भाग १"ट्रिंग.. ट्रिंग...ट्रिंग.. ट्रिंग..." बराचवेळ फोनची रिंग वाजत होती. पण मघापासून सारखं Unknown नंबर वरून कुणी तरी कॉल करून छळत होता, म्हणून त्याने दुर्लक्ष केले. फोन वाजून बंद झाला. मिनीटभरातच पुन्हा खणखणला. कदाचित खरंच कुणाच अर्जंट काहीतरी काम असेल असा विचार करून त्याने शेवटी फोन उचलला." हॅलो, कोण ? "हॅलो मी निधी देशमुख."अं.. हो हो बोला " तो थोडासा गोंधळला होता पण लगेच त्याने स्वतःला सावरलं." फोन का उचलत नवहतास ? " ते मी दुसऱ्या रूममध्ये होतो."एनी वेज, माझं जरा काम होत तुझ्याकडे ? "हो बोला ना." नाही असं फोनवर सविस्तर नाही सांगता येणार. तु माझ्या ऑफिसमध्ये येऊ शकतो

नवीन एपिसोड्स : : Every Monday

1

To Spy - 1

भाग १"ट्रिंग.. ट्रिंग...ट्रिंग.. ट्रिंग..." बराचवेळ फोनची रिंग वाजत होती. पण मघापासून सारखं Unknown नंबर वरून तरी कॉल करून छळत होता, म्हणून त्याने दुर्लक्ष केले. फोन वाजून बंद झाला. मिनीटभरातच पुन्हा खणखणला. कदाचित खरंच कुणाच अर्जंट काहीतरी काम असेल असा विचार करून त्याने शेवटी फोन उचलला." हॅलो, कोण ? ""हॅलो मी निधी देशमुख."अं.. हो हो बोला " तो थोडासा गोंधळला होता पण लगेच त्याने स्वतःला सावरलं." फोन का उचलत नवहतास ? "" ते मी दुसऱ्या रूममध्ये होतो.""एनी वेज, माझं जरा काम होत तुझ्याकडे ? ""हो बोला ना."" नाही असं फोनवर सविस्तर नाही सांगता येणार. तु माझ्या ऑफिसमध्ये येऊ शकतो ...अजून वाचा

2

To Spy - 2

To spy भाग २ विराटच्या डोक्यात विचारचक्र होतं. खरंतर ही केस मिसिंग पेक्षा किडनॅपिंगची असण्याचीच जास्त शक्यता वाटत होती. एवढ्या मोठ्या माणसाला काय कमी शत्रू असतील का ? पण कोण..? ' ओह शीट.' त्याने कपाळावर थाप मरून घेतली. मगाशी निधीला 'या' शक्यतेची कल्पना देऊन महिपतरावांचे कुणाशी शत्रुत्व, किंवा इतक्यात कुणाशी मोठ्ठ भांडण वैगेरे झाल होत का असं विचारायला हव होत. 'का नाही विचारलं आपण ?' ' मान्य आहे ती आधी जरा घाबरली असती, पण ही केवळ एक शक्यता आहे. आपण समजावलं असतं तर समजली असती ती. ती ब्रेव्ह आहे. आणि तिला विश्वास आहे की आपण तिच्या वडिलांना ...अजून वाचा

3

To Spy - 3

"तुम्हाला माहितीये, आम्ही प्रश्न विचारायला तुमच्या समोर न बसता असे तुमच्या आजूबाजूला का बसलो आहोत ?" करणने बोलायला सुरुवात "नाही. का ?" निधीलाही हे थोड वेगळ वाटलं होतं. " कारण आमच्या प्रश्नांची उत्तरे देताना तुमच्या मनावर कुठलंही दडपण येऊ नये. तुम्हाला अगदी आपल्या फ्रेंड्स सोबत बोलत असल्यासारखे फीलिंग यावं. आणि हो. ही आयडिया वीर ची होती. "अच्छा ?" मग विराट कडे पाहून निधी प्रेमाने म्हणाली. " सो स्वीट ऑफ यू वीर." विराटला ते ऐकून कसंसच झाल. म्हणजे आनंदाने. करणच्या घसा खाकरण्याने तो भानावर आला. "हो म्हणजे तो तर तुझा फ्रेंड आहेच, आपलीही मैत्री होईल हळूहळू." " हो नक्कीच. पण ...अजून वाचा

4

To Spy - 4

नाश्ता होईपर्यंत कुणीच काही बोललं नाही. जेवतान निगेटिव्ह विषयांवर बिलकुल चर्चा करू नये, असा विराटचा आग्रह असायचा. जेवून झाल्यावर आई प्लेट्स घेऊन गेल्या. मग निधीने बोलायला सुरुवात केली. "पपांच आमचे बिझनेस पार्टनर मिस्टर पंजवाणींसोबत मागच्या आठवड्यात खूप कडाक्याचं भांडण झाल होत. मला तर त्यांच्या वरच doubt येतोय." "नाही निधी, बिझनेस पार्टनर्समध्ये भांडणं होतच राहतात. त्यात तेवढ्यावरून त्यांच्यावर 'असा' संशय घेणं चूकीचे आहे." विराट समजावणीच्या सूरात म्हणाला. "नाही वीर, फक्त त्या भांडणामुळे माझा त्यांच्यावर संशय नाहीये. बिझनेस पार्टनर्समध्ये भांडणं होतात हे मलाही मान्यच आहे. पण पंजवाणीबद्दल माझं मत चांगल नाही. तो अत्यंत रागीट स्वभावाचा आहे. एकदा आमच्या ऑफिस मध्ये ...अजून वाचा

5

To Spy - 5

To Spy भाग ५ "वीर, मी संध्याकाळी पाच वाजता महाबळेश्वरला निघतो." "आजच ?" विराटने आश्र्चर्याने विचारलं. "हो, आधीच उशीर आहे, अजून वेळ लावून चालणार नाही." " हो, बरोबर आहे. मीही येतो तुझ्यासोबत." "नाही वीर, दोघांनी एकाच दिशेने तपास करून कसं चालेल ? तु उद्या त्या पंजवाणींची भेट घे. आणि अशा वेळी तु निधी सोबत असायला हवस." करण त्याला समजावत म्हणाला. "हं." "चल आता निघतो मी." थोड्या वेळानं उठत करण म्हणाला. "दोन वाजलेत. जायची तयारीही करायचीये‌." दोघेही खाली आले. किचनमध्ये निधी आणि रेणुकाबाईंच्या गप्पा रंगात आल्या होत्या. वाटतच नव्हते की ही त्यांची पहिली भेट आहे. दोघीही जुन्या मैत्रीणी असल्यासारख्या बोलत ...अजून वाचा

6

To Spy - 6

"हं, कम इन." पुन्हा समोरच्या कॉम्प्युटर वर लक्ष केंद्रित करत पंजवाणींने परवानगी दिली. विराट शांतपणे पुढे झाला. "बसू शकता." वरची नजर न हटवता पंजवाणीं म्हणाला. विराट खुर्ची वर बसला. पंजवाणी अंदाजे साठीच्या आसपास असावा. डोक्यावर अर्ध्यापर्यंत उरलेले केस, गोलाकार गोरागोमटा चेहरा, घारे भेदक डोळे, चेहऱ्यावर बेफिकीरी, लक्षात येणारी बलदंड शरीरयष्टी. त्याला बघून विराटला मराठी चित्रपटातील त्याचे आवडते खलनायक यतिन कार्येकर यांची आठवण आली. "माझं निरीक्षण करण्यासाठी नक्कीच तुम्ही आला नसाल." प्रथमच त्याच्याकडे पाहून जराशा गुर्मीतच पंजवाणीं म्हणाला. "अं.." त्याच्या बोलण्याने विराट थोडा गडबडला. मग जरा घसा खाकरून पुढे बोलू लागला. " मिस्टर पंजवाणी, तुम्हाला समजलंच असेल की तुमचे ...अजून वाचा

7

To Spy - 7

खोक्यात काही अल्बम्स होते. करणने ते सर्व बाहेर काढून नीट पाहिले. त्यात देशमुख साहेबांचे तरूणपणीचे त्यांच्या पत्नीसोबत व निधीसोबतचे होते. सर्व महाबळेश्र्वरमध्येच वेगवेगळ्या ठिकाणी काढलेले होते. अल्बम परत खोक्यात भरताना करणला दिसल, की खोक्याच्या तळाशी हिरव्या रंगाच्या कसल्यातरी पदार्थाचे कण सांडले होते. पण करणने त्याकडे दुर्लक्ष केलं. कदाचित खोलीतल्या इतर बॉक्सेस मध्ये काही मिळू शकेल असा विचार करून करण दाढेंसह देशमुखांच्या खोलीत आला. " दाढे तुम्ही बेडखालच दुसरं खोक घेऊन बाहेर नेऊन ठेवा. मी कपाटाखालचे आणि वरचे बॉक्सेस घेऊन येतो." दाढेंनी लगेच बेडखालच खोक काढून बाहेर नेल. करणने आधी कपाटाखालचे बॉक्सेस काढून बेडवर ठेवल. मग वरील बॉक्सेस उतरवून सर्व ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय