अमोल गोष्टी

(117)
  • 195.5k
  • 203
  • 78.7k

ग्रीक लोकांमध्ये स्वतंत्र लोक व गुलाम लोक असे दोन प्रकार असत. सॉक्रेटिससारख्या विचारवंत लोकांसही वाटे की, काही लोकांस ईश्वरानेच गुलाम म्हणून जन्मास घातलेले असते. आपल्याकडेसुध्दा शूद्र वगैरे ईश्वरानेच निर्माण केले म्हणून ते तसेच गुलाम राहणे युक्त असे समजण्यात येई. इतिहासात त्याच त्याच गोष्टी आपणांस सर्वत्र दिसून येतात. या गुलाम समजले जाणा-या ग्रीक लोकांस काही काही बाबतींत मुळीच अधिकार नसत. आपल्याकडे शूद्रांस वेदाध्ययन किंवा दुसरे चांगले धंदे करण्याची परवानगी नसे. तसेच ग्रीस देशात होते. एकदा तर एक असा कायदा करण्यात आला की, शिल्पशास्त्राचा अभ्यास फक्त स्वतंत्र लोकांनीच करावा. निरनिराळया मूर्ती, पुतळे वगैरे गुलामांनी करता कामा नये. जर त्यांनी शिल्पकलेचे नमुने केले तर त्यास भयंकर शिक्षा कायद्याने ठरविण्यात आली होती.

Full Novel

1

अमोल गोष्टी - 1

ग्रीक लोकांमध्ये स्वतंत्र लोक व गुलाम लोक असे दोन प्रकार असत. सॉक्रेटिससारख्या विचारवंत लोकांसही वाटे की, काही लोकांस ईश्वरानेच म्हणून जन्मास घातलेले असते. आपल्याकडेसुध्दा शूद्र वगैरे ईश्वरानेच निर्माण केले म्हणून ते तसेच गुलाम राहणे युक्त असे समजण्यात येई. इतिहासात त्याच त्याच गोष्टी आपणांस सर्वत्र दिसून येतात. या गुलाम समजले जाणा-या ग्रीक लोकांस काही काही बाबतींत मुळीच अधिकार नसत. आपल्याकडे शूद्रांस वेदाध्ययन किंवा दुसरे चांगले धंदे करण्याची परवानगी नसे. तसेच ग्रीस देशात होते. एकदा तर एक असा कायदा करण्यात आला की, शिल्पशास्त्राचा अभ्यास फक्त स्वतंत्र लोकांनीच करावा. निरनिराळया मूर्ती, पुतळे वगैरे गुलामांनी करता कामा नये. जर त्यांनी शिल्पकलेचे नमुने केले तर त्यास भयंकर शिक्षा कायद्याने ठरविण्यात आली होती. ...अजून वाचा

2

अमोल गोष्टी - 2

आपण सर्व जगाकडे दृष्टी फेकली तर आपणांस असे दिसून येईल की, सर्व माणसांच्या वाटयास दु:ख आले आहे. जरी काही सुखात व वैभवात दिसले तरी त्यांस दु:खाने सोडले आहे असे नाही. शारीरिक रोग कोणास सुटले आहेत? मानसिक चिंता कोणास व्यग्र व व्यथित करीत नाहीत? मरण तर सर्वांनाच ग्रासावयास टपले आहे. ...अजून वाचा

3

अमोल गोष्टी - 3

त्या गावाचे नाव होते मगरूळ. एके काळी ते गाव संपन्न होते. तेथे जणू सर्व मंगले होती. परंतु आज काय तेथील उद्योगधंदे मेले आहेत. लोक कसेतरी जगत आहेत. सारा गाव कर्जबाजारी झाला आहे. जिकडे तिकडे पडकीमोडकी घरे दिसतात. गाव पाहून वाईट वाटते. त्या गावचा जुना इतिहास आठवून डोळे भरून येतात. परंतु सा-या हिंदुस्थानचेच असे नाही का झाले? किती रडणार, आणि रडून काय होणार? ...अजून वाचा

4

अमोल गोष्टी - 4

एका समुद्रकाठी एक लहान नाही, मोठे नाही असे गाव होते. समुद्रकिनारा फारच सुंदर होता. समुद्रकिना-यावर शिंपा-कवडयाची संपत्ती किती तरी असे. किना-यालगतच एक लहानशी टेकडी होती. या टेकडीवर नाना प्रकारच्या समुद्रतीरावर उगवणा-या वेली वगैरे होत्या. या टेकडीवरून एकीकडून झाडीतून वर डोके काढणारी गावातील घरांची शिखरे, तर दुसरीकडे अफाट दर्या पसरलेला, असे मनोहर दृश्य दिसे. दूरवर पसरलेला तो परमेश्वराचा पाणडोह व त्यावर हंसाप्रमाणे पोहणारी ती शेकडो गलबते यांची मोठी रमणीय पण भव्य शोभा दिसे. सायंकाळ झाली म्हणजे गावातील मुले-मुली आपले चित्रविचित्र पोशाख करून येथील वाळवंटात किंवा टेडीवर खेळण्यास येत. टेकडीवरून घसरगुंडी करून खाली घसरत येण्याची मुलांना फार गंमत वाटे. सायंकाळी मावळत्या सूर्याचे सुंदर सोनेरी किरण लाटांशी शेवटची खेळीमेळी करताना पाहून आनंद होई. सूर्याचा तांबडा गोळा समुद्रात दूर क्षितिजाजवळ गडप होताना व त्या वेळची हिरवी निळी कांती दिसताना मनात शेकडो विचार उत्पन्न होत. रात्रीच्या वेळी तर समुद्राचा देखावा फरच सुंदर दिसे. ...अजून वाचा

5

अमोल गोष्टी - 5

आपले एक आटपाट नगर होते. तेथे एक भाग्याची बाई राहात असे. लेकी-सुनांनी घर भरलेले, गुराढोरांनी गोठा भरलेला, खायलाप्यायला काही नव्हते. पाटीभर दागिने एकेकीच्या अंगाखांद्यावर होते. लोक आपापले उद्योगधंदे करून सुखाने दिवस काढीत होते. त्या नगरात सर्वत्र बाईचीच सत्ता होती. तिचे भाग्य मोठे थोर म्हणून तिला 'भाग्यबाई' म्हणत. तिची मुलेही मोठी उद्योगी : कोणी उत्कृष्ट कारागीर, कोणी उत्कृष्ट संगीतज्ञ, कोणी शास्त्रज्ञ, कोणी तत्त्वज्ञ, कोणी चांगले विणकर, कोणी चांगले योध्दे, कोणी मुत्सद्दी, कोणी तपस्वी असे होते. सर्व त्या त्या कामात मोठे वाकबगार, मोठे दर्दी! परस्परांचा हेवादावा त्यांना माहीत नाही. सर्वच धंदे चांगले, ज्याला आवडेल तो त्याने करावा, असे होते. मुलांच्या या प्रेमळपणामुळे, या ऐक्यामुळे भाग्यबाई मोठी सुखी होती. तिचे मुख नेहमी प्रसन्न दिसे. ...अजून वाचा

6

अमोल गोष्टी - 6

(डॉ. जाकीर हुसेन हे सुप्रसिध्द शिक्षणशास्त्रज्ञ होते. वर्धा शिक्षण पध्दतीचे ते प्रमुख होते. हिंदीच्या परिचय-परीक्षेसाठी त्यांनी लिहिलेली 'अब्बूखाँकी बकरी' सुंदर गोष्ट आहे. ती मनोहर व भावपूर्ण गोष्ट माझ्या सर्व वाचकांस कळावी म्हणून देत आहे.) हिमालयाचे नाव कोणी ऐकले नाही? हजारो मैल लांब तो पसरला आहे. त्याची शिखरे इतकी उंच आहेत, की कोणी त्यावर अद्याप पोचला नाही. हिमालय पर्वतात मधून मधून वस्ती आहे. अशा वस्तीच्या जागांपैकी आल्मोडा ही एक आहे. ...अजून वाचा

7

अमोल गोष्टी - 7

'माझी सोन्यासारखी पोर अंथरुणास खिळली आहे आणि या कारटयास जरा त्या मुलीला घे सांगितले तर नुसता एरंडासारखा फुगला आहे! आठवली आहे मेल्याला! पुण्यास दिवे लावून आले पळपुटेराव, आता येथे आईशीला गांजावयास आले. चल, ऊठ घे त्या शांतीला व खेळव झोपाळयावर तिला. उठतोस की नाही का घालू कमरेत लाथ-' ...अजून वाचा

8

अमोल गोष्टी - 8

शंकरराव अलीकडे हिंदुमहासभेचे मोठे अभिमानी झाले होते. काँग्रेसच्या नावाचा उल्लेख होताच त्यांच्या पायांची आग मस्तकास जाई. काँग्रेस म्हणजे धर्मबुडवी, म्हणजे मुसलमानांची बटीक, वाटेल ते ते बरळत. महात्मा गांधी म्हणजे हिंदुधर्माला लागलेले ग्रहण, असे ते म्हणत. काँग्रेसला शिव्या देणे म्हणजे त्यांची संध्या. काँग्रेसच्या थोर सेवकाची निंदा करणे म्हणजे त्यांचा गायत्री जप. ...अजून वाचा

9

अमोल गोष्टी - 9

ती मोटार लांबची होती. वाटेत ती बिघडली. दुरुस्त होईना. बाहेर अंधार पडू लागला. आकाशातील तारे लुकलुकू लागले. लहान मुले रडू लागली. मोटारीत कुटुंबवत्सल माणसे होती. रात्री कोठे जाणार? गार वारा वाहत होता. जवळच्या शेतातून कोल्हे ओरडत होते. मुले मातांना घट्ट बिलगत होती. लहानगा धीट रमेश मात्र ड्रायव्हरला म्हणाला, 'पों पों वाजय म्हणजे कोल्हे भिऊन पळून जातील.' ...अजून वाचा

10

अमोल गोष्टी - 10

एक गरीब विधवा होती. तिचा एकुलता एक मुलगा होता. त्या मायलेकरांचे उभयांवर फार प्रेम. एकमेकांवर विसंबत नसत. तो मुलगा मोठा झाला. तो आता तारुण्यात आला. तो एका तरुणीच्या नादी लागला. तिच्या नादी लागून त्या तरुणाचा सर्वस्वी नाश झाला. त्याची संपत्ती, त्याची बुध्दी, त्याची श्रध्दा, त्याचा चांगुलपणा, त्याचा स्वाभिमान, त्याची मातृप्रीती, सर्व-सर्व गेले. त्या तरुणाचे सर्वस्व हिरावून घेऊनही ती तरुणी तृप्त झाली नाही. ...अजून वाचा

11

अमोल गोष्टी - 11

गोविंदाचा एक मित्र फार दूरच्या देशात फिझी बेटात गेला होता. फिझी बेटात आपल्या देशातील मजूर पुष्कळ आहेत. त्यांना शिक्षण आपल्या धर्माची ओळख करून देणे, या पवित्र कार्यासाठी गोविंदाचा मित्र गेला होता. त्याचे नाव रामचरण. रामचरणने आपला देश, घरदार, सर्व स्नेही यांस सोडून दिले होते. जे आपले बांधव हजारो मैलांवर आहेत, त्यांना ज्ञानदान करण्यासाठी तो गेला होता. त्या गरीब मजुरांच्या मनात सीता, सावित्री, रामकृष्ण यांची आठवण राहावी, हिंदु-संस्कृती त्यांच्या मनात जिवंत राहावी म्हणून तो गेला होता. ...अजून वाचा

12

अमोल गोष्टी - 12

युरोपातील एका शहरात फार प्राचीन काळी ही गोष्ट घडली. त्या शहराचे नावमात्र मला आता आठवत नाही. या शहरात न्यायदेवतेचा भला मोठा पंचरसी धातूचा एक पुतळा होता. भरचौकात तो उभारलेला होता. त्या पुतळयाच्या डाव्या हातात एक तराजू होता व उजव्या हातात तलवार होती. या शहरात कोणत्याही गोष्टीचा निकाल नीट तोलून पाहून देण्यात येतो. त्यात रेसभरही चूकभूल होत नाही हे दर्शविण्यासाठी तो तराजू होता आणि अन्यायाचे निर्दालन करण्यात येते हे दाखविण्यासाठी ती तलवार होती. ...अजून वाचा

13

अमोल गोष्टी - 13

सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीची गोष्ट. भगवान बुध्द त्या काळी अवतरले होते, व सर्व लोकांस सदुपदेश करून सन्मार्ग दाखवीत होते. एकवीस वयाचा एक तरुण ब्रह्मचारी होता. त्याच्या तोंडावर अग्नीसारखे तेज होते. तो विद्वान व बुध्दिमंत होता. लोकांनी आपल्या हुषारीची तारीफ करावी म्हणून त्यास अधिकाधिक शिकण्याची इच्छा असे. त्याने देशोदेशी नवीन ज्ञान मिळविण्यासाठी प्रवास केले. तक्षशिला, राजगृह, कौसंबी, उज्जयिनी वगैरे तत्कालीन सर्व विद्यापीठांतून तो निरनिराळया शास्त्रांत पारंगत होऊन आला. जे जे नवीन पाही, ते ते स्वतःस यावे असे त्याला वाटे, ते शिकण्याचा तो प्रयत्न करी व त्यास ते प्राप्त होई. ...अजून वाचा

14

अमोल गोष्टी - 14

ग्रीस देशातील इसापप्रमाणे पुष्किन् म्हणून एक रशियन ग्रंथकार शे-दोनशे वर्षापूर्वी होऊन गेला. त्याच्या गोष्टींपैकी एक गोष्ट पुढे देतो. एक लहानसा होता. उन्हाळयात पाण्याचा एक थेंब त्यात आढळेल तर शपथ. पावसाळयात मात्र त्याची कोण ऐट व मिजास! एकदा खूप मुसळधार पाऊस पडला, जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले. आमचा हा लहानसा ओढा पाण्याने फुगून गेला. त्याच्या तीरावर धान्यांची सुंदर शेते होती. त्या नाल्याने आपले पाणी दूरवर पसरिले, ती सुंदर शेते वाहून गेली. त्या उध्दट धटिंगण ओढयाने सामर्थ्यांच्या जोरावर ती सुकुमार व उपकारक शेते वाहवून न्यावी ना? त्या शेतांमुळे या ओढयाचेच सौंदर्य वाढत असे, परंतु दुष्टाला दुस-याचे नुकसान करण्यात स्वतःचेही शेवटी नुकसान होईल हे दिसत नसते. ...अजून वाचा

15

अमोल गोष्टी - 15 - 22

१५. पहिले पुस्तक, १६. योग्य इलाज, १७. चित्रकार टॅव्हर्निअर, १८. मरीआईची कहाणी, १९. कृतज्ञता, २०. श्रेष्ठ बळ, २१. चतुर राजा, २२. सभाधीटपणा ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय