सिद्धनाथ संध्याकाळ झाली होती, नदी चा तो भाग तसा उजाड च होता, नदीच पात्र मोठं होत, आजूबाजूला दाट झाडी होतीच, नदी जवळ एक वडाचा पार त्या जवळ मारुतीचं लहानस मंदिर सोडलं तर बाकी वस्ती वगैरे नव्हती, त्याला लागून जवळच गावाची स्मशानभूमी होती, नुकतेच कुणाचे तरी विधी होऊन गेलेले असावेत , पाण्यात भिजलेली फुल, गुलाल, कुंकू जमिनीवर सांडलेल दिसत होत, धगधगणारी चिता आता शांत होत चाललली होती, पोहोचवायला आलेले लोक कधीच परतले होते, स्मशाना वरून जाणारा रस्ता पुढे जाऊन हायवे ला मिळत असला तरी वर्दळीचा असा नव्हता. , निस्तब्ध थडगी, एक दोन दगडी समाध्या, प्राचीन मंदिराचे पडके अवशेष, अलका ला हे

नवीन एपिसोड्स : : Every Tuesday

1

सिद्धनाथ

सिद्धनाथ संध्याकाळ झाली होती, नदी चा तो भाग तसा उजाड च होता, नदीच पात्र मोठं होत, आजूबाजूला दाट झाडी नदी जवळ एक वडाचा पार त्या जवळ मारुतीचं लहानस मंदिर सोडलं तर बाकी वस्ती वगैरे नव्हती, त्याला लागून जवळच गावाची स्मशानभूमी होती, नुकतेच कुणाचे तरी विधी होऊन गेलेले असावेत , पाण्यात भिजलेली फुल, गुलाल, कुंकू जमिनीवर सांडलेल दिसत होत, धगधगणारी चिता आता शांत होत चाललली होती, पोहोचवायला आलेले लोक कधीच परतले होते, स्मशाना वरून जाणारा रस्ता पुढे जाऊन हायवे ला मिळत असला तरी वर्दळीचा असा नव्हता. , निस्तब्ध थडगी, एक दोन दगडी समाध्या, प्राचीन मंदिराचे पडके अवशेष, अलका ला हे ...अजून वाचा

2

सिद्धनाथ - 2

सिद्धनाथ 2 (परतफेड) कडकडीत ऊन पडलेलं होत, रस्त्यावर वर्दळ अशी नव्हतीच, क्वचित एखादं दुसरी गाडी, बस, बाईक दिसे, सिद्धनाथ झप झप चालत होता, रस्ता चांगलाच तापलेला होता, "शिवगोरक्ष .. शिवगोरक्ष...." अचानक एक गाडी येऊन सिध्दनाथा च्या थोडं पुढे जाऊन थांबली होती, गाडीतून चव्हाण साहेब खाली उतरले होते, गाडीजवळ च बूट उतरवत सिद्धनाथा जवळ ते पोहोचले, पायाला चटके बसत होते, हात जोडले, "महाराज..मला ओळख ल का ..?" "म..मी ..", "इन्स्पेक्टर चव्हाण..!", सिद्धनाथा न त्यांचं वाक्य पूर्ण केलं "आज इकडे...एकदम गुजरातमध्ये???" "हो, जुनागड ला निघालो होतो, थोडं ऑफिस च काम" "महाराज, तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला सोडू का तुम्हाला ...अजून वाचा

3

सिद्धनाथ - 3

सिद्धनाथ 3 (अघोरी) (Reader descrition advised) गावाची वेस संपत आली होती, भर दुपार वेळ, ऊन चांगलंच जाणवत होतं, तारा अघोरी ला अर्थात त्यानं काही फरक पडणार नव्हता, काळी कफनी, गळ्यात कवड्याच्या माळा, हातात बोटावर चढवलेल्या चेड्या च्या अंगठ्या, खप्पर , झोळी, खांद्यावर रुळणारे केस, कफनीतुन ही त्याच पिळदार शरीर जाणवत होतं, एका हातात त्रिशूळ होता, अघोरी असला तरी तारा दिसावयास देखणा होता, बेफिकीर चेहरा, हसरी मुद्रा, जर्द हिरवी शेवाळी मोहून टाकणारी भेदक नजर, कपाळावरच त्रिपुंड त्याच्या मोहक चेहेऱ्याच्या मोहिनीत एक वेगळीच भर टाकत होत , तारा त विलक्षण आकर्षण होत, रस्त्या न जा ये करणाऱ्या महिलांना सुद्धा ...अजून वाचा

4

सिद्धनाथ - 4

सिद्धनाथ ४ (दानव) पंचगंगेंच्या घाटावर स्नान करून सिद्धनाथ अंबाबाईच्या मंदिराच्या दिशेने निघाला तेव्हा पहाटेचे साडेतीन वाजलेले होते. "शिवगोरक्ष शिवगोरक्ष जप करत सिद्धनाथ झपाट्यानं चालत होता, जवळ जवळ दीड ते दोन km अंतर होत. हवेत कमालीचा गारठा होता. अगदी पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर वर्दळ नव्हतीच. मंदिरात पोहेचतो पहाटेचे चार वाजलेले होते. सिध्दनाथाने आंबाबाई चे दर्शन घेतले. "या चंडी मधुकैटभादि दलिनी या महिशोन्मुलिनी ...." . सिध्दनाथाच्या तोंडून उत्स्फूर्त पणे देवीभागवतातील मार्कण्डेय ऋषींनी रचलेले जगदंबिकेचे स्तुतीपर श्लोक बाहेर पडले. जगदंबेच्या त्या अलौकिक स्वरूपाकडे बघता बघता त्याच देहभान हरपलं होत. "आई", इतकेच शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडले..... लोकांची वर्दळ आता वाढायला सुरुवात झाली ...अजून वाचा

5

सिद्धनाथ - 5

सिद्धनाथ ५ (भेट) सिद्धनाथाच्या पावलांचा वेग आता वाढला होता , अजून थोडं चाललं की तो श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पोहोचणार ज्या ठिकाणी त्याची भेट नाथ संप्रदयाचे मुख्य प्रवर्तक आदिनाथ किंवा देवाधिदेव महादेव व त्या संप्रदायाचे गुरुपद भूषवणाऱ्या श्री गुरुदत्तात्रेयांची भेट होणार होती, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग म्हणजे ज्या ठिकाणी भगवान शंकर त्रिगुणात्मक दत्तात्रेय स्वरूपात विराजमान आहेत त्र्यंबकेश्वर हे शहर भारत देशाच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात नाशिक पासून साधारणत: १८ ते २२ km कि.मी. अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. मुंबई पासून १६५ कि.मी.अंतरावर असून जाण्यसाठी कसारा घाटातून इगतपूरी मार्गे तसेच भिवंडी - वाडा मार्गे खोडाळ्यावरून जाता येते. जव्हार मार्गे सुद्धा एक रस्ता ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय