Kavdasa books and stories free download online pdf in Marathi

कवडसा

कवडसा

रिषभ

हा भांबावलेला दिवस…|

हा भांबावलेला दिवस,

की हि विटलेली रात आहे,

खात जाते खोलपर्यंत,

न जाणे हि कोणती बात आहे |

त्या शपथा कधीच्या,

मी घेतल्यात एकट्याने,

अन समंजसपणाची शेलकी,

तुही ... टाकली कात आहे |

हे पडतात येथे अष्टोप्रहरी,

फक्त टोल घड्याळाचे,

जगणे उरलेच नाही,

.... काही जिव्हाळ्याचे |

हा आठवणींशी संगर,

असा पदोपदी होत आहे,

तो श्वास येत आहे,

अन हा जीव जात आहे |

मानले खरेच.... सर्वस्वी आता....

की पराजित मी,

अन हि अखेरची तुझी,

माझ्यावरची मात आहे |

हा भांबावलेला दिवस,

की हि विटलेली रात आहे,

खात जाते खोलपर्यंत,

न जाणे हि कोणती बात आहे |

जाण्यास जीव ....|

जाण्यास जीव वेडा,

थोडा अवकाश होता,

नजरेनेच केला त्यांनी,

वार सावकाश होता,

हि अपेक्षा फुकाची,

का मी पाळलीच होती,

पाळला ज्यांनी अबोला,

तो बेवफा.. सनम...

..... आपलाच होता,

जाण्यास जीव वेडा,

थोडा अवकाश होता,

नजरेनेच केला त्यांनी,

वार सावकाश होता |

जाहले चिंब....|

जाहले चिंब माझे ,

आता गात्र गात्र आहे,

बेचैन सैरभैर,

माझी रात्र रात्र आहे,

डोळ्यांचेही ओथप्रोथ,

भरले पात्र पात्र आहे,

जाहले चिंब माझे ,

आता गात्र गात्र आहे |

***

भेट तिची आसवांनो,

आता तरी घालून द्या,

दाम हवे तर वेदनांचे,

सरसकट मोजून घ्या,

भेट तिची आसवांनो,

आता तरी घालून द्या |

***

इथे न कोणती शमा..|

इथे न कोणती शमा,

न कुठला परवाना आहे,

फसलेला हा डाव फक्त,

अन सावरण्याचा बहाणा आहे,

इथे न कोणती शमा,

न कुठला परवाना आहे |

आसवे हसण्यात विणण्याचा,

अजब साला जमाना आहे,

इथे न कोणती शमा,

न कुठला परवाना आहे |

ये नही तो और सही,

और नही तो और सही,

म्हणण्याचा .....

दर्द फार पुराना आहे,

इथे न कोणती शमा,

न कुठला परवाना आहे |

केलेस आसवांचे..|

केलेस आसवांचे... तु,

पेले रिते गुलाबी,

अन....

हाय... म्हणतात लोक वेडे,

आम्हांस हे शराबी |

नशा वफादारीत होतीच कधी,

म्हणुनच कदाचित ...

केलीस बेवफाई,

ना सांत्वनाचा मरहम,

ना कोणती....

दिलीस सफाई,

अन....

हाय... म्हणतात लोक वेडे,

आम्हांस का शराबी ?

कधी कधी....|

कधी कधी....

त्याच त्याच शब्दांचा,

फार कंटाळा येतो,

तेच तेच आठवणं,

तेच तेच उसवणं,

अगदी जीर्ण सहवासाचं,

पुन्हा तेच गीत आळवणं,

अन नकोच वाटतं अगदी,

त्या रुसल्या फुगल्या....

.... देवांना बोळवणं,

पण कळत नाही कसा,

नाही म्हंटल तरी,

उगाचंच .....

कुठूनतरी तिचा उमाळा येतो,

कधी कधी....

त्याच त्याच शब्दांचा,

फार कंटाळा येतो |

***

ते तिचे तिचेच सारे...

हुंकार होते,

डोळ्यांचे होकार,

अन ओठांचे ... नकार होते |

***

तु .... सोड ... आकाशा....|

असे एकमेकांसाठी सारखे,

बऱ्हळणे बरे नाही,

तु .... सोड ... आकाशा..

तुला माझे वेड नाही,

मला तुझे वेड नाही |

हां कणव असेल कदाचित,

फक्त .. एकमेकांसाठी,

पण माझे तुझ्यावर प्रेम नाही,

अन तुझे माझ्यावर प्रेम नाही ,

म्हणुन ...

एकमेकांकडे रोखून.... सारखे,

पाहणे बरे नाही,

कारण तुला माझे वेड नाही,

मला तुझे वेड नाही |

तेरी खुद्गर्जी....|

तेरी खुद्गर्जीयो की दुकानो मे,

नही बिकता मेरा सच शायद,

तेरी अंजुमन की आबादियो मे,

नहि बसता मेरा घर शायद,

ये खास है की तेरी याद,

नहि जाती मगर,

मेरी रूसवाईयो को.

नही जचता तेरा दर शायद,

तेरी खुद्गर्जीयो की दुकानो मे,

नही बिकता मेरा सच शायद |

आवाज ये मेरी अफसानो मे हि,

हो जाती है फना,

और ये गुल-ए-गुलजार की शौहरत भी,

हमे नाही करती कायल,

हां .. यहि सच है की,

रूह मे बसी है तु,

और तेरी आवाज शायद,

तेरी खुद्गर्जीयो की दुकानो मे,

नही बिकता मेरा सच शायद,

तेरी अंजुमन की आबादियो मे,

नहि बसता मेरा घर शायद |

***

शोर जरूर था ...

आफत की गालीयो में,

की ... इन्सानियत का हुकुक,

चंद आखरी लमहात..

गिन रहा है,

शोर ये भी जरूर था..... की,

कोई दरिंदा ... कोई मजहब ...

इन्सानी खाल बुन रहा है |

***

हु हवस मे घीरा इतना ... की ..

पैमाने मोहब्बत नजर नही आता,

बला-ए-इश्क की तौहीन है बस... की ..

मौकफ पाक... पर दिफा नही होता |

***

है बला की आरजू ...

उलझी उन्ही जिस्म के तैखानो में ,

न उनसे इकरार होता .....

ना हमसे दीदार होता |

***

है और भी जमाने में,

हुस्न के जमादार यहा,

वो तो शौख रखतें है.... नुमाईश का...

वरना... उनसा सरमायादार कहा |

***

आसवांत माखलेला...|

आसवांत माखलेला,

हवा रुमाल त्यांना,

बहुतेक....

बोटावर नाचणारा,

हवा गुलाम त्यांना,

आम्हांस भेटण्याचा म्हणे,

झाला विषाद त्यांना,

अन का भेटलोच होतो ?

असाही....

झोंबतो सवाल ज्यांना,

नडते काही ना त्यांच्यावीन ...

सांगा खुशाल त्यांना,

हवी कशास त्यांची सलगी,

कधी ....

कळलाच नाही विशाल ज्यांना,

कळलाच नाही विशाल ज्यांना |

कभी कभी....|

कभी कभी जुस्त आरजूसे,

हालात तंग होते है,

बेखौफ से होता है दीदार,

जब आईनो में अक्स चंद होते है,

फिदा-ए-हुस्न के गुलाम...

तो थे हम याकिनन,

लेकीन अब तो ....

हवाले झेहनीयत पे भी..

खूब सवाल होते है |

हे राजरोसपणे तुझे......|

हे राजरोसपणे तुझे, छळणे बरे नाही,

अन आसवांशी असे, खेळणे बरे नाही |

गोड आशयाचे तुझे, बोलणे बरे नाही,

मोद येतात जे, टाळणे बरे नाही,

हे राजरोसपणे तुझे, छळणे बरे नाही |

सांग येतात जे, भाव ओंठात ते,

असे उन्मादाने, चालणे बरे नाही,

हे राजरोसपणे तुझे, छळणे बरे नाही |

आज जागली, हि उषा माझ्यासवे,

अन टाळुनी मला, तुझे झोपणे बरे नाही,

हे राजरोसपणे तुझे, छळणे बरे नाही,

अन आसवांशी असे, खेळणे बरे नाही |

समाधान याचेच....|

समाधान याचेच आता,

की मी कुण्या कळपात नाही ,

समाधान याचेच आता,

की झाला कोणता जळपात नाही |

साऱ्यांनीच मजहब,

कसे वेशीस टांगलेले,

साऱ्यांचेच इमान,

का रक्तात माखलेले,

की बरे अजून तरी मति शाबुत,

अन पाऊले चुकीची वळतात नाही,

समाधान याचेच आता,

की मी कुण्या कळपात नाही |

सारे आशय ... सारे मुद्दे,

सारेच... का वादांत पेटलेले,

अन जपण्याचे यांनीच सारे,

का कंत्राट घेतलेले,

अजुनतरी होश आहे जरासा,

की लागला पुरता गळफास नाही,

समाधान याचेच आता,

की मी कुण्या कळपात नाही |

***

फिरता हुं आशियाने,

लेकर खफा मै गालिब,

तेरा तसव्वूर अब भी,

न पा सका मै गालिब,

है बस आखरी,

तमन्ना ये मेरी गालिब,

की मेरे अश्क में हो गालिब,

की मेरी नज्म में हो गालिब |

***

ये शायद कुछ आखरी,

मै नगमे गाँ रहा हुं,

बेखौफ मौत मेरी,

मै किश्तो में ढाँ रहा हुं |

***

उमेद....!

हे असचं होतं सारखं,

जेव्हा आपल्याच माणसात,

कुणीच गवसत नाही आपलं,

त्यावेळी ते टंच पाण्यानं भरलेलं,

..... काळंशार आभाळ .... अन् मी,

...... दोन्ही एकच असतो,

तो पाणी असुनही बरसण्यास असमर्थ,

अन् मी भावना असूनही,

त्याचं ओझं पेलण्यास असमर्थ,

एकंदरीत काय ......

दुष्काळात जगण्याची सवय जडलीय,

..... हेच खरं,

अन् आत अंतरात देखील....

ती खोड नकळत नडलीय,

...... हेच खरं,

अशावेळी मग आठवतात जुनेच काही,

उगाच पोसलेले शब्द,

प्राक्तन, संचित, प्रारब्ध ... अन् बरेच काही,

..... आणि हो .... त्यांनीच माझ्याठायी,

विनाकारण .... हे षंढपण जपलं,

अन् हे असचं होतं सारखं,

जेव्हा आपल्याचं माणसांत ....

कुणींच गवसत नाही आपलं |

शेवटी येऊन जाऊन...

माझ्या क्षणांची किंमत काय ?

ते मलाही ठाऊक....

कारण जगण्याच्या बाजारात....

भावना थोड्याच मिळतात घाऊक,

पण प्रयास मात्र सतत चाललेला असतो,

फेसाळलेल्या लाटांचा,

....सारा किनारा पोखरण्याचा,

तटस्थ, रुक्ष खडकांवर....

स्वतःचं अस्तित्व कोरण्याचा,

हां ..... आता लगोलग जमतंच असं नाही,

... पण जेव्हा शेकडो वर्षांनी ...

खडकांच्या कातरलेल्या कडा पाहतो,

तेव्हा .....मग नाही वाटतं

.......खरचं आपलं काही चुकलं,

अन् हे असचं होतं सारखं,

जेव्हा आपल्याच माणसांत,

कुणीच गवसत नाही आपलं |

एकाकीपणावर माझ्या....|

एकाकीपणावर माझ्या,

आज कोणी हसतील,

सांगतील काही कारण....

अन् उगाचच् डिवचतील ..

कालपर्यंत माझे शब्द बोचत होते,

आज कोणाचे मलाही बोचतील,

कालपर्यंत फक्त मी फसत होतो,

आज बाकीचेही फसतील,

अन् एकाकीपणावर माझ्या,

कोणी उगाचच् हसतील |

इतके दिवस काय केलं,

कोण तोंड वर करून बोलतील,

पण .... नसेन मी जेव्हा,

तेव्हा .... तेही ....असेच रडतील,

काढतील एखादी आठवण,

अन् हुंदका मुकाच गिळतील,

...... एकाकीपणावर माझ्या,

कोणी उगाचच हसतील |

आता.....!

आता रडायचं तर आहे उर फुटेपर्यंत,

पण आसवं गाळु शकत नाही,

आता बोलायचं तर आहे मन भरेपर्यंत,

पण शब्द एकही सांगू शकत नाही,

नामुष्कीच्या गर्तेत......

...... आंधळा मी .....

दिसत असुन सारं......

काहीच पाहु शकत नाही,

आजवर.....

सांज सकाळ तिच्या आठवणींत सरली,

ती .... जणु प्रत्येक श्वासांत भरली,

आता फक्त जगण्यासाठी श्वास,

मग पुन्हा ....तिच्या आठवणींचे त्रास,

अरे कधी तुटेल अट्टाहास,

..... कदाचित......

जेव्हा संपेल हा प्रवास,

..... अशी हि वेडी घुसमट,

कुणालाच कळु शकत नाही,

आता रडायचयं उर फुटेपर्यंत,

पण ..... आसवं गाळू शकत नाही |

शब्दांस माझ्या....|

शब्दांस माझ्या भावनांचे,

अर्थ तु लावू नको,

झींगण्याची रीत वेडी,

व्यर्थ मजला दावू नको |

मी व्रताचा बांधील आहे,

आर्त हाक तु मारू नको,

मी शब्दांचा अशील आहे,

व्यर्थ मजला टोकू नको |

तु बांध स्वप्नांचे महाल मनी,

परी त्यात मजला पाहु नको,

अस्तनाऱ्या सुर्यास या,

वेड उद्याचे लावु नको,

गांजलेला सुर माझाच,

तु तुजला जाळू नको |

मागेच कधी ..... |

मागेच कधी आम्हांवरती,

सुख आगळे ढळले होते,

मागेच कधी अंगावरती,

रोमांच आगळे फिरले होते,

मागेच कधी झाला होता,

आम्हांवरती अभिषेक,

अमृतकनांच्या मखमालीचा,

आम्हांसी अतिरेक,

मागेच कधी जडले नाते,

मागेच कधी हरले नाते,

मागेच सारे झाले होते,

माझेच संपले मीपण होते,

मागेच सारे झाले होते,

माझेच संपले मीपण होते,

मागेच खुंटले आशांचे हिंदोळे,

अन मागेच आभाळी,

... दैवपन स्फुरले होते,

मागेच माझ्या ओठांवरती,

सुरुवातीचे गीत होते,

मागेच माझ्या ओठांवरती,

सुरुवातीचे गीत होते,

मागेच झाला उषःकाल,

अन् मागेच .... देहीच बळ....

सरणावरती जळले होते,

मागेच कधी आम्हांवरती ,

सुख आगळे ढळले होते,

मागेच कधी अंगावरती,

रोमांच आगळे फिरले होते |

गतजन्माचे .....!

गतजन्माचे असतील किती,

अस्खलित ते उतारे,

होती न जाणे किती आतुनी,

विरक्त ते पुकारे,

क्षणी संन्यस्त,

क्षणास रंगेल मी,

अपेक्षांच्या उरात....

.... वासनाच हुंगेन मी,

हे पलभर जीवन...

पण बितती तयातंच.....

दुःखाची असंख्य संवत्सरे,

गतजन्माचे असतील किती,

अस्खलित ते उतारे,

होती न जाने किती आतुनी,

विरक्त ते पुकारे |

***

अंतावर स्वार होऊन .....

न जाणे कशी ..... जगण्याची परवड येते,

.... आजवर कधीच .......

थकले नव्हते श्वास.....

पण आता ......

श्वासांनाही आमची अडचण होते |

***

तु....!

उधळताना अंतरंग

अडवलंस तु ....

मी नव्हतो आलो सांगायला,

पाहताना एकाएकी....

हसून एकाकी पाडलस तु ...

मी नव्हतो आलो बोलायला,

रात्र सरत होती... निवांत कधी....

जागावयास लावलं तु....

मी नव्हतो आलो ...छेडायला,

फाटक्या विश्वात....

फाटकासाच होतो मी,

बदलायला लावलंस तु....

मी नव्हतो आलो सजायला,

आता सारं उधळून ....

वेड जिव्हारी लावलंस तु.....

पण .....

मी नव्हतो आलो कधीच.....

तुझ्याकडे काही मागायला |

अंधारल्या जगात......!

चार क्षणांसाठी आठवणींच्या,

माझा तिच्याशी करार होता,

तिच्या गोड हसण्यासाठी,

तिच्या गोड लाजण्यासाठी,

अन् जमलंच तर,

ललाटीच्या मधुर चुंबनासाठी,

मांडलेला फक्त ....

पैशांचा बाजार होता...

चार क्षणांसाठी आठवणींच्या,

माझा तिच्याशी करार होता |

तिची दुःखं अपरिमित,

माझी सुखाची कल्पना,

... अगदिच सिमित,

तिच्या वेदना देहापरीस...

... आत्म्यास अधिक ...

माझ्या संवेदना परी,

देहासीस रुळल्या क्षणिक,

ती लगट तिच्याशी,

अन तो श्रुंगाराचा खेळ,

ती हसत जायची,

नि सरून जायची वेळ,

पण मला कुठे ठाऊक,

त्या हसण्यालाही ..... वेदनेचा शाप होता,

चार क्षणांसाठी आठवणींच्या,

माझा तिच्याशी करार होता |

शेवंती कधी....

तर कधी मोगऱ्याचाही,

सुवास होता,

फुलांच्याच सेजेवरती,

भावनांचा उठाव होता,

ती बोलावी काही,

मी ऐकावे काही,

पण ... शांततेस त्या...

असा कुठे आवाज होता,

तिची तिने झुरत जावे,

माझे मी रमत जावे,

तिचा अपेक्षांचा उर होता,

माझा श्वापदी सुर होता,

ती बोलत होती,

अधुन मधुन ....

मलूल माझा चेहरा बघुन,

पण शब्दांतुनी तिच्या,

न जाणे ......

अर्थ कोणता फरार होता,

चार क्षणांसाठी आठवणींच्या,

माझा तिच्याशी करार होता |

निखळत्या ताऱ्यांना...!

निखळत्या ताऱ्यांना तरी,

आता काय.....

अन किती मागायचं,

आपली दुःखं,

आपली व्यथा ,

आपणच जाणायचं,

क्षणात .... क्षणांची आठवण,

अन् मनांत दुःखाची साठवण,

आयुष्य आपलं हेच.....

पण म्हणुन .....

झुरत कण्हत कधीच नाही जगायचं,

निखळत्या ताऱ्यांना तरी,

आता काय.....

अन् किती मागायचं |

सुखाचे चार क्षण...

मनाच्या पोथडीत बांधायचे,

कुणाची माया,

कुणाचं प्रेम,

कुणाची तरी .... आठवण देखील ....

बरोबरच ठेवायची...

लागेल तशी ... शिदोरी,

आयुष्यभर पुरवायची....

मग .. कुनीच नाही माझं,

म्हणुन उगाच

कुढत नाही बसायचं,

निखळत्या ताऱ्यांना तरी,

आता काय... अन किती मागायचं |

मी मात्र......!

शहाण्यांच्या शहाण्या जगात,

मी मात्र वेडा ठरलो,

पाहुन कुणाचे दुःखं,

कधी आसवांसहित रडलो,

धरावी छाया म्हणुनी,

उन्हे झेलुन तटलो,

आणि म्हणुनच काय जणु,

शहाण्यांच्या शहाण्या जगात,

मी मात्र वेडा ठरलो |

क्षणभंगुर नुसतं सुखच नसतं,

तर हि दुःखंहि असतात,

... अशीच क्षणभंगुर,

आज डसत असतील कुणाला,

त्यांचं काय हो,

त्यातर स्वैर भावना,

सुकलेल्या .... शुष्क कल्पनांच्या सरीता ,

मी आसवे पुसण्यासाठी कुणाची....

वेड्यागत झिंगलो,

अन् आयुष्यात जणु एवढचं काय ते चुकलो,

शहाण्यांच्या शहाण्या जगात,

मी मात्र वेडा ठरलो |

पथ आहेत दिगंतराचे,

अजुन बहुत दुर,

चांदण्यांची स्वप्ने...

मखमालीचे भास...

नयन अजुन त्यातच चुर,

घेतात कोणी मग आपल्याभोवती,

हे वेटाळून सारे,

जगाचेही त्यांना मग,

नकोसे होते वारे,

मी परी कुणाच्या,

वेदनेस उगा भुललो,

दुःखात कुणाच्या,

जणु झिजुन झिजुन खुललो,

अन् म्हणुनच ....

शहाण्यांच्या शहाण्या जगात,

मी मात्र वेडा ठरलो |

चल उठ जाऊ......!

चल उठ जाऊ,

कुण्या अशा ठिकाणी,

जिथे नसेल कुणाचे बंधन,

अन् नसतील कुणाचे त्रास,

चल सोडून हि दुनिया,

कर स्वतःच हि किमया,

नकोच थांबू इथे,

जिथे सदैव होईल,

तुज अस्तित्वाचा ऱ्हास,

चल जाऊ,

कुण्या अशा ठिकाणी,

जिथे नसेल कुणाचे बंधन,

अन नसतील कुणाचे त्रास |

चल अशा ठिकाणी,

जिथे पाहुन कुणी तुजकडे,

भरतील न रागे श्वास,

न झरतील आसवे उगाच,

जावुनी कुणाच्या फुकाच पास,

अशी नको कराया बेईमानी,

जव आहेस तु इतका इमानी,

थांबव आता तुझे पाय,

जाताच जिथे,

मिळेल तुज फक्त .... झोंबती हाय,

संपव संपव लवकर,

साराच हा प्रवास,

असुनही जिथे,

तुज कधीच न होतो,

असण्याचा भास,

चल उठ जाऊ,

कुण्या अशा ठिकाणी,

जिथे नसेल कुणाचे बंधन,

अन नसतील कुणाचे त्रास |

सारेच अघटीत ...!

हि घरघर काही थांबत नाही,

हि वणवण काही संपत नाही,

भेटते ती चिंता,

चिता काही पेटत नाही,

उगा शब्दांचेच आहेर,

मन शोधू पहाते माहेर,

पण ... या मतलबी जगात,

आप्त कुठले ....

साधे नातेही उरत नाही,

सारे सुखाचेच सोबती,

धगधगत्या दुःखात .....

सख्खे देखील टिकत नाही,

कोण म्हणते आसवांचा बोझ आम्हां,

कोण म्हणते काट्यांचा तिरस्कार आम्हां,

अरे सेज त्यांचीच तर...

स्वतःहुन पसरली आहे,

निजणार त्यावरीच....

त्याशिवाय देहासही या.....

आराम कुठला मिळत नाही,

हि घरघर काही थांबत नाही,

हि वणवण काही संपत नाही |

कुठवर.....!

शब्दांना आता किती सांभाळू,

आराशासही किती समजावू,

कोण आहे मी ... म्हणुनी,

कोडे स्वतःस ....

आता तरी किती घालु ?

मी अमुक आहे,

मी तमुक आहे,

वल्गना किती,

अन् ... किती आभासांचे छंद पाळु,

संपतील स्वप्नांचे भास एकदाचे,

कल्पनांत तरी कसे क्षण जाळू |

उठायाचे होते मजला,

लढायाचेही होते मजला,

पण .... शास्त्रासही कापरे माझ्या,

अन मनगटात होते.....

अनामिक थरथर,

हे षंढपण अंतरीचे दूर कसे सारू,

कधी घडतील पराक्रम ....

आता कुठवर....

फक्त शाहीच झारू |

जीर्ण आठवांचा....!

मर्म बांधल्या पाकळ्यांचा,

आज मजला कैवार आहे,

जीर्ण झाल्या आठवांचा,

पुन्हा नवा संचार आहे |

मी विसरून जावे कितीदा,

पण या सागरास ,

का कुठे पैल आहे ?

विझुन मरणे मरून उठणे,

इतुके जीवन स्वैर आहे |

मी शब्दांत तुज बांधू कसा,

तु तर रक्तात स्थिरली आहे,

कधी रक्तही मी ....झरून पाहिले,

पण त्यातुनही.....

तुच तु वाहिली आहे |

आता उपाय तुला विसरण्याचा,

काय कोणता मार्ग आहे,

वेडात वेड अन् ...

श्वासांत श्वास ...

गुंतणे हाच परी....

सर्वस्वी धर्म आहे |

***

इतर रसदार पर्याय