To Spy - 5 books and stories free download online pdf in Marathi

To Spy - 5

To Spy
भाग ५

"वीर, मी संध्याकाळी पाच वाजता महाबळेश्वरला निघतो."
"आजच ?" विराटने आश्र्चर्याने विचारलं.
"हो, आधीच उशीर झाला आहे, अजून वेळ लावून चालणार नाही."
" हो, बरोबर आहे. मीही येतो तुझ्यासोबत."
"नाही वीर, दोघांनी एकाच दिशेने तपास करून कसं चालेल ? तु उद्या त्या पंजवाणींची भेट घे. आणि अशा वेळी तु निधी सोबत असायला हवस." करण त्याला समजावत म्हणाला.
"हं."
"चल आता निघतो मी." थोड्या वेळानं उठत करण म्हणाला. "दोन वाजलेत. जायची तयारीही करायचीये‌."
दोघेही खाली आले. किचनमध्ये निधी आणि रेणुकाबाईंच्या गप्पा रंगात आल्या होत्या. वाटतच नव्हते की ही त्यांची पहिली भेट आहे. दोघीही जुन्या मैत्रीणी असल्यासारख्या बोलत होत्या. विराट व करणला पाहताच निधी त्यांच्या जवळ आली.
"निधी मी संध्याकाळी महाबळेश्वरला निघतोय. तु बिलकुल काळजी करू नकोस, तुझ्या पपांना लवकर सुखरूप शोधून काढू." करण म्हणाला.
थॅंक्स करण, माझ्या पपांना शोधण्यासाठी..."
"कम ऑन निधी, मी एक पोलिस अधिकारी आहे. मी माझं कर्तव्यच करतोय. आणि मित्राचे कुणी आभार मानत का ? " शेवटचा प्रश्न त्याने जराशा लटक्या रागानेच विचारला. त्यावर निधी फक्त हसली. तिच्याशी थोडं बोलून, रेणुका बाईंचा आशिर्वाद घेऊन करण त्यांच्या घरी गेला.
संध्याकाळी पाच वाजता सोबत एक टीम घेऊन करण महाबळेश्वरला निघाला. टीममध्ये इन्स्पेक्टर दाढे, सब इन्स्पेक्टर बेंद्रे, सब इन्स्पेक्टर नाईक आणि हेड कॉन्स्टेबल गाढवे हे होते. हे सगळेच करणसारखेच अत्यंत कर्तवदक्ष होते. करणच्या प्रत्येक केसमध्ये हे त्याच्या सोबत असायचेच. त्याचा या सगळ्यांवर पूर्ण विश्वास होता. प्रत्येकाचे काहीतरी वैशिष्ट्य होतं. जे या केसमध्येही हळूहळू समोर येणारच होते. रात्री साडे आठच्या सुमारास ते महाबळेश्वरला पोहोचले. तिथे एक चांगला हॉटेल पाहून चेक इन केले. आणि चालल्या ताब्यात घेऊन सर्वजण आपापल्या रूममध्ये गेले. कारणही त्याच्या रूममध्ये आला. फ्रेश होऊन त्याने जेवण पाठवण्याची ऑर्डर दिली. जेवण झाल्यावर विराटला कॉल करून पोहोचल्याच कळवले, आणि सरळ बेडवर आडवा झाला. थकव्यामुळे त्याला लगेच झोप लागली.
दुसऱ्या दिवशी सकाळची सर्व नित्यकर्मे आटोपून, तयार होऊन सगळे जिथे मोबाईलची लोकेशन ट्रेस होती त्या भागाच्या दिशेने रवाना झाले. पण त्या ठिकाणी देशमुख साहेबांचच काय कुठलच घर नव्हत. त्या भागात शोध घेतला, अगदी जंगलाच्या आतही थोडं दूरपर्यंत शोध घेतला. (तसंही ते जंगल फारसं मोठं नव्हतं.) पण काही फायदा झाला नाही.
'देशमुखसाहेबांनी निधीला त्यांच्या इथल्या बंगल्यापासून दूर ठेवले होते.कदाचित तिथं अशा काही गोष्टी असाव्यात, ज्या तिला कळू नये अशी देशमुखांची इच्छा असावी. आणि यावेळी तर तिच्याशी खोटं बोलून ते इथे आले, ते परत गेलेच नाहीत. त्यांच्या गायब होण्याशी ' त्या ' गोष्टींचा संबंध असू शकेल. त्या बंगल्याची झडती घ्यायला हवी. कदाचित काही हाती लागेल. पण त्यासाठी निधीची परमिशन‌ घ्यायला पाहिजे. देशमुख साहेबांनच्या अनुपस्थितीत त्यांच्या सर्व प्रॉपर्टीची मालकी तिच्या कडेच आहे.' असा मनाशी विचार करून करणने निधीला कॉल केला.

दुसरीकडे विराट सकाळीच पंजवाणींच्या ऑफिसमध्ये गेला, आणि भेटण्यासाठी अपॉइंटमेंट मागितली. डिटेक्टिव्ह विराट जयकरचं नाव कळताच पंजवाणींने भेटायला आधी नकारच दिला. त्यामुळे विराटचा संशय अजूनच बळावला. पण त्यानं डोकं चालवून पंजवाणींला भेट घ्यायला भाग पाडल‌. त्याला त्याच दिवशी दुपारची अपॉइंटमेंट मिळाली.
आणि आता तो पंजवाणींच्या केबिनच्या दरवाजात उभा होता.
"एक्सक्यूज मी, मे आय कम इन ?" विराट ने विचारलं.
पंजवाणींने मान वर करून त्याच्याकडे बघितलं. क्षणभर त्याच्या घाऱ्या डोळ्यांची विराटच्या डोळ्यांशी नजरानजर झाली. आणि....

क्रमशः

आता पर्यंत दिलेल्या प्रतिसादाबद्दल मातृभारती वरील वाचकांचे खूप आभार. पुढील भाग लवकर पोस्ट करायचा प्रयत्न करेन. पुन्हा एकदा धन्यवाद.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED