प्रपोज - 2 Sanjay Kamble द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रपोज - 2


तशी सर्वांची कुजबूज थांबली... तो आवाज अगदी शांतपने ऐकु लागले... कदाचीत हा खुन करणा-यानच हा मेसेज ठेवलेला असेल...
एका गुढ शांततेनंतर त्या मोबाईल मधुन एका युवकाचा आवाज येऊ लागला...

'प्रेम......? हं..... प्रेम.......!

अस म्हणतात की प्रेम आंधळ असत..... असतं नव्हे , असतच... मी तर या मताशी अगदी ठाम आहे...... तसा प्रत्येक जण या प्रेमाचा आपापल्या परीने अर्थ लावत असतो...

खरंतर प्रेम म्हणजे या जगातली सर्वात सुंदर कल्पना... कधी नुसती कल्पना, तर कधी भयान वास्तव. कधी सुरेख चांदण, तर कधी भयान काळोख.. कधी आयुष्यभराची सोबत , तर कधी अर्ध्यातच शेवट.... शेवट, तो ही भिषण... काळजाचा थरकाप उडवणारा शेवट...

तुम्हीही केल असेल प्रेम .. म्हणजे अजुनही करत असाल.. प्रियकर म्हणुन काय करू शकतो आपण तीच्या साठी... तीच्या निरागस चेह-यावर चांदण खुलवण्यासाठी.. तीच्या आयुष्यात इंद्रधणुषी रंग भरण्यासाठी... तिच्या निष्पाप डोळ्यांमधील स्वप्न पूर्ण करण्यासाठी..
मी ही केल... तिच्यावरील आंधळ्या प्रेमासाठी...पण त्या आंधळ्या प्रेमाचा अंत असा रक्तरंजीत होऊन संपेल हा विचारही मनात आला नव्हता..
पन हा अंत होता , की अंताची सुरवात , की सुरवात होण्याआधीच अंत....
दोन आठवड्यापुर्वीची ती घटना...

'त्या' रात्रीे... म्हणजे साधारण दहा, साडे दहा वाजायला आले होते. ही वेळ म्हणजे सामान्यता: जेवण उरकुन बाहेर कट्ट्यावर गप्पा मारण्याची. चंद्राची कोर अगदी मंदपने ढगांच्या मागुन हळुच डोकावत पुन्हा ढगांच्या मागे लपुन जायची.. थंडी तर कमालीची त्यात अंगाला झोंबणारी छानशी हवा सुटलेली... आम्हा मित्रांच्या गप्पा रंगात आलेल्या... म्हणजे सारे काही अगदी रोजचं चाललेल... पुढं काय होणार आहे याची साधी पुसटशी कल्पनाही आम्हाला नव्हती.... कारण एका मुलीच्या भयान, ह्रदय पिळवटून टाकणा-या आर्त किंकाळीने आम्ही सर्वच हादरून गेले.. मघापासुन मजेशीर गप्पांनी पिकनारा हाशा एकदम बंदच झाला..त्या आवाजाने आम्हा सर्वांच्या काळजाची धडधड वाढलेली... जागेवरून ताडकन उठुन उभे रहात एकमेकांना प्रश्नार्थी नजरेने पहात आजुबाजुलाही नजर फिरवू लागलो...

"का, कोण ओरडलं रे..?"

" माहिती नाही पण एका मुलीचा आवाज होता.."

गल्ली पुर्ण शांत दिसत होती... त्यातच एक दोन विजेचे दिवे तेवढेच शिल्लक होते. तसेच सर्व त्या आवाजाच्या दिशेने पाहु लागलो.. पण आवाज कुठून आला समजल नाही.. पण त्या आवाजाने मात्र आजुबाजूच्या घरातील लोक ही पटापट बाहेर पडत एकमेकांकडे थोडी भिती आणि आश्चर्यान पाहु लागले.

आमची आपसात कुजबूज सुरू होती, तशी पुन्हा ती आर्त किंकाळी ऐकु आली... आवाज ज्या घरातुन येत होता ते साधारण आमच्या गल्लीतच साठ ते सत्तर मीटर अंतरावर असेल... आम्ही तसेच धावत त्या घराकडे निघालो.. रस्ता तसा कच्चाच होता. आणि त्यात भर म्हणुन रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावरील दिवा गल्लीतीलच काही टवाळखोर , आणि शुद्ध मराठी भाषेत सांगायच तर गल्लीतुन ओवाळुन टाकलेल्या दिवट्यांनी फोडले होते. त्यामुळ खुपच अंधार होता.. पन ज्या घरातुन ती आर्त किंकाळी आली होती त्यांच्या दारात लावलेला पिवळसर बल्ब आपल्या परीन अंधार दुर करण्याचा केवीलवाणा प्रयत्न करत होता...

त्या घरात काही दिवसापुर्वी एक कुटूंम्ब रहायला आल होत. पती, पत्नी त्यांचा मुलगा जो बारावीला होता ,आणि मोठी मुलगी एकवीस, बावीस वर्षची असेल.. ती मेडीकलची स्टुडेंट होती.. दिसायला खुपच देखणी , लांब आणी किंचीतसे तांबूस केस, निळसर आणि काजळ घातल्या सारखे डोळे, रेखीव चेहरा तर अंगाने नाजुक, अगदीच बारीक होती. पहील्या नजरेतच सहज मनात भरेल अशी. आता हे सगळ वर्णन मला कट्ट्यावर खुपशा मित्रांच्या तोंडुन ऐकायला भेटलेल, पण प्रत्यक्षात तीला पहाण्याचा योग आजवर आला नव्हता... ती आमच्या गल्लीत रहायला आल्यापासुन संपुर्ण गावातीलच मुलांच्या मोटरसायकच्या फे-या आमच्या गल्लीतुन वाढलेल्या...

मोबाईलची बॅटरी सुरू करून पायाखालचा‌ कच्चा रस्ता तुडवत आम्ही धावतच त्यांच्या घराजवळ आलो... आमच्यातील एकाने दरवाजा वाजवत बाहेरुन आवाज दिला, तशी पुन्हा ती किंकाळी आणि वेदनेन कन्हत असलेला त्या मुलीचा आवाज आमच्या कानावर येऊ लागला.. आता मात्र नाईलाज झाला होता. सर्वाना बाजुला करत एक जोराची लाथ त्या दरवाजावर घातली तसा खाडकन दरवाजा कडीमधून तूटला . सगळेच पटापट आत शिरलो तर घरातील चीज वस्तू विस्कटल्या होत्या. समोर तीची आई डोक्याला हात लाऊन भिंतीचा आधार घेऊन रडत ऊभी होती. तर बाजुला तीचे वडिल तीला खुर्चीवर जखडून धरत होते. तीचा भाऊ देखील आपल्याच बहीणीला जखडून ठेवण्यासाठी वडीलांना मदत करत होता... काय चाललय हे समजत नव्हत. समोरचे हे दृष्य पाहून आम्ही सर्वच गोंधळुन गेलो होतो. तोच आमच्या तील एकजन ओरडला.
"काय हे..? असं काा करताय....? का स्वता:च्या मुलीसोबत अस करताय. सोडा तीला..."

तस सगळच वातावरण एकदम शांत झाल.. अधून मधून तिच्या आईचं मुसमुसण तेवढ सुरू होत... ती मुलगी ही खुर्चीवर बसलेली. खाली मान घालून तशीच रडत होती. तीचे वडिल हाताची पकड सैल करत बाजुला झाले... तीला पाहुन आम्ही सगळेच चक्राऊन गेलो... पांढरा गाऊन अंगात घातलेला, काळसर तांबुस केस पुर्णपणे विस्कटून चेह-यावर पसरल्यान तो पुर्णपणे झाकलेला.. दोन्ही हातानी खुर्ची घट्ट पकडलेली त्यामुळे तीच्या हातावर ऊठलेले नखांचे लालसर ओरखडे आणि त्यातुन वहाणार किंचीतस रक्त, तीच्या नाजुक त्वचेवरुन स्पष्ट दिसत होते. हतबल झाल्यासारखे डोक्याला हात लाऊन तीचे वडिल आपल्या मुलीकडे पहात हुंदका आवरत मट्टकन जमिनीवर बसले . तीचा भाऊ ही शांत पने बाजुला झाला तशी तीची आई पदराने डोळे पुसत आपल्या मुलीजवळ गेली.. आम्ही मात्र तसेच ऊभे राहून प्रश्नार्थी नजरेन कधी एकमेकांना तर कधी त्या कुटुंबातील सदस्यांना फक्त पहात होतो. काय झालय काहीच समजत नव्हत. तीच्या आई ने जवळ जात चेह-यावर पसरलेले तीचे केस बाजुला केले तसे मी प्रथमच तीला पाहील. आजवर कट्ट्यावर बसल्या बसल्या मुलांकडुन ऐकलेल तीच वर्णन बरच मिळतजुळतच होत. दिसायला खुपच गोरीपान असली तरी निष्तेज वाटत होती, चेह-यावर ठिकठीकानी नख ओरबडल्याच्या खुणा. लांब केस पन कोणीतरी खेचुन आढुन त्याना रुक्ष केल्यासारखे वाटत हेते, निळसर डोळे पन खुपच थकल्या सारखे. डोळ्याखाली तयार झालेली काळी वर्तुळ पाहून अस वाटल की ही मुलगी एखाद्या भयंकर अशा दीर्घ आजारान ग्रासली असवी. तीची ही अवस्था पाहुन नकळत एक वाक्य ओठांवर आल ..

" शापित सौंदर्य..."

आमच्या पाठोपाठ धावत आलेल्या एका मित्रांच्या वडिलांनी तीच्या बाबांकडे पहात थोडं आपुलकीन विचारल..

" काय झाल....?"

तसे तीचे वडिल म्हणाले

" काहीतरी पाप केल असेल मी मागच्या जन्मात, त्याचीच फळ भोगतेय..." पन काय झालय हे त्यानी सांगायच जाणुन बुजून टाळल...
आपल्या आईच्या कुशीत शिरुन ती भितीन थरथर कापत आजुबाजूला थरथरत्या नजरेने पहात होती... काहीतरी होतं जे ते लपवण्याचा प्रयत्न करत होते... पण कुठवर लपवणार...? तिथून बाहेर पडणारा आमच्यातील प्रत्येकजण हाच विचार करत होता की, त्या मुलीलाा वेडाचा झटका आला असावा, किंवा ती एखाद्या मानसिक आजारानेे ग्रासलेली असावी... पण खरच ती मानसिक आजाराने ग्रासली होती का...? आणि खरच जर ती एखाद्यााााा मानसिक आजाराने ग्रासली असेल तर ती तिच्याा संपूर्ण कुटुंबासाठी घातक ठरणार होती.... तीला एखाद्या वााईट शक्तिची बाधा तर झाली नसेल ..?

*****

क्रमशः