Kaliyugatil maanus books and stories free download online pdf in Marathi

कळीयुगातील माणुस

मी अनुभवलेलं असं काही

माणूस

लोक म्हणतात - घोर कलियुग आलंय... आणि ते खरं आहे यात काही वाद नाहीच. वातावरणात होणारे प्राकृतिक बदल, माणसांमध्ये होणारे स्वाभाविक बदल हे अपवाद आहेत या कालियुगाला. माणूस इतका व्यस्त झालाय कि त्याला आपल्या माणसाजवळ चार शब्द बोलायला हि वेळ नाहीये. काही लोक तर मुद्दाम असं करतात. टाळतात बोलणं आपल्या माणसांजवळ यालाच गर्व असेही म्हणतात. तर अशा प्रकारे माणूस बदलतोय. वातावरण पण तसंच काही वर्षांपूर्वी सगळीकडे हिरवळ असायची परिणामी ऊन कमी असायचं कारण सगळीकडे गर्द झाडी असायची आणि सावली मिळायची. पण आता माणूस घराबाहेर पडायला घाबरतो दिवसा. पूर्वी लोक अंधाराला घाबरायचे पण आता ऊनाला घाबरतायत. कारण तापमान वाढलंय आणि ते कुणामुळं झालंय हे सुद्धा माणसांमुळेच झालंय.

थोडक्यात काय ? देवाने माणूस बनवला पण त्यात पुन्हा प्रकार बनवले चांगला आणि वाईट... ते पण चांगलंच आहे म्हणावं कारण एखाद्या गोष्टीत समतोल असला की ती गोष्ट जास्त काळ टिकते. पण असं होऊ शकतं ना जे वाईट लोक आहेत म्हणजे विचाराने वाईट आहेत ते चागल्या विचाराचे होऊ शकतात पण तसं होण्यासाठी त्यांना एकच वेळ मिळते ती ही अनपेक्षित असते. त्या वेळेचं भान असावं लागतं. पण चांगल्या विचाराच्या व्यक्तीला वाईट होण्यासाठी एक वाईट क्षण सुद्धा पुरेसा असतो. आणि हो हे चांगले आणि वाईट विचार जे बोलतोय त्यात भेदभाव करतोय असं नाही. आणि याला जी व्यक्ती भेदभाव समजत असेल ती निव्वळ मूर्ख असावी.

मुळात चांगल्या विचाराचा माणूस हा चांगला असतोच पण जो वाईट विचार करतो तो हि चांगलाच असतो पण त्याला न सुधारण्यास भाग पडणारी आणखी काही वाईट विचाराची लोक असतात जे नेहामी त्या माणसाच्या मनात वाईट साईट सांगून मन वळविण्याचा प्रयत्न करत असतात. कोण कधी कसं वागेल हे कधीच कोणाला कळू शकत नाही. माणूस बदलण्याच्या किंवा त्याची सवय त्याचे विचार बदलण्यास कारणीभूत असते ती परिस्थिती. परिस्थिती जगायला शिकवते पण त्याचबरोबर आयुष्यात डुंबवते ती ही परिस्थितीच असते. आपण एखाद्या व्यक्ती विषयी काही वाईट घडलं तर कारणीभूत ठरवतो ते दुसऱ्या व्यक्तीला जी त्याचा काहीच भाग वाटेकरी असते पण ते घडण्यात निम्मा वाटा असतो ते परिस्थितीचा. त्यात चूक कोणाचीच नसते पण आपल्याला आढळणारे गुन्हेगार मात्र खूप असतात. आपण ज्यांना जबाबदार समजतो ते च एकवेळ असा विचार करतात की मी असं का केलं असेन.

पृथ्वीवर सर्वात विषारी कोण म्हटलं तर पहिला माणूस. माणसापेक्षा विषारी काहीच नाही. हे विष विचारांच्या स्वरूपात असतात मुळातच ते वाईट असतात. एखादी चांगली व्यक्ती काही चांगलं करत असेल किंवा तिच्या बाबती काही चांगल्या गोष्टी घडत असतील तर ते वाईट व्यक्तीला सहन होत नाही मग जे काही चांगलं घडतंय त्यातच वाईटपणा दर्शवते आणि इतर लोकांना अजून काहीतरी त्यात वाईट गोष्टी टाकून सांगते जेणेकरून चांगली व्यक्ती पण लोकांच्या नजरेत वाईट होऊन जाते आणि वाईट व्यक्ती चांगली. पण ते फक्त सोंग असत वाईट व्यक्तीने चांगल्या पानांचं घेतलेलं. ते कधी न कधी लोकांना समजत पण या मागे सांगायचं कारण हेच कि वाईट व्यक्ती वाईटच असते चांगली व्यक्ती हि चांगली. चांगलेपणाच सोंग कधी घेता येत नाही आणि घेतलाच तरी ते फार काळ टिकत नाही. पण वाईट विचारांच्या व्यक्तीला जी व्यक्ती बदलण्याचा संकल्प करते ती खरच देवस्वरूप असते.

माणूस हा दोन तोंडी सापापेक्षा कमी नव्हे. ऐकणार एक आणि दुसरीकडे जाऊन सांगणार एक. त्या गोष्टीला व्यवस्थित चटणी मीठ मसाला लावून रंगवून सांगणे हि कला काही लोकांमध्ये असते. असं केल्यामुळे समोरच्या माणसाच्या मनात एखाद्यविषयी चांगली आकृती असेल तर ती बिघडते आणि कायमस्वरूपी वाईटच बनून राहते. म्हणून माणसाने माणुसकी हा धर्म आता तरी मनावर घ्यावा असं मला वाटत. एखाद्यविषयी चांगलं बोललात तर त्याच्या जीवनात पुढे जाऊन चांगले होईल का ते माहित नाही पण तुमचं भलं होईल. कारण जे कृत्य आपल्याकडून घडतंय त्यातून चांगलं निष्पन्न होत असेल तरच त्याचा फायदा आपल्याला होतो. या निसर्गाचा नियम च आहे की जर तुम्ही कोणाच्या बाबतीत चांगलं करताय तर त्याच्या बरोबर तुमचं पण नकळत चांगलं होत असतं. 'पेराल तसे उगवेल'.

समिर माळी

(०२ मार्च २०१८, सोमवार )

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED