दारा वरची बेल वाजली आणि अंजली थोड बडबड करतच दरवाजा उघडायला गेली .. इतक्या सकाळी कोण आलं असेल ? एक तर आधीच उशीर झाला आहे ..हे शनिवारी च का बरं सकाळी स्कूल असत ? कोणी काढला हा नियम काय माहीत ..अंजली ने बोलत बोलतच दरवाजा उघडला ..दरवाज्यात हातात फुले व कार्ड घेऊन एक मुलगी उभी होती. अंजली : अरे सरु ? ..ये ना आत.. सरु ने पटकन अंजली ला मिठी मारली .. सरु : wish you many many happy returns of the day Anjali.. अंजली : तुझ्या लक्षात होत ? सरु ने हातातलं कार्ड व फुले अंजली ला दिली ..

Full Novel

1

तुझी माझी यारी - 1

दारा वरची बेल वाजली आणि अंजली थोड बडबड करतच दरवाजा उघडायला गेली .. इतक्या सकाळी कोण आलं असेल ? तर आधीच उशीर झाला आहे ..हे शनिवारी च का बरं सकाळी स्कूल असत ? कोणी काढला हा नियम काय माहीत ..अंजली ने बोलत बोलतच दरवाजा उघडला ..दरवाज्यात हातात फुले व कार्ड घेऊन एक मुलगी उभी होती. अंजली : अरे सरु ? ..ये ना आत.. सरु ने पटकन अंजली ला मिठी मारली .. सरु : wish you many many happy returns of the day Anjali.. अंजली : तुझ्या लक्षात होत ? सरु ने हातातलं कार्ड व फुले अंजली ला दिली .. ...अजून वाचा

2

तुझी माझी यारी - 2

स्कूल मध्ये असा एक ही मुलगा नव्हता ज्याला अंजली आवडत नसे..पणं तिच्या सोबत बोलण्याच धाडस मात्र कोणी करू शकत ती जशी मुलीनं सोबत प्रेमळ पने वागत असे त्याच्या उलट मुलानं सोबत थोडी फटकळ च होती...त्यामळे मनात असून ही मुलं तिच्या सोबत बोलतं मात्र नव्हती. अंजली च्या वर्गातला नसिर तिला रोज एक टक पाहत असायचा ...आज ही तास सुरू असताना तो अंजली कडे च पाहत बसला होता ..पुढे मॅडम काय शिकवतात या कडे त्याचं लक्ष च नव्हत...अंजली ची नजर त्याच्या कडे गेली तेव्हा तिने सुरवातीला त्याला इग्नोर च केलं पणं तरीही तो पाहणं काही सोडेना त्यामुळे त्याने त्याला रागात पाहून ...अजून वाचा

3

तुझी माझी यारी - 3

आज परत शनिवार होता ..अंजली शाळेतून येऊन अभ्यास करत बसली होती तेवढ्यात तिला आठवल की अरे उद्या तर ऑगस्ट पहिला रविवार म्हणजे उद्या फ्रेंडशिप डे आहे.. ह ..उद्या सरु नक्की येणार सरु साठी फ्रेंडशिप बॅंड घेऊन यायला हवं..तिने मम्मी ला आवाज देणून सांगितलं की ती दुकानात जात आहे . मम्मी : अंजली लांब कुठे जात बसू नकोस इथल्याच त्या रफिक भाई च्या दुकानातून घेऊन ये ..आणि लवकर परत ये.. अंजली : हो मम्मी तिथेच जाणार आहे ..आणि लगेच येते. रफिक भाई च जन्नत स्टोअर अंजली च्या घरा पासून जवळ होत काही ही लागलं की अंजली तिथून च आणत असे ...अजून वाचा

4

तुझी माझी यारी - 4

अंजली किती ही धाडसी असली तरीही कोणत्या ही मुली ला तिच्या चारित्रयावर असे शिंतोडे उडवलेले पाहून वाईट वाटेलच ना अंजली ते सर्व पाहून रडू लागली ..सरु तिला समजावत होती तेवढ्यात तिच्या इतर मैत्रिणी ही आल्या.. सरु : अंजली रडू नको ना प्लीज तुझी काही चूक नाही आणि तू अशी नाही हे आम्हाला माहीत आहे मग का रडत आहेस तू ? निशा : अंजली रडू नको आम्ही सगळं पुसून टाकतो ..आणि कोणी केलंय ना हे सर्व त्याला चांगला धडा शिकवू .. निशा ,रेखा व सरु तिघी मिळून बॉटल मध्ये पाणी घेऊन ते लिहलेले सर्व पुसतात. रेखा : ये पणं हे ...अजून वाचा

5

तुझी माझी यारी - 5

अंजली चा प्रसाद मिळाल्या पासून नसीर आता चुकून ही अंजलीच्या वाट्याला जात नव्हता...सरु ने अंजलीची कराम त आपल्या इतर मैत्रिणी ना सांगितली होती ..त्या सगळ्याच नसीर वर हसू लागल्या होत्या आणि त्याला तसचं हवं म्हणून खुश झाल्या होत्या .चव्हाण सरांनी इतिहास ची टेस्ट शाळेच्या खेळाच्या मैदानावर एक एक हाता च अंतर ठेऊन सर्व मुलांना बसवून घेतली होती...अंजली ला तर छान च गेली टेस्ट ..हा मग हुशार च होती ती ना..अपेक्षे प्रमाणे तिला आउट ऑफ आउट मार्कस मिळणार याची तिला खात्री होती... सरू ला थोडी ठीक ठाक च गेली होती टेस्ट. स्वातंत्र्य दिवस जवळ येत होता ..म्हणजे च १५ ऑगस्ट ...अजून वाचा

6

तुझी माझी यारी - 6

अंजली आज पहाटेच उठून तयार झाली होती .ड्रेस ला तर रात्रीच कडक इस्त्री करून टका टक करून ठेवला होता..ब्राऊन चा पंजाबी ड्रेस त्यावर व्हाईट कलर ची ओढणी..असा ड्रेस होता त्यांच्या शाळेचा..ड्रेस घालून ती मम्मी कडून केसाची वेणी घालून घेत होती...ती मम्मीच्या पुढ्यात बसली होती आणि मम्मी तिची केस विंचरत होती. अंजली : मम्मी हळू ना...किती जोरात ओढते स केस.. मम्मी : हो झालं झालं..काय तुम्ही आज कालच्या पोरी अजिबात केसाची निगा राखायला नको .सारखं ते केस मोकळेच सोडलेले ..काय तर फॅशन म्हणे.. अंजली हळूच हसत मम्मी कडे मागे वळून पाहते .. अंजली : तो गजरा ही लाऊन दे.. मम्मी ...अजून वाचा

7

तुझी माझी यारी - 7

पहिली युनिट टेस्ट संपली त्यानंतर गणेश चतुर्थी आली ..सर्वांनी खूप मज्जा केली ..सुट्टी च्या दिवशी सर्व मैत्रिणी मिळून गावातील मंडळांचे गणपती पाहून आल्या ..सरु आणि अंजली ही ..पुन्हा होती तशी शाळा ,घर अभ्यास सुरू झाल.सुट्टी दिवशी मात्र कधी सरु अंजली च्या घरी येत असे कधी अंजली सरुच्या घरी जात असे.शनिवारी शाळेतून घरी जात असताना ..सरूने अंजली ला विचारल .. सरु : अंजली ,उद्या घरी येतेस का ? अंजली ने तिला विचारल .. अंजली : का ग ? सरु : तुझा फेवरेट कर्ज पिक्चर लागणार आहे उद्या .. बारा ला तुझ्या हिमेश रेशमिया चा.. अंजली ने खुश होऊन विचारल.. अंजली ...अजून वाचा

8

तुझी माझी यारी - 8

बराच वेळ सरु ची वाट पाहून अंजली शाळेला एकटीच निघून गेली ..रस्त्यात तिला तिच्या इतर मैत्रिणी ही भेटल्या ..शाळेत बराच वेळ झाला तरी सरु आली नव्हती ...बहुतेक सरु आज येणार नाही असा विचार करून अंजली मग शांत बसली ..तेवढ्यात निशा अंजली कडे आली. निशा : अंजली आज सरु आली नाही का ? अंजली : हो ग ..मी ही खूप वेळ वाट पाहून मग आले शाळेला.. निशा : काल तुला काही बोलली नव्हती का ? अंजली : नाही तर काही च बोलली नव्हती ..बघू दुपारच्या सुट्टीत पूजा ला विचारू.. मग दोघी ही वर्गात लक्ष देऊ लागल्या ...दुपारी सर्व जनी जेवायला ...अजून वाचा

9

तुझी माझी यारी - 9

सरूच बोलणं ऐकून अंजली चे डोळे विस्पारतात . अंजली :सरु तुला काय वेड लागलंय का ? खर बोलतेस ना ? की माझी गम्मत करत आहेस ? सरु आता तोंड बारीक करून बोलते. सरु : खरचं.. अंजली : पणं सरु ..तू मला एकदा ही बोलली नाहीस ? आणि कसली बेस्ट फ्रेन्ड बोलतेस ? अशीच असते का बेस्ट फ्रेन्ड ? छोट्या छोट्या गोष्टी साठी सुद्धा तुला मी आठवते आणि आता इतकी मोठी गोष्ट तू मला सांगितली नाहीस ? खरचं मला विश्वास च बसत नाही. सरु : अंजली ..मी तुला सांगणार होते.. अंजली तिचं बोलण मध्येच तोडत विचारते .. अंजली : कधी ...अजून वाचा

10

तुझी माझी यारी - 10

अंजली सुदीप ला पाहून आली पणं तिने हे सरू ला सांगितलं च नाही.सरु ही थोडी उदास च असायची पणं ही अंजली ला तस्स जाणवू द्यायची नाही.अंजली ही तिची बेस्टी होती तिला कळत होत.दोन दिवसांनी शाळेला जाताना अंजली सरु सोबत बोलत होती पणं सुदीप चा विषय कसा काढायचा हे तिला कळत नव्हत. अंजली : सरु... सरु : ह...बोल.. अंजली : तू खरच नाही बोलत ना त्या सुदीप सोबत ? सरु : अंजली तुला विश्वास नाही का माझ्या वर ? मी तुझी शप्पथ कशी मोडेन ? अग मी खरच नाही बोलत आता त्यांच्या सोबत..आणि सुदीप शिवाय राहू शकते मी पणं तुझ्या ...अजून वाचा

11

तुझी माझी यारी - 11

दिवाळी नंतर शाळा सुरू झाली पणं आता सगळेच शिक्षक खूप स्ट्रिक्ट वागू लागले..बोर्ड एक्साम जवळ येत होत्या त्यामुळे ..सुट्टी ही तास घेणं ..सराव पेपर सोडवून घेणं..फक्त अभ्यास एके अभ्यास सुरू होता...मुलांना थोडी ही उसंत मिळेनाशी झाली होती.अंजली व तिचा ग्रुप ही अभ्यासाच्या तयारीला लागला होता. पास होऊन सगळ्यांनी एकाच कॉलेज ला ॲडमीशन घ्यायच अस ठरल होत ... भले ही एकच शाखेला नसलं तरी कॉलेज एकच असल की सोबत जाता येईल ...कॉलेज मध्ये ही एकत्र असू अशी आशा. बोर्ड एक्झाम अगोदर दहावीच्या मुलांचा निरोप समारंभ ठेवण्यात आला होता .सर्व मुलींनी मिळून साडी घालायचं ठरवल होत.मुल आपली जीन्स टी शर्ट वर ...अजून वाचा

12

तुझी माझी यारी - 12

सुट्टी मध्ये सरु तिच्या मावशी कडे मुंबई ला गेली.अंजली मात्र सुट्टी मध्ये घरीच होती ती कुठेच गेली नव्हती.अंजली ला खूप आवड होती त्यामुळे सुट्टी मध्ये ती गावातील वाचनालयातील पुस्तके आणून वाचू लागली .सरु ला जाऊन दहा पंधरा दिवस झाले होते .सरु ने अंजली ला आपल्या मावस भावाच्या फोन वरून फोन केला.अंजली च्या घरी लॅन्ड लाईन फोन होता .फोन अंजली ने च उचलला. अंजली : हॅलो.. सरु : अंजली मी सरु बोलतेय .. सरु चा आवाज ऐकून अंजली खुश झाली .. अंजली : सरु... नालायका ..जाऊन दहा पंधरा दिवस झाले ..आणि आज फोन करतेस? सरु : सॉरी अंजली अग दादा ...अजून वाचा

13

तुझी माझी यारी - 13

सरु च लग्न झालं आणि अंजली व सरु च्या वाटा वेगळ्या झाल्या .अंजली आणि निशा सोबत कॉलेज ला जाऊ सरु ला खूप मिस करायची.निशा ला ते कळत होत.एकदा दोघी कॉलेज सुटून येताना निशा ने अंजली ला विचारल. निशा : अंजली सरु ची खूप आठवण येते का ग? अंजली : आठवण येते ..पणं त्या ही पेक्षा जास्त वाईट वाटत. निशा : वाइट कशाच ? अंजली : मी सरु साठी काहीच करू शकले नाही...याच ग.. निशा : जाऊ दे ना अंजली तुझ्या हातात काय होत ? असत तर तू हेल्प केली असतीस ना तिची ? अंजली : हो..पणं निशा सगळे च ...अजून वाचा

14

तुझी माझी यारी - 14

सरु आता कधी कधी अंजली ला फोन करत असे..पणं अंजली कडे सरु चा नंबर नव्हता.त्यामुळे जेव्हा सरु फोन करेल अंजली ला सरु सोबत बोलता यायचं .दिवाळी ला सरु माहेरी आली परंतु दोन दिवसात लगेच परत गेली तिची आणि अंजली ची भेट च झाली नाही. एक दिवस निशा व अंजली कॉलेज ला जात असताना .अंजली ला पूजा भेटली. अंजली : हाय पूजा कशी आहेस? पूजा : अरे अंजली खूप दिवसांनी भेट होतीय तुझी ..मी मजेत आहे तू सांग ? अंजली : हो शाळा संपल्या पासून आपली भेटच नाही..मी ही ठीक आहे ..कुठे असते स आता ? पूजा : अग मी ...अजून वाचा

15

तुझी माझी यारी - 15

सरूची अवस्था पाहून अंजली ला काय करावं तेच कळत नव्हत पणं तरीही तिने सरु ला समजावलं होत. अंजली ने काही तरी कराव इतकी ती काही मोठी नव्हती . पिढ्यान पिढ्या पुरुषी वर्चस्व माणणार्या समाजात त्या छोट्याशा अंजली च ऐकणार तरी कोण ? चूक जरी स्त्रीची नसली तरी समाज दोष मात्र नेहमी स्त्रीलाच देतो हे अंजली ला ही माहित होते . सरु आपल्या सासरी गेली.अंजली ही आपल्या परीक्षा आणि अभ्यासात व्यस्त झाली.बारावी च वर्ष होत ...त्यामुळे अंजली जोमाने अभ्यासाला लागली होती.सरु ची आठवण तर येत असे परंतु त्या भेटी नंतर सरु व अंजली ची भेटच झाली नव्हती .सरु ही माहेरी ...अजून वाचा

16

तुझी माझी यारी - 16

अंजली ऑफिस च्या कामानिमित्त बाहेर आली होती .काम संपवून रिटर्न ऑफिस मध्ये येत असताना अचानक पुन्हा तिला पंकज दादा ते तिच्या अगदी समोर होते ..तिने आवाज देऊन त्यांना थांबवले.अंजली : पंकज दादा..पंकज दादा..पंकज आवाज ऐकून थांबला आणि त्याने ही आवाज देणाऱ्या मुली कडे पाहिलं व त्याने अंजली ला ओळखलं.तो ही थोडा खुश होतच ..तिला बोलला.पंकज : अंजली ..तू इथे ?अंजली पंकज दादा ला पाहून इतकी खुश झाली होती की तिला त्यांच्या सोबत नीट बोलता ही येईना..अंजली : हो..दादा.. मी ..मी याच शहरात जॉब करते.. कसे आहात ? काकू कशा आहेत ?पंकज : ठीक आहे ..हो आई ही ठीक आहे...मी ...अजून वाचा

17

तुझी माझी यारी - 17

सरु च्या आई ला भेटून आल्या पासून अंजली खूप विचारत पडली होती...थोडी शांतच झाली होती.सरु आपली जिवलग मैत्रीण ..आपल्या शिकलेली ,खेळलेली आणि तिची अशी अवस्था होऊन तिने हे जग सोडाव ..हे अंजली च्या मनाला बोचत होत.सरु ने तिला तिच्या वर होणाऱ्या छळाबद्दल ही सांगितलं होत...पणं अंजली ने तिची काहीच हेल्प केली नाही...याच दुःख आता जास्त प्रमाणात अंजली ला होऊ लागलं होत.जर खरच सरु ला तिच्या नवऱ्याने मारल असेल तर ..तर ..तर आपण ही सरु च्या आई आणि भावासारखे शांत बसायचे का ? माहित असून तोंड बंद ठेवून चाललं आहे तसचं चालू द्यायचं का ? सरु साधी भोळी होती..त्याचा फायदा ...अजून वाचा

18

तुझी माझी यारी - 18

केशव ला भेटून आल्यावर अंजली नेहाला केशव तिचा क्लासमेन्ट असल्याचे व केस पुन्हा रिओपन करता येऊ शकते याबद्दल सांगते ला ही आनंद होतो.अंजली पंकज कडून सरूच्या सासरचा पत्ता विचारून घेते.. व तिथे जाऊन थोडी चौकशी करण्याचे ठरवते..अंजली जेव्हा हरीश च्या शेजाऱ्यांना त्याच्या बद्दल विचारते तेव्हा तिला कळत की त्याची वागणूक सरु बरोबर चांगली नव्हती ..तो सुरवातीपासूनच संशयी वृत्ती चा, गुंड टाईप व व्यसनी होता...अंजली जेव्हा तिथे गेली होती त्याचं वेळी सरु ची चुलत नणंद शितल कॉलेज ला निघाली होती...सरु बद्दल शितल ला आपुलकी होती..ती नेहमी सरु जवळ असायची ...आणि अंजली ही तिच्या सोबत बोलली होती फोन वर ...त्यामुळे शितल ...अजून वाचा

19

तुझी माझी यारी - 19

अंजली ने समजावून ही शितल तिची हेल्प करायला तयार होत नव्हती..त्यामुळे अंजली खूपच खचली होती ..इतका मोठा निर्णय तर परंतु त्या साठी आपण काहीच करू शकत नाही हा विचार राहून राहून तिला सतावत होता.केशव ही त्याची केस संपवून आज तिला भेटायला आला होता.दोघे आज ही त्याचं कॅफे मध्ये भेटत होते जिथे ते गेल्यावेळी भेटले होते...पणं आज अंजली लवकर आली होती व चेअर वर बसून विचारत हरवली होती .केशव येऊन तिच्या समोरच्या चेअर वर बसला तरी तिचं लक्ष नव्हत.शेवटी त्यानेच दोन तीन मिनिट वाट पाहून बोलायला सुरुवात केली. केशव: hello madam... इतका कसला विचार करताय ? केशव चा आवाज ऐकून ...अजून वाचा

20

तुझी माझी यारी - 20

शितल ने अंजली ला व केशव ला सरु बद्दल सांगायला सुरू केलं. शितल : हरीश दादा वहिनी वर नेहमीच घ्यायचा..वहिनी ने कोणाशी बोललेल त्याला पटायचं नाही..तो नेहमी वहिनी ला छोट्या छोट्या कारणा वरून मारायचा..वहिनी खूप रडायची माझ्या जवळ ..माझा जो सखा भाऊ होता किशोर दादा ..त्याच्या सोबत ही वहिनी ने बोललेल हरीश दादा ला आवडायचं नाही ..त्याने वहिनी या आधी ही तीन चार वेळा वहिनी ला किशोर दादा सोबत बोलायचं नाही म्हणून मारल होत...त्या दिवशी ही ..सरु वहिनी किशोर दादा ला मोबाईल मागत होती..तिला तिच्या आई ला फोन करायचा होता...हरीश दादा तिला फोन देत नसे म्हणून वहिनी ..किशोर दादा ...अजून वाचा

21

तुझी माझी यारी - 21 (अंतिम भाग)

अंजली आणि नेहा ऑफिस ला जाण्यासाठी तयार होत होत्या तोपर्यंत बेल वाजली..नेहा ने जाऊन डोअर ओपन केलं .. तर डोअर मध्ये तीन चार गुंड टाईप व्यक्ती उभ्या होत्या..त्यातल्या एकाने नेहा ला पाहून विचारल.. व्यक्ती: अंजली ? नेहा : नाही..नेहा ..आपण कोण ? त्या व्यक्ती ने नेहा ला डोअर मधून बाजूला केलं व स्वतः आत घुसला त्याच्या सोबत त्याचे मित्र ही आत आले..नेहा मागून ओरडत आत आली. नेहा : ओ हॅलो..तुम्ही आहात कोण ? आणि अस कसं जबरदस्ती आमच्या घरात घुसत आहात ? तिचा आवाज ऐकून अंजली ही बाहेर येता येता बोलली . अंजली : नेहा ,काय झालं कोण आहे ? ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय