स्वप्नांचे इशारे

(9)
  • 66.2k
  • 4
  • 32.1k

थंडगार हवा, नदीच्या पाण्याची मधुर धून, पाखरांची किलबिल, त्यात नदीच्या पाण्यात होणारा सूर्यास्त, अशा मस्त निसर्ग सानिध्यात बसली असताना अचानक तिचा डोळा लागतो. ती प्रिया अशीच निसर्ग सानिध्यात रमणारी आणि तिच्या होणाऱ्या राजकुमाराचे स्वप्न बघणारी. दिसायला अशी की जो बघेल तो तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडेल. गोरा वर्ण, काळे भोर लांब सडक केस, पाणीदार डोळे त्यावर तिचे ते स्मित हास्य.आताही तिच्या राजकुमाराच्या सप्नात हरवलेली, तो कोण असेल याचं विचारात गुंतलेली . स्वप्नात पाहिले तिने त्याला समोरून येताना रुबाबदार सुट बुट मधे गाडीतून उतरताना , ती टक लावून बघू लागली कोण आहे तो, कसा आहे तो ,त्याचा चेहरा दिसणार तेवढ्यात जोराचा पाऊस सुरू झाला .

नवीन एपिसोड्स : : Every Monday & Thursday

1

स्वप्नांचे इशारे - 1

थंडगार हवा, नदीच्या पाण्याची मधुर धून, पाखरांची किलबिल, त्यात नदीच्या पाण्यात होणारा सूर्यास्त, अशा मस्त निसर्ग सानिध्यात बसली असताना तिचा डोळा लागतो. ती प्रिया अशीच निसर्ग सानिध्यात रमणारी आणि तिच्या होणाऱ्या राजकुमाराचे स्वप्न बघणारी. दिसायला अशी की जो बघेल तो तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडेल. गोरा वर्ण, काळे भोर लांब सडक केस, पाणीदार डोळे त्यावर तिचे ते स्मित हास्य.आताही तिच्या राजकुमाराच्या सप्नात हरवलेली, तो कोण असेल याचं विचारात गुंतलेली . स्वप्नात पाहिले तिने त्याला समोरून येताना रुबाबदार सुट बुट मधे गाडीतून उतरताना , ती टक लावून बघू लागली कोण आहे तो, कसा आहे तो ,त्याचा चेहरा दिसणार तेवढ्यात जोराचा पाऊस ...अजून वाचा

2

स्वप्नांचे इशारे - 2

आता प्रश्न होता तो फक्त राजेश चा. राजेश कधी येणार आहे इकडे ? केशव ने प्रश्न केला. एक महिन्याचा प्रोजेक्ट आहे सध्या, तो पूर्ण करून येतो असं सांगितलं आहे त्याने , सीमा ताई बोलल्या. तर राजेश आल्यावरच आपण बघायचा प्रोग्रॅम ठेवूया. असं सगळ्यांच मत त्यांनी केशव ला सांगितलं. चला येतो मग म्हणत केशव त्याच्या घरी जायला निघाला, तो घरी पोचून फोन करेल त्या आधीच त्याला प्रियाच्या बाबांचा फोन आला. काय केशव केली का गोष्ट तु मुलाच्या घरी? हो हो आता त्यांच्याच घरून येत आहे मी. मुलगा कामा निमित्त मुंबई ला असतो तो एक महिन्याने येणार आहे तेव्हा बघायचा प्रोग्रॅम ...अजून वाचा

3

स्वप्नांचे इशारे - 3

प्रिया प्रिया ....आईच्या आवाजाने प्रियाची झोप उघडते ...उठ ना बाळा आज ऑफिस ला जायचं ना, विसरलीस का ? आई ...म्हणत प्रिया ताडकन उठते आणि लगबगीने तयारी करते ..प्रिया खाली येते , देवघरा जवळ जावून देवांना नमस्कार करते ,तिच्या आई बाबांना नमस्कार करते...तितक्यात प्रीयाची आई नास्त्याची प्लेट लावते. प्रिया नाष्टा करून ऑफिस ला जायला निघते. तितक्यात तिची मैत्रीण केतकी तिची स्कूटी घेऊन येते ...चला निघायचं का प्रियु ? .....चल चल लवकर म्हणत प्रिया स्कूटी वर बसते.दोघी ऑफिस ला पोहचतात. ऑफिस चा पहिलाच दिवस म्हणून दोघीही आधी जोईनिंग फॉर्मलिटी पूर्ण करतात. नंतर त्यांना एका सिनियर कडून कामा बद्दल माहिती दिली जाते ...अजून वाचा

4

स्वप्नांचे इशारे - 4

सरांनी दोघींना गाडीत बसायला सांगितले. पण प्रिया तर तिच्याच शॉक मधे असते तितक्यात केतकी तिला हलवते तशीच प्रिया भानावर काय झालं प्रिया कुठे हरवली आहे ,सर प्रश्न करतात? नाही नाही सर कुठे नाही प्रिया गडबडीने बोलते.चला मग लवकर बसा गाडीत आधीच उशीर झाला आहे सर सांगतात .प्रिया प्रश्नार्थक केतकी कडे बघते.केतकी रागात डोळे मोठे करते .प्रिया समजते की सर घरी सोडता आहे ....आता केतकी ला ही काही विचारायचं काम नाही ,नाही तर चांगलीच ओरडणार की लक्ष कुठे होत आणि तिला सांगावं लागेल आता चूप रहीलेलच बर. पण ही गाडी .. तीच कशी काय प्रिया परत विचारात पडते ...केतकी सरांना ...अजून वाचा

5

स्वप्नांचे इशारे - 5

ती ते स्वप्न विसरायचं ठरवते. त्यात तिचा काही गैरसमज ही असू शकतो असा विचार करून. पण सरांचा चेहरा, त्यांची त्यांचं हसन , त्यांचं बघण सगळच जणू मनात ठसून जात. त्यांचा विचार करता करता तिला झोप लागते.सकाळी जाग येते ती आईच्या आवाजाने ,प्रिया....प्रिया उठ लवकर, ऑफिस ला जायचं नाही का ?..तशी ती पटकन उठते आणि तयारी ला लागते. तयारी करते, तिची आई नस्त्याची प्लेट लावते.प्रिया नस्त्याला बसते. नाष्टा करतच असते तेवढ्यात पुढे सरांची कार येऊन थांबते .तशीच अर्धा नाष्टा सोडून ,जायला निघते ....तेवढयात आई सांगते अग पूर्ण नाष्टा तर कर..नको म्हणून घाईत निघते.ती कार बघून तिच्या डोळ्यां समोर परत ते ...अजून वाचा

6

स्वप्नांचे इशारे - 6

सर केबिन मधे गेल्यावर प्रियाला बोलवता. थँक्यू प्रिया,.,. प्रिया आश्चर्याने सरांनकडे बघते. सर तिचे भाव ओळखतात आणि सांगतात मला जवळ लंच साठी बोलवण्यासाठी .तु विचार करण्याआधी की मला कस कळलं मीच सांगतो, माझा हातरुमाल कॅटींग मधे खुर्ची वर राहून गेला होता तोच घ्यायला परत आलो तेव्हा तुझ आणि केतकी च बोलण ऐकलं.प्रिया समजते .थँक्यू प्रिया माझी इतकी काळजी करण्यासाठी.प्रिया ऐकून एकदम स्तब्ध होते तिला सुचत नाही काय बोलावं .ती तिच्या ही नकळत सरांची काळजी करत असल्याचं तीला जाणवते. तेवढ्यात केतकी येते , मे आय कम इन सर? येस कम. सर तुम्ही मीटिंग साठी सांगितलं होत सगळे जमलेत.ओके आलोच ...अजून वाचा

7

स्वप्नांचे इशारे - 7

प्रियाच लक्ष तिकडेच असत.तितक्यात सर येतात ,सरांना बघून प्रिया ला खूप आनंद होतो.तिला तिच्या स्वप्नातल्या राजकुमार ने घातलेला सूट आठवतो,सेम सूट सरांन घातलेला बघून ती बुचकळ्यात पडते.हॅप्पी बर्थडे प्रिया आणि सकाळ साठी सॉरी पण सर बोलतात. आणि ती एकदम भानावेर येते.नाही नाही सर उलट काल साठी मी सॉरी सांगते आणि थँक्यु तुम्ही आलात खूप बरं वाटलं.सांगून हळूच गालात हसते .सरांनी सकाळ साठी ही सॉरी सांगितलं ,सर किती चांगले आहेत ,मीच मूर्ख काहीही विचार करते , प्रिया मनातल्या मनात बोलली.सर ही प्रिया सगळ्यांसमोर सॉरी बोलली म्हणून कालचं सगळ विसरायचं ठरवतात. दोघांची चांगली मैत्री जमते.वाढदिवस मस्त साजरा होतो .सगळे घरी जातात ...अजून वाचा

8

स्वप्नांचे इशारे - 8

प्रिया सरांच्या आवाजाने जाता जाता परत मागे वळून बघते.ती बघताच सरांचीही धक धक वाढते .पण कसे बसे सावरून ते सुरुवात करतात.प्रिया ही कानात तेल टाकून ऐकत असते. मला वाटलं नव्हत प्रिया की माझी आणि तुझी मैत्री इतकी पक्की होईल.जातो तर आहे इथून पण तुझी खूप आठवण येणार. अ.....काही सांगणार असतात तेवढयात कार्तिक येतो , मे आय कम इन सर? दोघं ही थोडे सावरतात.येस कार्तिक येना .प्रिया तिथून निघून जाते त्यांचं बोलायचं परत राहून जात. प्रिया ला सर आवडायला तर लागतात पण तिला ते सरांना सांगायचं नसत ,कारण तिला माहित असत की त्या साठी तिचे आई बाबा कधी तयार होणार ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय