अपराध कुणाचा, शिक्षा कुणाला?

(44)
  • 40.1k
  • 17
  • 18.3k

(१) अपराध कुणाचा, शिक्षा कुणाला? वामनराव बैठकीत टीव्हीवरील बातम्या बघत बसले होते. डोळे जरी टीव्हीवर लागलेले होते तरी लक्ष कुठे अन्यत्र होते. चित्त जणू थाऱ्यावर नव्हते. एक औदासिन्य शरीरभर पसरले होते. काही तरी वेगळं घडलंय असेही नव्हते. रोजचे दिनमान नेहमीप्रमाणे सुरू होते. त्यांची आणि त्यांच्या पत्नीची तब्येत वयोमानाप्रमाणे होणारे आजार सोडले तर बाकी सारे व्यवस्थित होते. मग त्यांची मनःस्थिती तशी का झाली होती? भविष्यात काही वेगळे काही वाढून ठेवले नव्हते ना? एखाद्या संकटाची तर चाहूल लागली नव्हती ना? वामनराव आणि त्यांची

Full Novel

1

अपराध कुणाचा, शिक्षा कुणाला? - 1

(१) अपराध कुणाचा, शिक्षा कुणाला? वामनराव बैठकीत टीव्हीवरील बातम्या बघत बसले होते. डोळे जरी टीव्हीवर होते तरी लक्ष कुठे अन्यत्र होते. चित्त जणू थाऱ्यावर नव्हते. एक औदासिन्य शरीरभर पसरले होते. काही तरी वेगळं घडलंय असेही नव्हते. रोजचे दिनमान नेहमीप्रमाणे सुरू होते. त्यांची आणि त्यांच्या पत्नीची तब्येत वयोमानाप्रमाणे होणारे आजार सोडले तर बाकी सारे व्यवस्थित होते. मग त्यांची मनःस्थिती तशी का झाली होती? भविष्यात काही वेगळे काही वाढून ठेवले नव्हते ना? एखाद्या संकटाची तर चाहूल लागली नव्हती ना? वामनराव आणि त्यांची ...अजून वाचा

2

अपराध कुणाचा शिक्षा कुणाला? - 2

(२) अपराध कुणाचा, शिक्षा कुणाला? अत्यंत दुःखी अंतःकरणाने लताला घेऊन निघालेले वामनराव सायंकाळच्या सुमारास ते राहत असलेल्या गल्लीत पोहोचले. पण वातावरण कसे बदललेले, साशंक दिसत होते. नेहमीप्रमाणे कुणी त्यांचे स्वागत तर सोडा पण साधे हसून किंवा शब्दाने विचारपूसही केली नाही. कुणी नजरानजर होताच नजर वळवली. कुणी रागाने, अविश्वासाने पाहिले. कुणी नाक मुरडले. हे असे का व्हावे? हा बदल का? लता खूप दिवसांनी घरी येत असूनही आणि लता अनेक कुटुंबातील महिलांची लाडकी असूनही तिचीसुद्धा कुणी चौकशी केली नाही तर तिच्याबद्दल काही बायकांच्या डोळ्यात स्पष्टपणे घृणा दिसत होती. ही किमया ...अजून वाचा

3

अपराध कुणाचा, शिक्षा कुणाला? - 3

(३) अपराध कुणाचा, शिक्षा कुणाला? त्यानंतरच्या आठ दहा दिवसांची गोष्ट. घरातील वातावरण पूर्ण नाही पण काही प्रमाणात सुधारले होते. गप्पाष्टके रंगत नसली, हसणे बागडणे होत नव्हते तरीही दुःखाची छाया असूनही मोकळेपणा येत होता. यामागे होती आशा! ती दररोज मुद्दाम दोन्हीवेळा लताच्या जेवणाच्या वेळी येत होती. स्वतः दोन घास खाऊन लताला पोटभर जेऊ घालत होती. त्यादिवशी दुपारचे चार वाजत होते. विमलाबाई चहाची तयारी करीत होत्या. सुट्टी असल्यामुळे वामनराव घरीच होते. तितक्यात घरासमोर थांबलेल्या कारमधून आशासह एक तरुण आणि एक तरुणी उतरली. वामनरावांनी सर्वांचे स्वागत केले. सारे जण सोफ्यावर बसताच आशा म्हणाली,"ओळख करून देते. हे वामनकाका, ह्या ...अजून वाचा

4

अपराध कुणाचा, शिक्षा कुणाला? - 4

(४) अपराध कुणाचा, शिक्षा कुणाला? आठ-दहा दिवसानंतरची गोष्ट! डॉ. संदेश आणि अनिता यांच्या भेटीनंतर त्यांच्याशी झालेल्या मनमोकळ्या चर्चेनंतर लता कमालीची बदलली होती. प्रसंगोपात हसतही होती. अधूनमधून स्वयंपाक घरात जाऊन आईबाबांना आवडणारे पदार्थ स्वतः बनवून त्या दोघांना खाऊ घालत होती. आशाही दररोज येत होती. त्यादिवशीही आशा आली होती. सारे जण बैठकीत गप्पा मारत असताना फोनची घंटी वाजली. फोन उचलून वामनराव म्हणाले,"हॅलो, मी वामनराव बोलतोय...""हे बघा, एक कृपा करा, आम्हाला तुमच्या मुलीच्या बंधनातून कायमचं मुक्त करा...""मी नाही समजलो. काय म्हणायचे तुम्हाला?" वामनरावांनी विचारले."स्पष्ट सांगितल्याशिवाय तुम्हाला कळतच नसेल तर ऐका,आम्हाला घटस्फोट हवाय.""घटस्फोट? नाथराव, अजून आम्ही त्या धक्क्यातून सावरलो नाहीत...""तुम्हाला काय ...अजून वाचा

5

अपराध कुणाचा, शिक्षा कुणाला? - 5 - अंतिम भाग

(५) अपराध कुणाचा, शिक्षा कुणाला?खोलीत गेल्यावर लताने पत्र काढले. हळू आवाजात वाचायला सुरुवात केली. कोणताही मायना न लिहिलेल्या पत्रात होते...'तुझे नाव घेण्याची माझी लायकी नाही आणि तो अधिकार मी गमावून बसलो आहे. तुझा कोणताही गुन्हा नसताना, अपराध नसताना आणि मी केलेल्या चुकांची तसेच माझ्या मौन वागण्याची शिक्षा तुला मिळते आहे हे मला माहिती आहे. एका अर्थाने मी तुझा खून केलाय ही बोचणी, ही अपराधाची भावना, जाणीव मला होते आहे. तू निर्दोष आहेस, तुला एड्ससारखा महाभयंकर रोग माझ्यापासूनच झालाय हे जसे मला माहिती आहे, तसेच ते माझ्या आईबाबांनाही ठाऊक आहे. तू विश्वास ठेव असे मी म्हणणार नाही, तसे सांगणार नाही ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय