प्रपोज..-२ Anuja Kulkarni द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रपोज..-२

प्रपोज.. -

चौघ तसे एकमेकांच्या संपर्कात होतेच पण गौतम आणि रिया जास्ती क्लोज असल्यामुळे ते एकमेकांच्या जास्तीच संपर्कात होते.. बऱ्याच वेळा भेट व्हायची किंवा मेल, फोन वर दोघ संपर्कात होतेच. म्हणजे दोघांच अधून मधून फोन किंवा मेल आणि भेटण चालूच होत! गौतम नी रिया ला फोन करून भेटायला बोलावलं..

हे रिया आलीस..

येस. तू बोलावलं आणि मी येणार नाही अस होईल का गौतम?"

"आय नो.. मी बोलावलं आणि तू आली नाहीस अस कधीच होणार नाही. कॉलेज पासून जेव्हा जेव्हा मला तुझी गरज असायची तेव्हा तेव्हा तू माझ्या बरोबर असायचीसच. कॉलेजचा विषय निघाला आणि आठवलं, कॉलेज संपल आणि आपल सगळ्यांचच आयुष्य किती बदललं ना रिया?"

"हो.. ते तर होतचं ना. आता जॉब आहे, आपली स्वप्न आहेत. आधी फक्त मजा आणि अभ्यास इतकच होत..मस्त होते आपले कॉलेजचे दिवस..आपण जगलो ना आपले कॉलेज चे दिवस."

"आपण कॉलेजच्या आठवणीत काय रमलो रिया आत्ता?" गौतम कपाळावर हात मारून बोलला आणि हसला, "मला तुला काहीतरी महत्वाच सांगायचं आहे म्हणून तुला बोलावलंय. आपण निवांत भेटून गप्पा मारू. पण आत्ता महत्वाच ऐक.."

"हो कि गौतम. मी पण विसरूनच गेले की तुला काहीतरी महत्वाच सांगायचं आहे. बोल..एकदम फोन करून बोलावलस भेटायला?”

हो ग.. सांगायचं होत महत्वाच! मला काही दिवस अमेरिकेत जाव लागणार आहे सो आत्ता जितक बोलतो तितका वेळ बोलता येणार नाही मला...कामासाठी कंपनीनी मला सिलेक्ट केलय अमेरिकेत जायला. पण आता काम वाढणार. पण मला आनंद आहे कि माझ काम चोख होतंय.."

"अरे वाह.. कंपनीतून अमेरिकेत जाणार. मस्त गौतम. मला खूप भारी वाटतंय." पण रियानी थोडा विचार केला आणि ती हिरमुसून गेली,"तू खरच जाणार इतक्या लांब?"

"काय झाल रिया? फक्त ६ महिने ग...आणि मी मेल करत जाइन.. आपण फोन वर पण बोलूच कि..मी काय कंजूस नाही! पैश्याचा जास्ती विचार नाही करत. पण मला काम खूप महत्वाच आहे आणि कमी वेळात खूप काम संपवायचं आहे! सो किती वेळ बोलता येईल माहित नाही. आणि परत वेळेचे फरक. म्हणजे तुझ्या झोपेच खोबर नको.

आय नो.. पण वाईट वाटलच ना. आता ६ महिने मनात आल कि भेटता नाही येणार तुला. आणि काय रे गौतम, मला वाटलेलं काहीतरी भारी सांगशील रे.. पण अमेरिकेला जाणार हे सांगतोस.. म्हणजे मला आनंद आहे पण आपली भेट नाही होणार! किती दिवस जातोयस? मी तुला मिस करेन....

हो ना.. मला पण कसतरीच झाल. अग फार नाही...फक्त ६ महिने! तुला सांगितलं कि.. तुझ लक्ष न्हवत का?"

हो हो.. तू सांगितलं असशील पण माझ न्हवत लक्ष.. आणि फक्त काय??? ६ महिने फक्त असतात का रे?" रिया ओरडून बोलली.

"हो..फक्त ६ महिने.. असे जातील बघ!!"

"लेट्स सी.. किती लवकर जातात ६ महिने. आणि खर तर बर झाल तू अमेरिकेत जातोयस. पेरफेक्ट टाईमिंग! हाहा... मला काही गोष्टी हव्या आहेत तिथून.. मला अस वाटतंय, मला काही गोष्टी हव्या होत्या म्हणून तुला अमेरिकेत जायला सिलेक्ट केल असेल.. वॉट से?.. मी तुला यादी देते त्या वस्तू तू आणशील अमेरिकेतून? मी तुला पैसे देईन नंतर!

हो? असेल कदाचित.. म्हणूनच माझ सिलेक्शन झाल असेल..मलाही तसच वाटतंय आता. तुला काही गोष्टी हव्यात म्हणून मी अमेरिकेत जातोय. बरोबरे..तरीच मी विचार करत होतो माझ सिलेक्शन कस झाल बुआ..आत्ता कारण कळतंय."हसत गौतम बोलला.

"काय रे गौतम.. चेष्टा का करतोस? मी माझा मूड लाईट करायला बोलले होते आणि तू माझी चेष्टा करून मोकळा झालास.. जा.. मी नाही देत तुला माझी यादी."

"ए रिया, तू गम्मत करायची... आणि मी नाही. प्लीज चिडू नकोस ग. आधीच ६ महिने सगळ्यांपासून दूर जायचं आहे. नवीन अनुभव मिळेल पण मनात थोडी फार घालमेल तर होतेच. तुझ्यापासून काही लपवत नाही बघ.. आणि तू चिडत बसतेस. ते सोड, तू तुझी यादी देऊन ठेव... आणि आपल्यात पैसे कधी आले ग? मी काय तुझ्याकडून पैसे घेणारे का? काय ओळखलस मला.. मी चांगल्या पगारावर काम करतो..आणि मित्रांकडून पैसे घेईन का?? तुला गिफ्ट देण्याची ऐपत आहे माझी.. डोंट वरी!

ओक.. सॉरी! नाही चिडत. आणि मस्त मूड ठेऊन मस्त अनुभव घेणारेस... फ्रेश राहा आणि लवकर परत ये! तुझी खूप सवय झालीये.. म्हणजे तेजस आणि आभाची सुद्धा पण तुझी जरा जास्तीच!! काहीतरी चुकीचे अर्थ काढू नकोस... उगाच तुला कशाला नसते खर्च म्हणून म्हणले मी. तू जाणारेस मग अजून एक दोन वस्तू वाढतील माझ्या. यु नो, मी किती शॉपिंग करते. म्हणून म्हणले उगाच तुला कशाला खर्च.. मी देईन पैसे! चुकीचे अर्थ काढू नका साहेब!" रिया डाफरून बोलली

"शट अप... फालतू बडबड नको करूस! तू तुझी यादी देऊन ठेव.. मी वेळात वेळ काढून तुझ्यासाठी सगळ आणेन.. आणि येस, मस्त मूड ठेऊन जातो कामाला.. थँक्यू.."

"तू मला शट अप म्हणालास गौतम? का रे? बर आपण तू परत आलास कि भांडू.. मी भांडायला लागले कि खूप भांडते.. मला नाही करता येत कंट्रोल सो... आणि ओके.. देते यादी लवकरच! १० गोष्टी वाढवून देते ह...माझ्या मित्राकडे भरपूर पैसे आहेत.. मी कशाला करू काळजी खर्चाची? बरोबर ना? उपहासानी रिया बोलली

हाहा... चालेल! जे जे हवय त्याची यादी दे.. आणेन मी. तुम भी क्या याद राखोगी, किती उदार मित्र आहे तुझा! आणि येस...डन! मी आलो कि आपण हे भांडण पुढे नेऊ!! मी आल्यावर कंटिन्यू करू भांडण. पण चल मी जातो आता... तयारी करायचीये! खरेदी करायचीये... खूप काम आहेत!

ओके ह.. आय विल मिस यु गौतम!!!.. हे तू कधी निघतोयस अमेरिकेला जायला?”

नेक्स्ट वीक निघायच आहे... तू तुझी यादी देऊन ठेव... ऑर मेल कर! ते सोप्प! कागद सांभाळण्यापेक्षा ते बर! कागद हरवला तर उगाच प्रोब्लेम आणि कागद हरवेल अशी मला खात्री आहे!! दात दाखवत गौतम बोलला.

ओके... मी मेल करते तुला!

मस्त कर तुझी जायची खरेदी! आणि सगळी तयारी नीट कर... औषधाच्या गोळ्या बरोबर घेऊन ठेव...

येस रिया! थॅंक्यू!!! तू काळजी घे... आणि बोलूच फोन वर! आणि हो, मी पण तुला खूप मिस करेन! तेजस आणि आभाला पण...

येस येस.. मी काळजी घेते! सिया! यू टू टेक केअर!!"

अनुजा कुलकर्णी.