नागपूरच्या अभेद्य सेफ कॉर्पोरेशन मधील घड्याळ रात्रीचे अकराला पाच कमी असल्याची वेळ दाखवत होतं. वज्र द्विवेदी निघण्याच्या तयारीतच होता. तेवढ्यात फोन वाजला. पाच मिनिटे उशिरा जर फोन आला असता तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून तो ऑफिस मधून निघून गेला असता.. पण आज त्याचं भाग्य तेवढं नव्हतं त्याने फोन उचलला. रात्रीच्या वेळेला त्याच्या ऑफिसची अशी पद्धत होती की फोन उचलला की लगेच त्याचं रेकॉर्डिंग सुरू होत असे. मनात ती जाणीव ठेवूनच त्याने फोन उचलला.

1

तिजोरी - प्रकरण 1

तिजोरीप्रकरण १नागपूरच्या अभेद्य सेफ कॉर्पोरेशन मधील घड्याळ रात्रीचे अकराला पाच कमी असल्याची वेळ दाखवत होतं. वज्र द्विवेदी निघण्याच्या तयारीतच तेवढ्यात फोन वाजला. पाच मिनिटे उशिरा जर फोन आला असता तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून तो ऑफिस मधून निघून गेला असता.. पण आज त्याचं भाग्य तेवढं नव्हतं त्याने फोन उचलला. रात्रीच्या वेळेला त्याच्या ऑफिसची अशी पद्धत होती की फोन उचलला की लगेच त्याचं रेकॉर्डिंग सुरू होत असे. मनात ती जाणीव ठेवूनच त्याने फोन उचलला.“अभेद्य सेफ कॉर्पोरेशन” तो यांत्रिकपणे म्हणाला.“मी हितेंद्र कपूर” फोन मधून एक उद्धट वाटणारा आवाज आला. रोज अनेकांचे फोन घेऊन वज्रला आवाजावरून त्यांचं व्यक्तिमत्व कसं असेल याचा बरोबर अंदाज ...अजून वाचा

2

तिजोरी - प्रकरण 2

प्रकरण २मधे किती काळ गेला कोणास ठाऊक, वज्रला आता अस्पष्ट असा आवाज यायला लागला होता. शब्द कळत नव्हते.एखाद्या मैलभर बोगद्याच्या पलीकडच्या टोकापासून हे आवाज आल्याचा भास होत होता. त्याचे डोळे आता अर्धवट उघडायला लागले होतं.आपल्या अवती भोवती काही माणसं जमल्येत आणि आपल्यावर ओणवी होऊन बघताहेत अशी जाणीव वज्रला झाली. बहुदा उपचार करणारे डॉक्टर असावेत.“ अगदी थोडक्यात वाचला हा.” एक आवाज.“ याला फार लागलं नसेल तर घेऊ का याला उभा आडवा?” दुसरा आवाज.“ घाई नको करू.अजून थोडा जरी डाव्या बाजूला पडला असता तरी मेला असता हा.” पहिला आवाज.“ त्याला मी ताब्यात घेतला की मेलो असतो तर बर झालं असतं असं ...अजून वाचा

3

तिजोरी - प्रकरण 3

प्रकरण ३दुपारी सव्वाचार वाजता वज्र थकून भागून एका टेकडीच्या उतारावर झाडाखाली पहुडला होता.बघता बघता त्याने बऱ्यापैकी अंतर कापलं होतं. मिरपूड लावण्याची कल्पना त्याला पॅपिलॉन कादंबरी वरून सुचली होती आणि ती फळाला आली होती. कुत्रे मागावर आले नव्हते.बंदिष्टी ला मारल्यानंतर सगळे पहारेकरी परत गेले होते. कदाचित एकच कैदी पाळला असं वाटल्यामुळे असेल किंवा वज्र न सापडल्यामुळे त्यांनी नाद सोडला असेल.पुन्हा गिनती केल्यावर त्यांच्या लक्षात येईल की दोन जण पळाले, एक मेला पण एक निसटला.एव्हाना सगळीकडे बातमी पोचवून जवळच्या पोलीस स्टेशन्स ना सावध केलं गेलं असेल. अत्ता वज्र जिथे विसावला होता तिथून रेल्वे स्टेशन पाच किमी होतं.पण अंधार पडे पर्यंत तो ...अजून वाचा

4

तिजोरी - प्रकरण 4

प्रकरण ४कोलाघाट ला आल्या नंतर बंगली भाषेतली एक भली मोठी पाटी वज्रला पाहायला मिळाली.त्याचा अर्थ काय म्हणून वज्रने विचारलं, ने त्याचा अर्थ सांगितला, त्या नुसारजरा विसावाअसं त्या धाब्याचं नाव होतं.हा शेवटचा धाबा आहे, इथे तुमच्या आणि वाहनाच्या खाण्या पिण्याची सोय आहे.पुढे दीडशे किमी पंप किंवा हॉटेल नाही.असा मजकूर होता.एका बाजूला वळण घेऊन घाट रस्ता जात होता आणि उजव्या बाजूला दरीच्या काठाला खूप मोठा प्लॉट होता त्यावर पंप, सर्व्हिस स्टेशन, एक बऱ्यापैकी मोठं आणि अतिशय स्वच्छ रेस्टॉरंट, त्यामागे बंगला, आउट हाउस, आणि त्या सगळ्याच्या मागे असलेल्या खूप मोकळ्या जागेत भंगार माल ठेवायची जागा.पलाश ने ट्रक थांबवला आणि गेट उघडण्यासाठी हॉर्न ...अजून वाचा

5

तिजोरी - प्रकरण 5

प्रकरण ५एका दिवशी सकाळी वज्र उठला आणि आपलं आवरल्यावर रेस्टॉरंट मधे गेला.चहा, नाश्ता ची काय सोय होतं आहे हे सांझी तिथे किचन ओटा साफ करत होती.“ गुड मॉर्निंग ” वज्र म्हणाला. तिने त्याच्याकडे बघितलं आणि पुन्हा आपल्या कामाला लागली.“ मी मदत करू का तुम्हाला?” त्याने पुन्हा विचारलं.“ मला लागलं तसं काही तर सांगेन मी.” तुटकपणे ती म्हणाली.“ मला चहा हवा होता.” वज्र म्हणाला.“ बाहेर बस.” पुन्हा ती फटकन पणे बोलली.ती खरंच सुंदर होती. अत्ता काम करतांना तर जास्तच छान दिसत होती.वज्र तिच्याकडे बघतच राहिला.“ काय बघतो आहेस माझ्याकडे टक लावून ?”“ नाही... काही नाही.. म्हणजे..” गोंधळून तो म्हणाला.तिने हाताने ...अजून वाचा

6

तिजोरी - प्रकरण 6

प्रकरण ६रात्रीचे पावणे दोन वाजले होतं वज्र अजूनही तिची वाट बघत पेट्रोल पंपा जवळ एक खुर्ची टाकून बसला होता सिगरेट पेटवून त्याचे झुरके घेण्यात मग्न होता. कोणतीच वाहनं आता येत नव्हती.अचानक त्याला ती बाहेर आलेली दिसली. आपण नेमकं कुठे बसलो हे तिला कळावं म्हणून हातातल्या सिगरेटची ठिणगी तिला दिसेल अशा पद्धतीने त्याने हात हलवला. ती त्याच्या शेजारी येऊन खुर्चीत बसली."तू गोंधळात टाकलंस मला. तू बोगस माणूस आहेस हे माझ्या लक्षात आलं होतं पण तू तिजोरी फोडणारा दरोडेखोर असशील आणि तुरुंगातून पळून आलेला कैदी असशील हे मला नवीनच होतं. तू एकदम सेलिब्रेटीच झाला आहेस.""जोपर्यंत मी इथे माझी नोकरी करतोय आणि ...अजून वाचा

7

तिजोरी - प्रकरण 7

प्रकरण ७पलाश घोषने सुद्धा तिच्याकडे चमकून पाहिलं.त्याचा विश्वासच बसला नाही.“ याला एक छदाम सुद्धा घेऊन देणार नाही.सगळी रक्कम माझी ही.तू मला थांबवू शकशील असं मनातही आणू नको.”“ मूर्ख बये, आपल्या दोघांसाठी हे पैसे मी साठवले आहेत.सगळ्या जगाची सफर तुला घडवायची असं माझ्या मनात होतं. ते रिव्हॉल्व्हर भरलेलं आहे.खाली टाक ते आणि विचार कर शांतपणाने.” –पलाश“ खाली टाकण्यासाठी मी ते हातात घेतलेलं नाहीये. मी पोलिसांना सांगते की एका दरोडेखोराला तू आश्रय दिला आहेस आणि तिजोरीतलेते पैसे दोन नंबरचे आहेत. त्या पैशावर तू टॅक्स भरलेला नाहीस. गुमान माझ्या मार्गातून दूर हो नाहीतर गोळी घालीन मी तुला.” सांझीने दम भरला.वज्र अजूनही तिजोरीच्या ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय