त्या दिवशी एक जानेवारीला शुक्रवारी आम्ही सगळे फेरफटका मारण्यासाठी घराच्या बाहेर पडलो. अर्ध्या रस्त्यात असताना माझा फोन खणखणला. "हॅलो राघव" "हां बोला इन्स्पे नाईक",मी "तू जिथेही असशील तिथून त्वरित मी पाठवलेल्या पत्त्यावर ये. आल्यावर मी सांगतो सविस्तर.",इंस्पे नाईक "ठीक आहे सर मी येतो लगेच",मी "काय झालं? नवीन केस आहे वाटते!", रत्नेश "हो मला निघायला हवं. तुम्ही सगळे लंच करून घ्या माझी वाट पाहू नका. "हो हो ते तर ओघाने आलंच ",विघ्नेश मी त्वरित इन्स्पेक्टर नाईकांनी पाठवलेल्या पत्त्यावर पोचलो.
Full Novel
सातव्या मजल्यावरील रहस्य - भाग 1
त्या दिवशी एक जानेवारीला शुक्रवारी आम्ही सगळे फेरफटका मारण्यासाठी घराच्या बाहेर पडलो. अर्ध्या रस्त्यात असताना माझा फोन खणखणला. "हॅलो "हां बोला इन्स्पे नाईक",मी "तू जिथेही असशील तिथून त्वरित मी पाठवलेल्या पत्त्यावर ये. आल्यावर मी सांगतो सविस्तर.",इंस्पे नाईक "ठीक आहे सर मी येतो लगेच",मी "काय झालं? नवीन केस आहे वाटते!", रत्नेश "हो मला निघायला हवं. तुम्ही सगळे लंच करून घ्या माझी वाट पाहू नका. "हो हो ते तर ओघाने आलंच ",विघ्नेश मी त्वरित इन्स्पेक्टर नाईकांनी पाठवलेल्या पत्त्यावर पोचलो. सप्तसूर नावाच्या एका बिल्डिंग भोवती खूप लोकं जमा झाले होते. दुरून इन्स्पेक्टर नाईक फोनवर बोलत असताना दिसत होते. मी इन्स्पेकटर नाईकांच्या शेजारी ...अजून वाचा
सातव्या मजल्यावरील रहस्य - भाग 2
"काही लिंक लागतेय का राघव? तू तन्मय ची डेडबॉडी तपासली का?", इन्स्पेक्टर नाईक "हो सर मी अगदी बारकाईने निरीक्षण तन्मय पाठीवर पडला आहे. त्याचे डोके बिल्डिंग कडे आणि पाय रस्त्याकडे आहेत. तो ज्या अवस्थेत पडला आहे त्यावरून दोन शक्यता आहेत. एक तर दारूच्या नशेत असल्याने तोल जाऊन तो खाली पडला किंवा त्याला कोणीतरी ढकललं. आणखी एक गोष्ट मला कळली ती म्हणजे हा लांब केस जो तन्मय च्या शर्टवर मला दिसला तो मी ह्या प्लास्टिक च्या पिशवीत ठेवला आणि तन्मय चा शर्ट मागच्या बाजूने थोडा फाटला आहे. माझ्या मते खाली पडताना त्याचा शर्ट कशाला तरी अडकला असावा",मी "तो केस कोणाचा ...अजून वाचा
सातव्या मजल्यावरील रहस्य - अंतिम भाग
"कारण ते कॅक्ट्स चं रोप फार दुर्मिळ होतं. विजय ने खूप शोध घेऊन ते रोप आणलं होतं",अर्पित "अच्छा असं का! विजय तू कुठून आणलं हे रोप?",मी "मी नाही हो सर, आमचा दुसरा एक मित्र आहे त्याचेही नाव विजयच आहे.",विजय "अरे! असं आहे का! मग तो विजय का नाही आला पार्टी ला तुमच्यासोबत?",मी "त्याची तब्येत बरी नाहीये",राजेश "कुठे राहतो तो?",मी "तो इथून 2 किलोमिटर वर राहतो. तिथे त्याचा बंगला आहे.",अर्पित "मग असं करायचं का, आपण त्याला भेटायला जायचं का? म्हणजे मला त्याला कुंडी बद्दल विचारता येईल आणि तो आजारी असल्याने तुमचीही त्याच्याशी भेट होईल.",मी "हो चालेल आम्हालाही त्याला भेटायला जायचच ...अजून वाचा