नागपूरच्या अभेद्य सेफ कॉर्पोरेशन मधील घड्याळ रात्रीचे अकराला पाच कमी असल्याची वेळ दाखवत होतं. वज्र द्विवेदी निघण्याच्या तयारीतच होता. तेवढ्यात फोन वाजला. पाच मिनिटे उशिरा जर फोन आला असता तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून तो ऑफिस मधून निघून गेला असता.. पण आज त्याचं भाग्य तेवढं नव्हतं त्याने फोन उचलला. रात्रीच्या वेळेला त्याच्या ऑफिसची अशी पद्धत होती की फोन उचलला की लगेच त्याचं रेकॉर्डिंग सुरू होत असे. मनात ती जाणीव ठेवूनच त्याने फोन उचलला.
तिजोरी - प्रकरण 1
तिजोरीप्रकरण १नागपूरच्या अभेद्य सेफ कॉर्पोरेशन मधील घड्याळ रात्रीचे अकराला पाच कमी असल्याची वेळ दाखवत होतं. वज्र द्विवेदी निघण्याच्या तयारीतच तेवढ्यात फोन वाजला. पाच मिनिटे उशिरा जर फोन आला असता तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून तो ऑफिस मधून निघून गेला असता.. पण आज त्याचं भाग्य तेवढं नव्हतं त्याने फोन उचलला. रात्रीच्या वेळेला त्याच्या ऑफिसची अशी पद्धत होती की फोन उचलला की लगेच त्याचं रेकॉर्डिंग सुरू होत असे. मनात ती जाणीव ठेवूनच त्याने फोन उचलला.“अभेद्य सेफ कॉर्पोरेशन” तो यांत्रिकपणे म्हणाला.“मी हितेंद्र कपूर” फोन मधून एक उद्धट वाटणारा आवाज आला. रोज अनेकांचे फोन घेऊन वज्रला आवाजावरून त्यांचं व्यक्तिमत्व कसं असेल याचा बरोबर अंदाज ...अजून वाचा
तिजोरी - प्रकरण 2
प्रकरण २मधे किती काळ गेला कोणास ठाऊक, वज्रला आता अस्पष्ट असा आवाज यायला लागला होता. शब्द कळत नव्हते.एखाद्या मैलभर बोगद्याच्या पलीकडच्या टोकापासून हे आवाज आल्याचा भास होत होता. त्याचे डोळे आता अर्धवट उघडायला लागले होतं.आपल्या अवती भोवती काही माणसं जमल्येत आणि आपल्यावर ओणवी होऊन बघताहेत अशी जाणीव वज्रला झाली. बहुदा उपचार करणारे डॉक्टर असावेत.“ अगदी थोडक्यात वाचला हा.” एक आवाज.“ याला फार लागलं नसेल तर घेऊ का याला उभा आडवा?” दुसरा आवाज.“ घाई नको करू.अजून थोडा जरी डाव्या बाजूला पडला असता तरी मेला असता हा.” पहिला आवाज.“ त्याला मी ताब्यात घेतला की मेलो असतो तर बर झालं असतं असं ...अजून वाचा