we can if you will Madhavi Mahesh Pophale द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

we can if you will

#GreatIndianStories

ओवी जन्माला आली आणि त्याच दिवशी तीच्या डॅडने म्हणजे विनय सातपुते यांनी तीच्या बद्दल ध्येय निश्चित केले.पहिलीच मुलगी जन्माला येणं म्हणजे भाग्यच असा मनांत विचार करून विनयने तीच्या बद्दलचे ध्येय निश्चित केले.मुलगी जन्माला आली या गोष्टीचा आनंद विनयला आणि अश्विनीला खुपच झाला;कारण मुलांपेक्षा मुलींमध्ये धाडस निर्माण करून काहीतरी वेगळे करून दाखवायची इच्छा विनयच्या मनात नेहमीच असायची आणि आता ती  पुर्ण होणार होती.राजे पुन्हा जन्माला या पण शेजारच्या घरांत असं म्हणणारे बरेच दिसून येतात पण ओवीरूपी राणी जन्माला आली ती आपल्याच घरात.आता तीला घडवायचे,संस्कार देण्याचे काम अश्विनी आणि विनयचे.आणि ह्याच दिवसापासून एक आदर्श पालकत्वाचा शिक्का विनयवर बसला.
 ओवीचे शिक्षण सुरू झाले ,ओवी केवळ तीन वर्षाची असतांना  ओवीला डॅडने पाण्यात (swimming Tank) टाकले.ओवी स्वतःच्या बचावासाठी हातपाय हलवेवचहम हा विश्वास विनयला होता.कुठल्याही गोष्टीचा प्रारंभ हा  शुभारंभच असतो.आत्ता केलेली पहिली कृती विवीध शक्तींना कृतीत आणते त्यांना गती देते या प्रवाहातच मग सकारात्मक परिणाम दिसु लागतात.आणि लक्ष पर्यंत पोहचतो ती सकारात्मक्ता खरी झाली.केवळ तीन वर्षाची ओवी सरावाने उत्तम प्रकारे पोहायला लागली.फक्त शिक्षणच नव्हे तर सर्व गुणसंपन्न आपला पाल्य असला पाहिजे असं प्रत्येक पालकांना वाटते,पण प्रत्येक पालकांचे हे स्वप्न पुर्ण होण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते.मनांत आणलेले विनयचे विचार मात्र सत्यात उतरत होते.फक्त पुस्तकी किडा न होता माझ्या मुलीने सर्वगुण संपन्न असावे म्हणून अगदी लहान वयातच शास्रीय संगिताची  आवड निर्माण करून देणे.हार्मोनियमवर बोटे फिरविणे याचे देखिल धडे ओवीला आजी कडून मिळतच होते.आणि ओवी देखिल वडिलांची इच्छा पुर्ण करत होती.इच्छा पुर्ण होत गेल्या की अपेक्षा वाढतच जातात अगदी तसेच झले विनयच्या ओवी कडून अपेक्षा वाढत गेल्या आणि मनातील अपेक्षारूपी नंदनवन दोघांनाही खुणावु लागले.आपल्या पासून काहीशा दूरवर असलेले नंदनवन फार मोठे नव्हते.उत्तम क्रिडापटुला हे माहिती असतं की रोजचा सराव आणि कठोर परिश्रम ,मेहनत आपल्याला धेयापर्यंत घेऊन जाणार आहे.बस आणि ठरलं आठवीच्या सुट्यात  परदेशात जायचं
विकास आणि परिवर्तनाची सगळी प्रक्रियाच विलक्षण आणि अभिमानास्पद असते. सातत्याने विकसित होणं,परिपक्वतेकडे जाणं हेच खरं आपल्या अस्तित्वाचं लक्षण आहे. असा सकारात्मक विचार कायमच मनात बाळगणारे -विनय सातपुते, व्यावसायिक​, सामाजिक आणि आवड म्हणून नेहमीच परदेश दौ-यांवर असतात. ओवी, विनय यांची मुलगी, हीला लहानपणापासूनच वडीलांच्या परदेश दौ-यांविषयी भलतीच जिज्ञासा आणि उत्सुकता असायची. अनेकांकडून परदेशा विषयी ऐकणं त्यावर आईबरोबर चर्चा करणं ओवीला खूप आवडायचं.ओवी जसजशी​ मोठी होत गेली तसतशी तीची परदेशी जाण्याची ओढ वाढत गेली. ओवीने तीची ही ईच्छा तीच्या डॅडला-विनयला सांगितली. तेव्हा विनयने तिला आठवी नंतर नक्की परदेशात घेऊन जाईन असे वचन दिले. दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी विनयने, आठवीच्या सुट्टीनंतर ओवीला परदेशात घेऊन जाण्याची तयारी सुरू केली. साधारणपणे​ आपण परदेशात गेलो की तेथील संस्कृती, हवामान,तेथील लोकांच रहाणीमान व ऐतिहासिक-प्रेक्षणीय स्थळं पहाणं आदी बाबींना आपली पहिली पसंती असते. पण या चाकोरी शिवाय वेगळं काही पहाणे किंवा वेगळं काही करणे हा उद्देश मनात ठेऊन विनयने तयारीला सुरुवात केली.या आगळ्या वेगळ्या​ दृष्टीकोनातून थायलंडला जाणे निश्चित झाले.फुकेत या थायलंडमधील नयनरम्य समुद्रकिनारे लाभलेल्या शहरात स्कुबा डायविंग करून विक्रम करायचा असं विनयला सतत वाटायचं​, पण चिमुरड्या ओवीची क्षमता आणि वातावरण ह्या सर्वच गोष्टींचा विचार पण त्यांच्या मनात येई. शेवटी समोर येईल त्यापरिस्थितीला सामोरे जायच ही अटकळ विनयने मनाशी बांधुन घेतली आणि प्रवास निश्चित केला.
परदेशी जाण्यासाठी लागणारे सर्व सोपस्कार पुर्ण करण्याच्या मागे ओवीचे डॅड लागले. हाती घेतलेले काम पुर्णत्वास नेण्याची कला विनयला लहान पणापासूनच अवगत होती. त्यासाठी लागणारे सर्व सायास पार पाडण्यात त्यांचा हातखंडा होता. परिवार, मित्रमंडळी व नातेवाईकांत स्कुबा डायविंग बद्दल सांगताच सर्वत्र चर्चा सुरू झाली. खुप मोठा धोका पत्करून तु हा निर्णय घेतला आहे अशी देखिल चर्चा ओवीच्या कानावर येत होती. अशा चर्चेकडे ओवीने लक्ष दिले असते तर आज जो विक्रम ओवीने केला आहे तो झालाच नसता.
सर्व नातेवाईकांना तोंड देत देत, थोरांच्या आशीर्वादाने आणि शुभेच्छांसह पुणे ते थायलंड प्रवास सुरू झाला. प्रवास तसा अडचणींचाच झाला.पण गरूड भरारी घेणाऱ्या पंखात बळ रूजवायला विनय सोबत  होतेच. भारतात जलतरण चाचण्या देऊन त्यात उत्तीर्ण होऊन परदेशी आपले कौशल्य दाखवणे तसे नविनच होते, आणि ते ही अठरा मिटर खोल समुद्रात.
पुणे शहरातील​ पिंपरी चिंचवड येथील ही अवघ्या तेरा वर्षाची ओवी पहिलीच स्कुबा डायव्हर होती. ही गोष्ट सर्वांसाठीच​ कौतुकास्पद होती. ओवी आणि विनय परदेशात पोहचले पण नातेवाईक मित्रांमध्ये लहान ओवीचे व तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे तीचे डॅड यांचे सर्वत्र कौतुक सुरू होते.भारतात तसे पाह्यला गेले तर अनेक ठिकाणी मुलींना सामाजिक,कौटुंबिक जडणघडणीमुळे​ अशा धाडसी व अभिनव साहसात भाग घेण्यासाठी अनेक मर्यादा येतात. पण ओवीला मात्र बरेच उत्तेजन मिळत होते.तिच्या सोबत एक सकारात्मक पाठिंबा होता. अशी सकारात्मक्ता प्रत्येक मुलीच्या पाठीशी असावी. ही सकारात्मकता ओवीला कुठे नेऊन पोहचवते ते बघु. 
'ड्रिम बिग अॅन्ड डिसाईड युवर गोल' या उक्तीप्रमाणे मोठं स्वप्न बघितलं आणि ते ध्येय साकार केलं,पिंपरी चिंचवड येथील तेरा वर्षाच्या ओवी अश्विनी विनय सातपुते हीने.वयाच्या तेराव्या वर्षी ओवीला मिळालेला स्वप्नपुर्तीचा आनंद इतका मोठा होता की त्यासाठी मोजलेल्या वेळेचं,कष्टाचं तिला अजिबात अप्रृप वाटलं वाटत नाही, म्हणूनच तिच्या कडून स्कुबा डायविंग च्या मोहिमेबद्दल ऐकतांना हे फारसं कठीण नसावं असा समज होऊ शकतो. किंबहुना, झाला देखिल. पण हे जगावेगळं धाडस करण्याची उत्तुंग ईच्छा ओवीच्या मनात कशी रूजली? हे अथांग स्वप्न ओवीने कधी बघीतले? याला निमित्त कोण  झालं? तर,आठवीच्या सुट्टीनंतर काय?हा प्रश्न जेव्हा तिच्या मनात निर्माण झाला तेव्हा ओवीने त्या प्रश्नाला खोलवर नेऊन पोहचवले.आणि अशा अथांग विचार प्रणालीत जेव्हा हा प्रश्न पोहचला तेव्हा सुट्टीत काहीतरी विक्रम करायचा असा निर्णय घेतला. हा विक्रम जेवढा अथांग गेला तेवढं त्या प्रश्नाच्या उत्तराने उत्तुंग मजल गाठली ती स्कुबा डायविंगच्या रूपाने. हे सर्व घडत असतांना ओवीचे आई-बाबा, आजी-आजोबा, सर्वच नातेवाईक दिपस्तंभासारखे ऊभे होते.
   माध्यमिक शिक्षण घेत असतांना मोहिम फत्ते करणं त्यासाठी आईची परवानगी मिळवणं तितकच आवश्यक होतं. ओवीच्या सोबत बाबा होतेच, पण आईची साथ तितकीच महत्वाची असते. आई जरी आय. टी. इंजिनीअर असली तरी तीचं हळवं मन आणि काळजी आडवी येत होती पण आता मागे सरकायचं नाही असा दृढ विश्वास ओवीच्या बाबांनी म्हणजेच विनयने ओवीला दिला, ह्या मोहिमेपर्यंत पोहचतांना अनेक अडचणी येणारच त्यावर मात करत पुढे जाण्यातच आता यशप्राप्ती आहे. असा आत्मविश्वास ओवीच्या श्वासात विनयने भरला आणि मोहिम सुरू झाली.
आपले मनच आपल्या क्षमतांचे मापदंड असते.जर मनच अस्थिर असेल तर शरिर काय करणार?विझलेला दिवा अंधारात काय मार्ग दागवणार ? म्हणून भिती ,शंका ,संशय या नकारात्मक भावनांना मनातुन काढून टाकले किंबहुना मनांत प्रवेश करूच दिला नाही.मनात महत्वाकांक्षा जर ठेवली तर आपल्या समोर आपले उद्दीष्ट स्पष्ट असते .आपले विचार हा आपल्या व्यक्तिमत्वाचा अंश असतो यशश्वी विरांचे सर्वजण स्वागत करतात.ज्याला अडचणी दूर करता येतात,संकटाशी सामना करता येतो हाती घेतलेले कार्य पुर्ण करता येते या गोष्टीला महत्व आहे हे सर्वच आत्मविश्वासामुळेच प्राप्त होते.आणि हाच आत्मविश्वास ओवी मध्ये होता.इच्छा ही आयुष्याच्या सगळ्या सुविधांची जननी आहे.इच्छा तेथे मार्ग.आपण रात्रंदिवस ज्या कामाचा ध्यास घेऊ ते काम आपल्या व्यक्तिमत्वाचेच एक अंग होऊन जाते.ज्यांच्याजवळ प्रचंड आत्मविश्वास असतो त्याने अर्धी लढाई सुरू होण्या पुर्वीच जिंकलेली असते.आणि ही लढाई येरवडा येथे प्रथमतः स्कुबा डायविंग केलेल्या ओविने जिंकली होती.हे जग आत्मविश्वासाने पुढे जाणा-याला रस्ता करून देते ओवीला मार्ग दिसला तो थायलंडचा.किंबहुना दाखवला सुपर डुपर डॅड विनयने.एक आदर्श पिता  म्हणून विनयचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतांना ओवी हा त्याच आदर्शाचा भाग आहे हे लक्षात घेऊन त्यांचा आदर्श ओवीच्या मनीमानसी ठसलेला आहे.अशी अंतरिक प्रेरणा ओवीला वारंवार होत होती.आणि पिता रूपी गुरूंनी सांगितलेल्या मार्गानेघोडेदौड सुरू करायची निश्चित केले.हा ध्यास ओवीने मनी धरला नाही तर ध्येयाच्या दिशेने प्रवास कसा होणार?
 भितीला तुम्ही थेट सामोरे गेलात तर त्या दरवाज्याच्या पलिकडे तुमच्यासाठी यश वैभवाची एक भली मोठी भेट तुम्हाला दिसेल असे म्हणतात.आणि तशीच यशप्राप्तीची उत्तुंग अशी भेट अथांगते पर्यंत पोहचण्याची ओवीपुढे उभी राहीली.
मनातील असुरक्षितता ,आपल्या मनातील गोंधळ,भिती ओवी मध्ये कधी दिसूनच आली नाही.सर्वांनाच महानतेची एक ओढ असते यातही प्रत्येकाजवळ सर्वोत्तमाकडे ,उत्कृष्टतेकडे जाणारी एक अनाम शक्ती या ना त्या प्रकारे असतेच ज्याद्वारे आपण सभोवतालच्या जगतावर आपला स्वतःचा एक ठसा उमटवु शकतो.तशी उत्कट ,अथांग इच्छा ओवी मध्ये होती म्हणूनच ओवी आज तेराव्या वर्षी सर्वांचेच लक्ष बनून राहिली आहे.
    जोपर्यंत माणूस किनारा सोडण्याचे धाडस करत नाही तोपर्यंत तो नव्या महासागराचा शोध लावत नाही. ह्या विचारांनी विनय आणि ओवीचा 'अथांग' प्रवास सुरू झाला तो कोणतेही भय मनात न बाळगता. ध्येय निश्चिती हेच मोठे ध्येय भरारी घेत होते. ही झेप घेण्यासाठी विनय आणि आई अश्विनी यांनी चिमुरडीच्या पंखात बळ निर्माण केलं. त्या चिमुरडीने देखिल तेवढीच साथ दिली. मनात येणा-या द्विधा मनस्थितीला पुर्णविराम दिला आणि खोलवर पोहचण्याचं घेतलेलं आव्हान निश्चित केलं. अश्विनीची साथ, ओवीची मेहनत, चिकाटी पाहून विनयच्या विचारांची पकड घट्ट होत होती. पुण्यात येरवडा येथे स्कुबा डायविंग कोणत्याही सरावा शिवाय केले.स्कुबा डायविंग करत असतांना येणा-या अडचणींवर मात करत भरारी घेणे निश्चित केले."ईच्छा तेथे मार्ग" आपण वाचत आलो,ऐकत आलो अनुभवायची आता वेळ आली .अवघडाकडून सोप्याकडे जाणारे आहेत पण सोप्या कडून अवघड मार्ग स्विकारणारी ही चिमुरडी पहिलीच.ईच्छा व्यक्त केलेल्या आणि कृतीत उतरवलेल्या मार्गावर किती अडथळे आहेत हे तिला आणि विनयला माहित होते पण ते अडथळे दूर सारून 'लक्ष' पर्यंत पोहचण्याचा निर्णय घेतला.म्हणजेच भारता पुरतं मर्यादित न राहता पुढे जाण्याचा मानस ठेवुन परदेशात जाण्याचा निर्णय घेतला. थायलंड येथील स्कुबा विषयी भारतीय प्रशिक्षक माहीती देतच होते. जसं ड्रायव्हिंग शिकायचं असेल तर आपल्याला वाहतूकीच्या नियमांची माहिती करून घेणे आवश्यक आहे, त्या बरोबरच​ त्या साठी लागणारे उपकरण म्हणजे मोटार व तीचे विविध भाग क्लच, ब्रेक, एक्सिलेटर, इंजिन यांची माहिती व ते हातळायचं तंत्र अवगत होणं गरजेचं आहे. एकदा तुम्हाला हे ज्ञान व ते तंत्र माहीत झाले का तुम्हाला वाहनचालकाचा परवाना मिळतो व मग तुम्ही ड्रायव्हिंगचा मनमुराद आनंद घेऊ शकता. तसंच स्कुबा डायव्हिंगच पण आहे. स्कुबा डायव्हिंग म्हणजे काय? तर उडी मारणे, पण ही उडी कुठे? तर समुद्राच्या तळाशी. अशी उडी मारून लगेच बाहेर नाही यायचं तर दीर्घकाळ तिथे राहून तिथे असणाऱ्या जिवसृष्टी, जलचर, समुद्राचा तळ यांच निरीक्षण व अभ्यास करायचा. पण मानवी शरीर तर प्राणवायू विरहित वातावरणात राहूच शकत नाही, मग यासाठी परिधान करायचं एक चिलखती सारखं उपकरण ज्याला म्हणतात स्कुबा. तर या स्कुबा मध्ये उच्च​ दाबाच्या शुद्ध हवेची सिलिंडर्स असतात व एक रेग्युलेटर, ज्या मार्फत डायव्हरला सभोवतालच्या दाबानुसार हवेचा सतत पुरवठा होत असतो की जेणेकरून त्याचा समुद्र तळाशी वावर सुकर व्हावा व निरीक्षण करता यावं. या स्कुबाच्या  हाताच्या व पायाच्या तोंडाला माशासारखे वल्हे किंवा फिन्स असतात. या फिन्सच्या विशिष्ट हालचालींनी स्कुबा डायव्हर समुद्राच्या तळाशी  सहज फिरू शकतो. अशाप्रकारे ही माहिती व तंत्र शिकण्या बरोबरच स्कुबा डायव्हरला संभाव्य धोके व अपघातांची व ते टाळण्याचं कसब माहीत असणे तितकेच महत्त्वाचे आहे. तुम्ही एकदा या सर्व बाबींमध्ये पारंगत झाला का तुम्हाला स्कुबा डायव्हरच प्रमाणपत्र मिळतं. सुरवातीला तुम्हाला फक्त २०मीटर खोली पर्यंत व दिवसाच डायव्हिंग करता येते. जसजसा तुमचा सराव वाढतो व कौशल्य वृध्दींगत होते तसतसा तुमचा प्रमाणपत्राचा स्तर वाढतो व तुम्ही जास्तीत जास्त काळ, खोली व हव्या त्या वेळेस डायव्हिंग करू शकता.हे.ऐकुन ओवीचे व विनयचे मन अजिबात कचरले नाही किंबहुना उत्सुक्ता वाढतच गेली.हळवे मन असणा-या अश्विनीला ,आजी-आजोबांना याची थोडीही कल्पना होऊ न देता ;सोप्प असतं,मजा येते असे सांगून अश्विनीला दिलासा देत.हाच दिलासा आणि आत्मविश्वास मनांत बाळगून ३१ मे २०१७   रोजी पुणे ते फुकेत पर्यंतचा विलक्षण प्रवास सुरू झाला.कठोर परिश्रम आणि महत्वाकांक्षेमुळे अतर्क्य आणि अशक्य गोष्टी शक्य होतात हे उदाहरण म्हणजे ओवि आणि विनय यांचे.आत्मविश्वासाचा कलश ओवी पुढे खुला करून देणारे तिचे बाबा तिच्या सोबत तीचे 'बडी' म्हणून होते.दूर किना-यावर उभे राहून अनुभवलेला अथांग समुद्र आणि खोलवर जाऊन अनुभवलेला समुद्र यात विलक्षण तफावत होती.जसं जसं खोलवर जात होते समुद्राचे खवळणे ती समुद्राची गाज त्या लाटा सगळं डोळ्या समोर येत होते.समुद्र किना-यावर ऊभं असतांना जेव्हा ओवी ने जवळ जवळ येणा-या लाटा पाहिल्या त्या महत्वा कांक्षेचे प्रतिक आहेत असे मनोमन ठरवले आणि दूर दूर जाणा-या लाटा आपल्या मनातील भय दूर दूर नेतांना बघत होती तेव्हाच मनात सकारात्मकता आणखीनच दृढ झाली.अडथळ्यांची शर्यत पार करत विशाल समुद्राच्या पोटातील अनोखी सजीव सृष्टी आणि अनेक प्रकारच्या वनस्पती त्यांनी जवळून अनुभवल्या हा एक आगळा वेगळा अनुभव त्यांनी अठरा मिटर खोल जाऊन  घेतला.आपल्या अवती भोवती रंगीबेरंगी मासे फिरताहेत मध्येच एखादं छोटसं कसाव नजरे समोरून जातं .एरवी सहजासहजी न दिसणारे दगडगोटेही नजरेस पडणं .पाण्याच्या खाली असलेल्या या स्वप्नवत दुनियेची सफर म्हणजे एक स्वप्न आणि आव्हान होतं.
फुकेत ला पोहचे पर्यंत त्यांच्या वाटेला अडथळे आले.पण त्या अडचणींचा कुठेही उहापोह होऊ दिला नाही.कारण त्यांच लक्ष निश्चित होईलच हा आत्मविश्वास त्यांच्यात होता. याच विश्वासाच्या बळावर त्यांचे साहस सत्यात बदलत होते. स्कुबा डायविंगची परीक्षा म्हणजे एक विलक्षण अनुभव.तो पुर्ण करून परततांना ओवीच्या मनात नविन स्वप्न जागा घेत होते.तिने ते स्वप्न पुर्ण केले ते   " *वुई कॅन इफ यु विल* या पुस्तकाच्या माध्यमातून .
ह्या लहानश्या ओवीने या पुस्तकाचे लिखाण करून चिमुरड्यांच्या पंखात बळ निर्माण करण्याचे काम केले.ओवी आणि विनय चे हे प्रेरणादायी पुस्तक सकारात्मकते कडे आणि उद्देशा पर्यंत पोहचण्याचा मार्ग ठरले.हे पुस्तक म्हणजे उत्कृष्ट आयुष्य संहिता आहे.वाचकांच्या जीवन प्रवासात एक मार्गदर्शक म्हणून हे पुस्तक नेहमीच उभे असेल.प्रत्येक गोष्टीचा जन्म दोन वेळा होतो प्रथम कल्पनेत ,स्वप्नात आणि नंतर वास्तवात ओवी आणि विनय यांनी त्यांचे स्वप्न वास्तवात उतरवुन -
जब तक सफल न हो निंद चैन कि त्यागो तुम,
जीवन संघर्षोका मैदान छोडकर मत भागो तुम 
कुछ किये बिना ही जयजयकार नही होती
कोशिश करने वालोंकी कभी हार नही होती।
हा संदेश देत आहे.
ओवी सारख्या अनेक ओवी तयार व्हाव्यात यासाठी प्रत्येकाच्या भोवती आत्भविश्वासाची प्रदक्षिणा घालतांना दिसत आहेत.
'WE CAN IF U WILL' या पुस्तकाला प्रस्तावना उत्तर व दक्षिण धृवावर झेप घेऊन विश्वविक्रम केलेल्या शितल महाजन यांची आहे. त्यात त्यांनी ओवीचे कौतुक करतांना म्हटले आहे की हे पुस्तक वाचतांना मला मनस्वी आनंद झाला कारण ह्या साहसी क्रिडा प्रकारात ओवी सारखी उदयोन्मुख स्टार मी पाहते. ह्या साहसी खेळाबद्दल आणि समुद्रातील प्राण्यांबद्दल ओवीच्या मनात प्रेम आहे. भविष्यात अशा साहसी खेळांमध्ये ओवी सारखे अनेक खेळाडू भारताला नक्कीच मानांकन मिळवुन देतील.ह्या पुस्तका अंतर्गत ओवी ने 'कमवा आणि शिका"हा उपक्रम राबवुन अनेक गरजू मुलींना शिक्षणा साठी मदत केली आहे.हे पुस्तक विकुन त्यातून जो पैसा मिळेल तो १००% पैसा त्या मुलीच्या शिक्षणाला लावुन त्या मुलीच्या मनांत शिक्षणाविषयी ओढ निर्माण करून दिली.हा उपक्रम अतिषय स्तुत्य आहे.ओवीच्या ह्या सर्वच गोष्टींची दखल *GRRF*  (Global Records & Reserch Foundation) ने घेऊन क्रिडा क्षेत्रातील लहानात लहान लेखिका म्हणून घोषित केले .तसे सन्मानपत्र तिला देऊन सन्मानित केले.ही अत्यंत कौतुकाची गोष्ट आहे.एक आदर्श पालकत्वाची भुमिका बजावणारे विनय ओवीला एक सुपर नायक नक्कीच बनवतील.
विनय आणि अश्विनी सारखे पालक लाभले तर म्हणावं लागेल...

परिंदो को मिलेगी मंजिल यकिनन
ये फैले हुए उनके पर बोलते है
वो लोग रहते है अक्सर खामोश
जमाने मे जिनके हुनर बोलते है।



सौ.माधवी महेश पोफळे
'नलिनी', पोफळे नगर,
सटाणा रोड,
मालेगांव-423203 
जिल्हा-नाशिक.
mpophale34@gmail.com