खेळ जीवन-मरणाचा - 3 बाळकृष्ण सखाराम राणे द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

खेळ जीवन-मरणाचा - 3

खेळ ?जीवन-मरणाचा (भाग-3)
अमितला सायंकाळी सात वाजता तयारीत राहायला सांगितले होते.कोणतेही साहित्य त्याला सोबत घ्यायची परवानगी नव्हती. वातावरण थोड थंड वाटत होत त्यामुळे अमितने स्वेटर घातला होता.पायात नेहमीचे बूट होते.
सायंकाळी सात वाजता त्याला कारमधून सुमारे तासाभराच्या प्रवासानंतर एका किनार्यांवर नेण्यात आले. हा भाग थोडा शांत होता.पुढचा प्रवास एका बोटीतून सुरू झाला.बोटीवर एकूण चार माणसं होती.सगळीच शरीराने दणकट होती.ते एकमेकांशी कन्नड भाषेत बोलत होते.अमितने एकदोन वेळा त्याच्यांशी हिंदीत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्याला मोडक्या तोकड्या हिंदीत उत्तरे दिली. अमितच्या लक्षात आल की ते त्याच्याशी बोलायला फारसे उत्सुक नाहित.
अमितने त्यांशाशी बोलण्याचा प्रयत्न सोडून दिला. अमित बोटीच्या वरच्या भागात असलेल्या छोट्या केबीन मध्ये गेला.तिथे रेलिंगला टेकून तो समोर पाहू लागला.समोरच्या अथांग समुद्राला अंधाराने गिळंकृत केल होत. अमितच मन बेचैन झाल होत.त्याला दोन्ही बहिणी...दम्याने बेजार झालेली ...धापा टाकणारी आई....जबाबदारीच्या ओझ्यांनी थकलेले वडील आठवू लागले. आपण केल ते चूक की बरोबर हे त्याला समजत नव्हते. साहसी खेळाचा सगळा प्रकार त्याला संशयास्पद वाटू लागला.
आता आपल्याला अधिक चौकस व सावध राहाव लागणार हे त्याच्या लक्षात आल.कितीतरी वेळ तो लाटांचा आवाज ऐकत राहिला.एवड्यात एक खलाशी जेवण घेवून आला. जेवणानंतर मस्त ताणून द्यायचं अस त्याने ठरवलं.आता समुद्रावर मंद चंद्रप्रकाश पसरला होता.समोर चांदण्यात चमकणारे पाणी...मध्येच झेपावणारे मासे...त्यांची चांदण्यात चमचमणारी काया हे सार बघता-बघता त्याला कधी झोप लागली ते त्याचे त्यालाच कळले नाही.
भल्या पहाटे त्याला समुद्रपक्ष्यांच्या कलकलाटान जाग आली.त्याने केबिनच्या खिडकीतून बाहेर पाहिले.बाहेर उजाडल होत.आकाश नारिंगी रंगाने सजलेल होत त्याचे प्रतिबिंब पाण्यात पडल होत..हा देखावा मनमोहक होता. अमित उठून बोटीच्या कडेला गेला.समोर एक बेट दिसत होत.चारही बाजूला निळेशार पाणी...अन मध्येच वर आलेले बेट. बेटाचा बराचसा भाग ...हिरवागार दिसत होता.बेटाचा कडेचा भाग खारफुटीच्या जंगलाने वेढलेला होता. थोडी दलदल दिसत होती.साधारण पंधरा विस मिनीटांनी बोट बेटाच्या किनार्याला पोहचली.
बोटीतल्या एका इसमाने त्याला दोन फूड पाकिटे,दोन पाण्याच्या बाॅटल्स एक सॅक दिली...व एक जॅकेट घालण्यास दिले.या जॅकेटाला वायरलेस मायक्रोफोन जोडलेला होता.याशिवाय शस्त्र म्हणून एक दुधारी सुरा दिला .सहा इंच लांबीचा दोन इंच रूंद ...व जाड असा धारदार सुरा होता तो!
"तुम्हाला इतर सुचना बेटावर पाऊल टाकल्यावर मिळतील. " तो इसम म्हणाला.
अमितने खांदे हलवले.जे होईल त्याला तोंड द्यायचे असा त्याने निश्चय केला. तो उडी मारून खाली उतरला. क्षणभर त्याने मागे वळून बघितले.त्याला उगाचच वाटल ते सारे त्याच्याकडे सहानुभूतीने बघताहेत. खारफुटीच जाळ पार केल्यावर बेटाच अंतरंग कळणार होत.त्याने सुरा हातात पकडला व खारफुटीचा आधार घेत तो मुळांवरून चालत सुरुवातीची दलदल पार करू लागला.हे थोड जिकरीच काम होत.दहा बारा मिनिटांच्या कसरतीनंतर खारफुटीच्या भाग संपला व खडकाळ जमीन सुरू झाली. दिर्घ श्वास घेत तो क्षणभर गप्प उभा राहिला. अचानक त्याच्या जाकिटाला बसविलेल्या मायक्रोफोन मघून आवाज आला.
" मित्रा , तूझं या चमन बेटावर स्वागत आहे.माझ्या सूचना लक्ष देवून ऐक.या बेटावर तू एकटा नाहीस....या बेटावर अनेक संकटे तूझी वाट पाहताहेत.तूला लढायचे आहे.जो टिकेल तोच जगेल.तू मारलं नाहिस तर दुसरे तूला मारतील. याच बेटाच्या मध्यावर तूला पाणी आणी खाण्याचे पदार्थ सापडतील.या बेटावर जो एकमेव इसम शिल्लक राहिल तो एक कोटी रूपये घेवून सन्मानाने परत घरी जाईल.जगण्या-मारण्याचा खेळ आता तूझ्यासाठी सुरू होतोय.आणखी एक तूझ्या प्रत्येक हालचालींवर माझी नजर असणार आहे. "
त्यानंतर कुणाचा तरी हसण्याचा आवाज ऐकू आला. आवाजावरून तो इसम विकृत मानसिकतेचा वाटत होता.अमितच्या लक्षात आल त्याला फसवल गेलय.या बेटावरून जीवंत परत जाणे जवळपास अवघड आहे.त्याने अंगावरच जॅकिट काढून फेकून दिलं. त्याला तो आवाज परत ऐकायचा नव्हता.
" अरेच्या...एवड्या लवकर हार मानलीस. इथून पळून जायचा विचारही करू नकोस. ते...कधिही ...शक्य नाही.बेटाभोवतालच्या पाण्यात क्रूर शार्क आहेत...क्षणभरात माणसाचा फडशा पाडतात...आणि जवळपास दुसरा किनाराही नाही."
खाली पडलेल्या मायक्रोफोन मघून आवाज आला.अमितने रागाने दातं ओठ चावले....त्याच्या हाताच्या मुठी घट्ट वळल्या.हातातला सुरा त्याने पलिकडच्या पाण्यात फेकून दिला.
--------------*-----------------*----------------*-----------*---
"यू...बास्टर्ड..." शायना संतापाने ओरडली.
सूचना ऐकून तिच्या अंगाचा तिळपापड झाला होता.
किनार्याकाठी असलेल्या खडकावर ती उभी होती.पाठिमागे समुद्र तर समोर प्रवाळ खडकांची रांग..दूरवर दोन छोट्या टेकड्या झाडीतून डोकावत होत्या. खडकांवर पाय ठेवनेही अवघड वाटत होत .खडकांवर शेवाळ पसरला होता..शिवाय ती अतिशय टोकदार होती. शायना जपून पाऊल टाकत सावधगिरीने पुढे सरकत होती.एक दोन वेळा ती पडता पडता वाचली.खाली पडली असती तर अंगावर असंख्य जखमा निश्चित झाल्या असत्या.
ती काही वेळाने सपाट जागेत पोहचली.बाजूलाच झुडपांची दाट झाडी होती.सावली पाहून ती खाली बसली.मन शांत झाल्यावर ती विचार करू लागली.सुरा फक्त जवळच्या हाणामारीसाठी उपयोगी पडतो....दूरून हल्ला करण्यासाठी..एखाद हत्यार जवळ पाहिजे.तिने आजूबाजूंच्या झुडपांच निरिक्षण केल.एका झुडपाची लवचिक फांदी तिने सुरा वापरून कापली.फांदीची साल सोलून काढली.तीन फूट लांबीच्या त्या काठीच्या दोन्ही टोकांना खाचा पाडल्या. सालीच्या मजबूतीची खात्री झाल्यावर तिने एका बाजूला साल व्यवस्थित बांधली.काठी वाकवत तिने साल दुसर्या बाजूला ताणून बांधली. एक छान पैकी धनुष्य तयार झाला होता. दिड फूट लांबीच्या कमी जाडीच्या काठ्या काढून एका बाजूने तासून त्यांना अणुकुचीदार बनवलं. आता बाण तयार झाले होते. शायनाने परीक्षा घेण्यासाठी धनुष्यावर बाण चढवला दोरी ताणली व बाण सोडला .बाण वेगाने जात सुमारे पन्नास ते साठ फुटांवर जाऊन पडला.या सार्या खटाटोपात अंदाजे तासभर वेळ गेला.आता तिला भूक लागली होती.पाठीवरची सॅक काढून त्यातलं एक फूड पॅकेट तिने फोडले.आत ड्राय फ्रूटस होते.ह्याने माणसाची भूक कशी भागेल? वैतागत तिने अख्खे पाकिट तोंडात उलटे केले.त्यावर थोड पाणी पिऊन ती क्षणभर गप्प बसून राहिली.अचानक तिच लक्ष डाव्या बाजूला गेल ती शहारली. पंधरा एक फुटांवर एक मानवी सांगाडा खडकाला टेकून ठेवल्यासारखा होता.
शायना उठून तिथे गेली.महिनाभरापूर्वीचा तो सांगडा असावा.जखमी अवस्थेत कुणीतरी खडकाला टेकून बसला होता आणि त्याच अवस्थेत कुणीतरी त्याच्या मांसाचा कणन कण खाल्ला होता. त्या माणसाला पळण्याची संधीही मिळाली नव्हती
" ओ, गाॅड... मॅन ईटर मुंग्या....! " शायना बडबडली. होय ...! नक्कीच मुंग्यानीच त्याचा जीवंतपणी फडशा पाडला होता. शायनाने आजूबाजूला पाहिले.तिला एक कागद दिसला.त्या कागदावर तामिळ भाषेत काहितरी लिहिलेलं होत व त्याखाली एका इमारतीचा नकाशा व तिथपर्यंत पोहोचायचा मार्ग दाखवला होता. तामिळ येत नसल्याने त्यावर काय लिहिलंय हे कळत नव्हते. या कागदाचा कधितरी उपयोग होईल अस वाटल्याने तिने तो कागद आपल्याजवळ ठेवला. आजूबाजूला पाहत ती नेमकं कुठच्या बाजूने जायचे याचा विचार करू लागली. इथे दिशा कळत नव्हत्या.अचानक कसलातरी आवाज तिच्या कानांनी टिपला.
समोरच्या झुडपांपलिकडून आवाज आला होता.ती अतिशय सावधगिरीने पुढे सरकली.एखाद रानटी जनावर किंवा तिच्यासारखा एखादा स्पर्धक असावा असा विचार करत सुरा परजत ती पुढे सरकली.झुडपा पलिकडे एक तरूण पाठमोरा उभा होता.त्याच्या डाव्या हातात काठी होती. शायनाने सुरा त्याच्या मानेवर टेकवला.
" जराही हललास...तर गळा चिरीन.....हातात काय आहे ते फेक."
अनपेक्षितपणे तो तरूण वळला.त्याच्या चेहर्याकडे लक्ष जाताच ती दचकली.
"तू...?"
मँगलोरात स्टेशनवर भेटलेला.... तिला धक्का देणारा तरूण होता तो! तिने रागाने वार करण्यासाठी सुरा फिरवला.
चपळाईने बाजूला सरकत त्याने वार चुकवला.
" मूर्ख..मुली थांब...आधी याचा निकाल लावतो .नंतर तूला जे करायचे ते कर." त्याने आपला उजवा हात समोर धरला. त्याने उजव्या हाताने एका ब्लॅक कोब्रा जातीच्या सापाचे तोंड गच्च पकडले होते ..पाच फूट लांबीच्या त्या सापाने त्या तरुणाच्या हाताला विळखा घातला होता.शायना भयाने शहारली.एक दंश अन काही मिनीटात तडफडून मृत्यू...! हातातली काठी फेकत तरूणाने मोठ्या प्रयत्नाने सापाच्या विळखा सोडवला. त्या जाडजुड सापाची शेपटी पकडून त्याला गरागरा फिरवत त्याने त्याला हवेत सोडून दिले .दूरच्या खडकावर आपटून तो साप तिथेच वळवळत पडला.नंतर तो शायनाकडे वळून म्हणाला...
" हे बघ तूला जे करायचे ते करू शकतेस...मूलींवर हात टाकायची आपल्याला सवय नाही. मुळात या नस्त्या फंदात तू कशी काय पडलीस?"
" मुलगी समजून मला कमी लेखू नकोस .तूझ्या सारख्या पाचसहा जणांना सहज झोपवेन मी.... समजल?"
" हे बघ कुणितरी आपल्याला खेळवतोय...ऐकमेकांना मारून आपण त्यांच काम कमी करणार आहोत.एकत्र आलो तर यातून सुटकेचा मार्ग सापडेल."
शायना गप्प राहिली. तिला तो सांगत असलेलं पटलं होत.
"मी शायना ...गोव्यातली..! प्रथम आपल्याला एखादा आसरा शोधावा लागेल."
" मी अमित डोंबिवलीचा....! आधी पाणी व खाण्याचा शोध घ्यावा लागेल....समोरच्या टेकडीवर गेल्यास सभोवतालचा परिसर दिसेल. " अमित तिच्याकडे न बघता टेकडीच्या दिशेने चालू लागला.या वेळी सूर्य डोक्यावर आला होता.शायनाही गुपचूप त्याच्या मागोमाग चालू लागली.आज पहिल्यांदाच ती कुणा पुरूषाच ऐकत होती.
--------------*-----------------*---------------*--------*-----
ईलियास शेखने खारफुटीच्या काठीचे वितभर लांबीचे तुकडे काढून त्यांची टोक तासून .धारदार बनवली.हाताने फेकून मारता येईल अस शस्र त्याने तयार केले.त्याचा नेम अचूक होता.चाकू ...सुरे फेकून मारण्यात त्याचा हातखंडा होता.पंधरा ते वीस तुकडे त्याने तयार केले. आता समोर कुणीही येवू दे..त्याचा सामना करायचाच असा त्याने निश्चय केला.
एक फूड पॅकेट तोंडात टाकून त्यावर पाणी पिऊन तो पुढची वाट चालू लागला.लवकरच त्याला एक मोठा ओढा दिसला. ओढा पार करून पलिकडे जात येईल का हे पाहण्यासाठी तो पाण्यात उतरला.अचानक पाण्यात खळबळ झाली.धोक्याची जाणीव झाल्याने तो त्वरित पाण्याबाहेर पडला.त्याच्या पाठोपाठ एका मगरीने उडी घेतली .ईलियासचा पाय तिच्या जबड्यात येतायेता वाचला .पण या गडबडीत तो खाली पडला.आता मगर त्याच्या पासून चार ते पाच फुटांवर होती.त्याही स्थितीत त्याने कंबरेचा सुरा हातात घेतला.तेवढ्यात धडपडीचा आवाज आला. ईलियास कसाबसा उठून उभा राहिला. बघतो तर काय? समोर मगरीच्या पाठीवर एक दणकट तरूण स्वार झाला होता.आपल्या बलिष्ट हातांनी त्याने मगरीचा जबडा गच्च दाबून धरला होता.मगर शेपटी आपटत होती पण तरूण शिताफीने स्वताःचा बचाव करत होता.
"जाकिट काढ...त्याने या मगरीच्या जबडा गच्च बांध ...लवकर...घाई कर."
ईलियासने झटपट कातडी जाकिट काढलं व मगरीच्या जबड्याभोवती गुंडाळून घट्ट बांधलं.मगरीचा जबडा सोडून तो तरूण धापा टाकत उभा राहिला. ईलियास शेख त्याला मिठी मारत म्हणाला.
" दोस्त...तूने मेरी जान बचायी...आता तूझ्या साठी काय वाटेल ते करेल हा ईलियास.पण तू..तू कोण आहेस?"
"मी शिवा...साहसी खेळ म्हणून भाग घेतला..पण...नेमकं काय चाललंय तेच कळत नाहीय."
"हमे फसाया गया है....पण काहीही होऊंदे आपण एकमेकांना मारणार नाही आहोत." हात पुढे करत ईलियास म्हणाला.शिवानेही मैत्रीचा हात स्विकारला. तोपर्यंत
दुपार होऊन गेली होती.सूर्यकिरणे रूंदावली होती.
" आपण ओढ्याच्या काठान गेलो तर सायंकाळ पर्यंत त्या टेकडीपर्यत पोहचू...तिथ रात्र काढता येईल." शिवा म्हणाला.
दोघंही टेकडीच्या दिशेने चालू लागले.
---------*----------*----------*----------*--------
हे सगळं मोठ्या स्क्रीनवर पाहत असलेला सुलेमान संतापाने वेडापिसा झाला.
" मूर्ती..या वेळी वेगळ घडतेय हे एकमेकांना मारण्याऐवजी...गळा कापण्याऐवजी.... एकमेकांच्या गळ्यात पडताहेत. वेळ पडल्यास आपल्या माणसांना तयार ठेव."
मूर्तीने मान डोलावली
"आपली माणसं तयार आहेत.गरज लागल्यास या सगळ्यांना पळवत-पळवत हाल-हाल करून ठार मारतील.पण थोडा वेळ वाट पाहूया..बाहेर पडण्याचा दुसरा मार्ग नाही हे कळल्यावर ...निश्चितच हे सगळे एकमेकांच्या जीवावर उठतील..मग खेळात रंगत येईल."
सुलेमान चेहर्यावरच्या काळ्या डागाला कुरवाळत विखारी हसला.

----*-----*-------*-------*--------*------
भाग 3 समाप्त