सुटका पार्ट 6 Sweeti Mahale द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सुटका पार्ट 6

“बघतेयस ना? आवडला का? माझ्या आजोबांच्या वडिलांनी खास बनवून घेतलेला हा वाडा, जुना आहे खूप, सध्या विकायचं चाललंय. येत असं तो अधून मधून छान वाटत गाव, तसही माझ्या शिवाय याला कोणी वारस नाही. पण मला हा विकायची इच्छा होतं नाही.”

“ये, अगं उभी काय आहे? ये इकडे तुला खोली दाखवतो तुझी. इथे मात्र ऐसपैस रूम्स आहेत पूर्ण वाड्यात अश्या नऊ खोल्या आहेत. चलचल आपल्याला अजून खूप गोष्टी बघायच्या आहेत.”

त्याने माझी बॅग घेऊन आत येण्याची खूण करत तो पुढे निघाला.

“सावकाश ये. पडशील. पायऱ्या मोठ्या आहेत पण लाकडी असं ल्याने पाय सरकतो. अगं मी एकदा सोडून दोनदा पडलो आहे तिथून.” तो बोलत होता तसा तसा त्याचा आवाज वाड्यात घुमत होता.

“सुरे आठवतंय का आपण किती माजा करायचो तू नुसत्याच खोड्या काढायची आणि मी मात्र नुसते सगळ्यांना सॉरी बोलण्यात दिवस घालवायचो. बोलत बोलत त्याने त्या खोलीची सगळी धूळ झटकली, अगं आणि आठवतंय तुला ते एक मुलाने दहावीत असं ताना प्रापोस केला होता. तू त्याला काय चोपला होतं. बिचारा. पुन्हा कधी कोणाला प्रापोस करण्याची डेअरिंग नसेल झाली त्याची आयुष्यात.” किती तरी वेळ तो एकटा बाबडत होता. खटकन आवाज झाला आणि वाऱ्याची एक मंद झुळूक खोलीत आली. त्याने खोलीतल्या दोन्ही खिडक्या उघडल्या. सगळी खोली प्रकाशने भरून गेली. इतका वेळ न जाणे कुठे हरवून गेले होते. खटकन जाग आल्या सारख झालं.

“अरे, वाडा तर खूप छान आहे रे. मला तर इकडेच राहायला यावं वाटतय. किती सुंदर दृश्य दिसत इथून बाहेरच. छान माडाची झाड आणि शेती दिसत होती. आंब्याच्या बागा ही दिसत होत्या लांब लांब पर्यंत बागायती शेती दिसत होती. सुदंर वाटत होतं, जवळ नदी असेल ना?”

“हो तुला कसं माहीत? नदी आहे.”

“खूप छान नदी आहे. आपण जाऊ तिकडे. तुला शहरातल्या गटारी नाले आणि ती वास सोडणारी नदी एवढंच माहीत असेल. चल तुला दाखवतो, गावाचं सौंदर्य.”

तो बाहेर गेल्यावर मी शांत होऊन खिडकीतून बाहेर पाहत होते. किती सुंदर दृश्य होतं ते. मंद वाऱ्याची झुळूक चेहऱ्यावर येत होती. संध्याकाळची वेळ झाली होती त्यामुळे हलकी थंडी सुटलेली. अंगावर बारीक काटा आला. रोजचा शहरातला उकाडा तेवढा मला माहित होता. त्यावर उपाय म्हणून AC लावून थंडी अनुभवणे आणि खऱ्या खुऱ्या निसर्गाचा अनुभव घेणे किती फरक असं तो तेव्हा पहिल्यांदाच वाटलं.

“ये सुरे, आवर लवकर.” हे गाव आहे इथे लोक अंधार पडायच्या आत घरी येतात. शहर नाही रात्रभर फिरायला. चल लवकर. तो बाहेरूनच ओरडला.

“आले रे जाड्या.” मला नेहमीचं त्याच नाव आठवलं. मी स्वताशीच हसले. जाड्या, जाड्या कसंला? एवढा हँडसम झालाय मस्त. तसा आता charming दिसतो ना. मी फ्रेश होता होता स्वताशीच विचार करत होते. आवरून बाहेर आले. “ओये लोढू चलो. आम्ही तयार आहोतं.” मी हसत त्याला आवाज दिला.

“हो हो आलोच.” तो वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर असं लेल्या लाकडी पायऱ्यावरून धाड धाड करत पळत आला. पळताना एक चपळाई दिसत होती त्याच्यात. उंच पुरा आणि पिळदार शरीर. मी क्षणभर पाहतच राहिले.

“अरे यार, असं काय पाहतेय? मी दचकून लगेच दुसरीकडे नजर वळवली.

मी स्वताशीच हसले.

आम्ही दोघे चालत चालत कुठे तरी निघालो होतो. मी घातलेलं शर्ट आणि शॉर्ट पॅन्ट गावाकडे नवीन वाटत होती. कारण आता थोडे थोडे का होईना मला ओकवर्ड वाटायला लागलं. शेतात काम करणारे काही लोक मात्र मला विचित्र प्राण्याकडे पाहावं आशा नजरेने बघत होते. माझा जरा मूर्खपणाच झाला असं मला स्वतःला वाटलं. कारण मघाशी थोडी थंडी लागत होती. आता तर मधून मधून अंगावर काटा येत होता आणि त्यात अंगभर चावणारे मच्छर. वाह काय मस्त ना. तरी सूर्य मावळायला अजून वेळ होता. तो सोबत चालला होता पण आमच्यात काहीच संभाषण होतं नव्हते. कारण मी ते सौंदर्य डोळ्यात टिपून घेण्यात व्यस्त होते.

हलकं मावळतानाचं कोवळं लाल-पिवळं ऊन पाण्यावर चमकत होतं. स्वच्छ पाणी त्यात वर खाली पोहणारे मासे सुद्धा स्पष्ट दिसत होते. नदी तशी छोटीशीच पण वरून संध्याकाळच्या वेळी उडून जाणारे पक्षांचे थवे मी कितीतरी दिवसातून पाहत होते. नदीचा झुळझुळ वाहतानाचा आवाज कानात साठवत होते. हलका सुटलेला वारा चमकणारे लाल ऊन त्याच्या चेहऱ्यावर पडलं होतं. तो काहीतरी विचार करत असावा. माहीत नाही का, आधी कधी त्याच्या बद्दल मला असं वाटलं नव्हतं पण लोढूला पाहून मला आता काहीतरी वेगळंच वाटत होतं.

“येह वेडाबाई प्रेमात बिमात पडशील हा. परत अवडघड होईल.” त्याने हसून माझ्या कडे मान फिरवली. मी बराच वेळ त्याच्याकडे पाहतेय त्याच्या लक्षात आलं असावं बहुतेक. मला स्वातःचाच हसू आलं. चेहऱ्यावर आलेली लाज त्याला समजू नये म्हणून विषय बदलला.

“काय रे साजूक, एवढा बदलास. मस्त बॉडी बनवलीस एवढे दिवस होतास कुठे तू? काही गर्लफ्रेंड वगैरे बनवली का नाही? काही पत्ता नाही साधा एक फोन पण नाही. तुला नव्हते जमत तर निदान मला बोलायचं मी आले असं ते तुला भेटायला.”

“अरे वेळच मिळाला नाही कामाच्या गडबडीत. बाबा तर लहान असं तानाच गेले आणि आई ही दोन वर्षांपूर्वी गेली.”

“ओह सॉरी.”

“इट्स OK. बरं ते सोड तुझं सांग.”

“माझं, माझं काही नाही शिक्षण पूर्ण केलं नोकरी पडकली बस तेव्हढ्यातच खुश. या दरम्यान तुझी खूपदा आठवण आली. तुला शोधायचा प्रयत्नन ही केला पण तू काही सापडला नाही. नशीब त्या पत्रा मुळे मला तुझा पत्ता मिळाला.”

“हमम, बरं झालं तूला तुझ्या बॉसच्या गुलामगिरीतून काही वेळ का होईना सुट्टी मिळेल आणि नवीन प्रोजेक्ट succesful झला. मग काय मॅडम सुट्टी एन्जॉय करा. हक्काची सुट्टी आहे तुमची.”

“अरे हो ना.” मी हसून म्हणाले.

“एक मिनिट, ते जाऊ दे प्रोजेक्ट च तुला कसं माहीत? मी बोलले तुला?”

तो माझ्या सुरात सूर मिसळत म्हणाला, “हो तर आत्ताच तर सांगितलं. थोड्या वेळा पूर्वी.”

“हो का?”

“आठवत नाही.” मी डोक्याला हात लावला. “बुद्धू आहे अगं दीच.”

बराच वेळ दोघे गप्पा मारत होतो. छान वाटत होतं. पण आता बोचर्‍या थंडीने अंगावर जो काटा चढला होता तो जाता जात नव्हता. अरे घरी चल, तू कुडकुडायला लागली पार. आम्ही लगेचच मागे फिरलो. “कळलं ना हे असे तोडके कपडे इकडे का चालत नाही ते.”

मी आल्या आल्या ब्लँकेट मध्ये स्वतःला गुरफटून घेतलं.

“हे घे, गरमागरम चहा.” त्याने माझ्या समोर वाफाळता कप ठेवला.

“वाह छानच. हेच मिस करत होते. हा तर मग आपण काय बोलत होतो मघाशी? हा एखादी पोरगी पटली का नाही तुला? मला तर वाटते एवढ्यात बरंच काही झालं असं ले.”

“तू हा प्रश्न दुसऱ्यांदा विचारला आहेस.” तो चहाचा घोट घेत म्हणाला.

“हा... हा…”

मी शांत झालेली पाहून त्यानेच विषय चालू केला.

“होती एक.”

“मग?”

“पण काय होती म्हंटल्यावर. तो भूतकाळ झाला ना.”

“मला ती आवडायची. पण तिला मी आवडायचो का नाही ते माहीत नाही.”

“ओह अच्छा. म्हणजे भूतकाळ होता तर.”

“ओके.” मी जराशी हसले.

“आणि तुझं?”

“माझं? मी तर एवढी खडूस माझ्याशी कोण पटवून घेणार?”

“हा ते तर आहेच. म्हणत तो ही हसला.”

“बरं, थोड्या वेळात रामा जेवण घेऊन येईल. आपण जेवून घेऊ.”

“थकली असं शील जेवून घे. मग काय गप्पाच मारायच्या आहेत. मी जरा बाहेर जाऊन येतो.” असं म्हणून तो बाहेर गेला.