अरुल सरु.... 3 Harshad Molishree द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अरुल सरु.... 3

अरुल सरु

भाग ३...

सग चांगला चालू होतं अरुल आणि सरु रोज college मध्ये भेटायचे... व खूप जपून रहायचे, एकदा जे झाला ते परत तसला काय झाला नाही पाहिजेल या साठी दोघ खूप काळजी घायचे... मधी मधी जेव्हा मन नाही लागायचा college ला तेव्हा, दोघ जण बाहेर हि जायचे फिरायला, पण अगदी सग plan करून ठरवून... खूप मस्त चालू होतं दोघांचं कधी movie ला, तर कधी marine drives ला... कधी गार्डन मध्ये बसून गप्पा मारत बसायचे तर कधी संधी मिळाली तर फोनवर बोलत बसायचे.... असंच करत college चे 3 वर्ष निघून गेले.. व परीक्षेची वेळ आली... आज काय अरुलच मन लागत नव्हतं college मध्ये, त्याने सरू ला विचरल....

"चल न शोना movie ला जाउया"...

सरू ने नकरला..... "पागल आहे का गप exams आलेत मला अभ्यास करायचा आहे मी नाय नन्तर कधी तरी जाऊ"...

"शोना चल न जाउया न्तर ला खुप अंतर आहे चल न आज जाउया अस काय करतेस"....

"नाहीं हट्ट करू नकोस तुला काय वाटतं की नाही exams आलेत अणि तुला Movie ला जायचा आहे आपलं last year आहे अभ्यास करायचा आहे मला"......

"अणि मला, मला नाही का करायचा अभ्यास तू अ का बोलतेस, Exams माझे पण आहे ना मी तर एवढंच बोलतोय की exams आधी थोडा chill करूया"...

"नाही तुझा chill तुझा कडेच राहुदे.. मला नाही यायच बस्स"...

"शोना चिड़तेस का पण तू... movie ला तर जायचा सांगतोय अजून काय"...

"मी नाही चिडत आहे मी फ़क्त एवढा बोलते की मला नाही यायच बस्स"...

"अरे ऐक न असा काय करतेस... नेहमी अस करतेस तू".....

"नेहमी म्हणजे इतर वेळी कधि नाही का येत मी... घरी खोट बोलून तुझ्यासाठी college bunk करून येते ना मी"...

"तुझ्यासाठी म्हणजे तुला नसतं का यायच फ़क्त मी बोलतो म्हणून येते का"... अरुल खूप चिडून सरु ला विचारू लागला

"हो तू बोलतो म्हणून येते मी फ़क्त"... सरु ने अगदी रागात उत्तर दिला

"ठीक आहे... चालेल जा college ला"...

"ठीक आहे काय, बोल".....

"काय नाय चल सोड topic जा college ला"...

"अणि तू , तू पण चल न सोबत एकत्र अभ्यास करूया ना".....

"हो शोना ठीक आहे चल मी पण येतो चल"...

सरु ने अरुल चा हाथ पकडलं आणि अशीच हलकी फुलकी नोक झोक करत दोघे.... college मधे आले आणि एकत्र library मध्ये बसून अभ्यास करू लागले..... बगता बगता exams शुरू झाले न आज शेवट चा

दिवस होता exam चा paper संपल्या न्तर सगे एक मेकाना Bye करत होते, परत भेटूया कधी तरी अस promise करत होते... तसेच ईथे अश्या पूजा अरुल अणि सरू एका बाजूला थाम्बुन शरबत पिट होते व... college चा आप आपला experience share करत होते... तेवाच सरू बोलली...

"यार result चा टेंशन आहे मी पास होईल ना".....

पूजा बोलली.... "गप ग रानी एक तर तू scholar आहेस उगाच आम्हाला tension देऊ नकोस... ईथे आता कुठे तरी tension free झालीय मी न तू त्यात"...

पूजाचं असा बोलणं ऐकून सगे जोर जोरात हसू लागले... व त्यांची अशीच गमत चालू होती... म थोडा वेळ न्तर सगे आप आपल्या रास्त्या ला निघाले...

अरुल अणि सरू एकत्र घट एक मेकांचा हाथ पकडून चालत होते...

"उदया तू गावाला निघुन जाशील ना, म १ महिन्या नन्तर येशील पूर्ण १ महिना कस जाईल यार, म्हणून मला सुट्टी छे दिवस नाही आवडतं"... अरुल थोडं चिडूनच बोलला

सरू ने अरुल कड़े बघितला अणि बोलली.... "शोना ते तर ठीक आहे पण तुला माहित आहे ना.... मी कधी येतेय गाँव वरुण १ तारके ला"...

"माझा birthday मी किती सांगितलं बाबा ना पण ऐकतच नाही हड यार" ..... सरु अस म्हणत चिडु लागली अरुल वर...

"हो शोना माहित आहे आल्यावर वर करूया न तुझ birthday celebrate तू Tension का घेते... शांत शांत हो माझी शोना"....

"नाहीं पण मला तुझा सोबत birthday च्या दिवशी रायच होतं ना"..... असं म्हणत सरू अरुल ला मारू लागली... व मग रडू लागली... माझा birthday"....

अरुल बोलला.... "अरे पागल माझी शोना... sweet shona माझी angel, माझी शोना चे डोले किती छान किती सुन्दर आहे अणि शोना रडते, हे बग शोना मान्य करतो कि रडताना तू एकदम भारी, कचको, रावस डिसतेस full ठवका... मग काय तू रडत बसशील का"....

सरू बोलली "हो का"... "हो न शोना खरच चल रडणं बंद कर"....

"हो नाही रडत शोना"......

सरु ने अरुल ला मितीत्त घेतल... अणि सरू बोलली....

"बर ऐक शोना या वेळी Call वर बोलायला भेटेन की नाही माहित नाय... बाबा खुप ओरडतात, की काय सारखा सारखा phone वर असते अणि गावी सगे असतील काका वगेरे म नाही जमनार म तू mood Oooof नकोस".....

"हो शोना नाही करत.... , pakka नाही करणार"...... ummmmm "तसही तुला सांगितलं ना मी उद्या पासून मी job ला जातोय night shift आहे"...

"हो शोना सांगितलं... शोना थकशील ना आराम पण नाही भेटणार तुला".....

"हो शोना पण ठीक आहे.... कस आहे कि आज मी मेहनत करनार म एक दिवस जेव्हा future मध्ये मी succesfull होईन तेव्हा म तुला सांगता येईन ना बाबांना कि नाही तो चांगला आहे succesfull आहे... मग काय मेहनत तर करावी लागणार ना... शोना"

"हो शोना"... थोडं वेळ शांत होऊन सरु अरुल कडे पाहू लागली... आणि म लांब स्वाश घेऊन हळूच बोली.... love uhh so much अरुल".....

"Love uhhh to सरु".......

दोघेही आता घरी निघून आले... सरु खूप खुश होती आणि अरुल पण खूप खुश होता, आता थोडे दिवस भेटायला नाही जमणार त्याचा मनात दुःखं तर होतं पण तरी दोघ खूप खुश होते...

संध्याकाळ च्या bus ने सरु गावी निघून गेली... जायाचं वेळी सरु ने अरुल ला call लावला.....

"Hello शोना जातेय मी, काळजी घे आणि तू नीट वेळेवर खाऊन घे जास्त उशीर करू नकोस, काम नन्तर आधी जेवण आणि मी येतेच लवकरच"....

"हो सरु तू कुठे जातेय माझा सोबत आहेस तू माझा जवळ"...

"हो शोना मग काय सवाल आहेच मी बरं चल मी ठेवते फोन"...

"हो ठेव काळजी घे शोना Love uhhh".....

"Haaaan".... सरु ने call cut केलं

अरुल ने रात्री सरु ला good night message केला.. व अरुल झोपला गावी range नाही म्हणून सरु ऑनलाइन नव्हती.....

आज पासून अरुल जॉब ला join झाला night shift ला... दिवस भर सरु चा काय call नाही न message पण तरी अरुल खूप खुश होता... जॉब पण चांगला भेटलाय सगे नवीन freinds अरुल खरच खूप खुश होता... पण तरी मनाच्या कोणत्यातरी कोपर्यात सरु ची आठवण होती....

अरुल रोज सरु ला good night, good morning message करायचा आणि अधी मधी नुसतच call करायचा वेळ भेटला कि आणि सरु हि जमलं कि call वर बोलायची.... अरुल call करून सरु सोबत दिवस भर कामावर जे काय केलं दिवस कसा गेलं सग सांगत बसायचा..... दिवस असेच निघत गेले.........

आज सरु गावरून येणार होती... नेमकं ४ दिवस पासून सरु सोबत बोलणं काय झाल नव्हता त्यात birthday च्या दिवसी हि काय बोलणं झाला नव्हतं.... पण तरी आज मात्र एव्हड्या दिवस नंतर सरु सोबत भेट होईल हे विचार करून अरुल खूप खुश होता...

अरुल ने संगी तयारी करून ठेवली होती birthday चा cake व गिफ्ट हि घेऊन ठेवला होता....

अरुल आणि सरु चे सगे मित्र, मैत्रीण जमले होते सरु ची वाट बगत... तेव्हाच सरु चा call आला...

"शोना कुठे आहेस तू आज भेटायचं ठरलं होता ना मी निघाली आहे कुठे येऊ".....

अरुल बोलला.... "college जवळ ये शोना"...

"हो शोना येते"...

काही वेळ नन्तर सरु आली व सगळ्यांना बगून shock झाली, जशी सरु आली सगे freinds सरु ला wish करू लागले... व अरुल ने येऊन सरु चा हाथ पकडलं... व तिला cake जवळ घेऊन आला सरु ने cake कापला... अरुल ला भरवल मग अरुल ने सरु ला गिफ्ट दिलं... अरुल ने गिफ्ट मध्ये सरु ला wrist watch दिली व बगून सरु ते खूप खुश झाली.... freinds सोबत enjoy आणि party करून... मग अरुल सरु ला गार्डन मध्ये घेऊन आला... दोघ तिथं बसून बस एक मेकांडे बगत होते...

अरुल ने सरु चा हाथ पकडला... व लांब स्वाश घेत बोलला...."hasshhh शोना खूप छान दिसतेस... आज तुला इतक्या दिवस नन्तर बगून खूप खुश आहे मी... अस वाटय कि बस्स बगत बसू तुला कितीही बघितलं तरी मन काय भरतच नाही खूप मस्त वाटय.... एक दम कचको"...

सरु बोलली...... "हो शोना मला हि खूप मस्त वाटय"...

सग चांगलच चालू होत डोघ जण मस्त एक मेकां मध्ये रमून गेलते.... खूप दिवस नन्तर भेटले होते बस्स डोघ एक मेकांना बगत बसले होते... जणो ते नाही त्यांचे डोळे एक मेकसोबत बोलताय.... अरुल सरु ला एकटक बघत होता... व बोलला "अर्ज किया है".....

सरु बोलली.... "wahhhh... मस्त किती दिवस झाले एक पण शायरी नाही ऐकली तुझी मस्त.... इर्शाद इर्शाद"

"अर्ज किया हैं"....

"श्वेत श्वेत हसी तुझी... धुंद धुंद छाया....

उन्हाड्याची गर्मी तू... तू हिवाड्या ची छाया....

फुलून दिसे गाल जेव्हा होई लाल लाल....

लाज हि तुझी जीव घेई माझा आज...

रोग हा बग ना कसा मला झाला...

राग पण तुझा लागे या मनाला प्यारा...

करूनही तुझा या मनात वास...

हृदयात कुठे तरी ठेवू लपून तुला आज"...

अरुल आणि सरु असंच प्रेमाने बोलत होते कि तेव्हाच सरु चा भाऊ म्हणजेच तिचा काका चा मुलगा त्याने सरु ला अरुल सोबत बघितलं... तो लगेच त्याचा मित्रांना सोबत घेऊन सरु आणि अरुल जवळ आला दादा ला समोर बगून सरु तर इतकी घाबरलि कि लगेच रडायला लागली... व अरुल च्या मागे लपली... सरु चा भाऊ... निलेश येऊन सरु ला अगदी रागात बोलला....

"इथं काय करतेस चल घरी निघ"...

अरुल हळूच सरु ला बोलला.... "सरु जा तू... जा सरु"

तेव्हाच निलेश ओरडून बोलला सरुला.... "ऐलकलं नाहीस का निघ बोललो ना तुला निघ इथुन".....

सरु खाली मान टाकत निघून गेली तिथून...

निलेश बोलला अरुल ला..... "काय रे लय माज आलाय का तुला, माझा बहीण च्या पाटी, साल्या कुत्र्या तुझा घरी येऊन सांगितलं होता ना काका ने समजलं नाही का तुला म".....

अरुल ने अगदी शांत पाने उत्तर दिला... "सरु मला आवडते आणि मला... ?.

इतका ऐकताच निलेश ने अरुल वर हमला केला.. व त्याचे मित्र पण सगे सोबत एकत्र मिळून अरुल ला एकट्याला मारू लागले... अरुल ला इतका मारला कि तो रक्ताने भरला... व हे सगे पोर अरुल ला असच सोडून निघून गेले..... अरुल ला डोक्यावर मार लागलं होता व रक्त निघत होतं, अरुलला डोक्यावर लागल्या मुले तो बेशुद्ध पडला तिथंच..... हे सग होताना अरुल च्या एका मित्राने बघितलं व त्याने अश्या ला बोलवून आणलं... अश्या धावत आला व अरुल ला हॉस्पिटल ला घेऊन आला... अरुल बेशुद होता डोक्यावर मार लागला होता अगदी टाके बसले त्याला...

अरुल ला admit केल... अरुल चे आई बाबा हॉस्पिटल मध्ये आले... आई तर खूप रडत होती अरुल ला अस बगून.. पोलीस complaint हि झाली पण अरुल ने शुद्ध आल्यावर पोलिसांना सांगितलं कि माझा accident झाला ... मला कोणी मारला वगैरे नाही... व अरुल च्या ह्याच बोलण्यावर case close झाला... अश्या अरुल वर खूप चिडला त्याने नेमकं जे खरा होतं ते का नाही सांगितलं पोलिसांना यावर अरुल ला खूप सुनावलं हि अश्या ने....

अरुल चे बाबानी अरुल चा हाथ पकडला... व अरुल ला बोलले....

"बाळा तू माझा एकूनता एक मुलगा आहेस अस काही करू नकोस कि या वयात मला झेपणार नाही... मी तुला अस इथं या हालत मध्ये नाही बगू शकत... सरु चे आई बाबा नाही ऐकणार विसरून जा तिला"... अरुल चे बाबा अगदी उदास होऊन अरुल ना नीट प्रेमाने समजवत होते...

अरुल बोलला.... "बाबा मी तिच्या शिवाय राहवून घेईन पण ह्या अफसोस सोबत नाही राहू शकणार कि मी माझा प्रेम मिळवण्या साठी नुसतंच प्रयत्न हि नाही केल.... मला माझा साठी एक प्रयत्न करू द्या please"...

तेव्हा आई बोलली.... "कि हां तू कर प्रयत्न कर तू, ती तर तिथं खुश आहे आणि तू बग इथं काय हालत झालीय तुझी"...

"नाही आई ती पण खुश नसेल...... आई होईल सग ठीक सग ठीक होईल".....

अरुल शांत बसला... अश्या हे सग ऐकून हॉस्पिटल बाहेर निघून आला... तेव्हा अश्या ने बघितला कि सरु तिथं येत होती चेहऱ्यावर ओढणी टाकली होती व लपत लपत येत होती... अश्या ने सरु ला ओळखला... व तिच्या जवळ गेला... व तिला बाजूला घेऊन आला.....

"कुठे चालीय आत अरुल चे आई बाबा आहे आत बसले त्याचा सोबत"...

"मला अरुल ला बागायच आहे म्हणत सरु रडू लागलि".....

सरु ला रडताना बगून अश्या बोलला.... "आता का रडतेस आधी बग जरा काय हालत झालीय अरुल ची चांगला होता माझा मित्र पण काय बोलू, तुझा भावाला समजून ठेव आणि समजवू नकोस जपून ठेव आता त्याला, जीथ भेटला तो खपला समज सोडणार नाही मी त्याला, एक द अरुल ला बरं होऊदेत मग बग तू काय करतो आम्ही"....

अश्या चं अस बोलणं ऐकून सरु खूप रडत होती आणि एक हट्ट पकडून बसली होती कि.... "मला अरुल ला बागायच आहे"....

अश्या शांत झाला व बोलला.... "चल माझा सोबत"...

अश्या सरु ला हॉस्पिटल च्या मागे घेऊन आला व सरु ने तिथून अरुल ला खिडकी मधून बघितलं अरुल झोपला होता अरुल ला अस बगून सरु खुप रडली डोक्यावर पट्टी व अरुल ची अशी हालत बगून सरु तिथून धावत निघून गेली अश्याने तिला थांबवायचा प्रयत्न केलं पण सरु थांबली नाही.....…

To Be Continue.......