खेळ जीवन-मरणाचा - 4 बाळकृष्ण सखाराम राणे द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

खेळ जीवन-मरणाचा - 4

खेळ ? जीवन -मरणाचा
अमित व शायना बराच काळ चालत होती. चालून चालून दोघांचे पाय दुखत होते.तहान लागली होती.अगदी थोडेच पाणी शिल्लक होत ....ते जपून वापरावं लागत होत.वाटेत कुठंही गोड्या पाण्याचा झरा किंवा डबकं दिसल नव्हते. आपण कुणाच्या नजरेत येवू नये म्हणून ती दोघ झाडीतून चालत होती. कुणीच कुणाशी बोलत नव्हत.
ती दोघ टेकडीच्या पायथ्याशी पोहचली तेव्हा सूर्य अस्ताला गेला होता.काळोख होण्याअगोदर आसरा शोधावा लागणार होता.अमितने एखादी सुरक्षित जागा मिळते काय ते शोधायला सुरूवात केली.शायना तीर कामठा बाजूला ठेवून झाडाला टेकून बसली.
"अग. एखादा आसरा मिळतो काय ते बघ. नुसतं बसून काय होणार?"
"हे बघ मला काही फरक पडत नाही. तूला वाटत तर शोध.मी एखाद्या दगडावरही झोपेन." शायनाने उत्तर दिल.
"मूर्ख कुठली. एखाद्या प्राण्याला आयत खाद्य मिळेल. "
" माझ मी बघून घेईन.तसही या बेटावरून एकच व्यक्ती जीवंत बाहेर जाणार आहे."
अमित हसला व म्हणाला.."मला तेही खर वाटत नाही. मरायचं आहे तर लढून मरूया."
शायनाने काहीच उत्तर दिल नाही. अमित निरीक्षण करू लागला.टेकडी साधारण शंभर एक मीटर उंच होती.टेकडीवर फारशी झाडी नव्हती.
अमितला थोड्या अंतरावर एक कपारी सारखा भाग दिसला. पायथ्यापासून पंधराएक फूटांवर ती कपार होती.दोन मोठ्या जांभ्या खडकांच्या मध्ये त्रिकोणी मोकळी जागा तयार झाली होती.दोन माणसं कशीबशी मावतील अशी ती जागा होती.
"रात्र तिथे काढायची?" शायनाने विचारले.
"होय. तिथे थोडंफार सुरक्षित वाटेल."
अमित खुरट्या झाडांना पकडून वर चढू लागला. त्या पाठोपाठ शायनाही वर चढू लागली.तिथे पोहचल्यावर लक्षात आल की ती जागा खालून वाटत होती त्या पेक्षा थोडी जास्त रुंद होती. अमितने आतल्या भागाचं निरीक्षण केल.आत एखादा साप किंवा जनावर नाही याची त्याने खात्री केली.अमितने सॅक आत ठेवली.बाहेर वाळलेल गवत होत ते त्याने गोळा केल. काही सुकलेल्या काठ्या त्याला मिळाल्या.काठ्यांचा ढिग करून त्यावर गवत पसरलं.
" कित्ये करतंय?"
अमितने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं.
" काय करतोस?" तिने पुन्हा विचारल.
"आग पेटवायची व्यवस्था करतोय."
"आग? आणि ती कशी पेटवणार.?"
अमित हसला व म्हणाला...
"आपल्या जवळ प्रकाशाचं कोणतच साधन नाही. रात्री जोरात थंडी असेल. शिवाय जंगली जनावरांपासून संरक्षण मिळेल. "
एव्हाना पूर्ण काळोख झाला होता.आजूबाजूच्या गोष्टीही दिसत नव्हत्या.मंद बोचरा वारा सुटला होता..चंद्रोदय व्हायला बराच अवधी होता.आजूबाजूच्या परीसरातून चित्रविचित्र आवाज येत होते.किती वाजले ते कळायला कोणताच मार्ग नव्हता. अमितला भुकेली जाणीव झाली.दोन्ही फूड पॅकेटस दुपारीच संपली होती. शायनाकडे काही पदार्थ शिल्लक आहे का हे विचारायला त्याचा पुरुषी अंहकार आडवा येत होता.तो तसाच सॅकच्या बाजूला खडकाला टेकून बसला.मध्येच आकाशात दोन वेळा प्रकाशझोत डावीकडून उजवीकडे फिरत गेल्यासारखा दिसला.कदाचित ती सर्चलाईट असावी.थंडी थोडी वाढली होती.अमित उठला व सॅकमधून दोन गोलाकारा गारगोट्या काढल्या.या गारगोट्या त्याने सकाळी नदीकाठावरून गोळा केल्या होत्या. तो लाकडाच्या ढिगाजवळ गेला.गारगोट्या एकमेकांवर घासून गवतावर ठिणगी पाडण्याचा प्रयत्न करू लागला. बराच वेळ त्याचा हा प्रयत्न चालला होता.
शायना त्याची ही धडपड बघून हसली.
" अरे कित्ये करतंय खुळ्यागत?"
पण अखेर अमितच्या प्रयत्नांना यश आल व ठिणगी गवतावर पडली व गवताने पेट घेतला .निळसर-जांभळ्या ज्वाळा निर्माण झाला. कपारीत उजेड पडला.
" या खुळ्यान आग पेटवली, बघ" अमित हसत म्हणाला. उबदार हवा कपारीत पसरली. शायनाने आपल्या सॅकमधून कसलीतरी छोटीसी फळ काढली व तोंडात टाकून चघळू लागली.ज्वाळांच्या प्रकाशात तिच हलणारे तोंड बघून अमितच्या पोटात कावळे ओरडायला लागले. शायनाने हसत आपला हात अमित समोर धरला .
" घे,--- ही खारफुटीच्या एका जातीच्या झाडाची आहेत. यात प्रोटीन भरपूर असतात."
अमितने काही फळ तोंडात टाकून चघळली. एखाद्या सरबतासारखी चव होती.शायनाने त्याला आणखी ओंजळभर फळे दिली.
"छान आहेत.पण तूला कस कळल ही फळ खातात ते?"
" बाॅटनीत पदवी केली ती फुकट काय?"
दोघांनी शिल्लक राहिलेल पाणी थोड थोड पिऊन खडकावर अंग पसरलं.अमित कुशीवर वळून शायनाकडे बघत होता.एखाद्या तरूणीने या जीवघेण्या साहसात उडी का घ्यावी हेच त्याला कळत नव्हते.
" हे बघ मी एकटी आहे म्हणून तूझ्या डोक्यात काही वेगळे विचार असतील तर ते काढून टाक. मी माझ संरक्षण करायला समर्थ आहे." शायना म्हणाली.
अमित हसला व म्हणाला.....
" मला तुझ्यात जराही रस नाही. "
शायनाने अमितकडे रागाने कटाक्ष टाकला व तोंड फिरवून झोपण्याच्या प्रयत्न करू लागली.कपारीत आता ऊबदारपणा निर्माण झाला होता.बाहेर आता भयाण शांतता पसरली होती.वारा व खूप दूरवरून येणारा समुद्राचा आवाज ऐकता ऐकता दमलेली ती दोघ गाढ झोपली.
.............*............*................*..............*.......
सकाळी कसल्या तरी आवाजाने शायनाला जाग आली. आळस देत तिने परतून बधितल व ती दचकली .तिथे अमित नव्हता.तो एकटाच गुपचुप निघून गेला की काय अस तिला वाटल .क्षणभर तिच्या चेहर्यावर उदासी पसरली.एक विलक्षण रूखरूख मनाला वाटली. हे अस यापूर्वी कधीच कुणासाठी वाटल नव्हतं. ती स्वतः वर वैतागली. खांदे उडवत मनातल्या मनात म्हणाली..' गेला तर गेला... उडत जावू दे.'
ती कपारीच्या बाहेर आली. बाहेर पांढरा शुभ्र घुंक पसरलं होत.वातावरण उत्साहदायक होत.एवड्यात घुक्यातून कुणीतरी येताना दिसल.शायना सावध झाली.तिने लढण्याचा पवित्रा घेतला .ती झेप घेणार एवड्यात ..
"ये थांब...जेव्हा तेव्हा मारामारी करायच कस सुचत तूला?"अमित म्हणाला.
"तू.?"
"मीच! तूला काय वाटल ? पळून गेलो?"
" गेला असतास तर बर झाल असत." ती वैतागली.
" खाली उजवीकडे ओढा आहे.पाणी स्वच्छ पण मचूळ आहे. तिथ एक ताडासारख एक झाड आहे.तिथे एक छोटा गोड्या पाण्याचा झरा आहे. मी बाटली भरून आणलीय. तू जा...तोंड वैगेरे धुवून ये."
शायना फ्रेश होऊन आल्यावर दोघंही टेकडीच्या शिखरावर गेली.वरून बेटाचा परीसर दिसत होता.कोवळ्या ऊनात सारा परीसर न्हाऊन निघाला होता.छोट्या छोट्या टेकड्या....पाण्याचे प्रवाह....खडकाळ मोकळा भाग...दगडांचे नैसर्गिक मनोरे .. एकूणच सुंदर दृश्य होत ते. एवड्यात शायनाचे लक्ष एका दृश्याने वेधले.थोड दूरवर एक माणूस अर्धा दलदलीत बुडाला होतो...व बाहेर पडण्याची केविलवाणी धडपड करत होता.तो इंच इंचाने खाली जात होता.
" अमित तो बघ कुणी तरी दलदलीत बुडतोय..त्याला मदत हवी आहे."
"अरेच्या ... तो कुणीतरी विदेशी इसम दिसतोय. चल..."
दोघंही उतारावरून घसरत खाली उतरू लागले. काही वेळातच ती दोघ खाली पोहचली.घावतच त्यांनी दलदलीपर्यंतचे अंतर पार केल.
" हालचाल करू नका...!आम्ही मदत करतोय." शायना ओरडली. खर म्हणजे तिथे दलदल असेल अस कुणालाही वाटल नसत.ओलसर जमीन असावी तसा तो भाग होता. अमितने जवळच्या खुरट्या झाडाकडे धाव घेतली.सहा ते सात फूट लांबीची फांदी त्याने ताकद लावून मोडून काढली व धावतच दलदलीजवळ आला.तोपर्यंत तो इसम छातीपर्यंत चिखलात बुडालेला होता.फांदी त्या इसमापर्यंत पोहोचवून अमित ओरडला...
"पकडा....आम्ही हळूहळू ओढून घेतो. "
त्या इसमाने जीवाच्या आक॔ताने फांदी पकडली.अमित व शायना दुसरीकडून फांदी ओढू लागले.खरे म्हणजे हे अती जिकिरीचे काम होत.पण अखेर त्या इसमाला दलदलीच्या बाहेर काढण्यात यश आल.तो विदेशी इसम प्रचंड थकलेला होता.....त्याच्या शरीरावर चिखलाचा थर पसरलेला होता. बाहेर येताच त्याने स्वतःला जामिनीवर झोकून दिले.काही वेळ तो तसाच पडून राहिला.दहा -बारा मिनिटांनी त्याने डोळे उघडले.
"पाणी....पाणी..."त्याच्या डोळ्यात व्याकुळता होती.अमितने बाटलीतील पाणी त्याला पाजले.पाणी पिऊन तो थोडा ताजातवाना झाला.आमित व शायनाने त्याला झाडाला टेकून बसवले.शायनाने त्याला काही फळ दिली.
"एका वाघाने माझा पाठलाग केला. त्याला चुकवताना मी दलदलीत अडकलो. तूम्ही आला नसता तर माझा खेळ संपला असता. तुम्ही पण माझ्यासारखे या चक्रव्यूहात अडकला आहात ना?"
" होय.पण आपल्याला अडकवणारा कोण? आणि त्याच्यापर्यत कस पोहचायच हेच कळत नाही." अमित म्हणाला.
. "माझ्याजवळ एक नकाशा असलेला तामिळ भाषेत लिहिलेला एक कागद आहे.कदाचित त्यावरून एखादा धागा मिळेल. " तिने सॅकमधून हाडांच्या सांगाड्याजवळ मिळालेला कागद दाखवला.
"मलाही तामिळ भाषा येत नाही. पण मला वाटत यात एका इमारतींची आतली रचना व तिथ पर्यंत पोहण्याचा मार्ग दाखवला आहे.कदाचित आपल्याला खेळवणार्या लोकांचं हे ठिकाण आहे.पण तूला हा नकाशा कुठे सापडला."
शायनाने त्याला सारी हकीकत सांगितली.
" हे लोक अत्यंत क्रूर व निर्दयी आहेत.माझ नाव पीटर गेट आहे.मी फ्रीस्टाईल कुस्तीपिटू आहे.एखाद्याची डोक फोडण...हात- पाय तोडणे हा माझ्या डाव्या हाताचा मळ आहे पण कारणाशिवाय एखाद्याला जीव घेणं हे मात्र खूपच निर्दयीपणाच आहे."
" हे बघा गेट सर ,या टेकडीला वळसा घालून एक ओढा वाहतोय आंधोळ करून घ्या . काही संशयास्पद आढळल्यास सूचना द्या." अमित म्हणाला.
अमित व शायना झाडाखाली बसून विश्रांती घेवू लागले.
-------*---------------*-------------*----------------*--------
पीटर येईपर्यंत तास दिड तास गेला असावा.पीटरला बघून दोघं जण आश्चर्यचकित झाले.जवळपास सहा फूट उंच....गोरापान चेहरा...अगदी खांद्यापर्यत रूळणारे केस.....चेहर्यावर दोन जखमांचे व्रण...रुंद खंदे....दणकट मनगट यामुळे प्रौढ वयातही तो आकर्षक वाटत होता.आल्या आल्या त्याने दोघांशी हस्तांदोलन केल.तो खुपच रिलॅक्स वाटत होता.
" आपल काहीही होऊ दे...ज्याने आपल्याला इथे अडकवलय त्याला धडा शिकवायचाच." पीटर म्हणाला.
."सगळं खर पण शत्रू अज्ञात आहे व त्याची ताकदही आपल्याला माहित नाही. " शायना म्हणाली.
"काही वेळा अज्ञान फायद्याचे ठरत." अमित म्हणाला.
एव्हाना दुपार उलटून गेली होती. पाणी पिऊन व शायनाकडची उरलेली फळ खाऊन ते पुढे निघाले.बर्याच वेळ चालल्यावर ते पुन्हा एका छोट्या टेकडीजवळ पोहचले. इथ पायथ्याशी छोट्या झाडांची दाटी होती. पलिकडे नजरेच्या टप्प्यात ती सकाळी दिसलेली दगडांची मोठी चळत होती.कदाचित तिथेच अन्न व पाणी ठेवलेलं असावं.पंचवीस फूट उंच व पाच सहा फूट रुंद अशी ती चळत होती.
सध्या तरी तिथ जाण धोकादायक वाटत होत.
" आपण इथंच थांबून व ऊन्ह कलल्यावर तिथे जाऊया."अमित म्हणाला.तिघे तिथे सावलीत हिरवळीवर विसावले. काही वेळ असाच गेला अचानक समुद्री पक्षांचा कलकलाट ऐकू येवू लागला .त्या पाठोपाठ रानटी कुत्र्यांचा आवाज...कानावर आला. तिघेही धडपडून उठले.शायनाने आपला तीर -कामठा उचलला. अमितच्या हाती शायनाचा सुरा होता. धावतच ती तिघं झाडीतून बाहेर आली.समोरच दृश्य भयावह होत.दोन तरूणांना पाच सहा रानटी कुत्र्यांनी घेरले होत.ते दोघे लढण्याचा पवित्रा घेऊन ओरडत होते. एकाच्या हाती सुरा होता तर दुसर्याच्या दोन्ही हातात छोटै टोकदार लाकडी भाले होते....तो ते रानटी कुत्र्यांनी फेकत होता.
" कोळसुंद्रे...एकदा मागे लागले की वाघाला सुध्दा घेरून मारतात." शायनाने ओरडत तीर काट्यावर चढवला व नेम घरून तीर सोडला.झेप घेण्याच्या तयारीत असलेल्या एका कुत्र्याच्या मानेत तीर घुसला.त्याचवेळी अमित व पीटर मोठ्याने ओरडत धावले. अचानक बदललेल्या परिस्थितीने भुकेल्या कुत्र्यांनी पळ काढला.
तिघेही धावतच त्या तरूणांजवळ पोहचले.ते तरूण म्हणजे दुसरे तिसरे कुणीही नसून ईलियास शेख व शिवम दुबे होते.
" ते तसेच आजूबाजूला राहतील...एकदा सावज हेरल्यावर थे पिच्छा सोडत नाही. " शायना म्हणाली.
" आपल्याला इथून दुसरीकडे सुरक्षित ठिकाणी पोहचले पाहिजे. सगळे एकत्र राहिलो तरच त्यांचा सामना करू शकतो."अमित म्हणाला.

"सच कहा दोस्त..ज्याने खेळाच्या नावावर आपल्याला फसवलय उसको तो छोडेंग नही." ईलियासखान त्वेषाने म्हणाला.
" होय आपण आता पाचजण झालोय...पाच पांडव ...एक वज्रमूठ...लढून विजयी होवू. " शिवम म्हणाला.
" हे बघा जे कुणी आहेत ते आपल्यावर नजर ठेवून आहेत...आपल्याला प्रचंड तयारी करावी लागेल." पीटर म्हणाला.
"काहीही झाल तरी आपण एकमेकांशी लढणार नाही...व अखेरपर्यंत एकजूटीन लढू..अशी छपथ घेवूया."
पाचहीजणांनी हातावर हात ठेवत छपथ घेतली.
पाचहीजण त्या दगडी चळतीजवळ सावधगिरीने गेले. शिवम दगडांवरून चळतीच्या टोकावर चढला.तिथे अवघी चार फूड पॅकेटस व चार पाण्याच्या बाटल्या होत्या. ते सर्व त्याने खाली फेकले ईलियिसने ते झेलून घेतले.
तो खाली उतरल्यावर सारे पुन्हा टेकडीच्या परतले .
आजची रात्र या टेकडीवर काढायच त्यांनी ठरवलं.टेकडीच्या शिखरावर पोहचेपर्यत सायंकाळ झाली होती. एक मोकळी सपाट जागा त्यांनी रात्र काढण्यासाठी पसंत केली. सारे स्थिरस्थावर झाल्यावर शासनाने पुन्हा तो नकाशा सर्वांसमोर ठेवला. सुदैवाने शिवाला तामिळ वाचता येत होत.त्याने तो नकाशा काळजीपूर्वक नजरेखाली घातला.
"हा नकाशा त्या संयोजकाच ठिकाण दाखवतो.तिथपर्यंत कस पोहचायच त्याचा मार्ग दाखवला आहे.दगडी चळतीपासून पूर्वेकडे सुमारे तीन किलोमीटरवर एक नैसगिर्क गुहा आहे थोडी अरुंद व ओलसर अशी ही गुहा आहे.ही गुहा थेट या इमारतीच्या पाठीमागच्या खडकात उघडते.गुहेतून गेल्यास कॅमेर्यापासून बचाव होईल.इमारतीच्या पाठीमागे एक छोटी इमारत आहे.त्यात शस्र ठेवलेली आहेत.इमारतीच्या दोन्ही बाजूला टिपवर आहेत व त्यावर मशिनगनधारी पाहरेकरी चौविस तास पहारा देत असतात."शिवाने सर्वांना समजावले.
"पण त्याला हे कस समजले." इलियासने विचारले.
" हा इसम आपल्यासारखाच पहिल्या सत्रात या खेळात भाग घ्यायला आला होता. एकमेकांना मारता- मारता हा एकटाच उरला होता. त्यावेळी योगायोगाने त्याला या गुहेचा शोध लागला होता.पण जखमी असल्याने तो मागे फिरला होता.इथली माणसं त्याचा पाठलाग करत होती. बक्षीस वैगेरे हे सार खोट होत.अस त्याने लिहिलंय."
" म्हणजे इथून कुणालाच बाहेर पाठवायचं नाही अशी त्यांची योजना आहे." अमित म्हणाला.
" आपण त्यांच्याशी लढूया. पण प्रथम त्या गूहेचा शोध लावूया. ते आपल्या पर्यंत पोहचण्यापुर्वी आपण तिथे जावूया." शायना विचार करत म्हणाली.

------****--------****-------**-------*-------
हे सर्व बघून संतापलेल्या सुलेमानने मूर्तीला सूचना केली...
"एक दोन नव्हे..पाचजण एकत्र आले आहेत आणि बहुतेक आमच्याशी लढण्याच्या गोष्टी करताहेत...अस झाल तर आपल्या लाईव्ह कार्यक्रमाची रेटिंग घसरणार आहे. एक काम कर आपल्या माणसांना पाठव... प्रत्येकाला शोधून काढून मारा....एकही जीवंत राहता कामा नये....समजल."

"ठिक आहे...आता रात्र होइल. उद्या..सकाळी...दहा निवडक नेमबाजांना पाठवतो.तसेही ते उपाशीपोठी व हत्याराविना फार काळ लढू शकणार नाहीत. "
"त्यांना थोड पळवा जीव वाचवायची धडपड करू द्या...थोडी मजा येऊ दे...मग ठोका त्यांना!" सुलेमान आसुरी हसत म्हणाला.
----------*------------*------*--------------*----------*'
भाग चौथा समाप्त.