Arul saru - 1 books and stories free download online pdf in Marathi

अरुल सरु....

अरुल सरु....

"अरे ए अरुल लवकर… चल नाहीतर तुझी सरु निघुन जाईल चल लवकर… धाव पटापट"....

"हो अश्या आज खरच उशीर झालाय आज जर उशीर झाला आणि भेट नाही झाली तर उद्या पासून college ला सुट्टी आहे चल पटापट, काय रे अश्या तुझी वहिनी आज निघुन गेली वाटत.... यार नशीबच फुटक आहे माझं, मी ठरवलं होत रे अश्या आज काही ही करून सरूला माझ्या मनांतल सांगेन पण इथं तर भलतंच झालं"......

"अरुल… गेल्या 3 वर्षा पासून सरु वर जीवापाड प्रेम करतो पण नुसतंच सांगायला घाबरतो"…

"अविनाश उर्फ – अश्या…. अरुल आणि अश्याची मैत्री अगदी लहान पणापासून आहे", चाळीत तर दोघांना चड्डी मित्र म्हणून ओळखल जातं….. अश्या खूप चांगला स्वभावाचा आहे… आणि मित्रा साठी कायम स्थिर थांबणारा"….

"सरू अगदी शांत आणि स्वाभाविक मुलगी आहे अभ्यासात तर सरु नेहमी प्रथम स्थानावर…. वर्गात पहीला नंबर म्हणजेच सरु.... मित्र मैत्रीन तर सरुला scholar म्हणूनच हाक मारायचे".......

“अश्या आणि अरुलची मैत्री चाळीत नव्हे पण college मध्ये हि सुप्रसिद्ध होती "...

"12 HSC परीक्षेचा शेवटचा दिवस, अश्या आणि अरुल… त्यांच्या मैत्री प्रमाणे दोघांना सेंटर हि एक लागलं होत… मात्र सरुला वेगळ सेंटर लागलं होत"......

“परीक्षा सुरू झाल्या त्या दिवसा पासून पटापट पेपर संपवून दोघ धावत सरुच्या सेंटर खाली येऊन थांबायचे व तीचा पाठलाग करत घरी जायचे “

“पण आज काय नशीबच फुटक"…

"अरुल चल आता घरी, आई वाटं बघत असेल".....

"हो अश्या चल जाऊयात आता काय."...

अरुल आणि अश्या जसेचं मागे वळले… थक्क होऊन एकमेकांकडे बघू लागले…. बघातायेत तर काय, सरु त्यांच्या समोर ऊभी होती…...

“आज मात्र उशीर झाला होय तुम्हा दोघांना, काय..??? सरु बोलली.....

“नाय सरु आम्हाला वाटलं कि तू घरी निघुन गेलीस, नाहींतर आमची गाडी तर वेळेवर आहे… हां थोडा उशीर झाला आज काय,अरुल बरोबर ना…. अश्या जरा हसुनच बोलला".... !

“नाही असं काही नाही सरु", अरुल थोडं घाबरूनच बोल्ला...…

“हो, हो … राहू दे मला सगळंच माहीत आहे… मीच काय तरी ठरवून आलीये आज … सरु थोडं रागातच बोलली"...

“अरे अरुल हिला तर सगळ माहित आहे… आता काय, आता तर तुझी वाट....

"तू गप अश्या.. काही, ही बडबडू नको कळलं ना, जरा मला अरुल सोबत बोलू देत…. सरु बोलली"

अरुलला काय कळेना.... कि नेमक काय करावे त्याला काय बोलाव हेच सुचेना…. अरुल मनातच विचार करू लागला… आज नेमकं काय पण होऊ देत पण ठरवल्या प्रमाणे सरुला आपल्या मनातलं सांगायलाच हवं….

"अरुल काय कुठल्या विचारात पडलास तू.. ऐकतोय का ….. "

तितक्यात अरूल अतिउत्साहात, अगदी प्रेमाने बोलला.......

"I love youuuuuu सरु......

सरू I love uhhhhhh….

सरु अरुल कडे रागाने बघु लागली..... हे काय आहे अरुल मी तुला ….

तितक्यात सरुला अडवत मधेच अश्या बोलला....

"अरे भावा तुझा तर वाटत घोळ झाला, हि तर नाय म्हणते…. तुझी सारी मेहनत पाण्यात".…

"अश्या गप तू…. तू आज काय मला बोलू देणार आहेस कि नाही… तुला आधीच म्हटलं ना बडबडू नकोस, जरा गप कि म", सरु रागातच बोली……

“सरु हे बघ मला नाही महित हे चांगलं आहे कि चुकीचा आहे, पण मी आज घरातून निघताना मनात एक विचार मांडून आल्तो.... कि मी तुला हे नक्कीच सांगणार कि माझं तुझ्या वर प्रेम आहे, सरु तुला मी नसेल आवडतं तर ठीक आहे, मी मान्य करतो… पण तू माझं पाहिलं प्रेम आहे आणि तुला मी कधीच विसरणार नाही"…….

सरु बोलली.......

"झालं..... हे काय आहे अरुल, माझं हि तुझ्या वर प्रेम आहे मी हि आज ठरवून आली होती कि जर तू आज ही नाय बोल्लास तर मी समोरून बोलेन".…

"गेल्या 3 वर्षा पासून वाट पाहते कि कधी बोलशील पण तू…. तू कधी काही बोल्लाच नाही, आणि आज बोल्लास तर हे असं..... जा बोलू नको माझ्या सोबत...... मला नाही बोलायच तुझ्या सोबत"....अस म्हणत सरु मागे वळली... मी जाते घरी, मला नाही बोलायचं तुझ्या सोबत bye……

“अरुल अरे अरुल"…. अश्या जोर जोराने ओरडू लागला थांबव तिला सरु जातेय...... पण अरुल मात्र तिच्याकडे प्रेमाने एकटक बघत होता... जे घडतंय त्याला तर एक स्वप्न वाटत होत…. तो तर सरु कडे एकटक पाहतच होता…. थोडं पुढे गेल्यावर सरु मागे वळली ….. आणि अरुलला बघुन गालातच हसली आणि लाजून निघुन गेली…. हे पाहताच अरुल तर जणू कुठे आपल्याच जगात हरवून गेला….. ह्रदयावर हाथ ठेवून अरुल लाजतच तिथं थांबून अश्याला बोलला......

"अश्या सरु हसली यार"....... आणि उड्या मारत नाचायला लागला…. सोबत सोबत अश्या हि उड्या मारत नाचू लागला…. "अरे setting ,अग बाई माझी setting झाली…. अरे अश्या माझी setting झाली"……

अरुल अस गाणं म्हणत अश्या सोबत नाचू लागला…… अरुल खूप खुश होता एव्हढा कि त्याचा आनंद गगनात मावे

ना.... तो तर सरुच्या विचारात हरवून गेला... अस वाटत होता त्याला कि........

"आज पर्यंत अनोळखी होतो पण आज, आज मात्र तिचा झालो"......

अरुल घरी आला.... बॅग टाकली बेड वर आणि आईला मोठ्याने हाक मारू लागला....

"आई जेवायला देना खूप भूक लागलीये"

"देते आधी सांग होतास कुठे तू... आज इतका उशीर कसा काय, नेहमी तर लवकर येतो ना म आज कसा काय उशीर झाला"....

"अग आई ऐक ना... आज शेवटचा दिवस होता college चा म गप्पा मारत बसलो होतो मित्रांसोबत"....

"बरं थांब, बस तू आणते मी जेवण".....

"आई बाबा कुठेत... बाबा अजून आले नाही का...??

"हो बाबा अजून आले नाही कामा वरून, चल मी जेवण वाढते तू जेवूण घे"....

जेवण करून... थोड्या वेळाने फ्रेश होऊन अरुल घरा बाहेर पडला, अश्याच्या घरा जवळ पोहोचून त्याला हाक मारली " अश्या.... अश्या घरा बाहेर आला.....

"काय अरुल आज तर मस्त छावा दिसतोय, सरु तर फिदा होणार तुझा वर"....

"गपतो का तू अश्या"....

"अस व्हय, लडकी मिली तो अब दोस्त को भूल गया ना तू,..... अरुल दोस्त दोस्त होता"

"ए गप रे.... उगाच टाईमपास करू नकोस"...

"अरे अरुल मस्करी करतोय".....

"हो ते माहीत आहे मला".....

अरुल आणि अश्या दोघे कट्ट्यावर येऊन बसले आणि गप्पा मारत होते... चाळीत एकूण 12 घर होते लायनीत त्याहून अरुल दुसऱ्या घरात रहायचा व सरु सात्यवा घरात..... चाळीच्या समोर एक खुल मैदान आहे व त्याला लागून एक कट्टा आहे... इथं बसल्या वर इथून सरुच घर अगदी समोर दिसायच....

आता अरुल वाट बघू लागला कि सरु कधी घरा बाहेर येईल .... वाट बघत संध्याकाळ झाली पण सरु काय घरा बाहेर येईना...

"अरुल बस्स कि रे आता चल ना काय इथं कधी चा आपण बसलोय ती नाही येत आहे तोवर चल ना बाहेर जरा फिरून येऊया"....

"थांब रे अश्या तूला नाही कळणार मला एकदा सरुला बघावस वाटतय... येईल ती.... येईल".

तितक्यात अरुलची नजर पडली सरुच्या घराकडे..... सरु हळूच घरा बाहेर आली... हातात बाजाराची पिशवी आणि सोबत तिच्या मामीची छोटी मुलगी तिला घेऊन अरुलच्या समोरून निघुन गेली... थोड पुढे जाऊन पाठी वळून पाहिलं आणि अरुलला बघुन गालातच हसली.... अरुल पण तिच्या मागे मागे चालू लागला.... व अश्या पण अरुल सोबत चालू लागला....

सरु पुढे चालत होती व अरुल आणि अश्या तिचा मागे मागे चालत होते.... बाजारात पोचले तिघही.... सरुने बाजार घेतली व अरुल तसाच तिच्या मागे मागे फिरत होता... सरु हि मुद्दाम पूर्ण मार्केट फिरत होती... सगळ समान घेतल व घरी जाण्यासाठी सरु निघाली... जाताना सरुच्या मामीची मुलगी बोल्ली

"ताई ताई मला chocolate पाहिजे"

सरु मागे वळली आणि जशीच मागे वळली अरुल तीला बगून थांबला.... सरु बोली.....

"हो चुटकी चल हे दादा आहेत ना ते तुला chocolate घेऊन देतील... काय दादा घेऊन द्याल ना ???

"अरुल सरुकडे प्रेमाने बगत बोलला, अश्या जा जरा समोरून एक chocolate घेऊन ये".......

"हां आणतो थांब... "

अरुल बोलला सरुला....

"अजून राग नाही का गेला तुझा .... sorry ना "

"अरुल मी तुझा वर रागावले नाहीच आणि हां तू Sorry बोलू नकोस... मला नाही आवडतं तू मला sorry बोललेल नको बोलूस".......

"बरं नही बोलत म तुला काय आवडत"...... chocolate हे घे अरुल... आलास तू, हो आलो आणि हे घे chocolate...

हे घे चुटकी म्हणत ते अरुल ने चुटकीला दिलं... व सरुला विचारलं... आणि तुला काय हवं आहे......

सरु बोलली........

"आता तू भेटलास ना अजून काय नको मला माझ्यासाठी हेच बस आहे"....

"हे ऐकून अरुल खूप लाजला".....

सरु बोल्ली चल मी जाते उशीर होतोय... बोलत जायला लागली.... तेव्हाच अरुल ने पाठून हाक मरून सरु ला विचारलं परत कधी भेटशील ..... ?? लवकरच म्हणत सरु निघुन गेली.....

"अश्या आणि अरुल पण घरी निघुन आले".....

"घरी आल्यावर ... बाबा अरुलला बोलले काय रे... कुठे होतास"......

"काय नाही बाबा अश्या सोबत होतो बाहेर गप्पा मारत बसलो होतो"......

"नुसतं गप्पाच मारा... पेपर कसा होता आज चा.. ??

"हो बाबा छान होता चांगला गेला पेपर".......

"बरं आता पुढे काय म ... 12 वी नंतर"....

"काय नाय बाबा निकाल तरी लागूद्या त्या नंतर म college..... पुढे continue करायचा आहे मला 13 वि"......

"बरं जा हाथ पाय धुऊन घे आणि बस.....

"हो बाबा".........

अरुल बसलाच होता कि अचानक त्याने अावाज ऐकला..

"काकू आहात का घरी , हो आहे ये आत... अरुल ची आई बोली... अरुल ने बघितलं तर सरु आली होती.. दोघे एकमेकांना बघतच होते कि तितक्यात... अरुलची आई बोलली.....

हां बोल गं काय झाल... अहो काय नाही काकू ते थोडं अद्रक हव होत मी विसरली आणायला... बाजारातून बरं थांब मी देते आणून... हा.... जशी अरुलची आई आत गेली......

"सरु हळूच बोलली अरुलला...ऐक ना.... मागे येऊन भेट मैदानच्या पाठी".....

तितक्यात हे घे ग अद्रक... हा द्या काकू.. चला येते हां मी... म्हणत अरुल कडे बघुन हसत सरु निघुन गेली...... व अरुल पण लगेच आई ला बोलला आई येतो मी... बाहेर जाऊन जरा.... म्हणत मैदानाच्या मागे आला... येऊन बघतो तर सरु तिथं थांबली होती... अरुल तिच्या बाजूला जाऊन थांबला... आणि बोलला.....

"चांदणी हि रात... हातात असो तुझा हाथ..... जीव जाई गुंथून.... तुझ्या प्रेमात आज ".....

हे ऐकताच सरु लाजून अरुल कड़े पाहू लागली.......

"अरे wahhhh खूप छान शायरी करतो तू... आवडली मला..."

आणि मी....??

"हो, हो तू हि आवडलास".....

"आज तुला पाहिलं न आपोआप शायरी शिकलो"......

"अच्छा....... सरु अगदी प्रेमाने लाजून बोल्ली व गलातच हसू लागली".....

"मला शायरी आणि कविता करणं खूप आवडतं सरु पण... मी कधी कोणासमोर केली नाही.. आज तुला इथं पाहताच तोंडातून शब्द आपोआप फुटले... "

अच्छा! हो सरु....

"सरु तू खूप आवडतेस मला"....

"हो अरुल तू हि मला खूप आवडतो... आणि इथं हेच सांगायला तुला मी बोलावलं आहे"......

काय सरु...??

"तेच जे तू दुपारी मला बोल्लास ना"....

हो पण काय...???

थोडं वेळ शांत थांबून सरु ने मान वर केली व अरुल च्या डोळ्यात बघू लागली.... व काही क्षणा नंतर हळूच बोली.....

"अरुल I Love U...... सरु खाली मान टाकत लाजूनच बोली... आणि अरुल तर नुसताच हे ऐकून वेडा झाला... सरु चा हाथ पकडून नाचायला लागला.... I love u too सरु बोलत प्रेमाने उत्तर दिल अरुल ने...."

थोडा वेळ गप्पा मारल्या नंतर सरु बोलली अरुल.. बरं ऐक उद्या मी गावाला जातेय थोड्या दिवसानी येईन... अरुल उदास होऊन बोलला लगेच गावाला... चालीय...

"हो शोना "... म्हणत सरु ने प्रेमाने उत्तर दिला... व अरुल हि प्रेमाने बोलला बरं " शोना " जा... आणि लवकरच ये......

हो लवकरच येईन मी... तुला तिथून कॉल करेंन मी.... हो चालेल कर.... bye शोना बोलून सरु तिथून निघून गेली"......

अरुल थोडा वेळ तिथंच थांबला.... व नंतर घरी निघुन आला.........

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी.... सरु चा कॉल आला... अरुल ने फोन उचलला... हा शोना बोल.... भेट ना आता कालच्याच जागेवर.... बरं येतो... हो ये म्हणत सरु ने कॉल कट केला....

अरुल घरातून निघाला व मैदानाचा इथं जाऊन... थांबला, पाठून सरु अली... सरु ला पाहताच अरुल तर तिला बघतच राहीला.... आल्या आल्या सरु बोलली.......

"शोना कशी दिसते मी"....?

2 minute अरुल सरु ला असच बघत बसला.... आणि मग प्रेमाने... हळू स्वरात बोला......

"स्वप्ना सारखी सुंदर.... फुला सारखी छान.....

लाज तुझ्या चेहऱ्यावर शोभून दिसे आज.... "

सरु लाजून बोल्ली......

"wahh शोना.... खूपच छान खरच पडेन मी आता"....

"अरे शोना मी आहे ना अस कस पडू देणार मी तुला".....

"हो शोना नाहीच पडू देणार तू"......

"शोना.....खूप सुंदर दिसतेस आज तू खरच, आज तर अस वाटय कि स्वप्नं सुंदरी ला बगतोय.... नेहमी माझ्या स्वप्नात तू अशीच सजून येऊन मला विचारायची... अरुल कशी दिसते मी आणि मी प्रेमाने तुला बोलतो...

"स्वप्नात येऊन करते इशारा...

समोर का येत नाहीस...

लावते या मानला माया...

समोर का येत नाहीस...

प्रेमाने नजरेचे तिर चालवते....

समोर का येत नाहीस...

स्वप्नात जे दिसत प्रेम ते समोर का करत नाहीस"....

"बस शोना अजून किती तारीफ करशील"... अस थोडी आहे हे तर तुझा मोटपन आहे कि... तू अशी shayari मध्ये मला व्यक्त करतोस... नाहीतर मी कुठे येवडी सुंदर आहे".....

"Achaaa... म्हणजे मी खोटा बोलतोय का...??

"नही शोना... आहे बस जस तू बोलतोस ना तशीच खुश".....

"बरं ते सोड मी काय म्हणते, बोल ना काय बोलतेस, हां बोलते कि शोना... धीर धर ना जरा ...... मी ना, हा तू ना काय शोना....

शोना मला बोलू देना.... सरु मी तेच वाट पाहतोय कधी बोलशील अरे बोलते ना... अस करणार"... "नाही शोना बोल तू बोल".... "हा बोलते मी आज गावाला चालीये ना म म्हटलं गावाला जायच्या आधी तुला एकदा भेटून जाते मनाला आराम मिळेल".....

"मस्त वाटतय खूप आनंद होतोय पण मन उदास आहे कि तुझ्या कडून लांब जातेय पण... काय जाव लागणार"

"हो शोना जा आणि लवकरच ये... मी इथंच वाट बघेन तुझी"...

"हो शोना.. लवकरच येईन मी, तुला ना मेसेज करेन आणि जमलं कि फोन करेन"....

बरं जाते मी उशीर होतोय... शोना जाते मी लवकरच भेटू..... शोना.... हा सरु बोल...

"सरु ने अरुलला आपल्या मिठीत घेतलं".... अरुल दचकला... सरु कोणतरी बघेल आपल्याला.. म्हणत लांब झाला... सरु लगेच तिथून निघुन गेली....अरुल थोडा वेळ तिथंच थांबला... आणि सरु ला... जाताना बघुन म तिने जेव्हा त्याला मिठीत घेतलं तो क्षण आठवून खुश झाला.. आणि हसू लागला... थोडा वेळ थांबून... अरुल घरी निघून आला...

अरुल ला... आज काय झोप लागेना नुसतं सरु चा विचारात मोबाईल मध्ये गाणे ऐकत होता... तितक्यात मेसेज ची रिंग वाजली .... बघतोय तर सरु चा मेसेज आला....

"जास्त वेळ जागा राहू नकोस... शोना झोप आराम कर.... Good night.. take care"

"मेसेज वाचताच अरुल खूप खूष झाला... परत अरुल ने हि सरु ला Good night... take care मेसेज पाठवला व झोपला "......

सकाळी जसा अरुल उठला... सगळ्यात आधी मोबाइल मध्ये बघितल सरु चा मेसेज आलाय कि नाही.. बघितला तर मेसेज नव्हता... अरुल ने Good morning... मेसेज केला... व उठला...

दुपारी अश्या आला घरा बाहेरुनच अरुल ला हाक मारली अरुल...... हाक ऐकून अरुल लगेच घरा बाहेर आला व दोघे जाऊन कट्ट्यावर बसले...

अरुलने त्याचा आणि सरु मध्ये झालेला कालचा संवाद पूर्ण अश्याला सांगितला.... दोघे तिथं गप्पा मारत बसले होते... पण अरुलच अर्ध लक्ष मात्र मोबाइल वर होता... कि सरुचा काही कॉल मेसेज आला का....थोडा वेळ गप्पा मारून दोघही आपआपल्या घरी निघुन आले....

आज अरुल ला करमत नव्हतं..... संध्याकाळी अरुल मैदानाच्या पाठी जाऊन बसला... तिथं जाऊन सरुच्या विचारात गुंथला... तेव्हाच तिथं अश्या आला...

"काय रे भावा कधी चा शोधतोय मी तुला... आहेस कुठे तू"

"हे काय इथं, मी इथं बसलोय"

"हा ते बरोबर पण इथं काय करतोय चल कि आपल्या कट्ट्यावर तिथं जाऊन बसूया"....

"नाही इथंच बस"...

"मला माहीतेय सरु ला काल इथं भेटला होतास म्हणून इथं बसला आहेस ना तू .... हो रे भावा, आठवण येते ना रे तुला सरुची... हो अश्या खूप आठवण येते... अजून 2 दिवस झाले मनातलं तिला सांगितलं... आणि आज ती गावाला... आहे

ती काय करत असेल... तिला पहावंसा वाटतय... काय करू???

आज दिवस भर तिला पाहिल नाही मी बोललो पण नाही, मनात कसा तरी तळमळ होतेय"....

"असं होय. पक्का आशिक झाला आहे यार तू".....

"अरे तू काळजी का करतो हे बघ भावा तू टेन्शन का घेतोय फोन येईल कि तिचा... नाहीतर तू कर"...

"नको ती समोरून करेल तिने सांगितलं मला...

"बरं....असूदेत"...

थोड्या वेळा नंतर मोबाईलची रिंग वाजली... मोबाईल बगताच अरुल खुश झाला... सरुचा फोन होता...

अश्या बोला... "भावा नंतर मजा घे आधी फोन उचल, हा... अरुल ने फोन उचलला....

"हॅलो शोना... काय करतोय माझा शोना.... काय नाही शोना.. तुझ्या फोनचीच वाट पाहत होतो... तुझा आवाज ऐकला बरं वाटतय आता"....

"मला हि शोना... खूप मस्त वाटतय... तुला माहीतेय मी ना इथं गच्ची वर येऊन बोलतेय तुझ्यासोबत... इथुन ना आभाळ किती सुंदर दिसतंय... चंद्र पण बग किती छान दिसतोय... आणि त्याऊन भारी मी तुझ्यासोबत बोलतेय लपून लपून... मस्त वाटतय शोना".... अच्छा!

"हो शोना मग काय सवाल ??

"नाही शोना कशी आहेस तू ठीक आहेस ना... जेवलीस का तू"...

"हो मी ठीक आहे नाही जेवायचं आहे अजून.. तू कसा आहेस जेवलास"...

"नाही अजून जेवायचं आहे आणि मी हि ठीक आहे सरु.... तुला महितेय सरु जेव्हा ना तू प्रेमाने शोना बोलते ना खूप मस्त वाटत यार... अगदी " special " असल्या सारखा"...

"अरे वाटत काय आहेसच तू स्पेशल मला हि जेव्हा तू सरु बोलतो ना खूप आवडतं"....

"हो सरु, अरुल बोलत बोलत शांत झाला सरु बोलली हॅलो अरुल काय झालं बोलना...अरुल बोलला हो शोना बोलतोय ना ह्या शांत वातावरणाची मज्जा घेतोय तू पण जरा ह्या शांत वातावरणाला बघ त्याची जाणीव कर.... shhhhhhh हो अरुल.... hassssssh"

"चमक भरी हि चांदणी आणि चमकती हि रात...

मनात तुझा भास आणि सोबती न तुझा साथ...

हेच तुझ प्रेम कि सोबत आहेस तू माझा आज...

लांब असूनही आहेस मनाच्या पास.... "

है ऐकतच सरु प्रेमाने हळूच स्वरात बोली.... "love u so much shonaaaa"...

व थोडा वेळ बोलून... म सरु ने फोन ठेवला व अरुल आणि अश्या घरी निघुन आले...

दिवस असेच जात राहिले रोज संध्याकाळी सरुचा फोन यायचा व... दोघ मस्त प्रेमाने हसत हसत एकमेकांसोबत बोलायचे... आपल्या बोलण्यात दोघ इतक रमून जायचे कि... जणु जगात कोण दुसरा नाहीच....

एक दिवस अरुल मैदानाच्या इथे एक झाडा खाली पाठ करून... बसला होता स्वतः बोलत होता...

"एक क्षण येऊन दे साथ मला....

एक क्षण दे हातात हाथ माझ्या...

दर क्षण जाई पाहता वाट तुझी.....

एक क्षण दे श्वासात श्वास माझ्या...

एक क्षण येऊन दे साथ मला....

क्षण भरची आहे मर्जी माझी...

बस एक क्षण ची आहे अर्जी माझी...

एक क्षण समोर येना माझ्या.

मिठीत तुझ्या घे ना मला....

आता क्षण भर हि राहावत नाही.... बस

एक क्षण येऊन दे साथ मला "......

"अरुल एक क्षण नाही... माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण...प्रत्येक क्षण तुझा आहे,आपला आहे"......

अरुल हे ऐकताच उठला व वळून बघतो तर... सरु समोर थांबली आहे... सरुला बघताच अरुलचे मन भरून आले... व सरुचे डोळे हि पाणावले..... दोघ शांत थांबून बस काही ना बोलत एकमेकांकडे पाहू लागले..... जणू आज ते नव्हे पण त्यांची नजर बोलतेय... काही क्षण नंतर शांत होऊन अरुल बोलायला... गेला तितक्यात

सरु ने त्याला आपल्या मिठीत घेतलं...

दोघ थोड्या वेळा नंतर एकमेकांना पाहत होते तेव्हा अरुल बोला....

"खूप उशीर केलास यायला शोना.... हो शोना आता नाही जाणार कुठे मी बस तुझ्यासोबतच राहणार मी... love uhh so much.... शोना.... love uhh too... सरु".....

"कधी आलीस तू गावावरून.. आताच अाली जशी घरी पोहोचली तशी तुला भेटायला इथं आली... मला माहित होता तू इथेच माझी वाट पाहत असशील.... हो सरु रोज इथेच बसून तुझी वाट पाहत असतो"....

थोडा वेळ बोलून.... व दोघ थोड्या वेळा नंतर घरी निघुन आले....

आता रोज असच सरु आणि अरुल भेटू लागले... इथं अरुल सरुच प्रेम हळू हळू पूर्ण चाळीत पसरलं... चाळीतल्या सर्व मुलं व मुलींच्या तोंडावर बस एकच नाव अरुल सरु.....

त्यांच प्रेम दिवसेंदिवस चाळीत चर्चित होऊ लागलं..... व दोघांच एक मेकां वर प्रेम वाडू लागलं...

हीच चर्चा एक दिवस त्यांच्या घरापर्यंत... पोहीचली....

आज result कळले सरु,अरुल व अश्या पास झाले... नेहमी प्रमाणे सरु या वेळी हि 1 नंबर ने उत्तीर्ण झाली...

सगळं चांगल चालू होतं... पास झाले म्हणून सरु आणि अरुल पण खूप खुश होते... आज त्यांनी ठरवल्या प्रमाणे celebrate करण्यासाठी तिघही... भेटले व celebrate करत होते...

"त्याच वेळी सरुच्या काकांनी सरुला... अरुल सोबत हाथ पकडून चालताना पाहिलं".....

सरु खूप खुश होती घरी पाऊल ठेवताच बाबांनी तिला विचारलं....

"कुठे होतीस...?? सरुचे बाबा खूप रागात होते"....

"सरुने सहज सांगितलं बाबांना... बाबा सांगून गेलते ना आम्ही सगळे मित्र मैत्रीण... Pass झालो म्हणून celebrate करतोय"....

तेव्हाच आई ओरडली ....."सरु हे काय आहे हेच शिकवलं का आम्ही तुला... हे सगळं काय आहे आणि कधी पासून चालू आहे"...

सरु ला काय सुचत नव्हतं पण एव्हढ मात्र सरुला कळल कि घरी अरुल बद्दल कळलं ... सरु खूप घाबरली होती कि आता काय होणार...

"आई बोली सरु बोलशील काय"...

सरूची आई रडत होती व आईला बघुन सरु हि रडायला लागली... बाबा हि खूप टेन्शन मध्ये होते... शांत डोक्यावर हाथ ठेवून बसले होते... सरुची आई सरुला खूप ओरडली... काकांनि पहिला तुला त्या पोरा सोबत सरु... तू त्या पोराचा हाथ पकडून चालत होतीस.... तू शांत हो.. सरु चे बाबा सरुच्या आई ला म्हणाले....अहो काय शांत बसू... मी आताच जातो त्या मुलाचा घरी ....

"सरु काहीच बोलू शकली नाही"...

सरु खूप रडत होती... उत्तीर्ण झाली याचा आनंद एका जागी व घरात कळलं याचा दुःख एका जागी... सरुला काही कळे ना... कि काय करावे...

इथं सरुचे बाबा... अरुलच्या घरी आले... अरुलचे बाबा...

"अरे या राव कसा काय आज....सरु उत्तीर्ण झाली ना गुणी आहे मुलगी तुमची या वेळी हि प्रथम आलीये अभिनंदन"....

"हो तुमचं अभिनंदन तुमच्या जवळ ठेवा... कुठे आहे तुमचा लाडका... समजून ठेवा त्याला माझा पोरीच्या पाठी लागलाय.... त्याला सांगा माझ्या मुलीचा नादी लागू नको".....

हे ऐकताच अरुल चे बाबा...बोलले " अहो ऐका आधी तुम्ही आत या बसून... मला सांगा काय झालाय... "

सरुच्या बाबांनी अरुलच्या बाबांना व आई ला... सगळं सांगितलं व त्यांचा कडून हे खात्री करून.... घेतली कि अरुल आता सरु ला भेटणार किंवा बोलणार नाही... आणि सरु चे बाबा घरी निघुन आले....

अरुल जसा घरी आला... बाबांनी त्याला हाक मारली

"अरुल कुठ गेलतास"...

"बाबा बाहेर होतो मित्रांसोबत"....

"बरं जेवून घे मग मला आणि तुझ्या आईला... तुझासोबत बोलायचं आहे"....

"बाबा काय झालं आज घरात एवढी शांतता का आहे मी आज पास झालो बाबा तुम्ही खुश आहात ना"...

"हो बाळा खुश आहे मी, आई काय झाला काय तरी झालंय वाटत"...

"ऐकलंस ना बाबा काय म्हणाले जेवून घे आधी... बरं आई" ......

अरुल विचार करू लागला... नेमकं त्याला कळे ना कि झालय काय... त्याच विचारात जस तस जेवून... त्याने बाबांना विचारलं... बाबा काय झालय... अरुल चे बाबा बोलले...

"अरुल ऐक मी तुला काय सांगतोय... लक्ष देऊन ऐक, हो बाबा ऐकतो... अरुल तू माझं एकुलता एक मुलगा आहेस..

तुला कोण काय बोलणार किंवा कोण तुझ्याबद्दल काय बोलेल हे मला व तुझा आईला.. नाही आवडत, बाळा मुलीसोबत फिरणं फक्त प्रेम नसतं... खरं प्रेम त्या मुलीला मिळवण्या साठी आपण चांगल्या मार्गा वर चालून कसं यश मिळवतो.... हे असतं खरं प्रेम"... "मी जास्त काही नाही बोलत पण... एव्हढेच कि मी आणि तुझ्या आईने हे ठरवलं आहे... आज नंतर तू सरुला कधी भेटणार नाहीस, सरु सोबत तू बोलणार नाही बस"....

"बाबा पण झालं काय...??

"हे बघ अरुल, सरुच्या बाबांना मी... वचन दिलय आणि तिच्या बाबांना हि खात्री दिली आहे कि... या पुढे सरु ला तू नजर वर करून नाही बघणार".....

"बाबा माझं ऐका तरी"...

"अरुल बस जस बाबा बोलले तसच करायचं बस... आई रागात बोल्ली"...

व अरुल या पुढे काय बोलू शकला नाही...

अरुल जाऊन बेड वर झोपला... झोप तर काय लागे ना... अरुल मात्र विचारात गुंथला होता...सरुची काय हालत असेल ती जेवली असणार कि नाही.. तिचे बाबा काय बोलले असणार तिला... पूर्ण रात्र अशीच निघुन गेली... व तिथं सरुची हि तशीच अवस्था होती सरु जेवली हि नव्हती... व सरुचे आई बाबा सरु सोबत बोलतही नव्हते... पूर्ण रात्र सरुने रडत व अरुलचा विचार करत काढली.....

दुसऱ्या दिवशी... अरुल अश्या ला... भेटला व त्याला काल जे सगळं घडलं ते सविस्तर पणे सांगितलं... अरुलने अश्याला... सांगितलं कि मला एकदा सरुला बघायच आहे... पण हे शक्य नव्हतं..... रात्रंदिवस असेच गेले... अरुल ना धड कोणासोबत बोलतोय ना... धड जेवतोय... दिवस.. दिवस भर बस मैदानाच्या मागे झाडा खाली बसून असतो... या विचारात कि कधी तरी तिथं सरु येईल....

एकाच चाळीत रहायचे म्हणून एकमेकांना बघणं शक्य होत पण... अरुलला सरु सोबत बोलायचं होत... आणि तो दिवस हि आला... जेव्हा इतक्या दिवसांनंतर आज अरुल सरुला... भेटू शकतो...

आज College चा पहिला दिवस... सरु College साठी निघाली... अरुल रस्त्यात सरुची वाट बघत थांबला.. होता... सरुला बगताच तो सरु समोर आला... व प्रेमाने बोलला

"सरु कशी आहेस... माझी शोना... खूप दिवसांनी बघतोय तुला... आज मन भरून तुझा सुंदर चेहरा बघणार मी... या चेहऱ्याला.. मी माझ्या मनात lock करून ठेवेन..." अरुल अस हसत प्रेमाने बोलला...

पण सरु खाली मन टाकून थांबली होती... व काय न बोलताच तिथून जायला लागली... तेव्हा अरुल ने सरुला हाक मारली...

"सरु काय तरी बोल सरु काय नाही होणार, आपल्या आईबाबांना आपली काळजी आहे... म्हणून तेही त्यांच्या जागेवर बरोबर आहेत.. तू घाबरू नकोस... मी आहे ना तुझ्यासोबत सरु सगळं ठीक होईल.... जे होतं ते सगळं चांगल्या साठीच होतं"....

पण सरुने काय उत्तर नाही दिल व तिथून रिक्षात बसून निघुन गेली..

अरुल सरु ला हाक मारत तिथेच थांबून राहिला...

"सरु सरु... ऐक ना शोना ऐक ना... बोलत अरुलच्या डोळ्यात... पाणी आल सरु, सरु..... शोना थांब ना....

अश्या ने अरुलला.. सावरलं व समजवून... college ला... घेऊन आला... अरुलच मन कुठेच लागत नव्हतं....सरुला कस समजवायच बस हाच विचार त्याचा डोक्यात चालू होता...

तेव्हाच अश्याने अरुलला सांगितलं...

"थांब... मी येतो... जाऊ नकोस कुठे इथंच बस"...

व तो निघुन... गेला... काही वेळा नंतर तो परत आला व अरुलला बोलला...

"मित्रा काळजी करू नकोस.. मी सरुच्या मैत्रीणला... भेटून आलोय व तिने मला... सांगितलंय कि ती सरुला.. College च्या पाठी घेऊन येईल.... College सुटल्या वर जाऊया... अापण"....

"तेव्हा जाऊन अरुलच्या जिवात जीव आला.. अश्या बोलला अरुलला... भावा आता तरी हस जरा... व अरुल थोड गालातल्या गालात हसला"...

अरुल आणि अश्या सरुची वाट पाहत College च्या मागे... येऊन थांबले होते... थोड्या वेळा नंतर सरुला येताना बघुन अरुलचे हाथ पाय थरथरायला लागले... मनात कसा तरी होत होतं त्याचा...

"अरुल मी आहे बिंदास बोल काय ...... बोलायचं ते टेन्शन घेऊ नकोस बोल तू All the best.. भावा, अश्या अरुल ची हिमत वाढवत बोला"...

सरु अरुल च्या समोर येऊन थांबली व दोघ शांत थांबले... काय न बोलता... दोघ बस एकमेकांना बघत होते, थोड्या वेळा नंतर अरुलने सरुचा हाथ पकडला सरुने हाथ झटकला व वर बघून. बोलली...

"अरुल मला विसरून जा... विसरून जा मला... विसरून जा... विसरून जा"....

.... To Be Continue

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED