sutka part 2 books and stories free download online pdf in Marathi

सुटका पार्ट 2

“Hi, मी श्रीयश.” त्याने बत्तीशी दाखवत हात पुढं केला, मला तर काही इंटरेस्ट नव्हता त्याच्या बरोबरं hi, hello करण्यात.

मख्ख चेहऱ्याने मी त्याच्या हाताकडे पाहून थंड आवाजात “hello” म्हंटल. त्याने ज्या वेगाने हात पुढे केला होता त्याच वेगाने मागे घेतला.

आमचा दहावी ‘क’ चा वर्ग सुरू झाल्या पासून दुसरा महिना होता. हा नवीन आलेला प्राणी सोडला तर वर्गातला प्रत्येक जण आपल्या पासून चार हात लांबच राहायचा. मी प्रकारच तसा होते मला फालतू ची बडबड आवडायची नाही आणि जास्त कोणी बोलण्याचा प्रयत्न केल्यास काय होते हे प्रत्येकाला चांगलेच माहीत होते. म्हणून आपलं चार हात लांब बरं असं म्हणून सगळे मला माझी पब्लिक privacy देत होते, पब्लिक privacy म्हणजे सामाजिक ठिकाणी ही कोणी माझ्या व्यतिगत आयुष्यात ढवळा ढवळ करत नव्हते, म्हणजेच उगाच चुचेगिरी करून मला बोर करत नव्हते.

म्हणून माझ्या शेजारचा बेंच कायम रिकामा असायचा. कुणी बसायची हिम्मत तो काय करेल की हा प्राणी मोकळी जागा दिसली म्हणून तिथे थडकला, दुसरीकडे alredy सगळे डबल बसत आल्याने मला माझ्या शेजारची जागा दान करणे भाग होते माझ्या मर्जीच्या विरुद्ध का होईना त्या नाजूक शरीराने माझ्या ऐसपैस बेंचचा तीन चतुर्थांश भागाहून जास्त म्हणजे जवळपास 80 % भाग तरी बळकावला होता. आता माझ्याच राज्यात मी आश्रित होते, शेजारच्या राज्याचा आर्थिक विस्तार पाहतां ते दान करणे मला भाग होते, आता न बोलुन सांगता कुणाला! दात ओठ खात एक तास तशीच स्वताला थंड करत बसले, आता राग शांत झाला पण माझ्या सुपीक डोक्यात नानाविविध कल्पना डोकायला लागल्या, हे नाजुक धूड मला काहीही करून माझ्या राज्यातून हकलायचे होते. डोक्यात रणनीती चालू झाली.

तसा लहानपणी पासूनच माझा स्वभाव जरा अतरंगी आहे, मला माणसं जवळ आली का जास्त प्रॉब्लेम वाटतो. जस की मला आठवतंय अगं दी पुढचे दोन दात दुधाचे आणि भिंतीला धरून चालण्याचे तेवढं येत होतं की माझी मावशी आणि तिची सासू घरी आलेली, पाहुणे आणि पाहुणचार असे तर काही कळत नव्हते पण एक मात्र कळत होतं, मावशी आणि मावशीची सासू मला खुळखुळा वाजवून दाखवत होते आणि हसून माझ्या गालाला त्रास देत होते मला न त्या खुळखुळ्याचा आवाज आवडत होता ना माझ्या गालाला झालेला त्रास, मावशीच्या सासूचे केस असे काही पकडले की मला माझ्या शरीराला धरून ओढणारे दोन जण आणि मी केसांना घट्ट धरून जी पकड बनवली, की ती जर सुटली तर जणू काही माझ्या वयवर्षे दोन पर्यंत कमावलेल्या प्रतिष्ठेचा प्रश्न उभा राहणार होता.

Chocolate चे अमिष ही माझा राग control करू शकले नव्हते शेवटी मी अजून दोन तीन चॉकोलेट चे budget वाढल्याने ने माघार घेतली, मावशीच्या सासूशी आज ही माझं काही खास पटत नाही.

दुसरी गोष्ट आठवते ती मी इयत्ता दुसरी मध्ये असेल, मला माझ्या शेजारी ही कोणी बसलेलं आवडायचं नाही, माझ्या शेजारी एक मुलगी बसायची वर्गात सगळ्यात हुशार मला मात्र तिचा खूप राग यायचा, तिची हुशारी लपवत ती शांत बसून जरी असं ली तरी मला ती माझ्या डोळ्यासमोर नको होती, शेवटी मला जे हवं ते मी मिळणारच होते, आणि काहीच दिवसात मी ते साध्य केलं.

तेव्हा पासून माझ्या राज्यात मी एकटीच होते माझा चांगुलपणा सगळ्या शाळेत प्रख्यात होताच त्या मुळे फारस कोणी माझ्या नादाला लागायचं नाही, इयत्ता दुसरीत असं ताना जर एवढा खुनशीपणा माझ्यात होता तर आता तर या नाजूक शरीराला हकलायला मला कितीसा वेळ लागणार होता,

काय करावं याचं गणित चालू होतं. पहिला तास संपतच आला होता की सरांच या नवीन गोष्टीकडे लक्ष गेलं, माझ्या शेजारी चक्क कुणीतरी बसायची हिम्मत केली, याच आश्चर्य वाटलं असावं नक्कीच त्यांना. पूर्ण वेळ आळीपाळीने ते माझ्याकडे आणि शेजारच्या नाजूक देहाकडे पाहत होते, आपल्या वर्गात नवीन मुलगा आज पासून दाखल झाला आहे. कसं वाटतंय श्रीयश? तुझं introduction दे सर्वांना.

साजूक पुन्हा एकदा बॉउन्स झाला उठताना त्याची ढेरी बेंचच्या पुढच्या भागाला धडकली. “नमस्ते एवरी वन मी श्रीयश लोढी, त्याच आडनाव ऐकून मला हसू कंट्रोल झालं नाही,” लोढू!!!!!! मी खि खी करत त्याला आवाज दिला माझ्या सोबत अजून ही काही लोक हसले असं तील बहुतेक, सर पुन्हा एकदा ओरडले, “गप्प बसा रे!” मराठी खूपच चांगली होती त्याची, चांगली म्हणजे सर्वांचीच चांगली असं ते मात्र याची जरा जास्तच चांगली होती..

दुसऱ्या तासाला मराठीच व्याकरण मॅडम समजून सांगत होत्या, हे महाशय तर जणू व्याकरणाचे जन्मदातेच होते, व्याकरण आणि त्याची सगळी उत्तर तोंडपाठ होती, मराठी त्याला फार आवडते असं तो तास सुटते वेळी माझ्याकडे पाहून म्हणाला, आता मला अजून एक कारण मिळालं त्याला हुसकायचं मला हुशार आणि चमचेगिरी करणारे लोक माझ्या शेजारी बिलकुल नको असतात.

डोक्यात प्लॅनिंग सुरु झाली. तास ऑफ जाणार होता. सर आले नव्हते, मी हळूच स्कर्टच्या खिशातून मोबाइल काढला. गेम खेळत बसले, शेजारून काहीतरी खुडबुड चाललेली जाणवली तशी मी त्या साजूककडे मान वळवली, त्याने जेवणाचा डब्बा खोलला होता, अहाहा…काय सुंदर खमंग वास येत होता काहीतरी चटपटीत आणि चवदार आणलेलं दिसत होतं, त्याला शेजारी बसून तीन तास तरी झाले असं तील पण मी एक शब्दाने त्याला ओ दिली नव्हती, आता डब्यातल्या गोष्टी मागू कशा? पण काही का असेना त्या वासाने पोटात भूक कळवळली.

त्याने डब्बा व्यवस्थित खोलला आणि माझ्या समोर ठेवला.!!! आह ..!! जणू स्वर्गच .त्याने खा म्हणायच्या आतच त्यावर ताव मारायला सुरुवात केली, आह!!! काय चव होती त्या जेवणाला, नुसती बोट चाटत राहावं अशी, खाता खाता आमच्या मेसच्या काकूंच्या हातची अळणी भाजी आठवली…ह्या काय आठवतेय मी? पण डब्बा संपवला आणि बोटं चाटत ढेकर दिला, त्याने पाण्याची बॉटल समोर केली. ती घटघट प्यायले, किती दिवसांनी पोट शांत झाल्यासारख वाटत होतं.

“मिस सुर्वी फोन वापरायला परवानगी नाही आपल्या शाळेत हे highschool आहे कॉलेज नव्हे..!!” तो दात काढत खोचक हासत म्हणाला, त्यावर “ये तू तुझं काम कर मला शिकवू नको.” असं नेहमीच खमक उत्तम जिभेवर आल होतं की ते तोंडाच्या तोंडात गिळल, कारण आत्ताच मी माझ्या शेजारच्या राज्याची कुमक ढापली होती, लगेच कुरघोडी नको असं मनातल्या मनात म्हणून मी मोबाईल खिशात ठेवला..

जेवणाची सुट्टी झाली मला तर मस्त जेवण करून आता झोप येत होती, मी त्याला माझा डब्बा दिला त्याने तो खोलून शांततेत संपवला, काहीही नाव न ठेवता!! अजूनही आमच्यात काहीच संभाषण नव्हतंच, पण मला आता राहवेना , तरी मी त्याला शेवटचा घास तोंडात टाकताना टोकलच काय रे ते पांचट अळणी बेचव जेवण कसं काय गिळले तू? त्याने हळूच पाण्याचा घोट घेत म्हंटलं अन्नाला कधी नाव ठेऊ नये, “आई म्हणते ना अन्न हे पूर्ण ब्रह्म असं त.”

हम्म जरा जास्तच लक्ष आहे वाटत तब्येतीवर तुझं, आणि तुझ्या आईच, त्याच्या जाडेपणावरचा विनोद ऐकून खरं तर त्याने रागवायला हवं होतं, पण तो रागवायचा सोडून चक्क लाजला, मला हासु आलं...!!

“ये साजूक तुला डान्स येतो का रे?”

“नाही येत. तरी नाचतच चालतो. त्याच्या उत्तराने मला अजूनच हसू आलं. तसा तो ही गडगडाटी हसला, त्याची आई फार सुंदर स्वयंपाक बनवायची रोज आल्या आल्या त्याचा डबा मी फस्त करायची, आता हे रोजचंच झालं होतं तरीही रोज तो माझ्या मेसच अळणी बेचव जेवण गपचूप पणे जेवायचा, हळू हळू आमची गट्टी जमायला लागली जिकडे तिकडे आम्ही आता सोबत दिसायचो,तो मला सूरी म्हणायचं आणि मी त्याला ‘साजूक’ किंवा ‘लोढू’ असं म्हणायचे पण हे नाव फक्त माझ्या साठीच होतं दुसरं कोणी तशी हाक मारली तर मात्र काही खैर नव्हती.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED