आज रोहन जरा लवकर तयार झाला.कपाटातून एक ठेवणीतील कुर्ता काढला.खरतर त्याने तो जेम तेम दोन वेळाच घातला होता.एकदा चाळीच्या कोणत्यातरी कार्यक्रमात आणि शेजारच्या सुरेशच्या लग्नात.आईच्या दहावेळा ओरडून झाल्यावर रोहन आवरून बाहेर च्या खोलीत आला.खोली म्हणजे त्यांच घर म्हणजे चाळीतल दहाबाय दहा च्या दोन खोल्या सगळा संसार त्यातच..एवढ्या दोन खोल्यात रोहनच जग सामावल होत..... अंथरुणाला खेळलेली एक वयस्कर आजी तिची खाट, बाळांतपणाला आलेली त्याची बहिण, थकलेले आई वडील सगळे अगदी त्या घराला महाल समजूनच राहत होते.अश्यात आज घरात वेगळाच उत्साह होता.. रोहनला मुलगी बघायला घरातील सर्व लोक जात होत. रोहन तसा दिसायला गोरापान, देखणा आणि बँकेमध्ये कारकुनाची नोकरी करत होता. त्याला वधू-वर सुचूक मंडळातून स्थळ आलं होत प्रीती जोशी ह्याच.

नवीन एपिसोड्स : : Every Tuesday, Thursday & Saturday

1

लग्नप्रवास - 1

लग्नप्रवास - भाग १ रोहन जरा लवकर तयार झाला.कपाटातून एक ठेवणीतील कुर्ता काढला.खरतर त्याने तो जेम तेम दोन वेळाच घातला होता.एकदा चाळीच्या कोणत्यातरी कार्यक्रमात आणि शेजारच्या सुरेशच्या लग्नात.आईच्या दहावेळा ओरडून झाल्यावर रोहन आवरून बाहेर च्या खोलीत आला.खोली म्हणजे त्यांच घर म्हणजे चाळीतल दहाबाय दहा च्या दोन खोल्या सगळा संसार त्यातच..एवढ्या दोन खोल्यात रोहनच जग सामावल होत..... अंथरुणाला खेळलेली एक वयस्कर आजी तिची खाट, बाळांतपणाला आलेली त्याची बहिण, थकलेले आई वडील सगळे अगदी त्या घराला महाल समजूनच राहत होते.अश्यात आज घरात वेगळाच उत्साह होता.. रोहनला मुलगी बघायला घरातील सर्व लोक जात होत. रोहन तसा ...अजून वाचा

2

लग्नप्रवास - 2

लग्नप्रवास- 2 प्रीती घरी आली. आणि रडक्या स्वरात आत मध्ये गेली आणि रूमचा दरवाजा बंद केला. आई व वडील पडले. असं झालं तरी काय प्रीतीला. सकाळी रोहनला भेटायला जाणार म्हणून भलतीच खुश दिसत होती.थोड्यावेळाने प्रितीने दरवाजा उघडला, तेव्हा आई व वडिलांना सर्व पहिल्या भेटी मध्ये काय झालं ते सांगितले. वडिलांनी आणि आईने तिला खूप समजावलं, ज्यावेळी एक मुलगी आपलं घर सोडून जाते तेव्हा तीच खरं घर सासरचं असत. आणि पती हा साक्षात परमेश्वर असतो. त्याच्यामुळे त्याच्या निर्णय प्रथम. आणि रोहन हा खूप चांगला मुलगा आहे. देखणा, गोरापान, इंजिनियर आणि महत्वाकांशी, समजूतदार आणि तुझ्या प्रत्येक सुख दुःखात तुला नेहमी साथ ...अजून वाचा

3

लग्नप्रवास - 3

लग्नप्रवास - ३ चला, नक्की आज भेटायचं संध्याकाळी ७ ची वेळ दिली. आता कोण वेळेवर येतेय? रोहन अगोदरच तिकडे जाऊन पोचला. त्याने प्रीतीला मोबाईल वर संदेश पाठवला. थोड्यावेळाने प्रीतीही तिथे आली. दोघेही एका हॉटेलमध्ये गेले. रोहनन प्रीतीसाठी orange juice मागवला आणि स्वतःसाठी mango juice. तेव्हा अचानक प्रितीने जे दोन दिवस तिच्या मनात होत ते बोलून मोकळी झाली. माझ्यावर असे नियम तू लावू शकत नाहीस. अंतिम निर्णय हा आपल्या दोघांचा असेल. तू एकटा निर्णय घेणार लग्नानंतर ते मला मान्य नाही आहे. माझ्याहि काही अपेक्षा आहेत, स्वप्न आहेत. आणि मला साथ देण्याऐवजी तू माझ्यावर निर्बंध लावतो आहेस. हे मला चालणार नाही.तेव्हा ...अजून वाचा

4

लग्नप्रवास - 4

लग्नप्रवास- ४ रोहन आणि प्रीती च्या लग्नाची तारीख रविवार हळद शनिवारी न लावता शुक्रवारी हळदीचा कार्यक्रम ठरवण्यात आला. दोघांचे घर पाहुण्या मंडळांनी भरले होते. एकीकडे रोहन बरोबर लग्न होत आहे ह्याचा आनंद प्रीतीला होताच, आणि दुसरीकडे हे घर आता कायम परके होणार ह्याच दुःख. अश्या संमिश्र भावना प्रीतीच्या मनात दाटून आल्या होत्या. दुपारी बांगड्या भरण्याचा कार्यक्रम झाला. आपल्या हातातील हिरवा चुडा बघून प्रीतीच्या चेहऱयावर एक खट्याळ हसू आले. तिने लगेचच रोहनला फोन केला आणि हिरवा चुडाचा आवाज किणकिण आवाज ऐकवला. रोहनही त्या आवाजाने बहरला. पोरीचं लग्न म्हटलं तर बापाचा दुसरा जन्म होतो. नवरदेवाचे कपडे, पाहपाहण्यारावल्यानं ...अजून वाचा

5

लग्नप्रवास - 5

लग्नप्रवास-५ सासरी जाताना तिला बघवत नव्हते. प्रीती खूप बोलकी असल्याकारणाने ती घरात सर्वांची खूप लाडकी होती. अगदी मामा, मामी, आत्या, मावशी सगळेच रडले.पण तिला तिच्या बाबा आणि भावा व्यतिरिक्त कोणीच दिसत नव्हते. आईकडे तर ती बघूच शकत नव्हती.आईला जर बघितलं असत तर तिचा पाय निघालाच नसता कारणही तसेच होते त्याला. गंध तो रंगीन तिच्या कपाळावर चढला, मोगरा तो सुंगधी तिच्या केसावर मांडला.... नाचत नाचत पैंजण आले, हसत हसत बांगड्या आल्या..... शृंगार तिचा करुनि, तो काजळ डोळ्यात बसला, ओठावरची लाली खुद्कन हसली...... राखुनी मान सर्वांचे, साजणा ती साजणी तुझ्यासाठीच सजली........ घरी येण्याच्या आधी दोघांनी मंदिरात गाडी थांबवून सर्वजण पाया पडले.त्यानंतर थेट ...अजून वाचा

6

लग्नप्रवास - 6

लग्नप्रवास - ६ साथ माझीच असेल ! तुझ्या त्या नजरेतील नजाकतीला कसलीच तोड नाही मला आता तुझ्याशिवाय ओढ नाही तुझ्या निखळ मनात अडकून राहायला होत तुझ्या निरागस हसण्यात हरवून जायला होत तुझ्या आवाजातील बंदिश जीव ओढून नेते तुझ्या डोळ्यातील अश्रू माझे प्राणच घेते या वेड्याचे प्रेम फक्त तुझ्यावरच असेल तू प्रेम दे अथवा नको देऊ पण साथ मात्र माझीच असेल................. लग्न ही सुरूवात असेल तर हनिमून हा त्याचा कळस. स्त्री आणि पुरुष दोघेही अपूर्ण. जेव्हा मिलन होत तेव्हा लाभते ती परिपूर्णता आणि हीच परिपूर्णता जाणून घेण्याची किंवा स्वतःला पूर्णत्वाकडे नेण्याची संधी त्यांना हनिमून मधून मिळणार होती.लग्न जरी झाले ...अजून वाचा

7

लग्नप्रवास - 7

लग्नप्रवास- ७ दर्शन झाल्यानंतर दोघेही गाडीत बसले. दोघांनाही जोराची भूक लागली होती. म्हणून रोहनने ड्रायव्हरला सांगितले, की गाडी एका चांगल्या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी थांबव. ड्रायव्हरने लगेच गाडी तारा पलेस म्हणून हॉटेलमध्ये थांबवली. दोघांनीही मेजवानीचा आनंद घेतला. आनंद घेत असताना रोहनला एक खूप जुनी गोष्टी आठवली. एकदा तो असाच मित्राबरोबर हॉटेलला गेला होता.आणि तो त्याचे पाकीट पण विसरला होता. सगळ्यांनी भरपूर जेवायला मागवले होते. परंतु कोणाकडेच एवढे पैसे नव्हते. तेव्हा तो व त्याच्या मित्रांना भांडी घासायला लागले होते. ह्या गोष्टीवरून रोहन आणि प्रीती खूप हसले. रोहन : जेवण खुपचं सुंदर होत ना?प्रीती : हो, खरच. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जर ...अजून वाचा

8

लग्नप्रवास - 8

लग्नप्रवास - ८ रोहन मात्र तिची आठवण काढता काढता झोपी गेला तेवढ्यातच त्याच्या मोबाईल ची रिंग वाजली. फोन पोलीस मधून होता.पोलीस स्टेशन मधून फोन आलेला कळताच रोहन एकदम खडबडूनजागा झाला आणि त्याने पोलिसांना प्रीती मिळाल्याचे सांगितले. हे ऐकताच रोहनने लगेचच पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली. रोहन एकदाचा पोलीस स्टेशन मध्ये आला आणि प्रीतीला बघताच त्याने तिलाजोराची मिठी मारली. कळतच नाही कधी मनाशी मन जुळत,पाहता पाहता प्रेमाचं फुल खुलत,येताच कोणी आयुष्यात,आयुष्य वेगळ्याच वळणावर वळत,अन आयुष्यभर साथ देण्यासाठी,आपल्याला ही कोणी तरी मिळत,प्रितीने सुद्धा रोहनला कडकडून मिठी मारली, दोघांनाही पोलीस स्टेशनमध्येच रडण्यास सुरुवात केली. शेवटी प्रितीने रोहनला सांगितले कि, कशा पद्दतीने प्रीती ...अजून वाचा

9

लग्नप्रवास - 9

लग्नप्रवास- ९ आता त्याची गाडी प्रतापगडाच्या दिशने धाव घेत होती प्रत्येकला जोराची भूक लागली होती. ड्रायव्हरने सांगितले एखाद्या चांगल्या हॉटेल मध्ये मी गाडी थांबवतो. सर्वजण तुम्ही जेवून घ्या. कारण प्रतापगढ बघायला खूप उशीर होईल. सर्वानी होकाराथी मान डोलावून गाडी बाहेर पडले. सर्व जण हॉटेल मध्ये खुर्ची पकडण्यास सरसावले. पुढे जाऊन प्रितीने खुर्ची पकडली आणि रोहनला हाथाने इशारा केला. आता जेवायला काय मागवायचे ह्या विचारात दोघांनीही मेनू कार्ड मध्ये डोके घातले होते. त्यांनी दोन जेवणाच्या थाळी मागवल्या. ऑर्डर येण्यास वेळ होता तेव्हा प्रीतीला तो न्यहाळात बसला तेव्हा त्याच्या मनात विचार सुरु झाला. हल्ली ...अजून वाचा

10

लग्नप्रवास - 10

लग्नप्रवास- १० एकदाचे प्रीती आणि रोहन घरी पोहचले. तो दिवस त्या दोघांनाही आराम केला.दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे घरच्यांनी सांगितले, कि तुम्ही महालक्ष्मी आणि मुंबादेवीचे दर्शन घेऊन या. दोघांचे चेहरे पाहण्यासारखे झालेले. कारण दोघेही थकलेले आणि त्याचा आराम करायचा मूड होता. परंतु नाही कसे बोलणार म्हणून त्यांनी होकाराथी मान डोलावल्या. सकाळी दोघांनाही नाश्ता करून तयारीस लागेल. प्रितीने छानशी साडी नेसली आणि रोहन शर्ट पॅन्ट घालून जाण्यास निघाले. पहिले त्यांनी महा लक्ष्मीचे दर्शन घेतेले. तिकडे खण नारळाची ओटी घेतली, तिथेही दर्शन व्यस्थित झाले. थोड्यावेळेने त्या दोघानाही मुंबादेवीचेही दर्शन घेतले. आणि संध्याकाळी थकून भागून घरी आले. ...अजून वाचा

11

लग्नप्रवास - 11

लग्नप्रवास - ११ रोहन आणि प्रीतीच्या ४ महिने उरकून गेले होते. दोघांचाही रोजचा दिनक्रम असायचा. सकाळी उठून प्रीती नाश्ता करून ऑफिसला जायची. आणि संध्याकाळी ऑफिस मधून आल्यावर सासूबाईंना मदत करायची. रोहनचेही तसेच होते. हनिमून वरून आल्यानंतर ते दोघेही एकदम कामामध्ये बुडाले होते. रविवार असायच्या त्याच्या जोडीला.पण रविवारी एकतर कंटाळा नाहीतर दोघेही आपापली कामे करण्यात व्यस्त असायचे. गावी गणपतीला ह्यावर्षी लग्नानंतर रोहनच्या घरातले सर्व जाणार होते. आणि ह्याच वर्षी प्रीतीचा ओवसा असल्याकारणाने गावच्या काका काकूंनी प्रीती आणि रोहनला येण्याचे आग्रहाने आमंत्रण दिले. थोडा कामांमधून change मिळणार म्हणून प्रीती आणि रोहन खूप ...अजून वाचा

12

लग्नप्रवास - 12

लग्नप्रवास -१२ सकाळी नेहमीप्रमाणे प्रितीने तयारी केली. रोहनला आज जरा ऑफिसला उशिरला जायचे असल्यामुळे रोहन अंथरुणावर पडूनच होता. प्रितीने रोहनला उठून नाश्ता घेण्यास सांगतिले. आणि प्रीती निघाली ऑफिसला जायला. ऑफिसला उशिरला जायचे असल्यामुळे रोहन सकाळी ९ च्या सुमारास उठला. प्रिती जाताना कपाटाच दार बंद करायला विसरून गेली होती. लगेचच रोहनने उठून दार बंद करण्यास पुढे सरसावला.तेव्हा त्याला त्या दोघांच्या लग्नाचा अल्बम खाली पडला. रोहन बराच वेळ त्या अल्बम मधली आपले आणि प्रीतीचे फोटो पाहू लागले. तो त्या आठवणीत गुंतून गेला. किती गोड दिवस होते ते. लग्नाच्या आधी रोहनने आपल्या खास मित्रांना बॅचलर ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय