propose - 10 books and stories free download online pdf in Marathi

प्रपोज - 10Blue eyes

By Sanjay Kamble

रात्रीच्या गहिऱ्या काळोखात बुडालेल्या डांबरी रस्त्यावरून ती एकटीच चालत होती... विजेच्या खांबावरील बल्ब गल्लीतील टवाळखोर मुलांनी फोडल्यामुळे 1 , 2 विजेच्या खांबावरील बल्ब तेवढेच सुरू होते... कामावरून सुटून ती आता घरी निघालेली... मोबाईल कानाला लावून ती आपल्या आई सोबत बोलत होती....
" हो ग आई .. बाबांची औषधे घेतली आहेत... मेथीच्या दोन जुड्या आणी पांढरी वांगी.. तुझी आवडती... आता आणखी काही आणायला सांगू नको कारण आता सगळी दुकानं बंद झाली आहे..."

तिचं बोलणं ऐकून आई म्हणाली...
" इतका उशीर का केलास...? शहरात काय सुरू आहे माहित आहे ना...?"

आईच बोलणं ऐकून ती म्हणाली..
" हो माहीती आहे... दिड माहीण्यात आतापर्यंत तीन मुलींच अपहरण करून खून झालाय... ते ही मुंडकं धडावेगळ करून..खुनी अजुन सापडलेला नाही...आई, मी पण बातम्या पहाते हं..."

" काय मुलगी आहे ही...? भिती ती कसली नाहीच..."

" आई ... नोकरी तर करावीच लागेल ना ग.."

" हो ग...काय नशिब आहे आमचं, जिथ भितीन लोकांनी मुलींना घराबाहेर सोडण बंद केलय तिथं कुटुंबाचं पोट भरायला तुला घराबाहेर पडावं लागलय..."

" आई कशाला काळजी करतेस.. दहा पंधरा मिनिटांमध्ये मी घरी पोहोचतेय.. काळजी करू नको.. ठेवते आता.."

एवढे बोलून तिने फोन कट केला... आणी खांद्यावर अडकवलेली पर्स नीट करत ती चालू लागली..वाहनांची किंचित ये जा होती... अशीच एक एक चार चाकी मोटार तिच्या अगदी शेजारीच येऊन थांबली... तीनं वळून पाहिलं पण काही समजायच्या आतच एकानं तिच्या तोंडावर काळ कापड झाकल तर दुस-यान तीला गाडीत खेचल... कोणाला काही समजायच्या आत पुढच्या क्षणी ती गाडी सुसाट वेगात निघूनही गेली... या झटापटीत तिचा मोबाईल आणि पर्स मात्र त्या रस्त्यावर तसेच पडून राहिले...

काही वेळानंतर

रात्रीच्या काळोखात एका घनदाट जंगलातून जाणा-या कच्च्या रस्त्यावर एक चारचाकीी मोटार थांबलेली .... तिथेच काही अंतरावर झाडीतून आगीच्या ज्वाळाांचा पिवळसर तांबडा प्रकाश दिसत होता .,. आजुबाजुला पसरलेल्या घनदाट झाडीमध्येच असणाऱ्या थोड्या मोकळ्या जागेत एक अग्निकुंड धडधड पेटत होता ...... त्या अग्नीकुंडासमोर एक काळाकुट्ट जाड अर्धनग्न माणूस जो कदाचित मांत्रिक असावा, आपल्या उजव्या हाताने एक एक आहूति त्या अग्नीत अर्पण करू लागला.. त्याच्याााा आजूबाजूला पूजेसाठी लागणार बरंच साहित्य ठेवलेलं... बाजुुुुला एका मोठ्या उथळ भाांड्यात काहीतरी होतं ज्यावर कापड झाकलेल... त्या प्रत्येक आहुती सरशी चर्र चर्र आवाज करत त्या यज्ञकुंडात पेेटणा-या आगिमधून उठणा-या लालसर ठिणग्या सफेद धुरा सोबतच हवेमध्ये तरंगत उंच उंच जाऊ लागल्या ... तो मांत्रिक एक सारखे काहीतरी पुटपुटत होता... बसकं नाक, गोल चेहरा आणि तुळतुळीत टक्कल.... अग्नीच्या लाल तांबड्या प्रकाशात त्याचं हे काळजात जरब बसवणार रूप उठून दिसत होतं... त्यांचा विधी सुरू असलेल्या ठिकाणापासून काही अंतरावरच असलेल्या एका वडाच्या झाडावर उलट्या लटकणाऱ्या वटवाघळाची लाल रखरखती नजर जमिनीवर पेटणार्‍या अग्निकुंडावरच स्थिरावलेली... ते वटवाघुळ सारं काही अगदी शांतपणे पहात होत.. रात्र संथपणे पुढे सरकत होती.... त्या अग्निकुंडााच्या दुसऱ्या बाजूला तीघे तरूण हात जोडून बसलेले... अग्नीत आहुती टाकत त्या मांत्रीकानं आपली नजर एक एक करून तिघांवर रोखली आणि शेजारीच जमिनीवर ठवलेल्या त्या उथळ पात्रावर झाकून ठेवलेल कापड बाजूला केलं... त्या पात्रात त्याच मुलीचं तोडलेल मुंडक होते जीच काही वेळापूर्वी त्या तरुणांनी अपहरण केलेल... तिच्या केसांना पकडून त्यानं तीचं मुंडकं पटणा-या अग्नीवर धरलं तसे तिच्या कापलेल्यााा मानेतून थेंब थेंब रक्त त्या अग्नीत निथळू लागलं... समोर बसलेलेेे तिघे तरुण ते भीषण दृश्य निसंकोचपणे पाहत होते.. कदाचित हे त्यांच्यासाठी नवीन नव्हतं. मांत्रिकानेे आपली नजर त्या तिघांवर रोखली आणि करड्या आवाजात म्हणाला...


"या चौथ्या बळी सोबत या परिसरातील सर्व आसुरी शक्ती जागृत झाले आहेत... आता पाचवी आहुती , पंधरा दिवसांनी येत्या पौर्णिमेला... एका तरूण स्त्रीचं शीर कापुन अग्नीला अर्पण कराव लागेल.."
पहीला तरूण हात जोडून शांतपणे म्हणाला..
" तरूण स्त्रीचं. ?"

" हो तरूणीच...."
दुसरा तरूण " ते कुठुन आणायच...? "

" तुम्ही ठरवायचं... चार बळी दिलेत , आता पाचवा बळी... मग या जंगलात लपवलेल गुप्तधन स्वताहून तुम्हाला बोलावून नेईल.. आणि जेव्हा गुप्तधन तुमच्या हाती लागेल त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक अमावस्येला एक बळी गुप्तधन सापडलेल्या जागी द्यावा लागेल.. आणि त्यावेळी माझी गरज नाही लागणार."

तिसरा तरूण जरा अडखळतच म्हणाला
" बाबा, विवाहित की अविवाहित...? "

" कोणतीही चालेल... पण...." एवढे बोलून मांत्रिक मधेच थांबला...

" पण काय बाबा....?" त्यांच्यातल्या एकाने विचारल... तिघेही श्र्वास रोखुन शांतपणे त्या मांत्रिकाकडे पाहू लागले... तसं त्या मांत्रिकाने डोळे बंद केले... तिघेही हात जोडून त्याच्या त्या क्रूर चेहऱ्याकडे पाहत होते... एक विलक्षण हास्य त्याच्या चेहऱ्यावर पसरल... अग्नीचा लाल तांबड्या प्रकाशात त्याचं ते हास्य अधिकच भयानक वाटत होतं..
त्यानं आपले डोळे हळुवारपणे उघडले... तिघांकडे एक भेदक कटाक्ष टाकला आणि किंचित हसून म्हणाला..
'' निळ्या डोळ्यांची तरुणी..."

" निळ्या डोळ्यांची...?"

" हो.... निळ्या डोळ्यांची.. या पौर्णिमेला बळी द्यावा लागेल...आणि एक गोष्ट लक्षात ठेवा... पाचवा बळी नाही भेटला तर इथल्या सैतानी शक्ति मला जिवंत सोडणार नाहीत...."
एवढे बोलून त्या मांत्रिकाने अग्नीवर धरलेल त्या मुलीचा मुंडकं धडधड पेटणा-या त्या अग्नीकुंडात सोडून दिलं त्यासरशी आगीच्या ज्वाळांसोबत लाल प्रकाशमय ठिणग्यांसोबतच धुराचा लोट हवेत झेपावला.. समाधाानकारक नजरेने ते तिघेही एकमेकांना पाहू लागले... तसं मघापासून त्या झाडावर बसलेल्या वटवाघुळान अंगाभोवती आकसून घेतलेले आपले पंख हळूवारपणे वेगळे करत लांब पसरले आणि झटकन त्या झाडावरून घिरट्या घालत आकाशात उंच झेपावल .. त्याच्या तोंडातून बाहेर पडलेल्या चित्कायांनी परिसर थरारून गेला..

********


सर्वजण आपल्या त्या चारचाकी मोटारीतून घरी निघाले...
"Blue eyes..."
आणायची कुठून.... या एकाच विचाराने तिघांच्या मेंदूत काहूर माजवलेल... रात्रीच्या काळोखात डांबरी रस्त्यावरून त्यांची मोटार संथपणे धावत होती...
मागच्या सीटवर बसलेला एकजन म्हणाला...
" कॉलेज सुरू असतं तर 'टीना' होतीच... काय ते तिचे blue eyes hypnotise.. आख्ख कॉलेज तिच्या मागे पागल झालेलं आणि ती माझ्या मागं..."

त्याच बोलणं ऐकून शेजारी बसलेला तरुण म्हणाला..
" हो यार... आता उपयोगी पडली असती.."

"तशी ही बरीच उपयोगी पडली ना.."
त्याच्या बोलण्यान सगळेच असुरी हास्य करत एकमेकांना टाळ्या देऊ लागले..." ए मस्करी खुप झाली....३ मुलींच्या खुना मुळ आधीच पोलीस सतर्क झालेत... उद्या या चौथ्या मुलीचा मृतदेह नदिकठी मिळाल्यानंतर शहरात कडेकोट बंदोबस्त होईल... त्यात फक्त नोकऱ्या करणाऱ्या मुली बाहेर आहेत..."


त्याच्या बोलण्यावर कुणीच प्रतिक्रिया दिली नाही..
तोच गाडी चालवणाऱ्या मुलाची नजर रस्त्याच्या कडेला उभ्या काही कॉलगर्ल वर नजर पडली... त्याच्या मनात राक्षसी विचार चमकून गेला...
गाडीचे स्टेरिंग सांभाळत मागच्या सीटवर बसलेल्या आपल्या मित्रांना उद्देशून म्हणाल..
" म्हणजे इथुन पुढे अशा मुली स्त्रीया पहायच्या ज्यांच्या जगण्यान मरण्यान कोणालाच फरक पडणार नाही... जी जगली काय आणि मेली काय, सारखंच...."

"म्हणजे..?"

" म्हणजे एक सॉफ्ट टार्गेट.."

" Soft target....? पण कुठे शोधायची....?"

" शोधावी लागत नाही... तु हवी ती निवडायची.."

" काय....? पण कोण...?"

" निश्चिंत व्हा...त्या जंगलात लपवलेला खजिन्यासोबत तिथल्या सैतानी शक्ति आता आपल्या हातात असतील ."
आणि तिघेही आनंदाने घरी परतले... त्यांना त्यांच सॉफ्ट टार्गेट सापडलं होतं... आता प्रतिक्षा होती ती येत्या पौर्णिमेची...

इकडे शहरात तीनं मुलींची शीर धडावेगळ करून हत्या झाली होती आणि दोन दिवसांनी चौथ्या मुलीचं नुसतं धड नदीकाठी एका झुडपात पडलेलं एका जनावरं चारण्यासाठी गेलेल्या इसमाला दिसलं... सारं पोलिस खातं या प्रकरणाची चौकशी करण्यात गुंतलेल पण कसलाच धागादोरा त्यांच्या हाती लागत नव्हता.. लोकांनी आपल्या मुलींना घराबाहेर एकटं सोडणं बंद केल कारण खुनी मोकाट होते... दिवसामागून दिवस पुढे जात होते आणि शेवटी ती रात्र आली..

पौर्णिमेची रात्र....

खिन्न मनाने आज पुन्हा ती आपल्या रोजच्या ठिकाणी उभी होती.. रात्रीचे साधारण दहा वाजून गेलेले... पौर्णिमा असल्याने पूर्ण चंद्र आकाशात बराच वर आलेला... त्या चंद्राच्या नितळ प्रकाशात तिचं देखणं रूप अधिकच उठून दिसत होतं... त्या रस्त्यावरून स्त्रीयांची ये-जा रात्रीच्या वेळी नसायचीच... जरा बदनाम इलाका असल्यान विवाहित आणी अविवाहित आंबटशौकीनांची तीथे रेलचेल ठरलेली... शहराबाहेरील त्या रस्त्यावरून जाताना ठरावीक अंतरापर्यंत देहविक्री करणा-या महिलांची रांग दिसायचीच... ती देखील तीथेच उभी होती. एका पायात उंच टाचेचे काळे आणि लाल चमकदार खड्यांची पट्टी असलेले सैंडल ... गडद्द लाल रंगाचा शॉर्ट ड्रेस जो गुडघ्यापासून विथभर वरच होता त्यामुळं तीच्या मांसल गो-यापान मांड्यावर येणाऱ्या जाणाऱ्या ची नजर पडली नाही तरच नवल.. कमरेच्या घाटदार वळणांवरून निमुळत्या पोटावर आणी तसाच वर छातीपर्यंत अंगाबरोबर फिट्ट बसलेल्या इलास्टीकच्या लाल मखमली कापडामुळ तीच्या स्त्री देहाचे उभार कोणाही पुरुषाला स्वत:कडे आकर्षित करण्यासाठी पुरेसे होते... लालचुटुक ओठांवर तशी लिपस्टिकची गरज नव्हती पण ती पुसटशी लावायचीच... आणखी या सगळ्यात कहर म्हणजे तीचे निळसर डोळे...
एक दुचाकी तीच्या जवळ येऊन थांबली.. थोडा वेळ बोलून ती दुचाकी दुसऱ्या महीलेकड वळली... लॉकडाऊन शिथील होऊन बरेच दिवस झालेले.. पण लोकांचा म्हणावा तसा ओघ त्यांच्याकडे नव्हता... या सगळ्याची किळस वाटायची पण नाईलाज होता........

काही वेळापूर्वी
सायंकाळ झालेली तो अंथरुणात शांत झोपला होता... त्याच्या अंगावरची चादर नीट केली... त्याच्या कोमेजलेल्या चेहऱ्याकडे पाहताना तिच्या निळ्या डोळ्यात पाणी तरळलं... मायेन डोक्यावरून हात फिरवला... त्याची अवस्था पाहून तीचं काळीज तुटत होत... हातापायांच्या नुसत्या काड्या झालेल्या, चेहऱ्यावरच तेज कुठल्याकुठं विरून गेलेलं. एका दिर्घ आजारपणामुळ ग्रासलेल्या रोग्यासारखी त्याची अवस्था झालेली... अंगावरच कातड हाडांना चिकटून एक सांगाडा राहिलेला... पण ही वेळच भयंकर ओढावलेली... साध्या सर्दीपडशाच्या आजारान संपूर्ण जगच थांबवलेलं... चैनी होती ती फक्त पैसेवाल्यांची...पण ज्यांना तहान भागवण्यासाठी रोज विहीर खणावीच लागते अशांच काय..? ते सर्वच कोणावर तरी अवलंबून होते.. 'कोणितरी द्याव मग आपण खावं.'
असं लाजिरवाण जगणं नशीबी आलेल... त्याच्या कपाळाच हलकेच चुंबन घेत मनोमन त्याला वचन दिलं...
" काळजी करू नकोस... काहीतरी घेऊन येईन...."
एवढं बोलून ती उठली... त्याच्या खोलीतून बाहेर येत दार बंद करून घेतलं... एव्हाना रात्र व्हायला लागलेली... ती देखील आपल्या रूममध्ये आली... साधं पत्र्याच असं तीच घर... ना मजबूत भिंती , ना भक्कम छत... लाकडी बांबूच्या खांबांना पत्रे बसवलेले.. ते लोखंडी पत्रे ही आता बरेच जिर्ण झालेले... काही ठिकाणी गंजून फक्त बांबूच्या आधाराने उभे होते... त्यांना आतून प्लास्टिकचा पिवळा गडद्द कागद गुंडाळलेला...
एका कोपऱ्यात बांधलेल्या दोरीवर जुन्या साड्यांच्या पडदीन आडोसा केलेल्या बाथरूम मधे जात तीनं अंगावरचे कपडे काढले आणी प्लास्टिकच्या बादलीतील थंडगार पाणी अंगावर घेतलं... फ्रेश होऊन ती आरशासमोर बसली... भडक रंगाचा शॉर्ट ड्रेस अंगावर चढवला.. गडद मेकअप करत डोळ्यात काजळ घातलं... आणि क्षणभर आपल सौंदर्य पाहत राहिली.. पण क्षणात तिच्या निळ्या डोळ्यात पाणी तरळलं आणी ते अश्रू ओघळत गालांवरून खाली आले.. पण लगेचच तिने रुमालानंं ते पाणी टिपलं... पुन्हा आपल्या डोळ्यांच्या खालचा मेकअप नीट केला.. ओठांवर लाल रंगाची पुसटशी लिपस्टिक लावत ओठ एकमेकांवर नीट घाासले... वर बांधलेलेेे केस मोकळे सोडले... लाकडी दरवाजा माागे अडकवलेेेलीी पर्स उघडून त्यात आवश्यक ते साहित्य आहेे का पाहिलं आणि बाहेर पडतान पुन्हा एकदा त्याच्या खोलीचं दार उघडून भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिल...
बराच वेळ त्या जागी उभी होती.. तिच्या आजुबाजुला देखील काही तरुणी , महिला उभ्या होत्या... रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना ती मोठ्या आशेन पाहत होती...
पण अजूनही कोणी कस्टमर आले नव्हतं... तिच्या मनात विचारांचं काहूर माजलेलं..
'आज ही जर त्याच्या पोटाला अन्न नाही भेटलं तर तो मरून जाईल... आणि जर तो नाही राहिला तर मी जगून काय करू...'
तोच एक चारचाकी मोटार तीच्या जवळ येऊन थांबली. गाडीची काच खाली झाली तशी त्या अर्धवट उघड्या काचेतून त्या तरूणान एका विचित्र नजरेने तीच्या निळ्या डोळ्यांमध्ये पाहीलं... आणि त्याच्या कानामध्ये मंत्रीकान सांगितलेले शब्द घुमले..
" निळ्या डोळ्यांची तरुणी.'
त्या तरुणाच्या मनात सुरू असलेल्या भयंकर विचारांची तीला साधी पुसटशी कल्पनाही नव्हती... खूप दिवसांनी पोटभर अन्न खायला मिळणार या भावनेनं तीनं मनोमन देवाला हातचं जोडले... क्षणभर बोलून ती त्याच्या गाडीत बसली.... त्यान थोडे पैसे पुढं केले... ते पाहून तिच्या डोळ्यात पाणीच तराळल... क्षणात तीच्या नजरेसमोर त्याच ते खंगत जाणार शरीर उभं राहिलं..
'तो आता बरा होईल,'
हा विचार करत तीन पैसे आपल्या पर्समधे ठेवले.. तशी तिला आपल्यामागील सिटवर कसलीशी चाहूल जाणवली.. ती मागे वळली आणि मागे बसलेल्या दोघांवर तिची नजर पडली... ती घाबरली...
'' हे पण...?"

" घाबरू नको.... ते फक्त सोबत आलेत..."

तसं मागे बसलेल्या तरूणान हळुच आपल्या पायातील बुटात लपवून ठेवलेला धारधार सुरा हळूच बाहेर काढला... त्या सू-याचं चकाकणारे पातं पाहून त्याच्या बाजूला बसलेला तरुण कानाजवळ जात म्हणाला...
" गाडीत मारायला नको.. नाहीतर सगळ्या गाडीत रक्ताचा सडा पसरेल..''
त्याचं बोलणं ऐकुन हातात घेतलेला चाकू त्यानं पुन्हा सिट मागे लपवला...
ती मात्र काहीशी घाबरलेली.. काळजात थोडी भीती होतीच, पण नाईलाज होता... पोटाची आग माणसाला कीती लाचार बनवते या एका विचारान राहून राहून तिच्या डोळ्यात पाणी येतं होतं... त्याच खंगलेल शरीर नजरेसमोर आलं आणी त्याच्या साठि ती तयार झाली... ती थोडं धाडस करून म्हणाली...
" मला तुमच्यावर विश्वास नाही... माझ्या खोलीत येणार असाल तर मी तयार आहे.."

" हा .....हा.... चालेल ना..."

त्यांची चारचाकी मोटार तीच्या घराजवळ येऊन थांबली... ती खाली उतरली तसा तो तरुण आपल्या मित्रांकडे पहात म्हणाला...
" मी दरवाजा उघडाच ठेवतो... तुम्ही हळुच या आणि तिचा गळा चिरून टाका... आपल्याला तीच मुंडकच हवं आहे...."
एवढं बोलून तो तरुण त्या तरूणीच्या मागे चालत तीच्या खोलीत गेला... त्याचे मित्र रस्त्यावर लावलेल्या गाडीमध्येच थांबले... आजुबाजुला तुरळक झाडी आणी मधून जाणार ओसाड रस्ता. अशा ठिकाणी आता ते गाडीत बसलेले...
आत येऊन त्यानं दरवाजा बंद करून घेतला... खोलीत काही ठिकाणी तीनं मेणबत्त्या लावल्या होत्या.. आणखी एक मेणबत्ती पेटवत तीने शेवटची मेणबत्ती टेबलवर ठेवली... ती निष्पाप पणे पुढं घडणाऱ्या एका जिवघेण्या प्रसंगापासुन अनभीज्ञ अशी शांत उभी होती.... तीचा कमनीय स्त्रीदेह न्याहाळताना त्याच्या तोंडून अलगद शब्द बाहेर पडले..
'' soft target "

ते वाक्य ऐकून ती मागे वळली..
"काही म्हणालास का...?"

वासनांध नजरेन तीच्या उभारांवर नजर रोखत म्हणाला
" Soft and hot..''

तसा तीन आपल्या गळ्यातील स्कार्फ काढून बेडवर टाकला.. हातातली पर्स तीथेच टाकली...तिच्या अगदी जवळ येत तीला चिकटला... तिचं निष्पाप रूप न्याहाळत निळ्या पाणीदार डोळ्यात पहात मनात म्हणाला ...
' तुला ठार करावसं वाटत नाही पण नाईलाज आहे.'
तिच्या गालावर रूळणारी केसांची बट बाजूला करत तीच्या कानामागे सारली तसं तीने डोळे मिटून घेतले... आणि मेणबत्तीची पिवळसर वात संथपणे पेटू लागली...

आणि दुर त्या जंगलात अग्नीकुंडही पिवळसर अग्नी धडधड पेटत होता... सर्व साहित्याची मांडणी करून तो मांत्रिक आता त्या तीघांची वाट पाहू लागला... चंद्रबिंब आता आकाशात बरच वर आलेल... दुर कुठेतरी झालेल्या कोल्हेकुई सोबत त्या मांत्रिकाच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य पसरलं... "त्या तरूणांना फक्त गुप्तधन मिळेल , पण मला या परिसरातील भुतं पिशाच्च वेताळ यांचे अधिपत्य मिळेल.. राज्य करेन या जगावर "
आणि भेसूर हास्य त्याच्या तोंडून बाहेर पडल... आणि भेदक नजरेन तो चंद्राच पुर्णबिंब पहात राहीला...

त्याच चंद्राकड पहात गाडीजवळ उभा त्याचा मित्र म्हणाला...
"बराच वेळ झालाय... खेळ रंगात आला असेल..."

" हो चल.... खेळाचा शेवट करूया.."
म्हणतच हातात तो धारधार सुरा घेऊन त्या खोलीच्या दिशेने चालू लागले.. दुतर्फा झाडं आणि मधून जाणारी ती पायवाट तुडवत ते चालू लागले.. रातकिड्यांचा किर्र किर्र आवाज एकसारखा येत होता.. तर झाडावरून टामटिमणा-या काजव्यांचा मुक्तविहार सुरू होता... चालत दरवाजाजवळ येत आत पाहिल तर मेणबत्ती संथपणे जळताना दिसत होती.. मेणबत्तीच्या त्या मंद प्रकाशात सार काही अंधुक दिसत होत... त्यांनी दरवाजा हळुवारपणे पुढे ढकलला... खाली जमिनीवर दोघांच्या अंगावरचे कपडे एक एक करून विस्कटून पडलेले.. . बेडच्या पलिकडे जमिनीवर कदाचित दोघांचा प्रणय सुरू होता.. धारधार सुरा हातात घट्ट धरत दबक्या पावलांनी पुढ निघाला तर त्याच्या पायाचे तळवे बेडच्या पलिकडून दिसत होते तर ती तरूणी त्याच्यावर आरूढ झालेली... उघड्या पाठीवर पसरलेले तीचे काळेभोर मोकळे केस पाहून त्यान आपल्या हातातला धारधार सुरा घट्ट धरला तशी ती खाली झुकू लागली... .. दबक्या पावलांनी तो आणखी थोडा पुढ आला आणी ...........
समोरच दृश्य पाहून भीतीन त्याच्या हातातला सुरा निसटून खाली पडला... त्या आवाजाने झटक्यासरशी तीनं मान वळवून माग पाहिलं... तिचं ते रूप पाहून त्याच्या अंगातली सारी शक्ती संपली होती.. निळे रक्ताळलेले डोळे.. निमुळता चेहरा. पोपटाच्या चोचीसारख सारखं नाक.. विस्कटलेल्या केसांमधून सुद्धा दिसणारे ते वटवाघळासारखे कान पाहून त्याच्या अंगातली सारी शक्ती संपली होती... ओरडायला किंचाळायला देखील अंगात त्राण राहिला नव्हतं.. ती त्यांच्या मित्राच्या पोटावरच बसलेली... त्याच्या गळ्यातून काढलेला मांसाच्या तुकड्यातून वहाणार गरम रक्त ती प्राशन करत होती ... संपूर्ण खोलीत रक्ताचा सडा पसरलेला..... त्यांच्याकडे पहात तिने आपला रक्ताळलेला जबडा पसरला.. तोंडातून बाहेर आलेल्या दोन सुळ्यांमधून लाल भडक रक्त थेंब-थेंब टपकत होतं..ते दृष्य पाहून त्याची दातखीळीच बसली.. भीतीनं तो जोरात ओरडला...
"विजय... पळ इथुन.."
आणि झटकन मागे वळला आणि मागे त्याहून भयानक दृश्य होतं... एका रक्तपिपासू नरपिशाच्चान आपले दात विजयच्या मानेत रूतवून केव्हाच ठार केलेल...एखद्या हिंस्र प्राण्यासारखा त्या नरपिशाच्याच्या जबड्यातून निघणारा घुरघूरण्याचा आवाज कोणाच्याही काळजाचा थरकाप उडवेल असाच होता. त्या उंच नरपिशाच्या च्या तोंडातून वाहणारं रक्त त्याच्या छातीवरून ओघळत पोटातपर्यंत आलेलं... मेणबत्तीच्या अंधुक प्रकाशात त्याचं ते भयाण रूप पाहून उरलं सुरलं अवसान हे निघून गेल.. निष्प्रान विजय जमिनीवर कोसळला... जमिनीवर पडलेला विजयचा निष्प्राण देह पाहून तो हादरून गेला...रक्त रक्त आणि रक्त त्या खोलीत पसरलेल... आणि त्या नरपिशाच्चान आपला अक्राळविक्राळ जबडा पसरत क्षणात त्याच्याही मानेचा घोट घेतला त्यासरशी गरम रक्ताचा एक लोट त्याच्या चेहऱ्यावर उडाला... नरपिशाच्चाच्या राक्षसी विळख्यात त्याची मृत्यूपुर्वीची केविलवाणी धडपड काही क्षण तशीच सुरू राहीली आणि मग ते ही थंड पडल..
ती पिशाच्चनी मृतावस्थेत पडलेल्या तरूणाच्या शरिरावरुन उठली आणि त्या नरपिशाच्चाकड येत म्हणाली....
" लॉकडाऊन मुळ माणस बाहेरच पडत नव्हती त्यामुळ तुला त्यांच रक्त मिळालं नव्हतं म्हणून तुझी तहान भूक शमली नव्हती... "
एवढं बोलून ती त्याच्या मिठीत शिरली तसे दोघांच्या ही पाठिवरून वटवाघूळासारखे पंख निघाले... आपल्या पंखांची फडफड करत त्या घरातून बाहेर पडलेली दोन वटवाघळ रात्रीच्या काळोखामधे आकाशात झेपावली आणि दिसेनाशी झाली पण त्यांचे भयंकर चित्कार मात्र आसमंतात घुमत राहिले...


समाप्त....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED