स्वप्नद्वार - 1 Nikhil Deore द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्वप्नद्वार - 1

स्वप्नद्वार ( भयकथा ) भाग 1


त्या गर्द काळोख्या भयाण रात्री निशांत एकटाच जिवाच्या आकांतान धावत होता. मागे असलेली अमानवी शक्ती आज त्याचा प्राण घेऊनच शांत होईल हे त्याला कळून चुकल होत. त्या काळ रात्री फक्त रातकिडेच किर.. किर.. करीत होते. तिरकस नजरेने त्याने मागे वळून पहिले तो वाऱ्याच्या वेगाने त्याच्याकडेच येत होता. तसा निशांतनेही आपल्या धावण्याचा वेग वाढविला. तो कोण आहे? त्याचा आणि आपला संबंध काय? आपण धावतोय तरी कुठे.. गाव, शहर कि जंगल?? असे बरेचसे प्रश्न त्याच्या डोक्यात थैमान घालत होते पण सध्या तरी ते महत्वाचे नव्हते. सध्या तरी एकच गोष्ट महत्वाची होती ती म्हणजे स्वतःचा जीव सुरक्षित ठेवणे. कुठल्यातरी एका ठिकाणावर येऊन तो थांबला त्याचा श्वास घर... घर.. करीत भरून आला होता.. हृदय प्रचंड वेगाने धडधडत होत आणि त्याच्या घशालाही कोरड पडली होती. त्याला समोर एक गुहा दिसत होती. त्यात मंद असा प्रकाश होता. इतक्यात खाड... खाड... कुणाच्यातरी पायाचा आवाज त्याच्या कानी पडला. त्या आवाजाची तीव्रताही वाढतच होती. निशांतला कळून चुकलं तो त्याच्या अगदी जवळ येऊन ठेपला आहे. कसलाही विचार न करता तो त्या गुहेत शिरला. गुहेतल्या मंद प्रकाशात खट्याळ किजवे लुकलुकत होते. गुहेच्या शेवटच्या टोकाला तो धडकला. अतिशय भव्य अस ते द्वार होत, काळा रंग मारल्यासारख काळकुट्ट दिसत होत आणि काहीतरी विचित्रच नक्षीकाम त्यावर केल होत. द्वाराला कोळ्याच्या जाळ्यांनी घेराव घातला होता. शरीरातील समग्र शक्ती एकवटून निशांत ते द्वार उघडण्याचा प्रयत्न करू लागला. ती अमानवी शक्तीही जवळच येऊन ठेपली होती. त्याने भित्र्या नजरेने त्या अमानवी शक्तीला न्याहाळले. त्या अमानवी शक्तीचा अर्धा चेहरा जळून काळपट झाला होता, केस अतिशय लहान होते पण कूर्तळल्यासारखे अस्तव्यस्त झाले होते, संपूर्ण शरीरावर कोरडी त्वचा होती ज्यावर कुठल्यातरी हिंस्त्र श्वापदाने आपल्या तीक्ष्ण नखांनी ओरबडाल्याच्या खुणा होत्या, डोक्याच्या खालच्या भागावर खोल घाव होता ज्यातून लालसर भाग दृष्टीस पडत होता. डोळे तर नव्हतेच होत्या फक्त काळ्या कबीण्य खोपण्या. जमिनीला घर्षूण त्याच्या जळलेल्या हातातली तलवार घेऊन तो त्याच्याकडेच येत होता. तलवार रक्तानी माखली होती त्यातून टप... टप.. करणार रक्त जमिनीला रक्तस्पर्श करीत होत. त्या अमानवी शक्तीची काळी सावली निशांत वर पडली आणि त्याच्या काळजाचा ठोका चुकला. निशांत डोळे मोठे करून करून त्या अमानवी शक्तीला भित्र्या नजरेनी पाहत होता. क्षणातच त्याचे नेत्र मिटल्या गेले. समोर मिट्ट काळोख पसरला होता. थरथरत्या पापण्यांनी त्याने डोळे उघडले. " पुन्हा तेच स्वप्न " एवढेच शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडले. निशांत घामानी ओलाचिंब झाला होता. त्याच्या मानेवरील शिरा ताठरल्या होत्या. " तो आहे तरी कोण ?" हा एकच प्रश्न काही दिवसापासून तो स्वतःच्या मनाशीच विचारत होता.

काही क्षण काय सुरु आहे हे त्याच्या ध्यांनींमनीं येतच नव्हते. नंतर त्याच्या लक्षात आलं कि तो त्याच्या खोलीतच आहे. खिडकीजवळ ठेवलेली बॉटल त्याने उचलली आणि शांतपणे पाणी पिऊ लागला. एवढ्यात त्याची भिरभिरती नजर खिडकीबाहेर गेली. खिडकीबाहेर वाऱ्याने जोर धरला होता. त्या वर्तुळाकार वाऱ्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरविले होते. निशांतची नजर त्या धुळीच्या साम्राज्याला भेदून एका जागी स्थिरावली त्याला दिसली एक म्हातारी तिचे पांढरे केस तिच्या चेहऱ्याभोवती पसरले होते. तिची त्वचा संपूर्ण झिजली होती. कुत्र्यांनी तिच्याभोवती गर्दी केली होती आणि काही कुत्रे तिच्यावर जोरजोरात भुंकत होते.
" कसलातरी विचित्रच प्रकार आहे हा " हे त्याच्या चाणाक्ष बुद्धीने हेरल. क्षणाचाही विलंब न करता त्याने खिडकी सरकून बंद केली.

अंथरुणावर पडून कसल्यातरी विचारात तो बुडून गेला होता. एवढ्यात पलंगाखालून कुणीतरी पलंगाला तीक्ष्ण नखांनी ओरबडल्याचा भीषण स्वर त्याच्या कानी पडला. काही वेळ निशांत स्तब्ध झाला होता. तसा त्या आवाजाचा जोरही वाढतच होता. आता मात्र निशांतचे धाबे दणाणले होते. त्याने पलंगाबाजूला असलेले बटण दाबले आणि खोली प्रकाशमय झाली. वाकून त्याने पलंगाखाली पहिले. आता त्याच्या जीवात जीव आला कारण पलंगाखाली कुणाचेही अस्तित्व नव्हते. बटण बंद केल आणि अंथरुणात निशांत झोपण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागला. खोलीत थोडासा प्रकाश होताच. थंडगार वाऱ्याच्या झोताने त्या खोलीत प्रवेश केला त्यामुळे वर टांगलेल झुंबर गदागदा हलू लागलं. निशांतला झुंबरावर कसलीतरी हालचाल जाणवली.
" अरे देवा ! हा तर तोच जळलेला हात आहे जो मी माझ्या स्वप्नात पहिला होता "निशांत स्वतःशीच म्हणाला. त्याच्या संपूर्ण शरीरात थंडी भरली होती. मोबाईलचा प्रकाश सुरु करून त्याने झुंबरावर मारला. सुदैवाने तिथे काहीही नव्हते. " खूप खूप धन्यवाद देवा " मनातच त्याने देवाचे आभार मानले आणि कशीतरी रात्र झोपून काढली.

निशांत सिन्हा हा नवीनच मानसोपचार तज्ञ होता. नुकतेच त्याने एका नामवंत वैद्यकीय कॉलेज मधून मानसोपचार या विषयात M.D. ही पदवी घेतली होती आणि काही काळातच स्वतःचे क्लिनिक सुरु केले . निशांतला इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, पर्यावरण या विषयावर अवांतर वाचन करण्याची गोडी होती पण त्याला सर्वात जास्त प्रिय होत ते म्हणजे मानसोपचार या विषयावर संशोधन करायला. निशांत हा अतिमहत्वकांशी होता. तोच भारतातला सर्वोकृष्ट मानसोपचारतज्ञ आहे अशी त्याची भाबडी समजूत होती. क्लिनिक सुरु झाल्यापासून म्हणजेच जवळपास सहा महिन्यापासून जरी विविध प्रकारचे मानसिक रुग्ण तो हाताळत असला तरी त्याला सर्वात जास्त रस होता काही विशिष्ट प्रकारचे रुग्ण हाताळण्याचे ते म्हणजे रात्री वाईट स्वप्न पडणे, झोप न येणे. काही गोष्टी खूपच आश्चर्यकारक असतात म्हणजे निशांत ज्या आजाराचा डॉक्टर होता आज त्याच आजाराचा तो रुग्ण झाला होता. रात्री -अपरात्री तो वाईट स्वप्नांनी दचकून उठत होता. कधी -कधी तर रात्र रात्रभर झोप लागत नव्हती.

क्रमश..

आपल्याला हा भाग कसा वाटला हे अभिप्रायाने कळवा.