रात्री उशिरापर्यंत मी माझ्या कॅबिन मधे बसून होते. बऱ्याच वेळापासून रात्रीच्या अंधारात भयंकर वाटतील असे भिंतीवर ओरखडून होणारे आवाज थांबले. काही वेळ मी सुटकेचा श्वास घेतला, डॉक्टर असून मी कधी या स्थिती मध्येही असेल असं मला स्वतःला देखील वाटलं नव्हतं, गेल्या दहा दिवसांत मी प्रत्येक क्षणाला मरत होते, त्याचा हसणारा प्रेमळ चेहरा डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहायचा, मी जुन्या आठवणींत रमुन जायची, काही क्षणासाठी झालेली शांतता पुन्हा त्या भयानक आवाजाने ढवळून निघाली, काहीश्या तंद्रीत हरवलेली मी दचकून जागी झाले, पूर्णपणे काटेकोर लक्ष देता यावं म्हणून माझ्या कॅबिन शेजारच्याच वॉर्ड मध्ये त्याला ठेवलं होतं. काहीश्या थरथरत्या हाताने मी त्याच्या खोलीच्या खिडकीतून डोकवण्यासाठी काच खाली केली. खोलीभर नजर फिरवून तो दिसला नाही. मी दचकून सभोवताली नजर फिरवली, पुन्हा नीट पाहावं म्हणून मी खिडकी जवळ तोंड नेत आत डोकावण्याचा प्रयत्न केला. तोच खिडकीवर झेपावलेला रक्ताळेला चेहरा आणि गालावरच्या ओरखडयावर नजर गेली. मी घाबरून किंचाळत मागे सरकले.

नवीन एपिसोड्स : : Every Tuesday, Thursday & Saturday

1

सुटका पार्ट 1

रात्री उशिरापर्यंत मी माझ्या कॅबिन मधे बसून होते. बऱ्याच वेळापासून रात्रीच्या अंधारात भयंकर वाटतील असे भिंतीवर ओरखडून होणारे आवाज काही वेळ मी सुटकेचा श्वास घेतला, डॉक्टर असून मी कधी या स्थिती मध्येही असेल असं मला स्वतःला देखील वाटलं नव्हतं, गेल्या दहा दिवसांत मी प्रत्येक क्षणाला मरत होते, त्याचा हसणारा प्रेमळ चेहरा डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहायचा, मी जुन्या आठवणींत रमुन जायची, काही क्षणासाठी झालेली शांतता पुन्हा त्या भयानक आवाजाने ढवळून निघाली, काहीश्या तंद्रीत हरवलेली मी दचकून जागी झाले, पूर्णपणे काटेकोर लक्ष देता यावं म्हणून माझ्या कॅबिन शेजारच्याच वॉर्ड मध्ये त्याला ठेवलं होतं. काहीश्या थरथरत्या हाताने मी त्याच्या खोलीच्या खिडकीतून ...अजून वाचा

2

सुटका पार्ट 2

“Hi, मी श्रीयश.” त्याने बत्तीशी दाखवत हात पुढं केला, मला तर काही इंटरेस्ट नव्हता त्याच्या बरोबरं hi, hello करण्यात.मख्ख मी त्याच्या हाताकडे पाहून थंड आवाजात “hello” म्हंटल. त्याने ज्या वेगाने हात पुढे केला होता त्याच वेगाने मागे घेतला.आमचा दहावी ‘क’ चा वर्ग सुरू झाल्या पासून दुसरा महिना होता. हा नवीन आलेला प्राणी सोडला तर वर्गातला प्रत्येक जण आपल्या पासून चार हात लांबच राहायचा. मी प्रकारच तसा होते मला फालतू ची बडबड आवडायची नाही आणि जास्त कोणी बोलण्याचा प्रयत्न केल्यास काय होते हे प्रत्येकाला चांगलेच माहीत होते. म्हणून आपलं चार हात लांब बरं असं म्हणून सगळे मला माझी पब्लिक privacy ...अजून वाचा

3

सुटका पार्ट 3

माझ्या टोमण्यांना हसून उत्तर देणार आणि मी केलेल्या सगळ्या मस्कर्‍या हसून नेणारा माझा आता पर्यंतचा पहिला मित्र, जो मला पर्यंत कधीच खडूस म्हटले नाही किंवा माझ्या स्वभावाला वैतागून माझ्याशी भांडण केले नाही, मी त्याच्या समोर बहुली दिसायचे, मोटू-पतलूची आमची जोडी प्रसिद्ध झाली ती या कारणाने की मी कोणाची तरी खोडी काढणार आणि आमचा साजूक लोढू जाऊन त्याला सॉरी म्हणणार हे मात्र आता सोबत रोजच झालं होतं. आमच्या मागच्या बाकावर बसणारा गौऱ्या ही आमच्यात सामील असायचा पण मला मात्र आमच्यात लुडबुड केलेलं आवडायचं नाही, तसाही तो जरा जास्त हुशार आणि शिक्षकांच्या जवळचा होता, कडीमोडा धापणा अवतार मला अजिबात आवडायचा नाही. ...अजून वाचा

4

सुटका पार्ट 4

एक जुनी पडकी खोली वजा डाक घर तिथं होतं, आत गेल्यावर कुणीतरी काम करताना दिसलं, ती करुकुरणारी खुर्ची त्यावर खाकी कपडे घातलेला जक्ख म्हातारा बसलेला होता. चष्म्यातून त्याला फार काही स्पष्टपणे दिसत असेल याची मला जरा शंका वाटली कारण दारात मी उभी असं ताना माझ्या कडे बारीक डोळे करून तो पाहत होता आणि सोबत म्हणत होता. “आला का रे राम्या, बरं झालं. मी का निघतो आता घरला. तू टाळा लावून टाक तेव्हढा.” असं म्हणून तो त्या कुरकुरणार्या खुर्चीतुन उठला. काका मी तुमच्या कडे काम होतं म्हणून आले आहे थोडी माहिती हवी होती, त्या जड भिंगाच्या चष्म्यातून त्याने पुन्हा एकदा ...अजून वाचा

5

सुटका पार्ट 5

अन तुम्ही गाववाले ना जुना फोटो दाखवला असं लं त्यांनी ओळखलं बी नसलं कुणी.”“बरं, त्याचा काही पत्ता देऊ शकाल पत्ता तर नाई पण मागल्या येळी एक नंबरं मात्र दिला होता, आता इथं रेंजचं नाई तर फोन कसा करणार ना. कुठं ठेवलाय?” त्यांनी डोक्याला हात लावला. बराच वेळ शोधाशोध केल्यावर त्याने एक कागद माझ्या हातात दिला. मोबाईल नंबरं त्यावर लिहिलेला होता.मी लगेचच त्यांचा निरोप घेऊन तिथून निघाले. लवकरात लवकर मला तिथून बाहेर निघून ‘लोढू’ला फोन करायचा होता. गाव सोडून काही अंतरावर आल्यावर माझ्या मोबाइलला नेटवर्क दिसायला लागलं. घाईघाईनेच मी तो नंबरं फोन मध्ये डायल केला. “आपण ज्या नंबरं वर संपर्क साधू ...अजून वाचा

6

सुटका पार्ट 6

“बघतेयस ना? आवडला का? माझ्या आजोबांच्या वडिलांनी खास बनवून घेतलेला हा वाडा, जुना आहे खूप, सध्या विकायचं चाललंय. येत तो अधून मधून छान वाटत गाव, तसही माझ्या शिवाय याला कोणी वारस नाही. पण मला हा विकायची इच्छा होतं नाही.”“ये, अगं उभी काय आहे? ये इकडे तुला खोली दाखवतो तुझी. इथे मात्र ऐसपैस रूम्स आहेत पूर्ण वाड्यात अश्या नऊ खोल्या आहेत. चलचल आपल्याला अजून खूप गोष्टी बघायच्या आहेत.”त्याने माझी बॅग घेऊन आत येण्याची खूण करत तो पुढे निघाला.“सावकाश ये. पडशील. पायऱ्या मोठ्या आहेत पण लाकडी असं ल्याने पाय सरकतो. अगं मी एकदा सोडून दोनदा पडलो आहे तिथून.” तो बोलत होता ...अजून वाचा

7

सुटका पार्ट 7

रामा जेवण ठेऊन लगबगीने निघून ही गेला. मिणमिणत्या दिव्याच्या उजेडात मी जेवण केलं. पण मोबाइललाला रेंज नाही आणि त्यात ही बाहेर गेला होता. त्या वातावरणात जरा भीतीची लहर उमटली. “लोढू, तू बाहेर आहेस का?” फक्त रातकिडे किरकिरण्याचा आवाज येत होता. थकलेली असूनही मला झोप येईना म्हणून प्रवासात घेतलेलं पुस्तक वाचायला घेतलं. पण पुस्तकात माझं लक्ष लागेना. रातकिड्यांची कीरकिर आणि दूरवर कुठेतरी कुत्रे भुंकत होते. रम्य वाटणार सगळं अचानक भयाण वाटायला लागलं. बाहेर काहीतरी आवाज झाला तस काळजात धस्स झालं. “कोणी आहे का बाहेर?” कुठलीच प्रतिक्रिया नाही. काय यार हा कुठे गेला.? किती काळोख आहे हा? एवढी मोठी खोली ...अजून वाचा

8

सुटका पार्ट 8

सुंदर माडाच्या रांगा पसरल्या होत्या. पलीकडून आमराईच सुंदर दर्शन होतं होतं. सकाळची गुलाबी थंडी अजून ही ओसरली नव्हती. हलकं धुकं रस्त्यावर पसरलं होतं. कोवळं ऊन उबदार वाटत होतं. लांबून मोरांच्या म्याव म्यावचा आवाज. त्यात किलकीलणारी पाखरं वातावरण प्रसन्न करत होती. सुंदर वाटत होतं कसं सगळं. “सुरे ऐकतेस का? तुला आठवत का गं? आपण सोबत जेवायला बसलो तर तू माझा डब्बा आणि सोबत तुझा डब्बा सुद्धा संपवायची. तरी एवढी बारीक कशी दिसतेस ग?” “म्हणजे फक्त बारीकच दिसते, साडी कशी आहे सांगितलं नाही?” मी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव न्याहाळत प्रश्न केला. “साडी ही छान आहे.” त्याने तोळ्यावर मोजून देतात तस कौतुक केलं ...अजून वाचा

9

सुटका पार्ट 9

बाकीच्या कायम बंद असतात म्हणून आम्ही तिकडे गेलो नाही. तेवढ्या दोन मिनिटाच्या कालावधीत डोक्यात काय काय विचार येऊन गेले तील? अंगाला हलका कापरा सुटला होता. सगळं असं डोळ्यासमोर नाचायला लागलं, काय आहे हे? रात्री पाहिलेलं ते सगळं आठवून अचानक हॉरर फील यायला लागला. काय प्रकार आहे हा? सगळंच जरा कोड्यात टाकायला लागलं! तेव्हा असं वाटलं आता एकदा पाहुनच यावं, पण एवढ्या भयाण रात्री, तो किर्रर्र काळोख पाहून नुसती धडधड होतं होती. तोंडावर पांघरुन घेऊन मी गच्च डोळे मिटले. काल मी जशी घाबरंले हे पाहून त्याने अंगणात आणि वापरातल्या खोल्यांमध्ये लाईटची सोय केली होती. आता मात्र तरी आजू बाजूला उजेड ...अजून वाचा

10

सुटका पार्ट 10

“थांब सुरे… डोक्यातल्या एवढया सगळ्या प्रश्नांचं ओझं घेऊन जाशील तर तुलाच त्रास होईल त्याचा.” माझी पाऊलं अडखळली. क्षणभर थांबून मी मागे नजर फिरवली. डोक्यात हजारो प्रश्न होते. “एका मित्राला शोधायला अशी बाहेर पडते काय, तू असा अचानक भेटतो काय आणि रात्री पडणारी ती भयानक स्वप्न, स्वप्न की सत्य जर ती स्वप्न होती तर अंगावर या जखमा कशा? काय घडतंय? तू मूळचा इथला राहवासी नाही असं तूच सर्वांना सांगत फिरायचा तरीही त्याच्या पूर्वजांनी बांधलेलं वाडा, त्याचा हा वारस, रात्री बेरात्री होणारे भास नक्कीच इथं काहितरी भयानक आहे याची आता मला खात्री पटली आहे.” मी त्या वाड्याकडे नजर उंचावून पाहत म्हणाले. ...अजून वाचा

11

सुटका पार्ट 11

बोलता बोलता त्याचा कंठ दाटून आला.“रात्र रात्र ओरडायचो, अंगावर करंट झेलले, वारंवार दिलेल्या शिक्षेनी मी खूप हळवा झालो होतो. वर्षांनी घरी आलो तेव्हा मात्र मी भूतकाळ मागे ठेवला. आई ने कधी माझ्या शिक्षणासाठी कुठली कमी ठेवली नाही. पण या सगळ्यात ती थकली होती. माझ्या आजारपणा मुळे आम्हाला सतत घर बदलत राहावी लागायची. लोकं नको नको ते बोलायचे. चेटूक - करणी करतात ही लोकं असं म्हनून छि थू करायचे. माझं शिक्षण हे असंच झालं. काही इथे काही तिथे. मुंबईला गेलो तिथे तीन वर्षे काढली. सगळ्यांना आम्ही आमची खोटीच ओळख द्यायचो मग जास्त विचारपूस झाली तरी उत्तर ठरलेली असायची. तुम्हाला सांगितलेलं ...अजून वाचा

12

सुटका पार्ट 12

काहीतरी गौडबंगाल आहे हे मात्र नक्की झालं.पण मनाच्या कोपऱ्यात त्याची काळजी वाटत होती. त्या भूत बंगल्यात परत जायची इच्छा पण एकदा मला माझ्या मनाची शांती हवी होती. संध्याकाळ व्हायला आली होती, झपझप पावलं टाकत मी वाड्या समोर पोहोचले. भव्य वाडा तसाच दिमाखात उभा होता. सगळीकडे शांतता पसरलेली. जोरात आवाज दिला, “हॅलो….” तसा तो आवाज चारी बाजूला घुमला.“श्री, तू आहेस का ईथे?” कसंलाच प्रतिसाद नाही. काही वेळ मी उत्तराची वाट पाहिली. छे, काही उत्तर नाही. जाऊदे मीच आत जाते. मी स्वताशीच पुटपुटले.पाठीवरची बॅग त्या चौथऱ्यावरच टाकून त्या दुमजली इमारतीच्या वरच्या खोल्यांकडे जायला लाकडी पायऱ्यांचा तो रुंद जिना चढायला लागले. जिन्यातला ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय