To Spy - 3 Prathmesh Kate द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

To Spy - 3


"तुम्हाला माहितीये, आम्ही प्रश्न विचारायला तुमच्या समोर न बसता असे तुमच्या आजूबाजूला का बसलो आहोत ?" करणने बोलायला सुरुवात केली.
"नाही. का ?" निधीलाही हे थोड वेगळ वाटलं होतं.
" कारण आमच्या प्रश्नांची उत्तरे देताना तुमच्या मनावर कुठलंही दडपण येऊ नये. तुम्हाला अगदी आपल्या फ्रेंड्स सोबत बोलत असल्यासारखे फीलिंग यावं. आणि हो. ही आयडिया वीर ची होती.
"अच्छा ?" मग विराट कडे पाहून निधी प्रेमाने म्हणाली. " सो स्वीट ऑफ यू वीर." विराटला ते ऐकून कसंसच झाल. म्हणजे आनंदाने. करणच्या घसा खाकरण्याने तो भानावर आला.
"हो म्हणजे तो तर तुझा फ्रेंड आहेच, आपलीही मैत्री होईल हळूहळू."
" हो नक्कीच. पण मैत्री करायची, तर हे अहोजाहो चालणार नाही."
करण व निधीची आधी विराट मुळे बऱ्यापैकी ओळख होतीच. पण तो ईतका मनमोकळ्या स्वभावाचा आहे, हे तिला आताच कळालं होतं. त्याच्या मोकळ्या बोलण्याने तिच्या मनातली भीती गेली होती. आणि आता तीही त्यांच्यासोबत फ्रेंडली बोलू लागली होती. ते पाहून विराटलाही बरं वाटलं.
"ओके. आणि निधी, त्यादिवशी तु complent करायला आलीहोतीस तेव्हाच्या जगताप यांच्या वागण्याबद्दल मी तुझी माफी मागतो."
"इट्स ओके करण. मी समजू शकते. तुम्हाला पोलिसांना एवढी कामं असतात. आणि तुम्ही ही शेवटी माणूसच ना रे. इतक्या जबाबदाऱ्या पार पाडताना वैताग येण सहाजिकच आहे."
"समजून घेतल्याबद्दल थॅन्क्स. हसून करण म्हणाला.
निधीच्या मनस्थितीचा अंदाज घेण्यासाठी मग करण आणि विराटने तिच्या सोबत हलक्याफुलक्या गप्पा मारायला सुरुवात केली. विराटला दिसून आल, निधी आता वडलांच्या मिसिंग होण्याच्या धक्क्यातून चांगली सावरली होती. त्यांच्या बोलण्याला ती हसून प्रतिसाद देत होती. चांगली बोलतही होती. पण आधी पेक्षा फारच कमी ‌ बोलण्यात नेहमी जाणवणारा उत्साह नव्हता. जराशी गंभीरच झाली होती ती. पण दु:खी नव्हती. जरा वेळाने विराटने करणकडे पाहून होकारार्थी मान हलवली मग करणने मुद्द्याच बोलायला सुरुवात केली.
"निधी तु आता देशमुख साहेब हरवल्याच्या धक्क्यातून चांगली सावरली आहेस असं दिसतंय. आता मी जे सांगतो ते शांतपणे ऐकून घे hyper होऊ नकोस प्लीज. तु सांगितल्याप्रमाणे शुक्रवारच्या रात्री एक वाजता देशमुख साहेब घराबाहेर पडले, त्याला ४८ तास होऊन गेलेत, त्यांच्याशी संपर्कही होत नाहीये त्यामुळे त्यांना कुणी तरी किडनॅप केल असावं असं आम्हाला वाटतय." बोलताना करण निधीच्या चेहऱ्यावरील हावभाव निरखत होता. त्याने किडनॅपिंगची शक्यता बोलून दाखवल्यानंतरही तिच्या चेहऱ्यात काही बदल दिसून आला नाही. ते बघून करणला आश्र्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही.
"मलाही आता असंच वाटू लागलय". ती शांतपणे म्हणाली " पण कोण असू शकेल ?"
"मला सांग, ते एकटेच गेले होते की बरोबर कुणी होत?"
"हो, जाताना आमच्या शेरसिंग नावाच्या बॉडीगार्डला गाडी काढायला सांगितल होत."
"मला वाटतं फक्त पैशांसाठी कुणा रस्त्यावरच्या गुंडान हे केलं नसावं. कारण एवढ्या मोठ्या माणसाला एकट्यानेही किडनॅप करण खूप मोठी रिस्क आहे. ती घेण्याची हिंमत त्या मवाल्यांमध्ये नसणार‌. कुणी तरी देशमुखसाहेबांच्याच स्तरावरच्या माणसाचं हे काम असावे." विराट म्हणाला.
" येस, यु‌ आर राईट. मलाही तेच वाटत. पण असा व्यक्ती कोण ? निधी तुझ्या वडिलांना कुणी शत्रू ? किंवा एवढ्यात कुणाशी गंभीर स्वरुपाच‌ भांडण वैगेरे ?" करणने विचारलं.
यावर निधी काही उत्तर देणार तोच विराटच्या आई - रेणुकाबाई नाश्त्याच्या प्लेट्स घेऊन आल्या. त्या साध्या राहणीच्या, प्रसन्न हसतमुख चेहऱ्याच्या गृहिणी होत्या. त्या येताच विराटने उठून कोपऱ्यातला टी-पॉय उचलून तिघांच्या मध्ये आणून ठेवला. रेणुकाबाईंनी त्यावर प्लेट्स मांडल्या.
"काय हे काकू, किती उशीर लावलात." प्लेट उचलत करण लाडेलाडे म्हणाला. त्याच्याकडे कौतुकाने पाहत रेणुकाबाई हसल्या. मग त्यांची नजर निधीवर पडली. विराटला आवडणारी मुलगी हीच असल्याची अर्थातच त्यांना कल्पना होती. तिला मृदू आवाजात प्रेमाने त्या म्हणाल्या -
"निधी मगाशी आलीस तेव्हा नीट बोलता नाही आलं तुझ्याशी. तुमचं झाल्यावर थोडावेळ थांबशील का ?"
"हो काकू, थांबेल ना."
"आणि काळजी करू नकोस, तुझे पप्पा सुरक्षित असतील. पोलिस आणि विराट त्यांना लवकर शोधून काढतील."
त्यांच्या आश्र्वासक, प्रेमळ उद्गारांनी निधीचा त्यांच्या बद्दलचा आदर अजूनच वाढला. रेणुकाबाई जाण्यासाठी वळणार, इतक्यात त्यांना थांबून निधीने जागेवरूनच जमिनीला स्पर्श करत त्यांना नमस्कार केला.
' किती गोड मुलगी आहे. विराटची निवड बरोबर आहे.' रेणुका बाई मनात म्हणाल्या. जाता जाता त्यांनी विराटला सोबत येण्याचा इशारा केला. दारापर्यंत आल्यावर कुजबुजत्या आवाजात त्याला म्हणाल्या
"खूप गोड मुलगी आहे, तुझ्यासाठी अगदी योग्य आहे. देशमुख साहेबांना शोधून आणल्यानंतर अजिबात उशीर न करता विचारून टाक तीला.आईच्या बोलण्याने विराटला खूप बरं वाटलं. रेणुकाबाई बोलून निघून गेल्या. विराट पुन्हा आत येऊन जागेवर बसला

क्रमशः