स्वप्नद्वार

(14)
  • 53.5k
  • 2
  • 28.6k

या गर्द काळोख्या भयाण रात्री निशांत एकटाच जिवाच्या आकांतान धावत होता. मागे असलेली अमानवी शक्ती आज त्याचा प्राण घेऊनच शांत होईल हे त्याला कळून चुकल होत. त्या काळ रात्री फक्त रातकिडेच किर.. किर.. करीत होते. तिरकस नजरेने त्याने मागे वळून पहिले तो वाऱ्याच्या वेगाने त्याच्याकडेच येत होता. तसा निशांतनेही आपल्या धावण्याचा वेग वाढविला. तो कोण आहे? त्याचा आणि आपला संबंध काय? आपण धावतोय तरी कुठे.. गाव, शहर कि जंगल?? असे बरेचसे प्रश्न त्याच्या डोक्यात थैमान घालत होते पण सध्या तरी ते महत्वाचे नव्हते. सध्या तरी एकच गोष्ट महत्वाची होती ती म्हणजे स्वतःचा जीव सुरक्षित ठेवणे. कुठल्यातरी एका ठिकाणावर येऊन तो थांबला त्याचा श्वास घर... घर.. करीत भरून आला होता.

नवीन एपिसोड्स : : Every Tuesday & Saturday

1

स्वप्नद्वार - 1

स्वप्नद्वार ( भयकथा ) भाग 1 त्या गर्द काळोख्या भयाण रात्री निशांत एकटाच जिवाच्या आकांतान धावत होता. मागे अमानवी शक्ती आज त्याचा प्राण घेऊनच शांत होईल हे त्याला कळून चुकल होत. त्या काळ रात्री फक्त रातकिडेच किर.. किर.. करीत होते. तिरकस नजरेने त्याने मागे वळून पहिले तो वाऱ्याच्या वेगाने त्याच्याकडेच येत होता. तसा निशांतनेही आपल्या धावण्याचा वेग वाढविला. तो कोण आहे? त्याचा आणि आपला संबंध काय? आपण धावतोय तरी कुठे.. गाव, शहर कि जंगल?? असे बरेचसे प्रश्न त्याच्या डोक्यात थैमान घालत होते पण सध्या तरी ते महत्वाचे नव्हते. सध्या तरी ...अजून वाचा

2

स्वप्नद्वार - 2

स्वप्नद्वार ( भाग 2 ) ही कथा काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी काही स्थळांचा उल्लेख केला आहे. 1 वरून पुढे. सूर्य माथ्यावर चढला होता. रात्रभर निशांतची झोप न झाल्यामुळे त्याचे डोळे चुरचुरत होते. आईच्या आवाजाने अर्धझोपेत असलेला निशांत अंथरुणावर जागा होऊन बसला होता. संपूर्ण शरीर एका वेदनेन जखडल्यासारख वाटत होत. गरम पाण्याचा शॉवर घेऊन त्याने त्या जखडलेल्या शरीराला स्फूर्ती दिली. थोड्याच वेळात स्वतःला टापटीप करून तो त्याच्या लहानपणीच्या मित्राला अर्थातच योगेशला भेटायला फॉरनो कॅफेत निघाला. मागच्या काही महिन्यापासून वाईट स्वप्नामुळे त्रस्त झालेल्या निशांतने आज सर्व कामाला विराम दिला होता आणि स्वतःसाठी काही वेळ आज काढला होता. ...अजून वाचा

3

स्वप्नद्वार - 3

स्वप्नद्वार ( भाग 3) निशांत आणि योगेश Dr विजय कांत यांच्या क्लीनिक मध्ये पोहचले. Dr विजय कांत हे भारतातले मानसोपचारतज्ञ होते. कितीतरी न सुटलेल्या केसेस ते अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने सोडवत असे. क्लिनिकमध्ये लावलेल्या सुवासिक अगरबत्तीमुळे निशांतचे नाक फेंदारले होते. Dr विजय कांत हे 40- 45 वयाचे, सावळा रंग, चेहऱ्यावर स्मितहास्य, लांबसडक नाक, डोळ्यावर मोठ्या फ्रेमचा चष्मा असून त्यांच आकर्षीत करणार असं उठावदार व्यक्तिमत्व होतं. निशांत आणि योगेश दोघेही त्यांच्यासमोर बसले होते. निशांत एकापाठोपाठ एक सर्व गोष्टी सविस्तरपणे सांगू लागला... कि त्याला आधी वाईट स्वप्ने पडायची त्याचबरोबर काही दिवसांपासून विचित्र असे भास होत आहेत. अर्जुन जसा माश्याच्या डोळ्यावर ...अजून वाचा

4

स्वप्नद्वार - 4

स्वप्नद्वार ( भाग 4) "काय आहे स्वप्नांची नियमावली " डोळे मोठे करून निशांत विचारू लागला. " नियम क्रमांक एक.. मनुष्य हा फक्त दोनदाच त्याच्या स्वप्नदुनियेत जाऊ शकतो. नियम क्रमांक दोन.. स्वप्नदुनियेत जाण्याचा काही विशिष्ट कालावधी आहे. तो फक्त तेवढा वेळच त्या जगात राहू शकतो ". " बस एवढेच नियम " निशांत स्मितहास्य देऊन म्हणाला. " नाही आणखी पूर्ण ऐक.... जेव्हा तू स्वप्नदुनियेत जाशील तेव्हा तुझी संपूर्ण शक्ती, ज्ञानेंद्रिये, स्पर्शज्ञान सर्व काही त्या स्वप्नदुनियेत घेऊन जाशील. इथे तेवढं वेळ तुझं शरीर मेणाच्या पुतळ्यासारख होईल. ज्यात कुठलीही शक्ती, स्पर्शज्ञान नसेल. नाळीद्वारे चालणारा श्वास आणि धडकणार हृदय हा फक्त तुमच्या दोघात जोडणारा ...अजून वाचा

5

स्वप्नद्वार - 5

स्वप्नद्वार ( भाग 5) भाग 4 वरून पुढे त्या तळघराच्या भिंतीवर एक कुठलंतरी विचित्र वाक्य लिहून होत. सर्वांच्या चेहऱ्यावर एक वलय निर्माण झाले होते . " कुठलं वाक्य लिहून होत त्या भिंतीवर निशांत? " डोळ्यावरील चष्मा बरोबर करत एका धीरगंभीर स्वरात डॉक्टर विचारू लागले. मला सध्या ते काही आठवत नाही पण काहीतरी विचित्रच लिहलं होत त्या तळघराच्या भिंतीवर. डॉक्टरांच्या माथ्यावरील रेषा सरळ रेषेत ताठरल्या होत्या. चेहऱ्यावरील गंभीर भाव सावरून एक गोड हास्य देत डॉक्टर म्हणाले." अरे प्रत्येक स्वप्नांचा आपल्या जीवनाशी काही संबंध असतोच असे नाही. कधी कधी ते स्वप्न म्हणजे निव्वळ मृगजळ असते आणि मला तरी असे वाटते कि ...अजून वाचा

6

स्वप्नद्वार - 6

स्वप्नद्वार ( भाग 6) हि कथा काल्पनिक असून फक्त मनोरंजनासाठी काही स्थळांचा उल्लेख केला आहे. भाग 5 वरून पुढे घरी योगेश आणि डॉक्टर अगदी शांत बसून तिघेही हलकेच ऐकमेकांकडे पाहत होते. एक गर्द शांतता त्या खोलीत पसरली होती. अधून -मधून फॅनचा घर... घर... आवाज सर्वांच्या कानी पडत होता. तिघांच्याही चेहऱ्यावर काळजीचे धुके पसरले होते. एका दबक्या आवाजात डॉक्टर म्हणाले" तुला खात्री आहे काल जी घटना तुझ्यासोबत घडली ती वास्तविक घटनाच आहे?". " हो.... काल त्याने इतक्या जोरात माझ्या डोक्यावर प्रहार कि त्याची खूण अक्षरक्ष त्या भिंतीवर उमटली आहे " केविलवाण्या स्वरात निशांत म्हणाला. " कठीण आहे सर्वच आता... खूपच ...अजून वाचा

7

स्वप्नद्वार - 7

स्वप्नद्वार ( भाग 7) भाग 6 वरून पुढे. त्या अमानवी शक्तीने निशांतच्या मानेवर दुसरा प्रहार करण्यासाठी तलवार उचलली. बाहेर झोत सैरभैर थैमान घालत होते. त्या अमानवी शक्तीच्या हातात असलेली तलवार वाऱ्याला कापत विजेच्या वेगाने निशांतच्या मानेपर्यंत पोहचणार इतक्यात कुठल्यातरी दिव्य तेजपूंजी पुरुषाच्या हाताच्या मुठीला रुद्राक्षाच्या माळा गुंडाळून होत्या. तो प्रहार त्यांनी आपल्या भरदार हाताच्या मुठीवर घेतला. कोण...... कोण होते ते विराट दिव्य तेजोमय पुरुष.... ते होते.... आचार्य विष्णुगुप्त. त्यांच्या सोबत त्यांचा शिष्य आर्यही होता. त्या अमानवी शक्तीच ते बिभित्स रूप आणि त्याच्या डोक्यावरच ते लालसर मास पाहून त्याच्या पोटात खड्डा पडला. डोक्यात विचारांचे घणघणाती घाव एका पाठोपाठ एक सुरु ...अजून वाचा

8

स्वप्नद्वार - 8

स्वप्नद्वार ( भाग 8) भाग 7 वरून पुढे " काय? " सर्वांनी एका स्वरात प्रतिप्रश्न केला. " निशांत मला तुला राजा वीरवर्धनबद्दल एवढी माहिती कशी आहे? " भुवया उंचावून डॉक्टर म्हणाले. "काही दिवसांपूर्वी माझ्या क्लिनिकमध्ये रमेश सहस्रबुद्धे हे ऐतिहासिक लेखक मानसिक उपचारासाठी आले होते. नुकतेच त्यांनी " गाथा वीरवर्धनची खंड -1" हे पुस्तक प्रकाशित केले होते. त्याचाच सोहळा आटोपून ते माझ्याकडे उपचारासाठी आले होते. मलाही अवांतर वाचनाची आवड असल्यामुळे मी त्यांच्याशी या विषयावर बरीचशी चर्चाही केली. ऐतिहासिक विषयावर समान विचार असल्यामुळे त्यांनी मला त्यांच पुस्तक ' गाथा विरवर्धनची खंड 1' हे पुस्तक मला वाचायला दिलं. ते विचित्र स्वप्ने पडण्याच्या ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय