लावणी सुरू होण्याचा हंगाम आलेला होता. त्यावेळी सकाळ संध्याकाळ दोन वेळा शाळा भरायची. नऊ वाजता लघवीची सुटी झाली नी आम्ही वर्गा बाहेर पडून देवराईकडे दडदडत निघालो. ग्रामपंचायती समोर एस्टीची गाडी वळून जायची तिथे आलो नी बघतो तर काय ...... उघडे बंब काष्टी लावणारे चार पाच बापये शंकरेश्वराच्या ओवरी बाहेर चिंचेखाली सात आठ बांग़र पाडे घेवून उभे होते. त्यातल्या दोघा जणांनी बाही छट मुंडी- कोपरी घातलेली होती. पोरगेला होता त्याने घाटवळी घालतात तसला पोटावर खिसा असलेला गोल गळ्याचा मांजरपाटाचा गंजीफ्रॉक वजा सद्रा घातलेला होता. आम्ही लघवी करून आलो तो पर्यंत चिंचेखाली दोन तीन लाकडी खुंट्या ठोकून त्याना पाडे टांगलवून बापये चिंचेच्या पाळांवर बूड टेकून बसलेले होते. त्यातला एकजण चिलीम ओढीत होता त्याने दोन झुरके मारून चिलीम सोबत्याकडे दिली. बापयातला पोरगेलासा होता तो वगळता बाकी सगळ्यानी झुरके मारले. शेवटच्याने दोन तीन झुरके मारल्यावर चिलिम उलटी करून रिकामी केली फडका गुंडाळून खिशात ठेवली. तेवढ्यात तीन चार बाईल माणसे नी चार पाच पोरांची फटावळ आली नी डोक्यावरची काचकी बोचकी देवळाच्या तटाजवळ ठेवून बाईल माणसे तिथेच फतकल मारून बसली. ते कोण काय सगळी इत्थंभूत माहीती सहावी सातवीतल्या जाणत्या पोरानी दिली. ते भोरपी होते.
कोकणातले भोरपी - भाग 1
कोकणातले भोरपी भाग 1 लावणी सुरू होण्याचा हंगाम आलेला होता. त्यावेळी संध्याकाळ दोन वेळा शाळा भरायची. नऊ वाजता लघवीची सुटी झाली नी आम्ही वर्गा बाहेर पडून देवराईकडे दडदडत निघालो. ग्रामपंचायती समोर एस्टीची गाडी वळून जायची तिथे आलो नी बघतो तर काय ...... उघडे बंब काष्टी लावणारे चार पाच बापये शंकरेश्वराच्या ओवरी बाहेर चिंचेखाली सात आठ बांग़र पाडे घेवून उभे होते. त्यातल्या दोघा जणांनी बाही छट मुंडी- कोपरी घातलेली होती. पोरगेला होता त्याने घाटवळी घालतात तसला पोटावर खिसा असलेला गोल गळ्याचा मांजरपाटाचा गंजीफ्रॉक वजा सद्रा घातलेला होता. आम्ही लघवी करून आलो तो ...अजून वाचा
कोकणातले भोरपी - भाग 2
कोकणातले भोरपी भाग 2 मथवून मथवून त्या माणसालाडफ़ावर चढवला की, तो मागचा पुढचा विचार नकरता चढ्या दराने सौदा करी. जनावरसोडून त्याच्या ताब्यात देताना जमलेल्यां पैकीकोणीतरी चौकशी केली की बिलंदरभोरपी ठरलेल्या दरापेक्षा आणखी वीस पंचवीस जादाचा आकडा फोडीत. उलट जनावर खरेदी करताना जनावर बघितल्यावर त्याना अचूकअंदाज यायचा. हेजनावर वय झालेलं आहे, लंघलेलं आहे. आपल्याखेरीज दुसरंकोणीही गिऱ्हा ईक हे उचलणार नाही. हे पक्कंहेरून ते ढोराची केंड करीत.“अरा ऽऽरा, निस्तंकातडं नी हाडं हाईतशेठ. आमी धा गाव फिरणारं. वाटेलाकुटे गचकलं तर मुदलातच बूड......” नी अगदी पडत्याभावाने आकडा फोडीत. मालक रंजीस येवून काय काय बतावण्या करीत असे. पण भोरपीसहसा मागितल्या शब्दाबाहेर छादामही जादा ...अजून वाचा
कोकणातले भोरपी - भाग 3
कोकणातले भोरपी भाग 3 एखादं आयदण विणून ते पुंग़ळ्या नी ग़ोळ्या गुतवून उजू होईतो प्रचंड असते. हे अत्यंत किचकट नी वेळमोडं काम असतं. जाळी विणताना आटीचा धागा संपला की त्याच्या टोकाला नव्या आटीतला धागा विशिष्ट पद्धतीची गाठ मारून जोडावा लागतो. कारण वापर करताना ती गाठ नडीला येता कामा नये. नायलॉनचा धागा वापरात येण्याआधी आंबाडी, ताग आणि किशिष्ट प्रक्रिया करून सुती दोरा चिवट करून तो वापरला जायचा. भोरपी आले त्यावेळी वरच्या वाडीत सरवज्याच्या घराजवळ रस्त्यावर बांधलेल्या मोरीच्या विरुद्ध बाजूला पावसाळी पाण्याच्या व्हावटीमुळे पुरुषभर खोल कोंड होती. त्यात वीत भर लांबीचे पिंगट रंगाचे मासे दिसायचे. आमचा वाटेली, ...अजून वाचा