Propose - 1 books and stories free download online pdf in Marathi

प्रपोज..१

प्रपोज.. -

आज रिझल्ट! मला टेन्शन नाहीये पण काहीतरी विचित्रच वाटतंय... आभा बोलायला लागली..

हो ना.. मला तर जाम टेन्शन आलाय... फर्स्ट क्लास कि डीस्टिनक्शन... भीती वाटतीये! आत्तापर्यंत डीस्टिनक्शन मिळालाय प्रत्येकवेळी.. पण आत्ता काय होतंय काय माहित! रियानी आभाला उत्तर दिल. रिया खूप हुशार पण तितकीच घाबरट..

"रिया..तू टेन्शन काय घेतेस...नेहमी तू टॉप करतेस आपल्या चौघात...." रियाला टप्पल मारत आभा बोलली.

"आभा...टेन्शन अस नाही पण शेवटच वर्ष आहे... सो जरा धाकधूक होतीये!रिया म्हणाली..गौतम दोघींचं बोलण शांतपणे ऐकत होता पण शेवटी तो ओरडला,

बायांनो आपण रिझल्ट आणायचा का? मग बोला काय बोलायचं ते...गौतम दोघींन थांबवत म्हणाला..

गौतमला मानेनी होकार देत चौघांनी रिझल्ट आणला..रिझल्ट पाहून आगळेच खुश झाले.

रिया… ह्यावेळी पण तू टॉप केलस...कॉंग्रॅट्स! गौतम म्हणाला..

येस... कॉंग्रॅट्स रिया!! पण रिया ह्यावेळी आम्हला वाटल होत.. आम्ही म्हणजे मी आणि तेजस...गौतम टॉप करेल! पण नेहमीप्रमाणे तूच टॉप केलस.. आभा म्हणाली..

कॉंग्रॅट्स रिया! आणि आय अग्री विथ आभा! हाहा!

ओह.. थॅंक्यू ऑल.... आणि जास्ती नाही जस्ट १% जास्त मिळाला आणि मी गौतमच्या पुढे आले..तसही आपल्यात कधी स्पर्धा न्हवतीच ना? मग आत्ता अस का बोलताय? इतक काय? हे मार्क फक्त त्या दिवसाचे आहेत. तस गौतमच जास्ती हुशार आहे माझ्यापेक्षा! रिया म्हणाली..

असच ग रिया... स्पर्धा म्हणून नाही..आम्हाला तुझा अभिमान आहे म्हणून बोललो. गौतम नी रिया ला उत्तर दिल...

नेहमीप्रमाणे चौघांनाही डीस्टिनक्शन मिळाल होत...आणि नेहमीप्रमाणे रिया नी टॉप केल होत... बाकी जॉब च टेन्शन न्हवतच ... चोघांना जॉब आधीच मिळाला होता..

आता स्पर्धा अभिमान इत्त्यादी सगळ बाजूला ठेऊ! आधी आय वॉन्ट टू हग यु ऑल!एकमेकांना हग करत सगळे बोलले...सगळ्यांच अभिनंदन.... वी डीड इट... आणि आपण एकमेकांबरोबर होतो प्रत्येक क्षणी हे महत्वाच!!

जरा वेळ शांततेल गेला पण आभानी शांतता भंग केली...

चला... आज रिझल्ट झाला.... आता आपण वेगवेगळ्या वाटेनी प्रवास चालू करणार..ए पण भेटत जाऊ मधे मधे! आय अॅम गोइंग टू मिस कॉलेज अॅन्ड यू ऑल.... सेंटी होऊन आभा बोलली....

हो ना... आपल कॉलेज संपल पण.. आज रिझल्ट हातात आल्यावर पोटात धस्स झाल माझ्या! कॉलेज चे सोनेरी दिवस संपले! आपला कॉलेज चा प्रवाद एंड झाला! ४ वर्ष्यांची सवय आपली...सारखे एकत्र असायचो... आणि आता सगळे आपापल्या कामात बिझी होणार! आय डोंट नो,आता माझ कस होणार तुमच्या सगळ्यांशिवाय! रिया आभाच्या म्हणण्याला दुजोरा देत रडवेली होऊन म्हणाली..

गौतम..रिया...तेजस आणि आभा! रिया कॉलेज ची टॉपर... पण चोघे तसे स्कॉलर! चोघांच्या आवडीनिवडी साधारण सारख्याच असल्यामुळे त्यांच्या मध्ये वेगळीच जवळीक आली होती.. चोघांचा खूप छान ग्रुप झालेला कॉलेज मधे! चौघ सारखे एकत्रच असायचे... चार वर्ष एकत्र राहिल्यावर एकदम दुरावले जाणार ह्या कल्पनेनी आणि आता एकमेकांशिवाय कसे राहणार ह्या विचारांनी सगळेच डिस्टर्ब झाले होते.. त्यात आभा आणि रिया जास्तीच सेंटी! आभा आणि रिया सेंटी झाल्या आहेत हे पाहून तेजस नी बोलायला सुरुवात केली...

,आता प्लीज रडूबीडू नका.. तुम्ही दोघी हुशार आणि रडक्या! कसल डेडली कॉमबिनेशन आहे! हाहा! आणि आपला कॉलेज संपलय फक्त.. ह्याचा अर्थ असा नाही कि आपण आता कधीच भेटणार नाही! वेळ मिळाला कि आपण भेटत जाऊ ना! त्यात इतक सेंटी काय होतंय?” रिया आणि भाची टिंगल करत तेजस म्हणाला!

मग काय.. रडक्या दोघी! तुम्ही मुली फार सेंटी असता.. काही झाल कि डोळ्यात पाणी आणता! मी तर एकदम हैप्पी आहे... नवीन जॉब,नवीन काम आणि नवीन माणस... त्यात नवीन सुंदर मुली...वॉव. तेजस ला दुजोरा देत आणि रिया ला चिडवण्याच्या उद्देशानी गौतम नी पाण्यात एक दगड टाकला..

तीर एकदम निशाण्यावर लागला...दगड वर्मी लागला..... गौतम च बोलण ऐकून त्यावर रिया एकदम चिडलीच.. तिचा सेंटी मूड एकदम भांडायच्या मूड मधे चेंज झाला.. ती गौतम ला म्हणाली..

नवीन मुली...ओह! मुद्दाम स्ट्रेस देऊन नवीन मुली भेटतील म्हणलास ना गौतम! मग आम्हाला भेटायची गरज सुद्धा नाही हो.. मला तर भेटूच नकोस! मला पण भेटतील नवीन मित्र!! ओळख दाखवते का बघ आता! रिया पण नवीन मित्र वर स्ट्रेस देऊन बोलली...

आभा आणि तेजस ला त्यांच्या ह्या भांडणात काही इंटरेस्ट न्हवता.. तेजस आणि आभाला रिया आणि गौतम च्या भांडणात साथ देण्यात रस घेतला नाही! दोघ हसत रिया आणि गौतम च भांडण ऐकायला लागले...

मी स्ट्रेस देऊन बोललो नवीन मुली भेटतील? मला तर कळल पण नाही.. हाहा! आणि तुला पण नवीन मित्र मिळणार म्हणे! वा वा!!! आम्हाला विसरणार ना मग? कस होणार आता आमच? गौतम हसत म्हणाला..

हाहा... मी पण हसू? आणि हसा..तुम्ही फक्त हसा! गौतम तुला माझी किंमत आत्ता कळणारच नाही.. पण कधीतरी नक्की कळेल...जे असत त्याची किंमत कळतच नाही. रिया भयंकर चिडली आणि तावातावानी बोलायला लागली..

हाहा.. वन मोर टाईम! रिया चिडली.. आणि रिया-गौतम च परत भांडण.. तुला चिडवण किती सोप्पा आहे ग रिया! गौतम काहीही बोलतो आणि तू त्याच बोलण मनाला लाऊन घेतेस आणि चिडतेस... तेजस हसत बोलला आणि आभा नी हसण्यात त्याला साथ दिली!...

रिया चा मूड तसाच चिडलेलाच होता... ती काही बोलली नाही म्हणून गौतम बोलायला लागला..

चिडू बाई..किती चिडतेस! आम्ही आहोत म्हणून ऐकू घेतो.. नवीन लोक भेटतील,ते तुला असेल सगळे चिडावणारच आहेत! पण तू प्रत्येकवेळी अशी चिडलीस तर कस होईल तुझ? मला फक्त तुझा सेंटी मूड बदलायचा होता म्हणून मी बोललो.. पण मी एक वाक्य बोललो आणि तू किती चिडलीस...अस थोडी चालत? रागावर थोडा कंट्रोल करत जा.

सॉरी..पण तू कश्याला चिडवतोस सारखा? तुझ नेहमीच आहे अस वागण...आणि डोंट वरी! फक्त तुझ्यावरच इतकी चिडणार.. अनोळखी लोकांशी बोलतांना का चिडेन.

असच ग...मजा येते! आणि मला नाही आवडत तू रडवेली झालीस कि. तू कशी मस्त फ्रेश हवीस नेहमी! फ्रेश असलीस कि किती सुंदर दिसतेस. आणि तुला अस वाटत असेल तू रडलीस कि सुंदर दिसतेस तर तो तुझा भ्रम आहे हे लक्षात ठेव."

"ए, गौतम.. मी कुठे म्हणते मी रडले कि सुंदर दिसते! किती त्रास देतोस रे सारखा? इतका त्रास नसतो द्यायचा."

"हो हो.. लक्षात ठेवेन चिडू बाई...चलो मी आता जातो घरी! आई बाबांना रिझल्ट सांगायचं... मुद्दामच फोन नाही केला... आज फायनल रिझल्ट लागला! मी त्यांना रिझल्ट समोरासमोर सांगेन... आणि रिझल्ट ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर येणारा आनंद मला मिस करायचा नाहीये! भेटू परत.. आणि मेल मध्ये फोन वर बोलत राहूच... गौतम तसा एकदम हळवा... छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळवणारा... पण त्याची एक कमजोरी होती ती म्हणजे रिया!

ओके...सगळ्यांना आणि मलाही कॉंग्रॅट्स..हाहा! भेटू निवांत! ओळख ठेवा..रिया म्हणाली...

येस... आता आम्ही पण पळतो.. भेटूच लवकर! तुम्हाला दोघांना पण कॉंग्रॅट्स तेजस आणि आभा बोलले आणि तिथून निघाले...

गौतम ला रियाशी एकांतात बोलायचं होत म्हणून तो बोलायला थांबला...

हे रिया... सॉरी मगाशी तुला चिडवल! पण तू रडकुंडीला आली होतीस! आणि मला तुला अस खरच पाहवत नाही...

आय नो गौतम.. थॅंक्यू... आय अॅम गोइंग टू मिस यु गौतम... चार वर्ष्यांची सवय आता एकदम घालवायची... यू आर वेरी क्लोज टू मी! मला खूप अवघड जाणारे तू आस पास नसतांना जगण! तू पुढे काय करणारेस?”

यू नो,माझ्यासाठी जॉब जास्त महत्वाचा आहे..बाकी सगळ नंतर! आणि आपण भेटत राहू... डोंट वरी! आणि फोन आहे कि... काही वाटल तर फोन करत जा.. आणि मी पण करणार हक्कानी! डोंट वरी आणि.. आपण फक्त वेगळे जॉब घेतलेत पण भेटू शकतो कधीही..ओके?”

येस येस... थोडा वेळ काढत जा माझ्यासाठी. फक्त कामात बुडवून नको घेऊस."

"हो हो.. तुझ्यासाठी कधीपण असेल.. तू कधीही सांग, मी असेनच तुझ्याजवळ.."

रिया हसली आणि बोलायला लागली, "प्लीज मला घरी सोडतोस का रे? आज मला गाडी आणायचा जाम कंटाळा आला होता..

नो प्रोब्लेम...

गौतम नी रिया ला घरी सोडलं.. गौतम जायला लागला ! पण रिया तशी एकदमच सेंटी झाली.... गौतम जायला लागला आणि तिचे डोळे पाणावले... ते बघून गौतम नी चालू केलेली गाडी बंद केली आणि तो म्हणाला...

हे हे.. रिया! डोंट थिंक सो मच... आणि प्लीज रडू नकोस! आपण असणारोत नेहमीच बरोबर! तुला माझ्यापासून दूर जाण्याचा इतका त्रास होती? का? ह्या आधी तू अशी कधीच न्हवती वागलीस ग.. आणि आपल्या कंपन्या पण जवळच आहेत... अगदी वाटल तर हव तेव्हा भेटता येईल.. फक्त एक फोन कर...बंद हाजीर होगा जी!

थॅंक्यू ! आणि नाही रडते... फक्त जरा सेंटी झाले... मला तुझ्या सोबत रहायची इतकी सवय झालीये. सकाळी ९ला आपण कॉलेज ला आलो कि तुझ्याच बरोबर असायचे. तू आजूबाजूला आहेस हे फिलिंग इतक मस्त असायचं! असो, जा तू लवकर! तुला रिझल्ट सांगायचा आहे ना घरी?”

आय नो.. आता इतका वेळ एकमेकांबरोबर नाही घालवता येणार पण फोन आहेच कि.. हव तेव्हा हात टिक बोलत जा! आणि हो हो... जातो मी! आई बाबा वाट पाहत असतील.. मी जातो! तू अजिबात सेंटी होऊ नकोस आता! नंतर फोन करेनच!! सिया... टेक केअर!

सिया...

इतक बोलून गौतम घरी गेला...

अनुजा कुलकर्णी.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED