sutka part 9 books and stories free download online pdf in Marathi

सुटका पार्ट 9

बाकीच्या कायम बंद असतात म्हणून आम्ही तिकडे गेलो नाही. तेवढ्या दोन मिनिटाच्या कालावधीत डोक्यात काय काय विचार येऊन गेले असं तील? अंगाला हलका कापरा सुटला होता. सगळं असं डोळ्यासमोर नाचायला लागलं, काय आहे हे? रात्री पाहिलेलं ते सगळं आठवून अचानक हॉरर फील यायला लागला. काय प्रकार आहे हा? सगळंच जरा कोड्यात टाकायला लागलं! तेव्हा असं वाटलं आता एकदा पाहुनच यावं, पण एवढ्या भयाण रात्री, तो किर्रर्र काळोख पाहून नुसती धडधड होतं होती. तोंडावर पांघरुन घेऊन मी गच्च डोळे मिटले. काल मी जशी घाबरंले हे पाहून त्याने अंगणात आणि वापरातल्या खोल्यांमध्ये लाईटची सोय केली होती. आता मात्र तरी आजू बाजूला उजेड दिसत होता. झोपल्या झोपल्या मनात नाना तऱ्हेचे विचार डोक्यात गोंगावत होते.

कधी तरी मध्यरात्री अर्धवट झोप लागली. काहीतरी कुजबुजल्याचा आवाज येत होता बहुतेक. “सुर्वी.”

“कोणी हाक मारली मला?” मी दचकून उठले. “आईचा आवाज?”

असं कसं होऊ शकतं? आईचा आवाज इथे? मी काहीशी गोंधळले. नक्की इथे काहीतरी भुताटकी आहे. कसंले भास होतायत मला?

“ये श्री, ऐकतो का?” मी मारलेली हाक त्याला कळली नसावी बहुतेक. मी घाबरून दरवाज्याकडे पाहत होते. पुन्हा मी त्याला हाक मारली. “लोढ्या ऐकतोस का? कोणी आहे का बाहेर?” घशातून आवाज निघत नाही. कोणीतरी माझ्या वर येऊन मला खाली दाबायला लागलं. काय होतं ते? मी हवेत हात फिरवत होते; गळ्यातून शब्द बाहेर निघत नव्हता; मला मदत हवीय. काय श्वास गुदमरतोय; काहीच वेळ हात पाय आपटले. काही सुचेना काय करावं कोणी एवढं घट्ट पकडले की कुठलीच हालचाल करता येईना. आता फक्त काहीच क्षण होते माझ्याकडे. मी हारत चाललेय, मला समजत होतं, पण मी आता हेल्पलेस होते.. आता जणू वातावरणातला ऑक्सिजनच कोणातरी काढून घेतला आहे असं जाणवायला लागलं. जड पडलेलं शरीर आणि…अअअ एका मोठ्या किंकाळीने मला जाग आली. घशाला भयंकर कोरड पडली होती. जोर जोरात चाललेला श्वास मला आटोक्यात येईना. तो ताडकन उठून माझ्या जवळ आला.

“काय होतंय सुरे ठीक आहे ना?”

मी सरळ उठून त्याला गच्च मिठी मारली. फुललेला श्वास, सगळं अंग घामाने ओलं चिंब झालं होतं, मी डोक्याच्या केसा पासून तर पायाच्या बोटा पर्यंत थरथरत होते आणि बाहेरचा तो भयानक किर्रर्र काळोख जाणवत होता. अशा भेदरलेल्या अवस्थेत मला पाहून तो ही काहीसा घाबरंल्या नजरेने माझ्या कडे पाहू लागला, “काय झालं स्वप्न पडले का काही?”

काही वेळ मी तशीच त्याला घट्ट धरून होते. का माहीत नाही पण ती मिठी मला सोडवेना. तो ही काही वेळ तसाच माझ्या डोक्यावरून हात फिरवत राहिला. थोड्या वेळाने मला स्वतःलाच जरा वेगळं वाटलं, हळू हळू हाताची मिठी सैल झाली. लाजेने मी कावरीबावरी झाले, तो हळूच बाजूला झाला, पेल्यात पाणी ओतून त्याने माझ्या समोर धरला. “घे, पाणी पी.” तुला बरं वाटेल.

मी एक घोट गळ्याखाली उतरवला. तो हरवल्या सारखा माझ्या कडे बघत होता. कदाचित तो ही…

“असं काय बघतोय?” मी त्याला टोकल्यावर तो काहीसा भानावर आला.

“अ……!!! क…कुठे काय तुला स्वप्न पडलं का काही? झोप आता निवांतपणे मी आहे जागा. काळजी नको करू….”

“अ…हो.. तू जाऊ नको कुठे.”

“हो गं बाई, आता कुठेच जाणार नाही डोन्ट वरी.”

मी एका कुशीवर पडले होते. तो त्या लाकडी बेडच्या कडेला काहितरी वाचत बसला होता. रात्रीचे दोन वाजत आले असं तील. पण मला काही झोप येईना. बऱ्याच वेळाने जरा डोळा लागला होता. हलकी हलकी झोप यायला लागलीच होती की काहीतरी आवाज आला मी दचकून जागी झाले.

“श्री?” माझी घाबरली नजर त्याला शोधायला लागली. पण तो मात्र तिथे नव्हता. पुन्हा गायब. काय चाललंय हे? भीतीने माझा जीव जायची वेळ आता आली होती.

“कोण आहे तिकडे?” पुन्हा तेच तसाच कुजबुजल्याचा आवाज. कोणीतरी माणसं बाहेर असं ल्याची चाहूल लागली. तशी मी तकडन जागेवरून उठले. लाकडी दरवाजा खोलून बाहेर नजर फिरवली. बाहेर वाड्याच्या जागेत प्रकाश पसरला होता. तरीही ते सगळं भयाण वाटत होतं.

“श्री, कुठेयस?” मी बिचकत पाऊलं टाकत बाहेरच्या दिशेने निघाले. घशाला कोरड पडली होती. अंगावर काटा यायला लागला तशी ती कुजबुज जवळून जाणवायला लागली. कोणीतरी कुजबुजल्याचा आवाज येत होता. तो आता जवळून यायला लागला.

पाय एवढे भयानक थरथरायला लागले होते की मला आता पुढे पाऊल टाकवेना. पाठीमागे पाऊल सरकल तसं मी गर्रकन मागे वळले, खोलीमध्ये जाऊन स्वतःला बंद करण्यासाठी पूर्ण ताकदीने मी दरवाज्याकडे धाव घेणारच होते की मी जागेवर खिळले. माझ्या मागे तीनचार पाऊलं सोडून कोणीतरी उभं होतं, लालबुंद डोळे अस्ताव्यस्त झालेले केस, काळवंडलेला चेहरा आणि कुजका घाण वास,न जाणे कित्येक रात्री जागून काढल्या असं तील असं वाटलं, डोक्याला कापळभर फासलेलं कुंकू आणि चेहऱ्यावरच ते भयाण हसू..!!!

“क…कोण आहेस तू?”

हे…काय होतंय? “भ….भूत” मी जोरात किंकाळी मारली… कानावर हात ठेवून मी जिवाच्या आकांताने ओरडले, “आई…!!!”

मी खडबडून जागी झाले. डोकं अक्षरशः जड पडलं होतं. “आई.....” मी डोक्याला हात लावला वेदनेने जीव कासावीस झाला होता.

तो माझ्या बेडच्या बाजूला उभा राहून माझ्या कडे बघत होता. “मॅडम पुन्हा काही स्वप्न पाहिले का?”

मी घामेजलेल्या चेहऱ्यावर हात फिरवत पाणी असं उच्चारलेले त्याच्या लक्षात आलं त्याने पाण्याचा ग्लास माझ्या समोर धरला. “शांत हो.”

“दुसरी वेळ आहे तुझी? काही प्रॉब्लेम आहे का?” तो काळजीने म्हणाला.

रात्रीचे 3 वाजलेत आणि तू दुसर्‍यांदा अशी दचकून जागी झालीय. स्वप्न होतं. आता शांत झोप घाबरू नको अजिबात. त्याने माझ्या डोक्यावरून हळुवार पणे हात फिरवला. थारथरणार अंग तापलं होतं. कित्येक वेळ तो असाच शांतपणे माझ्या डोक्यावरून हात फिरवत होता.

सकाळी जाग आली तेव्हा ऊन डोक्यावर आलं होतं. रात्रीची स्वप्न झर झर डोळ्या समोरून सरकायला लागली. काहीही स्वप्न पडतात मला. तर मी स्वातःच्याच डोक्यात टपली मारून घेतली. त्याला आवाज दिला, बाहेरून त्याची ‘ओ’ आली.

“उठल्या का मॅडम?” आळस देत देत माझं लक्ष माझ्या अंगातल्या कापड्यांकडे गेलं.

कपडे जशेच्या तसेच होते. मी स्वप्नात पडले होते. खरं असतं तर लागलं असतं मला. पण लागलं तर नाही मला कुठे. चेक करावं म्हनुन मी गुडघ्याला हात लावून पहिला. जोरात सनक गेली…आई गं….. पायाचा लेहंगा वर करून पाहते तर गुडघ्याला खरंचटलं होतं, हे आणि कसं झालं? म्हणजे ते सगळं? हे देवा, डोकं बंद पडायची वेळ आली आता.

काही क्षण मी तशीच बसून होते. क्षणभर मला काय करावं ते सुचेना. सकाळ झालेली होती एक गोष्ट तर लक्षात आली होती की काहीतरी चुकीचं घडतंय. येऊन फक्त दोन दिवसच झाले असं तील. पण आता अजून इथे राहण्याची हिम्मत माझ्यात नव्हती. त्या गोष्टी आठवून माझं डोकं बधिर व्हायची वेळ आता आली होती. आवरलेल्या बागेची चैन लावता लावता मी त्याला जोरात हाक मारली तो धावतच आत आला. “आलास का?”

“तू निघाली सुद्धा? बरं ठीक आहे मी सोडतो तुला.”

“मी निघते आता. थँक्स, तुझ्या सोबत खूप सुंदर वेळ गेला, छान वाटलं खूप तुला भेटून.” पाठीवर बॅग टाकली आणि मागेही न पाहता मी वाटेला लागले. विचारांच्या तंद्रीत चाललेच होते की तेवढ्यात मागून आलेल्या आवाजाने लक्ष वेधून घेतलं.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED