यच होती,
प्रिया आपल्या आईला शांत व्हायला सांगु लागली पन त्याच्या डोळ्यातुन पाणी येतच राहील..

********

दोन दिवसात तीला डिस्चार्ज मिळाला पन तीच शरीर कृश होत चाललेल... एखाद्या असाध्या रोगान ग्रासलेल्या माणसा सारख निस्तेज बनत चाललेल तीच शरिर पहावत नव्हत .. ती बरी झालेली पन कायमची नाही... तीला पुन्हा कधी त्रास सुरू होईल कोणीच सांगु शकत नव्हत... आणी आता तीला त्रास सुरू झाला तर तो सहन करण्याची शक्तिही तीच्या शरिरात राहीली नव्हती ... तीचा अंत निश्चीत होता... पन हे का होतय..? याच उत्तर फक्त प्रियाच देऊ शकत होती... हो... याच उत्तर तीच देऊ शकत होती.. तीला मदत हवी होती आणी तीला अस तडफडताना मला पहावत नव्हत...

*****

रात्री त्यांच्या घरी पोहोचलो.. एव्हाना रात्रीचे दहा वाजून गेले होते, तिच्या घरातले सर्वच जेवण आवरून गप्पा मारत बसलेले. हाॅलमधे सोफ्यावर ती आणी तीचा भाऊ टीवी पहात होते, तर वडील बाजच्या खुर्चीवर सकाळच वर्तमान पत्र चाळत होते...

मला समोर पहाताच टीवीचा रिमोट भावाकड देत प्रिया काहीतरी निमीत्त काढुन आपल्या रुममधे गेली.. माझ्या 'प्रपोजचा परिणाम, राग शेवटी...

मला समोर पाहताच तिची आई म्हणाली...

" अरे आता ये ना...असा का अनोळखी असल्यासारखा दबकत दबकत येत आहेस.."

जास्त काही न बोलता थेट मुद्द्याला हात घातला.

" आई .... एक विचारू का...?"
" हो विचार ना...."
मी काय विचारतोय हे सर्वच कुतूहलाने पाहु लागले..

" आई , इतके मोठमोठे डॉक्टर पुण्या मुंबईत आहेत मग तुम्ही कोल्हापुरला कसे आलात...? कारण इकडे 'निदान' नाही झाल तर इथले लोक उपचारासाठी त्या मोठ्या शहरात जातात...."
माझ्या प्रश्नाने सर्वच स्तब्ध झाले... तीचा भाऊ टीवीचा आवाज कमी करत माझ्याकडे पाहु लागला, सर्वांचा उडालेला गोंधळ मला त्यांच्या चेह-यावरून दिसत होत...
कोणी काहीच समजु देत नव्हत. कदाचीत त्यांना ही गोष्ट कुणाला सांगावी वाटत नव्हती...

" मला त्याची चाहुल जाणवलीये... ते जे कोणी प्रियाला त्रास देतय, ते आहे..पण नेमका काय आहे हे तुम्हीच सांगू शकताय."

माझ्या या वाक्यान सर्वांच्याच चेह-यावर एक भीती झळकली. भिंतीकडेला उभी तीची आई मागे तोल गेल्यासारखी भींतीचा आधार घेत खाली बसली, वडीलांनी हातातल वर्तमानपत्र समोर टेबलवर ठेवत अस्वस्थपने माझ्याकडे पाहील... पण मला पाहुन आपल्या रूममधे गेलेली प्रिया दरवाजा उघडुन बाहेर आली..

" काय पाहीलस तु...?"
प्रिया भीती आणी कुतूहलान विचारू लागली पन तीच्याही चेह-यावर अस्वस्थता होतीच.
" एक विचीत्र आकृति. जी तुझ्या या अवस्थेला , वेदनांना कारणीभुत आहे....."
माझ बोलण ऐकताच प्रियान आपल्या आई बाबांकडे पाहील...
"आता तरी विश्वास ठेवा माझ्यावर...." तीच्या डोळ्यात पाणी आल आणी बोलता बोलता रडत आपल्या आईजवळ बसली..
" तुम्ही सगळे मला वेड ठरवत होतात. पन मी खरच सांगतेय मी वेडी नाही हो.... 'ते' आहे ..."
" काहीतरी बरळु नकोस..." बाबानी प्रियावर ओरडत माझ्याकड पाहील....
" काय पाहीलस... ? काय दिसल तुला..? प्रिया तुच सांगितल असशील याला...!"
" नाही.... तीने काही नाही सांगीतल आणी मी तेच समजुन घ्यायला आलोय...."

मी तीच्या बाबांना पहात म्हणालो....

" जेव्हा जेव्हा प्रियाला त्रास झालाय तेव्हा एक काळी सावली तीच्या आजुबाजूला होती.. याचा अर्थ ती फक्त प्रियालाच यातना देतेय...पन परवा त्या आकृतिन माझ्यावरही हल्ला केला.. प्रियाला तडफडताना पाहुन एक विलक्षण आनंद त्या आकृतिला होत असल्यासारख वाटत...."

सर्वच माझ्या बोलण्यान आवक झाले काही वेळ सर्वच गप्प होते.. अधुनमधून प्रियाच मुसमूसन तेवढच सुरू होत बाहेर रात्र गडद्द होत चाललेली आणी समोरच्या भिंतीवरच्या घड्याळाचे टीक टीक करणारे काटे संथ गतीने पुढ सरकत होते...

" कदाचीत तुम्हाला वाटत असेल मी तुमच्या खाजगी आयुष्यात जास्तच रस घेतोय , पन प्रियाच्या वेदना पहावत नाहीत, रस्त्यात एखाद्या अनोळखी व्यक्तिचा अपघात झाला तरी पुढ जाऊन मदत करतो मग प्रिया तर ....." मी मागे दरवाजा कडे वळलो तसा मागुन आवाज आला...

" प्लीज थांब...." तीचा आवाज येताच मी मागे पाहील.. ती आपल्या आई बाबांकडे पहात बोलु लागली...

" आजवर सगळ्यांनी मला वेड ठरवल, हायएज्युकेटेड होते ना... 'हैल्युसिनेशन' ..... हो हाच आजार झालाय म्हणाले होते ना तुमचे मोठे भाऊ... आणी मला कोल्हापुरला उपचारासाठी नव्हे तर मिरजच्या मेंटल हॉस्पीटल मधे भरती करायला आलो आहोत ना आपन....? हो ना ग आई...."
बोलताना तीला भरुन आल होत.... आपल्या च्या कुशीत शिरून ती तशीच रडत होती..


*****

मी घरी परतलो... ती थोड का असेना बोलली माझ्यासाेबत. लाईट बंद करत अंथरूणावर पडलो तोच व्हॉट्सअॅपवर मेसेज आला, प्रियाचा..
' उद्या मी तुला सांगेन सगळ , क्लास सुटल्यावर भेटू...'

तीचा मेसेज वाचुन थोड बर वाटल निदान ती या निमीत्ताने तर दोन शब्द बोलेल ...

*****

मी ड्युटीवर तब्बेत बरी नसल्याच सांगून बाहेर पडलो ... तीची वाट पहात ठरलेल्या ठिकाणी बसुन होतो...

तोच तलाव, 'प्रपोज' वाला... हम्म.... निसर्गाने जमिनीवर हिरव्यागार गवताचा जणु गालीचा अंथरला होता, त्यावर ठरावीक अंतरावर बसलेली प्रेमी युगूल कुणालाही हेवा वाटावी अशीच ... एकमेकांच्या हातात हात गुंफून चालणारे जोडपे... आयुष्यातली सर्वात मोठी श्रीमंती त्याच्याकडे होती, आपल्या आवडत्या व्यक्तीच्या रूपातच... त्यांना पाहुन आपन कीती कमनशिबी आहोत याची जाणिव मात्र होत होती...
"संजु......? कधीपासुन तुला बोलावतेय मी."

पाठीमागुन आलेल्या प्रियाच्या आवाजान अचानक त्या सुंदर कल्पनेतून बाहेर आलो.. समोर दूरवर गोलाकार पसरलेल्या त्या तलावामधील त्या निळसर पाण्याकडे पहातच म्हणालो
" सॉरी... जरा वेगळ्याच विचारात होतो... " बोलतच तीच्याकड पाहील .पन मागे कोणीच नव्हत , ती आली नव्हती. पन माझ्या जवळुन जाणा-या प्रेमी युगूलान विचीत्र नजरेन माझ्याकड पाहील आणी तसेच चालत पुढ गेले. पन ती अजुन कशी आली नव्हती...? 11 ला भेटणार होती 12 वाजुन गेले होते... मी तीला कॉल लावला पन नॉट रिचेबल... आणखी थोडा वेळ वाट पाहीली पण शेवटी निराश मनान परतलो...येताना तीच्या घरासमोरूनच आलो... बाईक स्टँडवर लावून आत आलो, पन अजुनही तीचा कॉल लागत नव्हता...

" प्रियाला कॉल करतोयस ना..?" माझ्या अस्वस्थ चेह-याकड पहात पुजा न विचारल
" हो ग..... काहातरी महत्वाच बोलायच आहे म्हणाली होती..."
" हे घे...." माझ्याकडे एक कागद देत म्हणाली
" तीला उपचारासाठी दुस-या हॉस्पिटल मधे नेलय... कदाचीत ते पुन्हा आपल्या गावी नाशीकला गेलेत..."
" काय...? पन मला का नाही बोलली...."
" ती सकाळी क्लासला जात होती तेव्हाच एक व्हाईट व्हॅन आली होती. सगळेच सोबत गेलेत.."

मी चिठ्ठी उघडुन वाचु लागलो..
' सगळ्यांनी मला वेड ठरवल आणी एकवेळ मला स्वता:लाही वाटल की खरच मी वेडी आहे पन मी वेडी नाही रे.. निदान तु तरी माझ्या विश्वास ठेवलास thank you....'

ती चीठ्टी वाचली आणी सुन्न झालो. नकळत डोळ्यात पाणी आल . पन आता पुढ काय....?

ती परत तीच्या गावी गेलीय, आपली सारी दुख: , सा-या यातना एक भयान पोखरत जाणार आयुष्य घेऊन ती गेली... मला एकटच सोडुन गेली ती.... पन तीला जे सांगायच होत ते चिठ्ठीत लिहू शकत होती आणी चिठ्ठी लिहीण्यापेक्षा मेसेज करू शकत होती... बरोबर.... कारण ती मला परका समजत होती... 'आपल्यामुळे दुस-याला त्रास नको'... हेच म्हणाली होती ना... तसाच आपल्या रुममधे जाऊन बसलो पन लक्ष लागेना. समोर काचेच्या कपाटात एका ग्रिटींगमधे पीन लाऊन उभा केलेला तो गुलाब दिसला... 'प्रपोज' वाला गुलाब. त्याच्यावरच तेज , सुगंध , त्याच सौंदर्य कमी होत चाललेल... तो पुन्हा ताजा , टवटवीत नाही होणार.... आणी शेवटी तो नकळत बाहेर फेकला जाणार , जशी प्रिया आता वेड्याच्या हॉस्पीटल मधे....
'वेड्यांच हॉस्पीटल' .......? झटकन ऊभा राहीलो

हो ती म्हणाली होती घरचे सर्व तीला मेंटल हॉस्पीटल मधे भरती करायला आलेत.. आणी तो डॉक्टरही तेच म्हणाला होता...

तो डॉक्टर......?

भेटायलाच हव...क्रमशः


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED