Propose - 4 books and stories free download online pdf in Marathi

प्रपोज..- ४ शेवटचा भाग.

प्रपोज..- ४

शेवटचा भाग

रियाला गौतम च स्वप्न ऐकायचं होत म्हणून लवकर उठून पटापट आवरून क्षणाचाही विलंब न लावता घरातून निघाली.. रिया गौतम कडे आली... गौतम आधीच उठला होता.. उठल्या उठल्या त्यांनी चहा आणि पोहे करून ठेवले... त्याला माहित होत रिया त्याला भेटायला नक्की येणार.. ती आली आणि तावातावानी बोलायला लागली,

रूड... का माझी झोप का घालवलीस ते सांग! त्याचाच जाब विचारायला आलीये मी तुझ्याकडे..

हो का? स्वप्न ऐकायला नाही आलीस?”

नाहीच आले स्वप्न ऐकायला... का यु वर वेरी रूड गौतम! मला झोपेतून उठवलस आणि अर्धवट स्वप्न सांगितलस...मग झोप आली म्हणून झोपून गेलास. तू खा रे आता माझा मार!

हाहा... लक्षात ठेव....मला मारलास तर स्वप्न सांगणारच नाही! मग बस रडत..

यु आर ब्लॅक मेलिंग मी गौतम? यु कान्ट डू दॅट गौतम!

आय कॅन रिया… हाहा

ओके ओके… नाही मारत… कर तुझ स्वप्न पूर्ण! सांग पुढे काय झाल? तू घाबरलास का रे?”

न मारायचा निर्णय,गुड फॉर यू रिया... हाहा!

सांग आता स्वप्न! मी वाट बघतीये तुझ स्वप्न ऐकायची.... सांग लवकर!

थांब कि.. मी मस्त चहा केलाय... तो पी! तुला आवडतो तसा चहा आहे बर का... आणि पोहे मेड बाय मी... टेस्ट करून सांग कसे झालेत.

तू मुद्दाम करतोस का रे? मी काय बोलतीये आणि तू चहा पोह्याच काय बोलतोयस?”

आधी पेटपूजा रिया.. मग सांगतो ना स्वप्न... काय एवढी घाई उडालीये तुला स्वप्न ऐकायची?”

गौतम...यू आर पथेटिक... दे दे चहा आणि पोहे...बर झाल...केलस खायला..मला जाम भूक लागलीये! मी उठल्या उठल्या पटापट आवरून तुझ्याकडे आले तुला भेटायला..

आय नो...भूक लागली असेल... पोहे खाऊन झाले कि सांगतो स्वप्न..

होप सो...

अग रिकाम्या पोटी माझ स्वप्न ऐकून घाबरून चक्कर बिक्कर आली तर काय करायचं ना... मी इथे एकटाच! स्वत:साठी काळजी घेतलीये!" हसत गौतम बोलला

दोघांनी चहा आणि पोहे खाल्ले.... रिया बोलायला लागली..

मस्त पोहे केलेस रे! तुला पोहे करता येतात हे मला माहित न्हवत! आय मिन इतके चांगले पोहे? आणि चहा झक्कास झालेला!

तू विसरलीस रिया.. १ वर्ष अमेरिकेत गेलेलो... सगळा स्वयंपाक शिकलो! आणि उत्तम स्वयंपाक करतो आता..

गुड गुड...आता स्वप्न सांगतोस?”

येस येस... आता पेटपूजा झाली आता सांगतो स्वप्न.. स्वप्नात मी दरीच्या अगदी कडेला उभा होतो... कोणत्याही क्षणी दरीत पडलो असतो..

हे तू सांगितलं आहेस… पुढे काय झाल सांग!!

हो का? सांगितलं होत? विसरलो मी! ओके.. ऐक, मी दरीत पडलो नाही... कारण मी पुढे जाणार तितक्यात मला मागून आवाज आला...

ओह.. कोणाचा आवाज होता?” रिया थोड्या विचारात पडली..

सांगतो ना... मग मी मागे वळून पाहिलं... आणि.. गौतम नी मोठ्ठा पॉज घेतला

आणि काय....कोण होतं? सांग लवकर! उगाच टाईमपास नको रे करूस गौतम!

तू मला हाक मारत होतीस.. आणि मी जाम घाबरलो तुला स्वप्नात पाहून!!"

"हो का? मी इतकी भीतीदायक आहे? गुड ह..पुढे बोल.."

"तू हाक मारलीस आणि मी वळलो... नाहीतर दरीतच पडलो असतो!

ओह... मी होते स्वप्नात आणि मी तुला दरीत पडण्यापासून वाचवल!

हो ना... तू होतीस स्वप्नात! तू मला पडण्यापासून वाचवलस... त्याक्षणी मी गुढग्यावर बसलो... गुढग्यावर बसत गौतम बोलला...

एकदम का बसलास गुढग्यावर? तुला काहीही स्वप्न पडतात का रे गौतम?

ऐक ऐक.. मी असा गुढग्यावर बसलो... तू समोर होतीस... आणि मी तुला... गौतम परत बोलायचा थांबला.

सगळ कळल रे...आता पुढे बोल पटापट... किती वेळा थांबतो आहेस..

हाहा.. मी गुढग्यावर बसलो आत्ता बसलोय तसा आणि मी तुला प्रपोज केल... त्याक्षणी मला जाग आली! घामेघूम झालो होतो मी! इतक भीतीदायक स्वप्न.. गौतम नी रियाच्या नकळत तिचा हात हातात घेतला आणि तिच्या बोटात हिऱ्याची अंगठी घातली....रिया अंगठीच्या थंड स्पर्ष्यानी भानावर आली

ओह माय गॉड... हे स्वप्न भीतीदायक आहे?" भुवया उंचावर रिया बोलली. पण तिला अंगठीचा स्पर्ध जाणवला आणि ती बोलायला लागली, "बाय द वे, तू मला प्रपोज केल आत्त्ता? ते ही अस? नो टाईमपास ना?"

"तू येडी आहेस का ग रिया? आय प्रपोज्ड यु..टाईमपास करेन का असा?" रिया गौतमच बोलोन ऐकत होती.. तिचे डोळे लकाकले.

"पण घाबरवून प्रपोज काहीही!!.. बट, वॉव... फिलिंग सो गुड.. आय अॅम लाविंग इट...

आता सांग,तू माझ्याशी लग्न करशील?” गौतम गुढग्यावरच बसून बोलला...

हो हो... मी तुझ्याशी लग्न करेन!!. तू विनोदी आहेस गौतम....साध प्रपोज मारायला तू किती नाटक केलीस?”

मग आहेच मी वेगळा.. आता ३ मॅजिकल वर्डस... आय लव यू रिया!!!! वूड यु मॅरी मी?

हो हो!!" रिया लाजली, "आय लव यू टू गौतम...पण घाबरवून टाकून प्रपोज केलस... काल रात्री मी किती घाबरले होते गौतम... म्हणून सकाळी धावत धावत आले तुझ्याकडे... माझा असा समज आहे.. स्वप्न काहीतरी मेसेज देतात. आणि दरीकडे चालत जाण हे चांगल स्वप्न नाहीये....तू पुढे काही सांगायला तयार न्हवतास. तुझ अर्धवट स्वप्न ऐकून मी खूप घाबरले..

हाहा.. आहेच मी वेगळा! आणि मला माहितीये तुला अस वाटत की स्वप्न काही संदेश देतात. थोड थ्रील ग.. तू घाबरलीस आणि धावत आलीस!"

"तुला माझ्याविषयी सगळ माहिती आहे पण तू त्याचा गैरफायदा घेतलास. मी बघून घेईन पुढे कधीतरी!"

"बघ ह.. आय विल बी ऑल युअर्स. हाहा.. आणि तू दिलेल्या यादी मधल सगळ आणल आहे..... यादीतल सामान घेत होतो तेव्हाच मला तिथे एक सुंदर हिऱ्याची अंगठी दिसली आणि मी तुला खूप मिस करत होतो.. मला जाणवल होत, आय कॅन नॉट लिव विदाऊट यू! तूच माझी योग्य जोडीदार... पण मला वेगळ्या पद्धतीनी तुला प्रपोज करायच होत.. आणि का ते भयंकर स्वप्न पडल त्याक्षणी मला आयडिया मिळाली तुला प्रपोज करायची... हाहा! आणि फक्त कड्याच्या टोकावर उभ आहे इथपर्यंतच स्वप्न खर होत.. तेव्हा मला एकदम जाग आली.. त्यामुळे पुढच स्वप्न मला दिसलं नाही.. पुढच सगळ मनानी सांगितलेलं आहे! पण स्वप्नात आज जे सांगितलं तेच आल असत.."

"हाहा.. काहीही वागलास गौतम!!! पण हुशार आहेस...इतक भयानक प्रपोज कोणी केल असेल का रे? भयानक इन द सेन्स,मुलीला घाबरवून मग प्रपोज...मला पण तू लांब गेल्यावर जाणवलं की आय कांट लिव्ह विदाऊट यु. तू नेहमीच आजूबाजूला असायचास त्यामुले मला ते आधी कधी जाणवल न्हवत"

तुझ्यापासून खूप दूर गेल्यावर मला तुझ महत्व अजून जास्त कळल... आणि काल स्वप्नाच्या निम्मित्तानी तुला प्रपोज करायचाही चान्स मिळाला.. मी तुला घरी बोलावते पण तू आखडू... काहीतरी कारण देत बसतेस..आणि घरी येत नाहीस! बट धिस आयडिया वर्कड! हाहा..मी कसला स्मार्ट आहे ना रिया!

मला पण तू लांब गेल्यावर काहीतरी मिस करतीये हे जाणवत होत पण ते काय होत ते कळतच न्हवत! बट नाऊ आय नो, आय अल्सो लव यु! ए, पण माझ्याकडे तुला घालायला अंगठी नाहीये... आता?

डोंट वरी! माझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत! हाहा! आत्ताच दुकानात जाऊन अंगठी घेऊन येऊ हिऱ्याची... काय म्हणतेस? गौतम म्हणाला...

ग्रेट आयडिया!!! बाय द वे,गौतम... तू मला साध प्रपोज केल असतस तरी मी हो म्हणाले असते... मला घाबरवून प्रपोज करण्यात काय मजा आली तुला देव जाणे! हाहा..

आयुष्य त्याच त्याच पद्धतीनी जगण्यात काही मजा येत नाही... आयुष्यात थ्रील पाहिजे! यु सी!..

ओह हो! हाहा!... रिया इतक बोलली आणि दोघ हसायला लागले. आणि गौतमला अंगठी आणायला बाहेर पडले.

अनुजा कुलकर्णी.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED