लग्नप्रवास - 12 सागर भालेकर द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लग्नप्रवास - 12

लग्नप्रवास -१२

सकाळी नेहमीप्रमाणे प्रितीने नाश्ताची तयारी केली. रोहनला आज जरा ऑफिसला उशिरला जायचे असल्यामुळे रोहन अंथरुणावर पडूनच होता. प्रितीने रोहनला उठून नाश्ता घेण्यास सांगतिले. आणि प्रीती निघाली ऑफिसला जायला. ऑफिसला उशिरला जायचे असल्यामुळे रोहन सकाळी ९ च्या सुमारास उठला. प्रिती जाताना कपाटाच दार बंद करायला विसरून गेली होती. लगेचच रोहनने उठून दार बंद करण्यास पुढे सरसावला.तेव्हा त्याला त्या दोघांच्या लग्नाचा अल्बम खाली पडला. रोहन बराच वेळ त्या अल्बम मधली आपले आणि प्रीतीचे फोटो पाहू लागले. तो त्या आठवणीत गुंतून गेला. किती गोड दिवस होते ते. लग्नाच्या आधी रोहनने आपल्या खास मित्रांना बॅचलर पार्टी दिली होती. तेव्हा सर्वानी त्याला सांगितले, " रोहन आता तुझे आमच्याबरोबरचे करमणुकीचे दिवस संपले. आता तू गुलाम बनणार. होम मिनिस्टरच्या आदेशच तुला आता अंतिम मानावा लागणार. पण रोहन मात्र ह्या गोष्टीकडे कानाडोळा करत होता. आणि आपल्या मित्रांना हेच समजावून सांगत होता. असं काह नसत, ती माझी जरी बायको असली तर तुम्ही माझे लहानपणापासूनचे मित्र आहेत. तुम्हाला तोडून कसे चालेल मला. रोहनला लग्नाच्या आधीचे दिवस खूप आठवत होते. त्याच्या मनात नानाप्रकारचे प्रश्न होते. ती कशी असेल, ती मला लग्नानंतर समजवून घेईल ना. तिच्या काही अपेक्षा तर नसतील ना. पण खरंच दोघाच्या गाठी स्वर्गातच बांधून ठेवल्या होत्या. दोघांचाही जोडी म्हणजे शंकर आणि पार्वती सारखीच होती. जेवणामध्ये प्रितीने भरवलेला पहिला घास. रोहनच्या मनाला अगदी आजही स्पर्स करून जात असे. रोहन आठवणींमध्ये इतका रमून गेला कि, त्याला आपल्याला ऑफिसला जायचे आहे. ह्या गोष्टीचा विसरच पडला होता. रोहनने फ्रेश होऊन प्रितीने मोठ्या आवडीने केलेले कांदेपोहे त्याने अगदी चाटूनपुसून खाल्ले. आणि तयारी करून निघाला ऑफिसला जायला. " आई येतो गं. रात्री यायला उशीर होईल थोडा". हो सावकाश जा.

रोहन नेहमीप्रमाणे लिफ्टने बिल्डिंगच्या खाली आला. तेव्हा त्याला धर्माधिकारी काका भेटले. धर्माधिकारी काका हे रिटायर्ड आर्मी ऑफिसर. दोन मुलगे. दोन्ही अमेरिकेमध्ये. इकडे काका आणि काकू दोघेच राहत. धर्माधिकारी काकांना राजकारणाची फार आवड. रोज नेहमीप्रमाणे मॉर्निंग walk ला जात असे. आणि मॉर्निंग walk मधून येत असताना रोहनला भेटले.

धर्माधिकारी काका: अरे, काय आज कालचे राजकारण नेते. जनतेसाठी काही करायला मागतच नाही. वोट घेण्यासाठी पहिलेदारावर येणार.

रोहन: काका, जाऊ द्या. नेते लोकांनी नाही काही केलं म्हणून. आपल्यात काही फरक पडणार आहे का? आपल्याला आपली कामे करावीच लागणार ना. सोडून द्या तो विषय.

धर्माधिकारी काका: असं बोलतोस. ऐक ना, कामावर चालला आहेस. माझं एक काम आहे तुझ्याकडे. माझ्यासाठी एक वाईन आणशील. देतो तुला पैसे.

रोहन:काका, पण काकू. त्या नाही ओरडणार का तुम्हला.

धर्माधिकारी काका:अरे तीच सोडून दे तू. उद्या गटारी आहे. आमच्यासारख्या लोकांचा दिवस आहे.

रोहन: हो, ठीक आहे. आणतो.

रोहनने घाईगडबडीत रिक्षा पकडली आणि तो स्टेशन वर आला. तेवढ्यातच त्याला प्रीतीची फोन आला. प्रितीने सांगितले, गाड्या खूप उशिरा धावत आहेत. घाई करू नकोस. ऑफिसला उशीर झाला तरी चालेले. एवढे बोलणे ऐकून रोहनने प्रीतीचा फोन ठेवून गाडी पकडण्यास पुढे धावला. बघतो तर काय गाडीला हि गर्दी. रोहन मनातल्या मनात विचार करू लागला. गाडीत कसे हि चढायचे. नाहीतर ऑफिसला जायला उशीर होईल. आणि आधीच खूप लेटमार्क लागले आहेत. गाडी आली तसा रोहन गाडीत चढला. त्याला कळले सुद्धा की, आपण मालडब्यात चढलो आहे ते. एकतर त्या डब्यात एवढा घाणं वास मारत होता. त्यानं एवढा परेशान झाला रोहन. त्यात थोड्यावेळाने स्टेशन आल्यावर भर पडली ती, रेल्वे पोलीसची. रेल्वे पोलीसानी रोहनबरोबर अनेक लोकांना स्टेशनबाहेर काढले. रोहन मात्र विचारात पडला आणि ऑफिसला उशिरा पोचण्याच्या भीतीने त्याने पोलिसाला विचारले. उलट पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला. आणि एक रांग बनवून सर्वाना पोलीस स्टेशन मध्ये नेले. मोबाईल जप्त केल्यामुळे रोहन ऑफिसला उशिरा येतोय म्हणून कळवू शकवत नव्हता किंवा एखादा साधा संदेशहि पाठवू शकत नव्हता.ह्या अश्या गडबडीमुळे तो खूप चिंतेत पडला होता. पोलिसांनी सगळ्याचा जबाब लिहून घेतला. कुठे राहता तुम्ही, का मालडब्यामध्ये चढलात वैगरे. रोहनच्या मनात प्रश्न निर्माण झाले. एवढयाश्या चुकीसाठी त्याच्या जबाब लिहून घेतला, हे त्याला कुठेतरी पटत नव्हते. पण शेवटी नाईलाज त्याचाही झाला. आणि त्याने पण आपला जबाब नोंदवला. तास ना तास निघून गेला, पण पोलीस काही लोकांना सोडायला तयार नाही. शेवटी पोलीस शिपाई पुढे आला आणि त्याने सांगितले, एक रांग करून आपल्याला कोर्टात जायचे आहे. तिथेच तुम्ही तुमच्या गुन्ह्याची कबुली द्या. आता मात्र रोहनला ह्या कायदा व्यस्थेचा संताप आला होता. इथे प्रीतीला पण काही सुचेनासे झाले होते. बराच वेळ झाला होता. रोहनचा काही फोन किंवा संदेश पण नाही. घरीही प्रितीने फोन करून बघितला तर रोहन १०च्या आसपास घरातून निघाला होता. आता मात्र प्रीती खूप घाबरली होती. तिने त्याच्या ऑफिस मध्ये फोन करून पाहिला. तेव्हा तिला समजले, आम्ही पण त्याचा फोन try करतोय. पण तो अजिबात उचलत नाही. आता मात्र प्रीतीला खूप भीती वाटत होती की, रोहन कोणत्या संकटात तर सापडला नसेल ना. इकडे रोहनला कोर्टात हजर करण्यात आले. रोहनने आपल्या गुन्ह्याचा कबूलनामा न्यायधीशाकडे केला. आणि न्यायाधीशाने त्याचा कबूलनामा स्वीकारत त्याला दंड म्हणून ३०० रुपये भरण्यास सांगितले. हा सगळा प्रसंग घडत असताना दुपारचं तीन कधी वाजले रोहनला कळले सुद्धा नाही. रोहन धापा टाकत स्टेशनवर आला आणि त्याने प्रीतीला फोन लावला. हा आपल्याबरोबर घडलेला सर्व प्रसंग सांगितला.प्रीतीशी जेव्हा रोहनचे बोलणे झाले तेव्हा त्याला खूप बरे वाटले. त्याला खूप तिचा आधार वाटला. प्रीतीनेही त्याला आज ऑफिसला जाऊ नकोस. घरी जाऊन आराम कर सांगितले. अशाप्रकारे ह्या प्रसंगातून रोहनची सुटका झाली आणि तो घरी आला.

बसले होते एकांतात आठवल्या त्या आठवणी

काही पुसटश्या तर काही दिसेनाश्या…

काहींना लागलेला गंज

तर काही अडगळीत पडलेल्या

वर्षांनुवर्षे जपलेल्या

पण म्हताऱ्या झालेल्या…

जवळ कोणी नसताना

सोबत असल्याच्या धीर देताना

फेकल्या कितीही दूर

तरीही जीवनाचा आधार बनतात…

तुम्हाला आजचा भाग कसा वाटला, मला नक्की तुमची प्रतिक्रिया कळवा. तोपर्यंत थांबतो. भेटू पुढील भागात.