To Spy - 6 Prathmesh Kate द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

To Spy - 6


"हं, कम इन." पुन्हा समोरच्या कॉम्प्युटर वर लक्ष केंद्रित करत पंजवाणींने परवानगी दिली. विराट शांतपणे पुढे झाला.
"बसू शकता." कॉम्प्युटर वरची नजर न हटवता पंजवाणीं म्हणाला. विराट खुर्ची वर बसला.
पंजवाणी अंदाजे साठीच्या आसपास असावा. डोक्यावर अर्ध्यापर्यंत उरलेले केस, गोलाकार गोरागोमटा चेहरा, घारे भेदक डोळे, चेहऱ्यावर बेफिकीरी, लक्षात येणारी बलदंड शरीरयष्टी. त्याला बघून विराटला मराठी चित्रपटातील त्याचे आवडते खलनायक यतिन कार्येकर यांची आठवण आली.

"माझं निरीक्षण करण्यासाठी नक्कीच तुम्ही आला नसाल." प्रथमच त्याच्याकडे पाहून जराशा गुर्मीतच पंजवाणीं म्हणाला.

"अं.." त्याच्या बोलण्याने विराट थोडा गडबडला. मग जरा घसा खाकरून पुढे बोलू लागला. " मिस्टर पंजवाणी, तुम्हाला समजलंच असेल की तुमचे बिझनेस पार्टनर देशमुख साहेब शुक्रवार रात्रीपासून बेपत्ता आहेत.

ते ऐकून पंजवाणीच्या चेहऱ्यावरील बेफिकीरपणा कमी होऊन त्या जागी गंभीर पणा आला."हो कळलं मला."

"तुम्हाला काय वाटतं, त्यांच्या असं अचानक गायब होण्यामागे काय कारण असेल ? विराटने सहज विचारल.

"ते मी कसं सांगणार ? ते शोधायच काम पोलिसांच आणि तुमच्यासारख्या डिटेक्टिवच आहे."

"हो ते तर आहेच. बरं, तुमचे रिलेशन कसे आहेत ?"

"नॉर्मल." एका शब्दात पंजवाणीने उत्तर दिले.
मग थोडावेळ छोटे-मोठे प्रश्न विचारून विराटने विचारलं.

"देशमुख साहेब गायब होण्याच्या चार पाच दिवस आधी तुम्हा दोघांच कडाक्याचं भांडण झाल होत. कशावरून ते कळेल का ?"

"ते आमच्या बिझनेस बद्दल होते. त्याच्याशी तुमचा संबंध नाही." त्या प्रश्नामुळे पंजवाणीचा आवाज चढला."आणि मी सांगितलं असतं तरी तुम्हाला समजलं नसतं."

"ओह, मग तर तुम्ही फारच प्रोफेशनल दिसता. कामात काही प्रॉब्लेम झाला तर आपल्याच बिझनेस पार्टनरला‌ चक्क तुला सोडणार नाही, बरबाद करुन टाकेन अशी धमकीच देता." विराट उपहासाने म्हणाला.

"शट अप, वाट्टेल ते आरोप करायचे नाहीत माझ्यावर. मी अशी कुठलीही धमकी वैगेरे दिलेली नाही. कोण म्हणतं ?"

ओरडू नका, स्वत: त्यांच्या मुलीने निधीने तसं सांगितलय."

"खोटं बोलतीये ती. त्यावेळी ती तिथे नव्हतीच, मला तर वाटतं, हा तिचाच प्लॅन असावा. आधी बापाला गायब करून कंपनी स्वत:च्या घशात घालायची, मग माझ्यावर खोटा आळ टाकून मला जेलमध्ये टाकायच, म्हणजे आरोपी पकडला गेला, असं समजून पोलिसही तपास थांबवतील. आणि ही बापाच्या प्रॉपर्टीवर ऐश करायला मोकळी. देशमुखशी तिचं पटत नाही, काम करण्यातही तिला बिलकूल इंटरेस्ट नाही, फक्त बापाच्या पैशावर मजा करायची, आणि ऑफिसच्या स्टाफवर मालकी गाजवायची. यावरूनच तिचे रागरंग दिसून येतात. " पंजवाणी निधीवर आरोप करून मोकळा झाला.

"पंजवाणी.." निधीबद्दल असं बोलल्यावर मात्र विराटचा तोल ढासळला. त्याने झटक्यात पंजवाणींजवळ जाऊन त्याची कॉलर पकडली. पण पंजवाणी सावध होता. त्याने विराटचे कॉलरवरचे हात हिसकावून त्याच्या नाकावर ठोसा लगावला. विराट धडपडत खाली पडला.

"तू.." दात ओठ खात पंजवाणी म्हणाला. "तू एक फडतूस डिटेक्टिव. माझी कॉलर पकडायची तुझी हिम्मत कशी झाली ? चल निघ येथून, गेट आऊट."
विराट पंजवाणीच्या ऑफिसमधून बाहेर पडला. कारमध्ये बसताना त्याच्या डोक्यात विचार आला. - 'पंजवाणीने देशमुख साहेबांना बरबाद करुन टाकेन अशी धमकी दिल्याचे निधीने सांगितल. पण मग त्यांच भांडण कोणत्या कारणावरून झाल हे तिला का सांगता आले नाही ? पंजवाणी म्हणतो तसं तिने मुद्दामहून त्यांच्याबद्दल खोट सांगितल असेल का ? निधी त्यावेळी तिथे होती की नव्हती ?"

करणने निधीला कॉल करून सगळं सांगितलं, आणि देशमुख साहेबांच्या 'त्या' बंगल्याची झडती घेण्याची परवानगी मागितली.
" अरे परवानगी कसली मागतोयस ? माझ्या पपांना शोधण्यासाठी जे जे करावं लागेल, ते कर. पण प्लीज त्यांना शोधून काढ."

" हो निधी, तु काळजी नको करूस, तुझ्या पपांना मी लवकरात लवकर सुखरूप शोधून घेऊन येईन. बरं मला सांग इथे त्यांचे कुणी ओळखीचे आहे का ? ज्यांना तो बंगला कुठे आहे ते सांगता येईल ?"

" हो, महाबळेश्र्वरमध्ये ' चेरी प्लाझा ' नावाच एक मोठं हॉटेल आहे, त्याचे मालक पपांचे चांगले मित्र आहेत. मी जेव्हा पपांसोबत तिकडे जाते तेव्हा दरवेळी त्यांच्या हॉटेल मध्येच थांबतो. त्यांना कदाचित माहित असावं. त्यांना तू सगळ खर सांगू शकतोस. ते विश्वासू‌ आहेत."

" अच्छा, थॅंक्स निधी, बाय." करणने कॉल कट केला. तो त्याच्या टीमसोबत ' हॉटेल चेरी प्लाझा ' मध्येच थांबला होता, त्यामुळे फुकटची दगदग वाचणार होती म्हणून त्याला बरं वाटलं. सर्वांसह गाडीत बसून तो हॉटेल मध्ये परतला. पोहोचल्यावर लागलीच हॉटेल मालकाची भेट घेतली, आणि त्यांना विश्वासात घेऊन सर्व खरी हकीकत सांगितली. देशमुखांना शोधण्यासाठी पोलिस आलेत हे कळाल्यावर हॉटेल मालकाने त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, आणि त्याला देशमुखांच्या घराचा अॅड्रेस देऊन तिथल्या केअरटेकरला परस्पर कळवून बंगल्यावर पाठवून देतो असे सांगितले. करणने त्यांचे आभार मानले. सर्वांना थोडावेळ विश्रांती घेण्यासाठी आपापल्या रूममध्ये जायला सांगून तोही रूमवर गेला. थोडावेळ विश्रांती घेतल्यावर सर्व देशमुखांच्या बंगल्याकडे निघाले.

थोड्या वेळात ते बंगल्याजवळ पोहचले. हॉटेल पासून अर्ध्या तासाच्या अंतरावर तो बंगला होता.बाहेर पोर्चमध्ये सफेद सदरा, खांद्यावर शाल, सफेद पॅन्ट अशा वेशात एक व्यक्ती उभा होता. गाडीतून उतरून सर्वजण त्याच्यापाशी गेले.
" तुम्हीच का इथले केअरटेकर ?" करणने त्या व्यक्तीला विचारलं.

" आं.. व्हय व्हय, मीच." त्याला आधी केअरटेकर शब्दाचा अर्थच कळला नाही, पण अंदाज लावून त्याने उत्तर दिले.

" नाव काय तुमचं ?."
"जी बजरंग, सगळे बज्या म्हणत्यात."

हा बज्या एक नमुनाच होता. काळासावळा लंबुळका चेहरा, मोठे बटबटीत डोळे, लांबट नाक, पुढले दोन दात जरा बाहेर आलेले, असं ते ध्यान होत.

"व्हय, आत्ता उघडतो." पॅन्टच्या खिशातून चाव्या काढून त्याने दरवाजा उघडला. सर्व जण आत गेले.
हॉल प्रशस्त आणि टापटीप होता. हॉलमधील फर्निचर आणि इतर वस्तू फारशा महागड्या नव्हत्या, पण सुंदर होत्या. कुठेही श्रीमंतीचा दिखावा नव्हता.

"दाढे सर तुम्ही साहेबांची बेडरूम चेक करा, आणि बेंद्रे तुम्ही किचनमध्ये बघा. नाईक तुम्ही ड्रॉइंग रूम बघा..आणि गाढवे तुम्ही हॉलमधेच अजून काहि मिळतंय का बघा."
सगळे आपापल्या जागी शोधायला गेले. करन ने पून्हा बज्या ला प्रश्न विचारायला सुरवात केली.

"तुम्ही कुठं राहतां? "

"इथं जवळच राहातो.. तेवढ एक बरं आहे..जवळ असल्यामुळें रोज इकडे साफ सफाइ करायला येता येत..शुक्रवारी आलो तेव्हा साहेबाच्या खोलींत सगळं सामान ईकडे तिकडे पडलं होत..सगळा पसारा झाला़ होता."

"काय?" करण ला ते ऐकुन आश्र्चर्य वाटल. 'याचा अर्थ ते इथे आले होते तर.' करणच्या मनात विचार आला.

"हो..साहेब आलेले वाटतय.. पण असं न् सांगता ते कधींहि येत नाहीत."
बज्या बोलत असतानाच देशमुखांच्या खोलीतून एक मोठं खोक घेऊन दाढे बाहेर आलें.

"सर देशमुख साहेबांच्या पलंगाखाली मिळाल. अजून एक आहे. याच साइजचे दोन कपाटावर आहेत. आणि कपाटाखाली दोन‌ छोट्या साइजचे आहेत."

टेबलावर खोक ठेवत् ते म्हणाले. ' एवढे कशाचे बॉक्सेस साठवून ठेवलेत देशमुखांनी ' असं स्वत:शीच पुटपुटत करणं ने खोक उघडुन आत डोकावले. आतील वस्तू पाहून त्याला खूप मोठा धक्का बसला.

क्रमशः