प्रपोज..-३ Anuja Kulkarni द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रपोज..-३

प्रपोज.. -

गौतम अमेरिकेला गेला.... तिथे सेट झाल्या झाल्यावर त्यानी रियानी दिलेली यादी पहिली. आधी गडबडीत त्याला रियाच मेल पाहायला वेळ मिळालाच न्हवता. त्यानी यादी पहिली आणि त्याच्या एकदम हसूच आल. रीयानी इन मीन २ गोष्टी लिहिल्या होत्या. त्यानी लगेच रियाला फोन लावला. रियानी फोन उचलला आणि ती उत्साहात बोलायला लागली,

"गौतम.. तुला आत्ता वेळ झाला का रे फोन करायला?"

"तुला पोचल्यावर मेल केल होत रिया..उगाच झापू नकोस! इथे सेट व्हायला जरा वेळ गेला आणि कामाच तर काही विचारूच नकोस. काम मस्त आहे पण खूप काम आहे. सो त्यात राहीला फोन करायचा. कशी आहेस?"

"मी मस्त.. तू नसण्याची सवय करून घेतीये. परवा फोन लावत होते तुला चुकून..मग लक्षात आल, तू इथे नाहीयेस. आणि तू काळजी घे न वेळेत जेवत जा.. तुला सवय आहे जेवण स्किप करायची. आता एकटा राहातोयस सो "

"मी येतोय ग ६ महिन्यात.. माझा नंबर डिलीट करू नकोस. आत्ता फक्त इनअॅक्टीव केलाय."

"तुझा नंबर डिलीट कसा करेन गौतम..तू माझा खूप खास मित्र आहेस."

"ए, तू सांग, मी तुझी यादी आत्ता पहिली. फक्त २ गोष्टी? काय रिया? तुला सांगितलेलं ना मी, मी नाही कंजूस."

"फार काही नकोय सो.. आय नो आय नो, तू खूप उदार आहेस!" रिया हसून बोलली.

दोघ बराच वेळ गप्पा मारत बसले मग मात्र रियाला झोप आली त्यामुळे त्यांनी फोन बंद केला.

गौतम आणि रिया वेळ मिळेल तेव्हा बोलत होते... पण गौतमला काम खूप असल्यामुळे त्याला जास्ती वेळ कोणाशीच बोलता येत न्हवता. गौतम तसा वर्कोहोलिक. त्यामुळे तो अमेरिकेत रमला. पण अर्थात त्याला भारताची आणि त्याच्या ग्रुप ची आठवण नेहमीच यायची. गौतम चा अमेरिकेतला स्टे वाढला...आणि त्याला १ वर्ष अमेरिकेत रहाव लागल.. काम पूर्ण करून तो परत भारतात आला.. गौतम नी रीयानी सांगितलेल्या वस्तू आणल्या होत्या पण त्यानी ते तिला लगेच सांगितलं नाही..

भारतात आल्यावर एका मध्य रात्री गौतमला खडबडून जाग आली.. तो भयंकर अस्वस्थ झाला आणि त्यानी रिया ला फोन लावला... रिया नी फोन उचलला आणि ती बोलायला लागली,

गौतम...आत्ता पहाटेचे ४ वाजलेत रे... का उठवतोस सुंदर झोपेतून? तू अमेरिकन वेळेप्रमाणे जागा राहतोस का अजून? जेट लॅग अजून नाही गेला?”

"नो नो.... मी झोपलो होतो! जेट लॅग चा त्रास नाही झाला! आणि अग रिया मी इथे घाबरून उठलोय आणि तुला तुझ्या झोपेची काळजी?”

ओके...सॉरी! बोल काय झाल? काका काकू नाहीयेत का घरी? त्यांना उठवायचं ना...

नाहीयेत ना ते घरी.. दोघ ट्रीप ला गेले आहेत.... मी एकटाच आहे आणि हे स्वप्न! विचित्र होत स्वप्न..म्हणून तुला फोन केला...

ओके.. सांग,का घाबरलास? तुला माहितीये, मला नाही आवडत कोणाच्या घरी जायला पण मी आत्ता लगेच तुझ्याकडे यायची गरज आहे? तस असेल तर सांग.....आवरून येते मग बोलू निवांत!! कशी बशी झोपेतून जागी होत रियानी उत्तर दिल...

नको रिया.. आत्ता घरी येऊ नकोस! आपण उद्या सकाळी भेटू... आत्ता फक्त माझ स्वप्न ऐक.. मला माझ मन मोकळ करायचय! मनात ठेऊन दिल तर त्रास होईल मला! आणि परत झोप पण नाही लागणार.

ओके.. तू सांग,काय स्वप्न पडल? भीतीदायक स्वप्न होत?”

भीतीदायक आहे का ते नाही माहित पण अस्वस्थ करणार स्वप्न होत,हे नक्की!

तू स्वप्न सांग आता.. मी वाट पहातीये

ओके ऐक,मला भयंकर स्वप्न पडल...मी कड्याच्या अगदी टोकाला उभा आहे.. कोणत्याही क्षणी दरीत कोसळणार अस वाटत होत... आणि...

आणि काय बोल कि.... तू दरीत पडलास? अश्या स्वप्नांवर विश्वास नसतो रे ठेवायचा. अमेरिका रिटर्नड आहेस आणि स्वप्नावर विश्वास काय ठेवतोस? मनात विचार चालू असतात ते फक्त दिसत स्वप्नात. रिया गौतमची समजूत घालायचा प्रयत्न करत होती पण रिया सुद्धा मनातून घाबरली कारण तिचा स्वप्नांवर विश्वास होता. तिनी अस नेहमीच वाटायचं, स्वप्न अशीच पडत नाहीत. स्वप्न काहीतरी मेसेज देतात असा तिचा ठाम विश्वास होता.

मला नाही माहित. कधी कधी माझी स्वप्न खरी होतात ग.. आणि हो,उरलेलं स्वप्न उद्या भेटल्यावर सांगीन.… ओके? आता झोप येतीये!! पण दरीत पडलो नाही स्वप्नात हे सांगू शकतो उगाच तू विचारत नको पडायला!"

"हाऊ मीन... तू मला रात्री उठवलस.. मी इतकी छान झोपले होते आणि तू माझी झोप घालवलीस...स्वप्न काय ते पण नाही सांगत! उद्या भेटले कि बघ...मी कर करते तुझ!"

ओके ओके.. मी वाट पाहतो उद्याची! आणि स्वप्न ऐकायला तू वाट पहा उद्याची.... नक्की ये आणि वेळेत ये! मी वाट पाहीन!!

ओके.. आता उद्या तुला बघतेच!

सॉरी तुला डिस्टर्ब केल...पण माझ्याकडे दुसरा पर्याय न्हवता! बट नाऊ,आय अॅम शुअर,यु विल कम अॅट माय प्लेस! तुला माझ स्वप्न ऐकायचं आहे ना.. आय नो यु रिया!

आता तर येणारच नाही...बघ येते का! असा त्रास देतोस.. रूड!

आय नो,यु विल कम!

आय विल नॉट..बघच!

हाहा..लेट्स सी रिया! आता झोप..मी पण झोपतो! सी यू टुमारो! गुड नाइट

गुड नाइट...

इतक बोलून गौतमनी फोन बंद केला आणि एकटाच हसायला लागला. तिथे रिया मात्र विचारात पडली होती.

अनुजा कुलकर्णी.