कोकणातले भोरपी - भाग 1 Prof Shriram V Kale द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • देवाचे ठाणे - 6

    देवाचे ठाणे६       दश दिशातून हवा शिल्पा भोवताली ओढली जावू ल...

  • Mr. Money - भाग 13

    तन्वीने मिस्टर मनीच्या कार्यालयात रुजू होऊन आता दोन आठवडे पू...

  • अनामत - भाग 1

    भाग १संध्याकाळचे सात वाजले होते. जोशींच्या घरात सगळे हॉल मध्...

  • निषाद पर्व - भाग 9

                 निषाद पर्व भाग ९            साक्षात योगेश्वराच्...

  • Miss'tery - भाग 13

    दुर्गा तिच्या वाटेला निघाली पण अभय तिथून गेल्यावरच..वाट जंगल...

श्रेणी
शेयर करा

कोकणातले भोरपी - भाग 1

कोकणातले भोरपी  भाग 1 

                   लावणी  सुरू होण्याचा  हंगाम आलेला होता.  त्यावेळी  सकाळ संध्याकाळ दोन वेळा शाळा  भरायची.  नऊ वाजता लघवीची सुटी झाली नी आम्ही वर्गा बाहेर पडून देवराईकडे दडदडत निघालो.  ग्रामपंचायती समोर  एस्टीची गाडी  वळून जायची तिथे आलो नी  बघतो तर काय ...... उघडे बंब काष्टी  लावणारे  चार पाच बापये शंकरेश्वराच्या ओवरी बाहेर चिंचेखाली  सात आठ बांग़र पाडे  घेवून उभे होते. त्यातल्या दोघा जणांनी बाही छट मुंडी- कोपरी घातलेली होती. पोरगेला होता त्याने घाटवळी घालतात   तसला   पोटावर खिसा असलेला   गोल गळ्याचा मांजरपाटाचा  गंजीफ्रॉक वजा सद्रा   घातलेला होता. आम्ही लघवी करून आलो तो पर्यंत चिंचेखाली   दोन तीन लाकडी  खुंट्या ठोकून  त्याना  पाडे टांगलवून बापये चिंचेच्या  पाळांवर बूड टेकून बसलेले होते. त्यातला एकजण चिलीम ओढीत होता त्याने  दोन झुरके मारून चिलीम सोबत्याकडे दिली. बापयातला पोरगेलासा होता तो वगळता बाकी सगळ्यानी झुरके मारले. शेवटच्याने दोन तीन झुरके मारल्यावर चिलिम उलटी करून रिकामी केली फडका गुंडाळून खिशात ठेवली. तेवढ्यात तीन चार बाईल माणसे नी  चार पाच पोरांची फटावळ आली नी  डोक्यावरची काचकी बोचकी  देवळाच्या तटाजवळ ठेवून बाईल माणसे  तिथेच फतकल मारून बसली. ते कोण काय सगळी इत्थंभूत माहीती  सहावी सातवीतल्या जाणत्या पोरानी दिली. ते भोरपी होते. 

                  हे भोरपी  कमरेला अर्धे अर्धा कुला झाकणारी लंगोटी सदृश काष्टी  लावीत नी  बिन हाताची बंडी  किंवा कोपरी घालीत .  हे लोक  शेतकरी  व अन्य गुरे ढोरे बाळगणाऱ्या लोकांची म्हातारी, खोड्याळ अवजतनीमुळे हडखडलेली  गुरं अल्पस्वल्पात विकत घेत. मृगाच्या टायमाला मुरातून  पाडे आणून गावोगाव फिरून विकीत. मुरातले पाडे तल्लख आणि बारदार कामाला  लायक असल्यामुळे शेतकरी तिकडचे बैल  पाडे  चढाओढीने  चार पैसे जादा झालेतरी   देवून घ्यायला झटत. यांचा दुसरा धंदा म्हणजे हे लोक मच्छीमारीला लागणारी  कांडळ, आकी, पाग़ ही  आयदणं विणीत. तो लावणी सुरू व्हायचा समा असल्यामुळे ते मुरातले पाडे विकायलाच आलेले होते. शाळेतली पोरं घरी गेल्यावर  भोरपी पाडे घेवून आल्याची वर्दी  गावभर झाली. दुपारी वाड्या वाड्यांमधले जाणते लोक  तळावर जमले. आणलेले सगळे पाडे चार दाती नी बांगर होते. मुरातले बैल बेतके अटकर , शिंगोटी बेताची नी रंग पांढरा ,कब्रा, कसरा , नाकपुडी  काड्यापेटीतल्या काडीचा गोल असतो तशा फिक्कट तपकीरी रंगाची. क्वचित एखादा पाडा  मोरा  किंवा  काळे  पांढरे ठिपके असलेला बाळा  असायचा. मुरात  दऱ्या दरडींच्या भाग़ात हिंडलेले पाडे काटक नी  कामाला न डगणारे. जनावरं बेतखुरी नी किंमती कडून गोर गरीबाला परवडणारी. घाटी  पाडे  महाग. क्वचित कोणी पैसेवाले  गुलहौशी  लोक घेत असत. 

                  काही गिऱ्हाईकं बदला सदली वाली. म्हणजे आपल्या गोठ्यातली  म्हातारी, खोड्याळ , लंघले लोपलेली जनावरं देवून वरचे पैसे देवून नवीन पाडे घेत. अशा लोकांच्या घरी जावून भोरपी ते जनावर बघीत. ते पडत्या किमतीला मागत नी सौदा पटला तर व्यवहार व्हायचा.  आपल्या पाड्यांच्या किमतीत पाच दहा रुपयेही कमी न करता किंमत लावून धरीत. खरेदीदारही महाखट. काही लोळग़ी गिऱ्हाईकं चार चार दिवस सकाळ दुपार खेटे घालून दरखेपेला  रुपया दोन रुपये बोली वाढवून सांगायचे. काही वेळा त्यानी टेळलेल्या पाड्याला  गावतलं दुसरं कोणी गिऱ्हाईक लागलंच तर मग तानमान बघून अखेरची बोली सांगून  जनावर उचलित. अर्थात  दरवेळी ही खेळी साधे अशातला भाग नव्हता. पण  अशी वेळ येईल तेंव्हाच अगदी नाइलाजाने  आपली बोली  वाढवून बैल पाडा खरेदी करीत. 

                 काही जनावरातले दर्दी  नी  सरळ मार्गी लोक  एखादा पाडा पसंतीला उतरला की कसलाही घोळ  न घालता  नेमका  रास्त आकडा बोलून  व्यवहार करून मोकळे होत. अशावेळी भोरप्याला लांब एकवशी  जागेला नेवून  सौदा ठरवीत. ते परत आले नी रक्कम द्यायला लागले की , त्या पाड्यावर टक ठेवून असणारे नव्या खरेदीदाराशी, भोरप्याशी हुज्जती घालीत असत. अर्थात भोरपी व्यवहाराला ‘चावून चिकट नी ओढून बळकट’ असले तरी एकदा टाळी मारली की मग त्या जनावराला पाच-दहा रुपये चढ देणारा कोणी आला तरी दिला शब्द मोडीत नसत. वर्षानुवर्षे सवगव असल्यामुळे आणि बारागावचं पाणी पिवून आलेल्या गिऱ्हाईकाची  अचूक पारख त्याना असायची. गुलहौशी खरेदीदार तर  ते  उज्जू  ओळखीत. झटून आलेल्या माणसाला बाजूला न्हेवून  दोघे तिघे भोरपी  त्या माणसाने  सग़ळ्या  जनावरातून  नंबरबाज  वाण उचलला आहे, अशी तारीफ करून ते जनावर रंग रूपाने नी लक्षणाने कसं उजवं आहे हे त्याला पटवीत. (क्रमश:)