अमित सावंत चौवीस वर्षांचा एक साहसी युवक होता. डोबिंवली पश्चिम भागात एका जुनाट बिल्डिंग मधल्या फ्लॅटमध्ये राहायचा.घरची परिस्थिती बेताचीच. वडील रिटायर्ड पोस्टमन..तुटपुंजी पेन्शन.घरात दोन बहिणी... दोघींची लग्न व्हायची होती. आईला दम्याचा त्रास होता. अमितला हे सारं दिसत होत पण तो काहीही करू शकत नव्हता. गेली दोन वर्ष तो नोकरीच्या शोधात होता. ना वशिला ना पैसा त्यामुळे प्रत्येक ठिकाणी हाती नकारघंटा येत होती. पदवीपर्यंतच शिक्षण वाया गेलं असच त्याला वाटत होत.अश्या परस्थितीमुळे तो अधिक बेडर आणि निडर झाला होता. परिसरात कुठेही साप आला की अमितला बोलावल जायचं. अत्यंत विषारी सापाना तो नुसत्या हातानं पकडायचा. मोटरसायकलवर स्टंट करायचा.अरेला कारे म्हणत मारमारीही करायचा.कोणत्याही धाडसी कामात तो पुढे असायचा.भीती हा शब्दच त्याला माहित नव्हता.घरात त्याच्या शब्दाला किंमत नव्हती. बेकार हा शिक्का त्याच्यावर बसला होता.वडील त्याला नेहमी हिणवायचे ' एक पैसा कमवायची अक्कल नाही अन चाललाय जगाच्या उठाठेवी करायला. ' आपला काहीच उपयोग नाही असा न्यूनगंड त्याच्या मनात निर्माण झाला होता.काहितरी अचाट कराव व बक्कळ पैसा कमवावा असच त्याला वाटत होत.दोन दिवसांपूर्वी त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला होता. मेसेज असा होता.

Full Novel

1

खेळ जीवन-मरणाचा - 1

खेळ ? जीवन- मरणाचा अमित सावंत चौवीस वर्षांचा एक साहसी युवक होता. डोबिंवली पश्चिम भागात एका जुनाट बिल्डिंग मधल्या राहायचा.घरची परिस्थिती बेताचीच. वडील रिटायर्ड पोस्टमन..तुटपुंजी पेन्शन.घरात दोन बहिणी... दोघींची लग्न व्हायची होती. आईला दम्याचा त्रास होता. अमितला हे सारं दिसत होत पण तो काहीही करू शकत नव्हता. गेली दोन वर्ष तो नोकरीच्या शोधात होता. ना वशिला ना पैसा त्यामुळे प्रत्येक ठिकाणी हाती नकारघंटा येत होती. पदवीपर्यंतच शिक्षण वाया गेलं असच त्याला वाटत होत.अश्या परस्थितीमुळे तो अधिक बेडर आणि निडर झाला होता. परिसरात कुठेही साप आला की अमितला बोलावल जायचं. अत्यंत विषारी सापाना तो नुसत्या हातानं पकडायचा. मोटरसायकलवर स्टंट करायचा.अरेला ...अजून वाचा

2

खेळ जीवन-मरणाचा - 2

खेळ ?जीवन -मरणाचा (भाग -2) सुलेमान करोल या नावाचा दबदबा मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये गेल्या पंधरावर्षापासून निर्माण झाला होता. 'सनकी' या नावाने प्रसिद्ध असलेला सुलेमान अत्यंत क्रूर होता. अपहरण.....खून....अमली पदार्थांची तस्करी...खंडणीवसूली असे नाना उद्योग त्याने केले होते.त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते.आज करोडोंच्या संप्पत्तीचा मालक असलेल्या सुलेमानच्या गुन्हेगारीच जाळ भारतातल्या प्रमुख शहरात पसरलं होत. त्याच्याशी विश्वासघात करणार्या लोकांच्या हातांची बोट तो तोडून टाकत असे.रक्तबंबाळ अवस्थेत तडफडत विव्हळणार्या माणसांना बघून आनंदाने खदाखदाखदा हसत बसणे हा त्याचा आवडता खेळ होता. तो मूळचा हैद्राबाद मधला.बालपणात त्याला खूप हाल अन वेदना सोसाव्या लागल्या होत्या . त्याचा बाप हैद्राबाद मधला नामवंत उद्योगपती ...अतिशय थंड डोक्याचा...धंद्याच्या निमित्ताने त्याने ...अजून वाचा

3

खेळ जीवन-मरणाचा - 3

खेळ ?जीवन-मरणाचा (भाग-3) अमितला सायंकाळी सात वाजता तयारीत राहायला सांगितले होते.कोणतेही साहित्य त्याला सोबत घ्यायची परवानगी नव्हती. वातावरण थोड वाटत होत त्यामुळे अमितने स्वेटर घातला होता.पायात नेहमीचे बूट होते. सायंकाळी सात वाजता त्याला कारमधून सुमारे तासाभराच्या प्रवासानंतर एका किनार्यांवर नेण्यात आले. हा भाग थोडा शांत होता.पुढचा प्रवास एका बोटीतून सुरू झाला.बोटीवर एकूण चार माणसं होती.सगळीच शरीराने दणकट होती.ते एकमेकांशी कन्नड भाषेत बोलत होते.अमितने एकदोन वेळा त्याच्यांशी हिंदीत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्याला मोडक्या तोकड्या हिंदीत उत्तरे दिली. अमितच्या लक्षात आल की ते त्याच्याशी बोलायला फारसे उत्सुक नाहित. अमितने त्यांशाशी बोलण्याचा प्रयत्न सोडून दिला. अमित बोटीच्या वरच्या भागात असलेल्या ...अजून वाचा

4

खेळ जीवन-मरणाचा - 4

खेळ ? जीवन -मरणाचा अमित व शायना बराच काळ चालत होती. चालून चालून दोघांचे पाय दुखत होते.तहान लागली होती.अगदी पाणी शिल्लक होत ....ते जपून वापरावं लागत होत.वाटेत कुठंही गोड्या पाण्याचा झरा किंवा डबकं दिसल नव्हते. आपण कुणाच्या नजरेत येवू नये म्हणून ती दोघ झाडीतून चालत होती. कुणीच कुणाशी बोलत नव्हत. ती दोघ टेकडीच्या पायथ्याशी पोहचली तेव्हा सूर्य अस्ताला गेला होता.काळोख होण्याअगोदर आसरा शोधावा लागणार होता.अमितने एखादी सुरक्षित जागा मिळते काय ते शोधायला सुरूवात केली.शायना तीर कामठा बाजूला ठेवून झाडाला टेकून बसली. "अग. एखादा आसरा मिळतो काय ते बघ. नुसतं बसून काय होणार?" "हे बघ मला काही फरक पडत नाही. ...अजून वाचा

5

खेळ जीवन-मरणाचा - 5 - अंतिम भाग

खेळ- जीवन -मरणाचा आघात शेवटचा सुलेमानच्या चमन पॅलेस वरून दोन चिलखती जीप्स बाहेर पडल्या. दोन्ही जीपमध्ये मिळून एकून बारा होती. सारे तडीपार गुंड होते.मशिनगन ...तलवारी अस साहित्य घेवून पहाटेच बाहेर पडले होते.अजून उजाडले नव्हते. हा सारा लवाजमा दोन नंबरच्या टेकडीकडे चालला होता. पाचजणांना बेसावध ठेवून घेरायच अशी त्यांची रणनीती होती.पण पीटरने अर्धवट झोपेतही वाहनांचा आवाज टिपला. " ऊठा..ऊठा .. ,गाड्यांच्या आवाज येतोय..खडकाळ.. वाटेवरुन येताना थोडा वेळ लागेल....तोपर्यंत आपण तयारी करूया.." सारे धडपडून उठले.डोळे चोळतच शायनाने तीर- कामठा हाती घेतला व उडी मारतच ती उभी राहीली. " ईलियास तू टेकडीची उत्तर दिशा पकड ..शिवा तू दक्षिणेकडे जा मी पूर्व दिशा ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय