To Spy - 7 Prathmesh Kate द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

To Spy - 7

खोक्यात काही अल्बम्स होते. करणने ते सर्व बाहेर काढून नीट पाहिले. त्यात देशमुख साहेबांचे तरूणपणीचे त्यांच्या पत्नीसोबत व निधीसोबतचे फोटो होते. सर्व महाबळेश्र्वरमध्येच वेगवेगळ्या ठिकाणी काढलेले होते. अल्बम परत खोक्यात भरताना करणला दिसल, की खोक्याच्या तळाशी हिरव्या रंगाच्या कसल्यातरी पदार्थाचे कण सांडले होते. पण करणने त्याकडे दुर्लक्ष केलं. कदाचित खोलीतल्या इतर बॉक्सेस मध्ये काही मिळू शकेल असा विचार करून करण दाढेंसह देशमुखांच्या खोलीत आला.
" दाढे तुम्ही बेडखालच दुसरं खोक घेऊन बाहेर नेऊन ठेवा. मी कपाटाखालचे आणि वरचे बॉक्सेस घेऊन येतो."
दाढेंनी लगेच बेडखालच खोक काढून बाहेर नेल. करणने आधी कपाटाखालचे बॉक्सेस काढून बेडवर ठेवल. मग वरील बॉक्सेस उतरवून सर्व बॉक्सेस बाहेर आला‌. हॉलमधल्या एका सोफ्यावर करण बसला. सर्व बॉक्सेस समोरच्या टेबलाजवळ खाली ठेवले होते. करणने एक - एक बॉक्स टेबलावर घेऊन तपासायला सुरुवात केली. टेबलाच्या एका कडेला इन्स्पेक्टर दाढे लक्ष देऊन सगळ निरखत होते. दुसऱ्या कडेला बज्या शांतपणे उभा राहून बघत होता. पहिल्या बॉक्स मध्ये काही छोट्या मोठ्या साइजच्या डायऱ्या होत्या, दुसऱ्या मोठ्या खोक्यात बुद्धिबळाचा पट होता. करणने प्रश्नार्थक मुद्रेने बज्याकडे पाहिले. बज्या म्हणाला -
" ते इथं जवळ एक मोट्ट हाटेल हाय ना, त्याचे मालक सायबांचे चांगले मित्र हायेत. ते येत्यात कदी कदी भेटाया. तवा खेळत्यात त्यांच्या बरूबर."
" असं." मान डोलावत करण म्हणाला.
इतर बॉक्सेस मध्येही महत्त्वाचे अस काही सापडलं नाही. करण थोडा निराश होऊ लागला होता. शेवटच्या बॉक्स मधील सामान बाहेर काढल्यानंतर तळाशी एका कोपऱ्यात छोटंसं प्लास्टिकच सीलबंद पाकिट आढळलं. सर्वात आधी तपासलेल्या खोक्याच्या तळाशी जशा पदार्थाचे कण दिसले होते, तसाच किंबहुना तोच पदार्थ त्या पाकीटात होता. करणच्या मनात काहीतरी शंका डोकावली. इतर सामान पुन्हा बॉक्स मध्ये भरून पाकीट शेजारी ठेवलं. मग खिशातून एक टिश्यू पेपर काढून टेबलावर पसरला. पहिल्या वेळी तपासलेल खोक उघडून त्यातील द्रव्याचे कण टिश्यू पेपरवर ओतले. मग पाकिटातील पदार्थाचे आणि त्या कणांच बारकाईने निरीक्षण केलं. त्यातून जे लक्षात आल, त्यामुळे करणला धक्काच बसला. टिश्यू पेपरवरील कण पाकिटातील पदार्थाचेच होते, धक्कादायक गोष्ट म्हणजे ती अफू होती. थोडं सावरताच करणने खिशातून तसेच प्लास्टिकच सीलबंद पाकिट काढून टिश्यू पेपरवरील द्रव्याचे कण त्यात सांभाळून भरले, व दोन्ही पाकिटे दाढेंच्या हाती दिली. टिश्यू पेपरचा चोळामोळा करून ते बज्याला कचरापेटीत टाकायला सांगितले. इतक्यात सब इन्स्पेक्टर नाईक, बेंद्रे व हेड कॉन्स्टेबल गाढवे एकत्रच तिथे जमा झाले. कुणालाही संशयास्पद असं काही सापडलं नव्हतं.
" हरकत नाही, जे हवं होतं ते सापडलं आहे. चला. " करण उभा राहत म्हणाला. सर्वजण बंगल्यातून बाहेर पडले व जीपमध्ये बसून निघाले. बज्या थोडावेळ पोर्चमध्ये उभा राहून दूरवर जाणाऱ्या गाडीकडे पाहत राहिला. मोबाईलच्या रिंगटोनच्या आवाजाने तो भानावर आला. मोबाईल काढून त्याने कानाला लावला व फोनवर बोलत बोलत पायऱ्या उतरून ते गेले त्याच्या विरुद्ध दिशेने निघाला.

हॅलो निधी."
" hii वीर, काही कळलं का रे ? " निधी ने आशेने विचारलं.
" नाही. एक विचारायचं होतं." विराटला कसं विचाराव सुचत नव्हतं.
" हो विचार ना मग ? "
" काही आठवलं का , तुझ्या पपांच आणि पंजवाणीच भांडण का‌ झाल होत ? " विराटला माहीत होत की तिने माहीत नाही अस सांगितल होत, तरी काहीतरी विचारायच म्हणून त्याने विचारलं.
" अरे आठवायचं काय ? मी म्हटलं ना, पपांनी नाही सांगितल. "
" पण तु स्वत:च तिथे होतीस ना ? "
" नाही रे. पपांचे पी. ए होते तिथे त्यांनीच सांगितलेल मला त्यांच्यात काय झालं ते. "
" ओह, ओके. " ' हे आपल्या कसं लक्षात आलं नाही. ' विराट मनाशीच म्हणाला. " बरं थॅंक्स निधी. चल बाय. " त्याने कॉल कट करून मोबाईल खिशात ठेवला. आणि कार स्टार्ट करून निघाला.

क्रमशः